✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उंबरा

ह — हर्षल_चव्हाण, Wed, 07/13/2016 - 11:49
सैल झाले बंध आता, व्यर्थ आहे बांधणे, दोन धृवांतील अंतर, हे कशाने सांधणे? मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले, "नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे... शोध घेताहे सुखाचा, दु:ख ये पत्त्यावरी, (पण मनाला आस ही, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत देव्हार्‍यात वा तिरडीवरी आहे जरी, "पण, जरा उमलून घे", आहे फुलांचे सांगणे, का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? अंगणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या हद्दीत येते, प्रेम हे माझे-तुझे? उंबरा आहे शरीराचा, मनाने लांघणे... - हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

प्रतिक्रिया द्या
5307 वाचन

💬 प्रतिसाद (38)

वरील कविता वाचुन आम्हाला हे "शी"घ्र काव्य सुचले

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/13/2016 - 12:26 नवीन
हरभरा.... सैल झाली नाडी आता, व्यर्थ आहे थांबणे, दोन क्षणांची प्रतिक्षा, तो वरी का कुंथणे, मी तुझ्या डब्यात माझे पाणी होते ओतले, बोट त्यात बुडवु नको तू, व्यर्थ आहे चिवडणे, शोध घेता मी डब्याचा, टिश्यु येतो सामोरी, पण मनाला आसही की, स्वच्छ निर्मळ वाटणे, अंत माळरानात वा शौचालयी आहे जरी, "उद्या पुन्हा फिरुन येरे" आहे जगाचे सांगणे का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? *गणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या चड्डीत येते, लव्ह हे माझे-तुझे? तोबरा कांदाभजीचा अन, टारारा **णे... (आमच्या गुरुजींना सविनय समर्पित...) तुटलेबंध (३०-०२-२२२२ स ६.०० वाजता सिंव्हगड एक्सप्रेस मधे, गाडी स्टेशन मधुन बाहेर पडली की ताबडतोब) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अगं अयायायायायाया ...मेलो...

चिनार
Wed, 07/13/2016 - 12:38 नवीन
अगं अयायायायायाया ...मेलो... थांबा....जरा कुंथुन येतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आणि तुमचे (अर्थात सर्वांचे) गुर्जी

नाखु
Wed, 07/13/2016 - 12:46 नवीन
धन्य झाले !!!! त्यांनी या धाग्यावर पायधूळ झाडलीच पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

का निघेना पाय येथुन, का

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/13/2016 - 12:50 नवीन
का निघेना पाय येथुन, का पुन्हा ती ओढही? *गणी माझ्या मनाच्या, आठवांचे रांगणे... कोणत्या चड्डीत येते, लव्ह हे माझे-तुझे? तोबरा कांदाभजीचा अन, टारारा **णे... (आमच्या गुरुजींना सविनय समर्पित...) तुटलेबंध (३०-०२-२२२२ स ६.०० वाजता सिंव्हगड एक्सप्रेस मधे, गाडी स्टेशन मधुन बाहेर पडली की ताबडतोब) पैजारबुवा,
साष् टांग प्रणी पात! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

विडंबनमाऊली.

अभ्या..
Wed, 07/13/2016 - 18:16 नवीन
विडंबनमाऊली. साष्टांग राह्यला होता नमस्कार. घ्यावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

पैजारबुवा __/\__

सस्नेह
गुरुवार, 07/14/2016 - 09:20 नवीन
पैजारबुवा __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अरे अरे काय हे पैजार बुवा.

प्रमोद देर्देकर
गुरुवार, 07/14/2016 - 09:34 नवीन
अरे अरे काय हे पैजार बुवा. अक्षरशः चहा सांडला ना अंगावर, ऑफिसमधले सगळे बघताहेत माझ्याकडे. साष्टांग नमस्कार. हर्षल तुमची कविताही चांगली आहे. आणि अंत देव्हा... ही ओळ क्लासच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

मूळ काव्य मात्र अव्वल आहे..

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/13/2016 - 12:52 नवीन
मूळ काव्य मात्र अव्वल आहे.. एकच नंबर हो- हर्षल_चव्हाण.
  • Log in or register to post comments

+१ सुरेख आहे कविता!

रातराणी
Wed, 07/13/2016 - 13:55 नवीन
+१ सुरेख आहे कविता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

बापरे...

हर्षल_चव्हाण
Wed, 07/13/2016 - 13:36 नवीन
ज्ञानोबा, धन्य आहात, तुम्ही विडंबन लिहून (की आणखी काही करून) मोकळे पण झालात ;) मला एवढ्या वेदना नव्ह्त्या झाल्या काही ... सपशेल आडवी केलीत कविता :D आत्मबंध, तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद...

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 07/13/2016 - 15:18 नवीन
ह. घेतल्याबद्दल धन्यवाद हर्षल, कविता खरोखरच छान आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हर्षल_चव्हाण

:)

हर्षल_चव्हाण
Wed, 07/13/2016 - 17:50 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)

सतिश गावडे
Wed, 07/13/2016 - 15:03 नवीन
हर्षल (१३/०७/१६ - दु. ३.००)
ठिकाण राहीले की. आधी मला वाटले ही आजची हर्षलास्त किंवा हर्षलोदयाची वेळ असावी. कविता छान आहे.
  • Log in or register to post comments

कविता लिहून पूर्ण होण्याची

हर्षल_चव्हाण
Wed, 07/13/2016 - 17:53 नवीन
कविता लिहून पूर्ण होण्याची वेळ टाकतो. कधीतरी एखादी सुचते, म्हणून... बाकी, कल्पना आवडली उदयास्ताची :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आवडले रे लेखन हर्षल. अव्वल

अभ्या..
Wed, 07/13/2016 - 18:13 नवीन
आवडले रे लेखन हर्षल. अव्वल आहे अगदी.
  • Log in or register to post comments

धन्यवाद :)

हर्षल_चव्हाण
गुरुवार, 07/14/2016 - 06:57 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कविता सुंदर!

चांदणे संदीप
Wed, 07/13/2016 - 23:53 नवीन
विडंबन...... पैजारबुवा..... ___/\____ मैल झाले बंद आता, व्यर्थ कोस मोजणे दोन मजलातील दर, ही कशाने गाठणे? मी तुझ्या रस्त्यात माझ्या, वाटा होत्या गुंफल्या, चघळत्या चर्चा नको, पारास माझे सांगणे... शोध घेता मी जरासा, गाव सारे दारावरी, (अन् मला आस मी, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे, का ढळेना सूर्य येथून, का पुन्हा ती काहिली? अंगणी माझ्या प्रितीच्या, का उन्हाचे नाचणे? कोणत्या हद्दीत सखे, गाव हे माझे-तुझे? उंबरा आहे कशाचा? आले आता शोधणे... हर्षलराव, कविता लै आवडलीये! :) Sandy
  • Log in or register to post comments

कविता सुंदर!

चांदणे संदीप
Wed, 07/13/2016 - 23:54 नवीन
विडंबन...... पैजारबुवा..... ___/\____ मैल झाले बंद आता, व्यर्थ कोस मोजणे दोन मजलातील दर, ही कशाने गाठणे? मी तुझ्या रस्त्यात माझ्या, वाटा होत्या गुंफल्या, चघळत्या चर्चा नको, पारास माझे सांगणे... शोध घेता मी जरासा, गाव सारे दारावरी, (अन् मला आस मी, व्हावे उन्हाचे चांदणे)... अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे, का ढळेना सूर्य येथून, का पुन्हा ती काहिली? अंगणी माझ्या प्रितीच्या, का उन्हाचे नाचणे? कोणत्या हद्दीत सखे, गाव हे माझे-तुझे? उंबरा आहे कशाचा? आले आता शोधणे... हर्षलराव, कविता लै आवडलीये! :) Sandy
  • Log in or register to post comments

:)

हर्षल_चव्हाण
गुरुवार, 07/14/2016 - 06:59 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

छान कविता आहे संदिप.

सतिश गावडे
गुरुवार, 07/14/2016 - 10:02 नवीन
छान कविता आहे संदिप.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

Sandybaba, tuzi kavita

अभ्या..
गुरुवार, 07/14/2016 - 10:08 नवीन
Sandybaba, tuzi kavita aawadali.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

धन्यवाद दादानु! __/\__

चांदणे संदीप
गुरुवार, 07/14/2016 - 10:45 नवीन
कविता आवडल्याचे सांगितल्याबद्दल सर्वांचे आभार... पण खरे श्रेय मूळ कवीला... श्री हर्षल चव्हाण यांचा झिंदाबाद! :) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कविता आणि त्यांची दोन्ही

प्रचेतस
गुरुवार, 07/14/2016 - 06:59 नवीन
कविता आणि त्यांची दोन्ही विडंबने लै भारी.
  • Log in or register to post comments

+१

माहितगार
गुरुवार, 07/14/2016 - 09:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुंदर!! आवडलीच

प्रीत-मोहर
गुरुवार, 07/14/2016 - 08:29 नवीन
सुंदर!! आवडलीच
  • Log in or register to post comments

या कडव्याने

नाखु
गुरुवार, 07/14/2016 - 08:57 नवीन
अंत पेपरात वा, जरी चौकातल्या फळ्यावरी, पण, जरा "वाचून" घे काय त्या शब्दांचे सांगणे,
आम्हाला बुवांचा अजरामर फलक धागा आठवला. संदीपा बेष्ट लेका. नित्वाचक नाखु
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
गुरुवार, 07/14/2016 - 09:14 नवीन
सुरेख कविता!
  • Log in or register to post comments

मी तुझ्या श्वासात माझे श्वास

मदनबाण
गुरुवार, 07/14/2016 - 09:18 नवीन
मी तुझ्या श्वासात माझे श्वास होते गुंफले, "नाव या नात्या नको", गर्दीस माझे सांगणे... वाह्ह... विडंबन सुद्धा लयं भारी हायेत... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- रंभा हो हो...संभा हो हो... :- Armaan
  • Log in or register to post comments

कवितेचा आशय आवडला.

सस्नेह
गुरुवार, 07/14/2016 - 09:21 नवीन
कवितेचा आशय आवडला. मीटर जरा गंडलंय.
  • Log in or register to post comments

+१

एस
गुरुवार, 07/14/2016 - 10:15 नवीन
हेच म्हणायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धन्यवाद :) कुठे माशी शिंकलीय,

हर्षल_चव्हाण
गुरुवार, 07/14/2016 - 16:38 नवीन
धन्यवाद :) कुठे माशी शिंकलीय, जरा लक्षात आणून द्याल का? सुधारेन तसं...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

मस्तंय कविता आवडली.

पेशवा भट
गुरुवार, 07/14/2016 - 09:27 नवीन
मस्तंय कविता आवडली.
  • Log in or register to post comments

कविता छान विडंबन महान ;)

अजया
गुरुवार, 07/14/2016 - 09:50 नवीन
कविता छान विडंबन महान ;)
  • Log in or register to post comments

वाह!!!!

अनिरुद्ध प्रभू
गुरुवार, 07/14/2016 - 09:55 नवीन
तिनही कविता उत्तम.... पैजारबुवा,........ सासाटांग नमस्कार हो!!!! (नतमस्तक) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments

व्हर्जिनल कविता, एक 'शि'डंबन

धनंजय माने
गुरुवार, 07/14/2016 - 10:17 नवीन
व्हर्जिनल कविता, एक 'शि'डंबन आणि एक सुडंबन सगळं आवडलं.
  • Log in or register to post comments

मुळ कविता अतिशय आवडली.

किसन शिंदे
गुरुवार, 07/14/2016 - 10:53 नवीन
मुळ कविता अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

वाह

चाणक्य
गुरुवार, 07/14/2016 - 11:20 नवीन
मस्त आहे कविता.
  • Log in or register to post comments

वाह

चाणक्य
गुरुवार, 07/14/2016 - 11:45 नवीन
मस्त आहे कविता.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा