Skip to main content

पुन्हा झकीर नाईक

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 08/07/2016 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=I6GY8WvRHo8 झकीर नाईक हा एक तल्लख स्मरणशक्ती असणारा, खर्‍या खोट्याची बेमालूम मिसळ करून सांगणारा एक वहाबी तत्त्वज्ञानाचा पाईक आहे. अरबी देशातून ह्याच्या संघटनेला भक्कम पैसा मिळतो. बांगला देशात ढाका इथे जे जीवघेणे अतिरेकी हल्ले झाले त्यातील अतिरेकी हे झकीर नाईकचे भक्त होते. त्यामुळे ह्या इसमाला आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. सॅटॅनिक व्हर्सेस एक मोठे उदाहरण आहे. जेम्स लेनचे शिवाजी महाराजांवरचे पुस्तक हे एक दुसरे. अशा प्रकारची बंदी घातलेल्या साहित्याची यादी प्रचंड मोठी आहे. (https://en.wikipedia.org/wiki/List_of_books_banned_in_India) माझ्या मते ह्या माणसाचे विचार खंडन करुन टाकावेत. बंदी घालून काही साध्य होत नाही. व्यासपीठावर, झगमगाटात, हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत (ज्यातले बहुतेक त्याचे भक्तच असतात) तो अगदी दिपवून टाकणारे काहीतरी भव्यदिव्य बोलतो. पण बारकाईने तपास केला तर त्याच्या मुद्द्यातील कच्चे दुवे सहज कळतात. सौदी अरेबियात बाकी धर्मस्थळे बनवायला परवानगी नाही ह्याचे उत्तर असे की गणिताचे शिक्षक नेमायचा असेल तर २+२=४ उत्तर देणारा नेमाल का २+२=५ असे उत्तर देणारा? इस्लाम हा २+२=४ उत्तरवाला आणि बाकी धर्म २+२=५ किंवा २+२=३ वाले आहेत म्हणून त्यांना परवानगी नाही असे खरे तर संतापजनक आणि अन्य धर्मांना तुच्छ लेखणारे ह्याचे उत्तर यू ट्युबवर उपलब्ध आहे. https://www.youtube.com/watch?v=mzq--C6rHIY अशा विचारांनी प्रभावित होऊन कुणी ढाक्यातील अतिरेक्यांप्रमाणे कुराणातील आयतांवर प्रश्न विचारून ते न येणार्‍यांचा शिरच्छेद केला तर झकीर नाईकाचा त्यात वाटा नाहीच असे कसे म्हणता येईल? एखाद्या देशातील लोकशाही, विचारस्वातंत्र्य ह्यांचा वापर करुन असहिष्णूपणा, दहशतवादाला पूरक विचार मांडणे ही एक डोकेदुखी बनत आहे. भारताप्रमाणे इंग्लंड, अमेरिका इथेही असले प्रकार होताना दिसतात. ह्याला आळा कसा घालावा हा एक क्लिष्ट प्रश्न आहे. असल्या प्रकारावर उतारा म्हणून हा उपाय कसा वाटतो? https://www.youtube.com/watch?v=F630rQ2lrWU

वाचने 59010
प्रतिक्रिया 271

प्रतिक्रिया

आपले विचार खुलेपणाने मांडू द्यावेत की बंदी घालावी अशा चर्चा भारतीय माध्यमात होऊ लागल्या आहेत. खरे तर कुठल्याही विचारावर बंदी घालणे चूक. पण भारतात असे निर्भेळ विचारस्वातंत्र्य नाही. हुप्प्या भौ पुढे नाय वाचले. एक ठरवा काय ते मग बोलु.

बापूजींची हत्या करणार्‍यानेही मी अमके तमके यांना गुरु मानतो असे सांगितले होते ना ?

In reply to by चंपाबाई

१. सावरकरांवर रीतसर खटलाही भरला होता. कडव्या गांधीवाद्यांकडून त्यांच्या नातेवाईकांना मारहाणही झाली होती. झकीर नाईकांना तसे करावे असे सुचवताय का? २ गांधींना मारणे हा दहशतवाद होता का? माझ्या मते नाही. ती एक ठरवून केलेली राजकीय हत्या होती. हातात पिस्तुल होते, अनेक नि:शस्त्र लोक जे गांधीचे भक्त म्हणजे नथुरामचे विरोधी होते. पण अन्य कुणालाही मारले नाही. ढाक्यात जे झाले तो शुद्ध दहशतवाद होता. त्या बेकरीत उपस्थित लोकांना केवळ मुस्लिम नाहीत, कुराण येत नाही म्हणून ठार केले गेले. गांधींना मारणे आणि हा प्रकार ह्यात आपणास फरक दिसत नाही का?

In reply to by हुप्प्या

केवळ गुरु आहेत असे म्हटल्याने खटला झाला नव्हता. कटात सामील असण्याचा संशय होता म्हणुन खटला झाला होता. .... गुरु मानणे व कटात सामीलही असणे / तसा संशय असणे यात फरक आहे न ?

In reply to by चंपाबाई

१. गांधींना मारणे हा दहशतवाद नव्हता. गांधींना मारणे इतकाच मर्यादित हेतू ठेवून सगळी आखणी झाली होती. जगभरच्या अमुक एका विचाराला न मानणार्‍या मिळेल त्या व्यक्तीला कसेही करून ठार मारण्याचा हा जगत्व्यापी कट नव्हता. इथे म्हणजे ढाका, मदिना, अन्कारा, बगदाद ह्या विविध ठिकाणी तो तसा आहे असे दिसते आहे. २. झकीर नाईकच्या जहाल विचारांचा प्रचार प्रचंड प्रमाणात होत आहे. प्रेक्षकांपैकी अगदी १ टक्का लोक माथे फिरून हिंसक कारवाया करु लागले तरी मोठे उत्पात होऊ शकतात. देशांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. अशा विचारांचा प्रसार करु देण्याकरता भूमी, व्यासपीठ उपलब्ध करुन द्यायला बहुसंख्य बिगरमुस्लिम असणारा देश बांधील आहे का? ३. वर्तमानकाळातील प्रत्येक घटनेला गांधीहत्येशी संबंध जोडून तिथे तसे घडले मग आता का नाही असे विचारणे हे आवश्यक आहे का? असे केल्याने वर्तमानकाळातील समस्या सोडवणे सोपे जाते का? ४. गांधीहत्येनंतर महाराष्ट्रातील विशिष्ट गटाने तमाम ब्राह्मण घरात मारहाण, जाळपोळ, लुटालूट केली. कित्येक ब्राह्मण कुटुंबे बेघर होऊन देशोधडीला लागली. पोलिस व कायद्याने ब्राह्मण लोकांना वार्‍यावर सोडले होते. निदान ह्या गोष्टीचे वर्तमानकाळात वा भविष्यात कधीही अनुकरण होऊ नये अशी माझी तरी इच्छा आहे.

In reply to by हुप्प्या

दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी यांची हत्या म्हणजे धार्मिक दशतवादच. आणि त्यावर इथे का काथ्याकूट होत नाही बरे?? दांभिक कुठचे

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

संजय पाटील यांनी काढलेला धागा होता. आणि इतरांना दांभिक म्हणण्याऐवजी स्वतः धागा काढा की. लोक करतील चर्चा. बरं; दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी या तिन्हीही हत्यांमध्ये अजून खटला होऊन निकाल लागणं वगैरे प्रकार व्हायचे आहेत. त्यांची हत्या धार्मिक कारणावरून झाली हे अजून सिद्ध झालेलं नाही. मग तुम्हाला काही का वाटेना!

In reply to by बोका-ए-आझम

कलबुर्गींच्या हत्येवर काथ्याकूट झालेला आहे.
हो झाला ना! तोंडदेखला निषेध नोंदवून आपला अजेंडा चालवणार-या बर्याच प्रतिक्रिया पाहिल्या.
तिन्हीही हत्यांमध्ये अजून खटला होऊन निकाल लागणं वगैरे प्रकार व्हायचे आहेत. त्यांची हत्या धार्मिक कारणावरून झाली हे अजून सिद्ध झालेलं नाही.
डाॅ तावडे आणि अकोलकर हे काय आयसिसचे मेंबर आहेत काय?? एबीपी माझावर या प्रकरणातील कोल्हापूरच्या साक्षीदाराची मुलाखत ऐकली आहे का? कि सोयीचं तेवढचं घेता?
आणि इतरांना दांभिक म्हणण्याऐवजी स्वतः धागा काढा की.
आमचे धागे उडवतात इथे.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

इस्लामी कट्टरता आणि दहशतवाद याबाबत इथे चर्चा करून काही उपयोग नाही कारण इथे कोणी मुसलमान नाहित कि जेणेकरून त्यांना समुपदेशन मिळेल,पण दभोलकर-पानसरे यांबद्दल चर्चा केली तर कायतरी उपयोग होईल,कारण इथे बरेच सनातनी आणि देवभोळे लोक आहेत त्यामुळे निदान चर्चा वाचून इथल्या पूर्णसंख्यांक हिंदूना समुपदेशन तरी मिळेल.

In reply to by भोळा भाबडा

...याबाबत इथे चर्चा करून काही उपयोग नाही कारण..
१) मंगळ अथवा शनी ग्रहावरील इथे कोणी नसले तरीही आम्ही मिपावर चर्चा करतो :), सभ्यतेच्या संकेतात आणि मिपाच्या धोरणात बसते तो पर्यंत मिपा एक चर्चामंच आहे सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्याच पाहीजेत. २) मिपा हे आजच्या घडीला सर्वाधीक वाचले जाणारे मराठी चर्चामंच संस्थळ आहे, ज्या विषयाबद्दल हा धागा आहे ती व्यक्ती महाराष्ट्रात राहते संस्था चालवते महाराष्ट्रातून प्रचार चालवते त्याच्या यथायोग्यते बद्दल मिपावर चर्चा होऊ नये ? कमाल आहे ? चर्चा न झाल्यामुळे अविश्वास पूर्वग्रह वाढले तर ते कुठल्या मंचावर हाताळले जाणार ? ३) आज सगळ्याच समुदायांची नवी पिढी इंग्रजी माध्यमातून शिकते आहे समुपदेशनही इंग्रजी भाषेतून अधिक श्रेयस्कर पण इंग्रजी भाषेत लिहिणारे समुपदेशनात यशस्वी झाले असते तर हा प्रश्नही उपस्थीत झाला नसता म्हणजे इंग्रजीतून चर्चा करणारे कुठेतरी कमी पडताहे म्हणून स्थानीय भाषेत चर्चा झाली तर त्यांना न जमलेल्या काही रचनात्मक बाजू मराठीतून पुढे येऊ शकतील असा विचार का करु नये ? ४) अमुकतमूक समुदाय महाराष्ट्रात कैक शतके राहतो आणि मराठी चर्चामंचावर नसतो याचा कार्यकारणभाव वेगळ्या चर्चेचा विषय आहे तुर्तास विषय काढलात तर लक्ष वेधतो ५) इतर गोष्टींबद्दल चर्चा वेगवेगळ्या धाग्यातून होतच असतात दुसर्‍या मुद्द्यांकडे लक्ष वेधून एखाद्या विषयावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तार्कीक उणीवेचा तर आहेच पण त्या पेक्षा आपण चर्चा दाबतो तेव्हा रचनात्मकताही दाबत असू शकतो त्यामुळे अशापद्धतीने चर्चा दाबण्याची मनिषा कितपत सकारात्मक ठरते या बद्दल साशंक आहे.

In reply to by माहितगार

५) इतर गोष्टींबद्दल चर्चा वेगवेगळ्या धाग्यातून होतच असतात दुसर्‍या मुद्द्यांकडे लक्ष वेधून एखाद्या विषयावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न तार्कीक उणीवेचा तर आहेच पण त्या पेक्षा आपण चर्चा दाबतो तेव्हा रचनात्मकताही दाबत असू शकतो त्यामुळे अशापद्धतीने चर्चा दाबण्याची मनिषा कितपत सकारात्मक ठरते या बद्दल साशंक आहे.
किंचित असहमत, मुद्दा दाबण्याचा काहीच हेतू नाही. माय पाँईंट इज,आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे न पाहता निरर्थक अत्मरंजन चालू असते. सनातन वृत्ती,देवभोळेपणा,कर्मकांड इत्यादी गोष्टींवर चर्चा करणार-यांना इथे काय प्रतिष्ठा आहे ते आपणास माहित आहेच,सगळे कसे अंगावर धावून जातात?(उदा-यनावाला) बाकि चर्चा दाबण्याची मनिषा नाही ओ साहेब.

In reply to by भोळा भाबडा

माय पाँईंट इज,आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे न पाहता निरर्थक अत्मरंजन चालू असते.
मी आस्तीक नास्तीक ह्या धर्माची बाजू ते त्या धर्माची बाजू उजवी डावी बर्‍याच विषयांवर मी लेखन केले आहे, मी तटस्थपणे लेखन आणि सगळ्यांच्या योग्य बाजूला उचलतो आणि टिकाही करतो एकांगी लिहीत नाही याची माहिती झाली आहे ते सहसा माझ्या अंगावर धावून येत नाहीत. व्यक्तिगत टिकेसंबंधी आणि तार्कीक उणीव यूक्त लेखन होते -तार्कीक उणिवा दाखवून दिल्या की भागते- पण जगातली ९९ % लोक तर्कशुद्ध बुद्धी प्रामाण्यावर नाही भावनांवरच जगतात हे ही वास्तव नाही का ? बाकी बुडा खाली अंधार हे वास्तव असले तरी बुड सोडून इतरत्र प्रकाश देण्याची क्षमताही असू शकते, सकारात्मकतेने पाहीले की सकारात्मक दिसते. दुसर्‍या धाग्यांवरचा राग या धाग्यावर येऊन काढण्यात इथल्या चर्चेत विषयांतर करणे हा सुद्धा तार्कीक उणीवेचा प्रकार आहे आणि आपण इतरांकडून तर्कपूर्णतेची अपेक्षा करतो तेव्हा तर नक्कीच टाळला पाहीजे किंवा कसे

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

डाॅ तावडे आणि अकोलकर हे काय आयसिसचे मेंबर आहेत काय?? एबीपी माझावर या प्रकरणातील कोल्हापूरच्या साक्षीदाराची मुलाखत ऐकली आहे का? कि सोयीचं तेवढचं घेता?
तुम्ही न्यायाधीश आहात का? नाही ना? मग तुमचं मत काहीही असो, जोपर्यंत कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत माणूस गुन्हेगार नाही. एवढी साधी गोष्ट आहे. डाॅ.तावडे पोलिसांच्या अटकेत आहेत. सारंग अकोलकर फरार आहेत. त्यावरून त्यांना दोषी मानायचं असेल तर तुम्ही खुशाल मानू शकता. इतरांनाही तसंच वाटावं अशी सक्ती करु शकत नाही.
आमचे धागे उडवतात इथे.
संपादकांना जे उडवण्याच्या लायकीचं वाटतं ते सगळं उडवलं जातं. तुम्हाला तुमचे धागे ज्ञानपीठ पारितोषिकाच्या तोडीचे वाटत असतील. संपादकांना वाटत नाहीत. साधी गोष्ट आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तुम्ही न्यायाधीश आहात का? नाही ना? मग तुमचं मत काहीही असो, जोपर्यंत कोर्टात गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत माणूस गुन्हेगार नाही. एवढी साधी गोष्ट आहे.. ...... जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?

In reply to by चंपाबाई

जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?
अर्थातच. म्हणजेच त्यांना कोर्टात उभं करायला पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे. चला. या आयडीत सुधारणा आहे.

In reply to by चंपाबाई

जनाब नाईकसाहेब यानाही हे लागू होइलच ना ?
अर्थातच. म्हणजेच त्यांना कोर्टात उभं करायला पाहिजे हे तुम्हाला मान्य आहे. चला. या आयडीत सुधारणा आहे.

In reply to by बोका-ए-आझम

तीन-तीन माणसे मारली राव!! तुम्हाला काय हा योगायोग वाटतो काय? बाकि तुम्ही याबाबतीत झापड ओढली आहे त्यामुळे अधिक काय सांगणे. सूज्ञांना माहित आहेच कोणती वृत्ती यास कारणीभूत आहे.

In reply to by चंपाबाई

चंपाबाई,
माणसे नाईकसाहेबानी मारली ?
त्याला साहेब म्हणायची गरज नाही.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

त्याचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. तरीही कोर्टात खटला चालवून, सर्व साक्षी-पुरावे तपासून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यावर अपील करण्याचा आणि भारताच्या राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करण्याचा हक्कही देण्यात आला. या आरोपींनाही तो हक्क आहे आणि तुम्ही कितीही म्हणालात तरी जोपर्यंत कोर्टात या हत्या सनातन्यांनी केल्या आहेत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही सनातन्यांच्या नावाने काहीही आरोप केलेत तरी त्याला काहीही अर्थ नाही. तुमच्याकडे जर त्याबद्दल माहिती असेल तर पोलिसांना का नेऊन देत नाही? सगळंच स्पष्ट होईल.

In reply to by बोका-ए-आझम

झाकीर नाईकचे विचार/भाषणं गुन्हा आहे हे देखील अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाही. म्हणून काय त्यावर मत प्रदर्शन करायचं नाही काय? बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही.

In reply to by अनुप ढेरे

बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही. सहमत

In reply to by अनुप ढेरे

असं अजून सिद्ध झालेलं नाही. मुळात त्यांना का मारण्यात आलं हेच अजूनही सिद्ध झालेलं नाही. वीरेंद्र तावड्यांकडे सापडलेल्या कागदपत्रांत दाभोळकरांचा उल्लेख दानव का राक्षस असा केलेला होता. त्यावरून त्यांची हत्या सनातनच्या लोकांनी केलेली आहे हे सिद्ध होत नाही. शिवाय एखाद्या माणसाने हत्या केली म्हणजे तो ज्या संघटनांचा सदस्य आहे त्या सर्व गुन्हेगार किंवा दहशतवादी संघटना होत नाहीत.

In reply to by बोका-ए-आझम

मी काही लगेच त्यांना शिक्षा द्या असं म्हणत नाहिये. कोर्टाची भांडणं वर्षानुवर्ष चालतील. पण सामान्य माणसाला मत बनवता येतं आणि ते खूप चुकीचं असतं असं नाही. तसं बघायला गेलं तर राजा/ कनिमोझी यांच्यावर देखील कोणतेही टू-जीमधले आरोप कोर्टात सिद्ध झालेले नाहीत. पण तरीही सामान्य माणूस त्यांना भ्रष्टाचारी मानतोच. तसंच सनातन प्रभात बद्दल आहे.

In reply to by अनुप ढेरे

आपल्या देशातल्या न्यायव्यवस्थेत निकाल लागायला वेळ लागतो आणि खटल्याला राजकीय रंग मिळाला की कुठलाही राजकीय पक्ष विधिनिषेध न बाळगता त्याचं भांडवल करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्याला हवा असलेला कुणी जर दोषी नसेल तर त्याला कोर्टाचा निर्णय पटत नाही. यातूनच कोर्टाबाहेर जाऊन न्याय मिळवायचे प्रयत्न सुरु होतात. नक्षलवादी असोत किंवा बजरंग दल - दोन्हीही लोकांना तारणहार वाटायला लागतात.हे दुष्टचक्र चालू राहतं.

In reply to by बोका-ए-आझम

दाभोळकर आदींचे तीन खून हाही धार्मिक दहशतवाद आहे हा मूळ मुद्दा होता. केवळ ते अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाही म्हणून लोकांनी त्यावर मत बनवू नये असं नाही.

In reply to by अनुप ढेरे

दाभोळकर आदींचे तीन खून हाही धार्मिक दहशतवाद आहे हा मूळ मुद्दा होता.
कशावरून धार्मिक दहशतवाद? तेच तर सिद्ध व्हायचंय. खून का झाला हेच अजून सिद्ध झालेलं नाहीये. सर्वजण त्यांच्या कार्यामुळे त्यांचा खून झाला असं म्हणताहेत. दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी हे गेली अनेक वर्षे कार्यरत होते. आत्ताच त्यांचं कार्य लोकांना समजलं आणि त्यातून त्यांची हत्या झाली? काहीही असलं तरी ते न्यायालयापुढे आलेलं नाही. लोकांनी काहीही मत बनवू दे. तो त्यांचा हक्क आहे. पण न्यायालयात ते जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही.

In reply to by बोका-ए-आझम

न्यायालय स्वतः पुरावे गोळा करत नाही,ते पुरवणारे जे लोक असतात तेच न्याय करत असतात,बाकि न्यायालयात औपचारिक सुनावणी होते इतकेच.आता सलमानचचं उदाहरण घ्या ना. न्यायालयामध्ये देव आहे हे सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही,पण देव मानणारे किती प्रचंड संख्येने आहेत.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

न्यायालय स्वतः पुरावे गोळा करत नाही,ते पुरवणारे जे लोक असतात तेच न्याय करत असतात,बाकि न्यायालयात औपचारिक सुनावणी होते इतकेच.
एका सलमानच्या उदाहरणावरुन न्यायव्यवस्थेवर टीका करणं हे नकारात्मक वृत्तीचं निदर्शक आहे, असं माझं मत आहे. एका मुस्लिम अतिरेक्यावरुन संपूर्ण मुस्लिम समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारे लोक आणि एका सलमानच्या उदाहरणावरुन न्यायव्यवस्थेच्या नावाने बोटं मोडणारे यांच्यात काहीही फरक नाही. आणि मुळात लोकशाही आहे तर न्यायव्यवस्था अशी होण्यात आपलाही सहभाग आहेच. फक्त घटनेने दिलेलं उच्चारस्वातंत्र्य पाहिजे आणि जबाबदारी घ्यायची नाही हा दुटप्पीपणा आहे. (व्यक्तिगत घेऊ नये.)

In reply to by अनुप ढेरे

बांग्लादेश्मधले अतिरेकी आणि दाभोळकर आदींना मारणारे सनातनप्रभात वाले यांच्यात फरक नाही मोठ्ठ्ठा फरक आहे. झापडबंद असाल तर तो फरक लक्षात येणार नाही. पण नाहीतर ते लक्षात येणे सहज शक्य आहे. दाभोळकर वा अन्य व्यक्तींना मारणारे मारेकरी हे फक्त त्या व्यक्तीला मारण्याचा कट करत होते आणि त्यांची सर्व योजना ही त्या दृष्टीने होती. ढाक्यात काय घडले? कुठल्याशा बेकरीत जायचे जिथे परदेशी व्यक्तींची गर्दी असते तिथे शस्त्रसज्ज होऊन जायचे. मग तिथे जो कुणी असेल त्यातील लोकांना ओलिस ठेवायचे. त्यातल्या कुराणातील आयते म्हणू शकणार्‍या लोकांना सोडून द्यायचे आणि बाकीच्यांना ठार करायचे. हा अत्यंत धर्माधिष्ठित, पिसाट, विध्वंसक, असहिष्णू बेत होता. त्यात एखाद्या व्यक्तीला मारणे हा उद्देश नसून मिळतील तितक्या लोकांना मारण्याचा एक घाऊक द्वेष होता. कट करुन एका व्यक्तीला मारणे हे बेकायदा, मृत्युदंडाला पात्र असणारे कृत्य आहे. पण दहशतवाद हे त्याहूनही भयंकर आणि क्रूर कृत्य आहे. एखाद्या व्यक्तीला मारण्यामागे त्या व्यक्तीबद्दल रोष असतो. पण निव्वळ अमुक जागी उपस्थित आहे आणि इस्लामचा अनुयायी नाही म्हणून एखाद्याला मारणे ह्यात जी निर्घॄणता लागते ती एका व्यक्तीला कट करुन मारताना दिसत नाही. हा मोठा फरक लक्षात आणून दिलाच पाहिजे. जेवढे हाताला लागतील ते लोक मारायचे. मग त्यात वय, लिंग, स्वभाव काहीही न बघता ते पुरेसे इस्लामी आहेत की नाहीत ते जुजबी तपासून मग मारायचे हे कृत्य जास्त भीतीदायक आणि विध्वंसक आहे. कलबुर्गी आणि दाभोळकर प्रकरणी फक्त त्या व्यक्तींनाच नुकसान झाले पण ढाक्यातील दहशतवादी प्रकारात कोण बळी जाईल किती बळी जातील ह्याचा काहीही भरवसा नाही. त्या दोन्ही प्रकारांना एका पारड्यात तोलणे उथळपणाचे आहे असे माझे मत.

In reply to by हुप्प्या

दोन्ही गोष्टींमध्ये धार्मिक प्रेरणेने हत्या केलेया आहेत. धार्मिक भावनांचा/धर्माचा आधार घेऊन दहशत पसरवणं हे दोन्हीकडे कॉमन आहे. (बाबरी पाडणं हा देखील दहशतवादच होता!) सनातन प्रभात आदींना गंभीरपणे घेत नाहीत हे दुर्दैवी आहे. मॉडरेट मुसलमानांकडून जसं आपण झाकीर नाईक, आयसिस आदींची निंद करण्याची अपेक्षा ठेवतो तशीच अपेक्षा हिंदूंकडून ठेवणं अवाजवी नाही. नाहीतर आत्ता छोटं पिल्लू असलेली मूलतत्ववादी मंडळी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्येही बनतील.

In reply to by अनुप ढेरे

मॉडरेट मुसलमानांकडून जसं आपण झाकीर नाईक, आयसिस आदींची निंद करण्याची अपेक्षा ठेवतो तशीच अपेक्षा हिंदूंकडून ठेवणं अवाजवी नाही. नाहीतर आत्ता छोटं पिल्लू असलेली मूलतत्ववादी मंडळी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्येही बनतील.
+१

In reply to by बॅटमॅन

+++१११

In reply to by अनुप ढेरे

(बाबरी पाडणं हा देखील दहशतवादच होता!)
तथाकथित बाबरी मशीदीच्या जागी ११ व्या शतकातील मंदीर होते हे पुराव्याने शाबित झालेले आहे , तेही 'सेक्युलर' सरकारच्या काळात ! त्यामुळे बाबरी पाडणे हा दहशतवाद ठरत नाही, तो उशीराने झालेल्या न्याय ठरतो. जर बाबरी पडणे हा दहशतवाद असेल तर शिवाजीमहाराजांनी दख्खन्मोहिमेत २-३ मशीदी ( की ज्या पुर्वाश्रमीमंदीरे असल्याचे खणखणीत पुरावे होते) पाडुन पुन्हा मंदिरे उभारली आहेत ह्याला काय म्हणाल ? आणि हिंदुंनी कोणत्याही दुसर्‍या "धर्माच्या" विरुध्द "प्रो-अ‍ॅक्टीव्हली" हिंसा केल्याचे एकही उदाहरण इतिहासात सापडत नाही , तुम्हाला सापडले तर जरुर कळवा आम्हालाही , इथेच मिपावर वादावादीत वापरता येईल !!

In reply to by अनुप ढेरे

पुन्हा सांगतो: एका व्यक्तीची हत्या ही केवळ त्या व्यक्तीचे नुकसान करते. दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे ह्यांनी कुठल्यातरी विचारांनी धार्मिक लोकांशी संघर्ष सुरू केला होता. त्यातील माथेफिरु लोकांनी त्यांना संपवले. हे अर्थातच पूर्ण चुकीचे, फाशी द्यायच्या योग्यतेचे कृत्य होते. पण निदान ह्या बळी पडलेल्यांनी काही वादग्रस्त विचार मांडून त्या संघर्षाची पायाभरणी केली होती. ढाक्याचे काय? तिथली ती बेकरी, तिथे उपस्थित असणारे तरिशी जैन सारखे लोक, कुणाच्या अध्यात ना मध्यात. कधी इस्लाम विरोधी विचार मांडलेले नाहीत काही नाहीत. केवळ अतिरेक्यांनी ती जागा निवडली म्हणून त्यांना बळी जावे लागले. त्यातील स्वैर, ताळतंत्र नसणारा हिंसाचार, कुणाचाही बळी घेऊ शकणारा हिंसाचार हा जास्त घातक आहे. दोन मोठे फरक म्हणजे आकड्यातला फरक, एक व्यक्ती विरुद्ध अनेक व्यक्ती बळी जाणे. पहिल्या बाबतीत निदान थोडी कुणकुण लागली असणे आणि कुठलाही मागमूस लागू न देता घडवून आणलेला हिंसाचार हे दुसरे टोक. जर सरकार सजग असते आणि दाभोळकरांसारख्या लोकांना २४ तास संरक्षण देत असते तर त्या घटना टळू शकल्या असत्या. भविष्यात टळू शकतील. पण ढाक्यातील अतिरेकी घटनांसारख्या घटना टाळणे अशक्य आहे. एक तर ते अतिरेकी त्या घटनेपर्यंत अतिरेकी आहेत हेच माहित नव्हते. आणि जिथे ती घटना घडली तिथे अशी काही पार्श्वभूमी नाही. त्यामुळे एक समाज म्हणून इस्लामी दहशतवाद मला जास्त धोकादायक वाटतो. मी कुठल्याही धर्माच्या अध्यात वा मध्यात नसलो तरी इस्लामी अतिरेकाचा बळी मी ठरणारच नाही अशी खात्री नाही. उलट सनातनकडून मला धोका नाही असे वाटते. बहुतांश समाज हा मध्यममार्गी असतो आणि त्याच्या दृष्टीने ढाक्यात घडले ते जास्त नुकसान करणारे आहे.

In reply to by अनुप ढेरे

मॉडरेट मुसलमानांकडून जसं आपण झाकीर नाईक, आयसिस आदींची निंद करण्याची अपेक्षा ठेवतो तशीच अपेक्षा हिंदूंकडून ठेवणं अवाजवी नाही. नाहीतर आत्ता छोटं पिल्लू असलेली मूलतत्ववादी मंडळी मोठ्या प्रमाणात हिंदूंमध्येही बनतील.
माॅडरेट मुस्लिम हे अमेरिका जसं good Taliban आणि bad Taliban म्हणते तसं मृगजळ आहे. आणि हिंदू धर्मात मूलतत्ववाद येणं मला तरी शक्य वाटत नाही. इस्लामप्रमाणे हिंदू धर्म हा काही पुस्तक किंवा प्रेषित यांच्यावर आधारित धर्म नाही. त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. ईश्वरनिंदा किंवा blasphemy ही संकल्पनाच हिंदू धर्मात नाही. पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो. तसा पूर्णपणे नास्तिक मुस्लिम असू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कमी कडवा किंवा कमी कट्टर मुस्लिम असू शकतो, पण moderate किंवा liberal हा शब्द ज्या अर्थाने वापरला जातो तसा मुस्लिम असणं शक्य नाही. आणि त्याबद्दल तक्रारही नाही, किंवा त्यात नकारात्मक असं काही आहे असंही नाही. पण उगीचच moderate मुस्लिम वगैरे अस्तित्वात नसलेल्या किंवा शक्य नसलेल्या मृगजळी संकल्पनांच्या मागे लागणं व्यर्थ आहे.

In reply to by बोका-ए-आझम

त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. ईश्वरनिंदा किंवा blasphemy ही संकल्पनाच हिंदू धर्मात नाही. पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो. १. हिंदूधर्मात भौगोलिक विविधता आहे हे मान्य आहे २. ब्लास्फेमी ही संकल्पना हिंदूधर्मात नाही हे जरा सोदोहारण स्पष्ट केलेत तर पुढे बोलता येईल 3.पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा मनुष्य हिंदू असू शकतो हे मात्र मी अमान्य करतो

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

जवळपास सर्व इस्लामिक देशांत त्याबद्दल कमी-अधिक स्वरूपाच्या शिक्षा आहेत. पाकिस्तानमध्ये ईश्वरनिंदेचा आरोप ठेवलेल्या एका स्त्रीला माफी देण्यासंदर्भात विधान केल्याबद्दल पाकिस्तानी पंजाबचे गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्याही झालेली आहे. तसं हिंदू धर्मात अजिबात नाही. कुठल्याही हिंदू सुधारकाला ईश्वराचं अस्तित्व नाकारण्याबद्दल वाळीत टाकणं वगैरे प्रकार झालेले नाहीत. गोपाळराव आगरकरांना पुण्यातल्या ब्राम्हण समाजाने वाळीत टाकलं होतं आणि त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली होती. पण त्यामागे आगरकरांच्या नास्तिक असण्याचा आणि ते उघडपणे जाहीर करण्याचा काहीही संबंध नव्हता. चार्वाकाचं जडवादी तत्वज्ञान, ज्यात भौतिक सुख सर्वश्रेष्ठ मानून पारलौकिक सुखाचा ध्यास घेण्याची खिल्ली उडवलेली आहे, भारतीय तत्वज्ञान परंपरेचा एक महत्वाचा भाग आहे. पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा माणूस हिंदू असू शकतो कारण हिंदू असण्यासाठी माझी देवावर श्रद्धा असण्याची किंवा देव या संकल्पनेवर विश्वास असण्याची अजिबात गरज नाही. इस्लाममध्ये अल्लावर विश्वास न ठेवणारा हा सरळसरळ काफिर मानला जातो. मग भलेही तो दुस-या धर्मानुसार असलेल्या देवाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारा असला तरीही. हिंदू धर्मात असं काहीही नाही.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

१. हिंदूधर्मात भौगोलिक विविधता आहे हे मान्य आहे
तुम्हाला काही वेगळे म्हणावयाचे आहे का ? एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति (ऋग्वेद १.६४.४६)– meaning wise people explain the same truth in different manners हे त्या शिवाय ज्ञान हे सर्व दिशांनी येऊ द्या म्हणणार्‍या धार्मिक संस्कृतीत तुम्हाला केवळ भौगोलीक विवीधताच आढळली ? इतर विवीधता आढळल्या नाहीत ?

In reply to by माहितगार

बापूंनी भौगोलिक विविधता असा उल्लेख केलाय म्हणजे त्यांना फक्त तीच आढळली असं होत नाही असं मला वाटतं. त्यांनी बाकीच्या विविधतांचा उल्लेख केला नसेल.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

3.पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा मनुष्य हिंदू असू शकतो हे मात्र मी अमान्य करतो
नास्तिकांचा धर्म कल्पनेवर विश्वास असेल असे वाटत नाही. नास्तिक हिंदू हा केवळ जन्माने हिंदू असण्याची शक्यता जास्त आहे.

In reply to by सतिश गावडे

तेव्हा अनेक आचरणात्मक गोष्टी त्यात येतात. उदाहरणार्थ माणूस हिंदू म्हणून जन्मला असेल पण नंतर पूर्ण नास्तिक बनला असेल तरी त्याचे काही आचार-विचार हे हिंदू धर्मानुसार किंवा हिंदू जीवनशैलीप्रमाणे असतील. उदाहरणार्थ तो/ती लग्न हिंदूधर्मीय जोडीदाराशी करतील, मुलांची नावं हिंदू धर्मानुसार (याचा अर्थ धार्मिक विधी करुन असा घेऊ नये) ठेवली जातील वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू धर्मात जी अंगभूत सहिष्णुता आहे त्यानुसार असा माणूस दुस-यावर त्याचे विचार लादणार नाही. असा माणूस नास्तिक असला तरी तो हिंदू धर्माचं पालन करतो आहे. मग त्याचा देवावर विश्वास नसला तरी हरकत नाही. दुस-या शब्दांत सांगायचं तर - हिंदू धर्मात देव आणि धर्म या वेगवेगळ्या संकल्पना आहेत पण इस्लाममध्ये महंमद हा देवाचा प्रेषित मानलेला असल्यामुळे इस्लामवर विश्वास आणि देवावर विश्वास या दोन वेगवेगळ्या गोष्टी असू शकत नाहीत.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

२. ब्लास्फेमी ही संकल्पना हिंदूधर्मात नाही हे जरा सोदोहारण स्पष्ट केलेत तर पुढे बोलता येईल.
कोणत्याही धर्मीयात उदात्तता आणि संकुचितता आढळून येतात तसे हिंदूतही होत असावे तरीही संकुचितता कुठे आढळलीच तर त्याचा हिंदूधर्मीय अध्यात्मिक पाया अत्यंत ढिसाळ असेल. याच कारण मोक्ष प्राप्ती हे सर्वोच्च उद्दीष्ट षड रिपूंचा त्याग करणे अनिवार्य होते त्यात मत्सर क्रोध यांचाही त्याग निरपवाद अनुस्यूत आहे. संत एकनाथ काय म्हणतात बघा निंदा अवज्ञा हेळण । दुर्जनीं केलिया अपमान । हें साहे तो ईश्वर जाण । निजबोधें पूर्ण तो मद्रूप ॥५१॥ ज्यासी सर्वभूतीं निजात्मता । दृढ बाणलीसे तत्त्वतां । तो दुर्जनाचिया आघाता । साहे सर्वथा यथासुखें ॥५२॥संदर्भ हिंदू धर्मीय तत्वज्ञानांचा आधार असलेल्या षड्दर्शनातील काही दर्शने इश्वराचे अस्तीत्वच मानत नाहीत. -जे इश्वर मानतात ते इश्वरापर्यंत अनेक मार्गाने पोहोचतात, आई वडलांना गुरुला देशाला किंवा अजून कशाला तुम्ही ईश्वर मानले तर त्यास इश्वर निंदा असे गृहीत धरले जात नाही. शिवाय असंख्य वेळा ईश्वरावर भक्तगण आणि संतगण रागावलेले ही दाखवले आहेत, तर ऋषीमुनी इश्वराला माणसाप्रमाणे रागवून शापही देऊ शकत. एवढेच नाहीतर विघ्नकर्त्यांची पूजा देखील करण्याचे स्वातंत्र्य आहे. पारंपारीक भारतीय परस्पर विचारांवर टिकेचे आणि मतभेद निराकारणाचे मुख्य साधन शास्त्रार्थ आहे. त्यात टिकाकरतानाही दुसर्‍याच्या (वैचारीक) निवडी बद्दल दुष्वास न करता आदर आणि सहिष्णूतेची भावना ठेवणे अभिप्रेत असे. फार फारतर इतर मतांवर पाखंडी (heresy) असल्याची टिका केली जाई अपवादात्मक संघर्षही होत असतील पण मुख्य भर इतरांच्या निवडी बद्दल आदर आणि दुष्वास टाळणे यावर असल्यामुळे गोष्टी विकोपाला जाणे अवघड असे एवढे करुन, न्याय करणे हे राजाचे कर्तव्य असे. इश्वर अथवा पावित्र्य निंदा आढळली तर कुणीही उठा आणि घ्या बदला असा इश्वरी आदेश हिंदू धर्मात दिसत नाही उलट बदल्याच्या भावनेचा त्याग (किमान थेअरीत तरी) सांगितला जातो. अंशतः संदर्भ: Why Hinduism never developed a concept of blasphemy
3.पूर्णपणे नास्तिक असूनही एखादा मनुष्य हिंदू असू शकतो
विवीध दर्शन तत्वज्ञांनाचा दाखला वर दिलाच आहे त्या शिवाय स्वामी विवेकानंदांचे नास्तिकांची बाजू घेणारे पुरेसे लेखन मी मिपावर पुर्विच्या धागा लेखातून उधृत केले आहे. अर्थात मी जशी उदात्त बाजू मांडली तसे संकुचित आचार-विचारांचे प्रदर्शन करणारी हिंदू धर्मीय मंडळीही आढळतात ही खेदाची बाबही बर्‍याचदा समोर येऊ शकते ही मानवी मर्यादा हिंदू मानवांनाही लागू होत असावी.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी यांची हत्या म्हणजे धार्मिक दशतवादच. आणि त्यावर इथे का काथ्याकूट होत नाही बरे?? दांभिक कुठचे अहो "पाताळ धुंडणारे" दांभिक असतात... हे घ्या दुवे... डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली ! अराजक डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..

In reply to by विकास

तुम्ही तीन लिंका दिल्या आहेत,आता दांभिकता म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो. श्रद्धांजलीच्या धाग्यात काहींनी मुद्दाम कालनिर्णयकार साळगावकरांनासुद्धा श्रद्धांजली वाहली आहे,आता साळगावकरांची विचारधारा नेमकी दाभोलकरांच्या विरूद्ध आहे,आणि धाग्याचे औचित्य पाहता ते कितपत योग्य ठरते हे तुम्हीच ठरवा,कारण त्यांच्यासाठी वेगळा धागा काढता आला असता. "अराजक" या धाग्यात सुद्धा काही प्रमाणात विषय सोडून गरळ ओकलीच आहे. "कलबुर्गींची हत्या" या धाग्यात प्रगो,तुडतुडी,काळा पहाड,यांचे प्रतिसाद तसेच इतरही सन्मानणीय आयडींचे प्रतिसाद पाहिल्यास दांभिकता काय असते ते लक्षात येईल.काहींनी यर हत्येचा निषेध पण नोंदवला नाही.

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

श्रद्धांजलीच्या धाग्यात काहींनी मुद्दाम कालनिर्णयकार साळगावकरांनासुद्धा श्रद्धांजली वाहली आहे,आता साळगावकरांची विचारधारा नेमकी दाभोलकरांच्या विरूद्ध आहे,आणि धाग्याचे औचित्य पाहता ते कितपत योग्य ठरते हे तुम्हीच ठरवा,कारण त्यांच्यासाठी वेगळा धागा काढता आला असता. दाभोळकरांच्या धाग्यावर साळगावकरांना देखील श्रद्धांजली वाहणे ही मला वाटते एक उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती. त्या संदर्भात म्रूगनयनी ने दिलेली खालील प्रतिक्रिया बोलकी आहे
'अंनिस" कार श्री. नरेन्द्र दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली... 'कालनिर्णय' कार श्री. जयन्त सांळगांवकरांना भावपूर्ण श्रद्धांजली... एक -महान ज्योतिष-अभ्यासक जयन्त साळगांवकर आणि दुसरे महान ज्योतिष विरोधक- नरेन्द्र दाभोळकर... यांचा दुर्दैवी मृत्यू एकाच दिवशी व्हावा.. हाही एक विचित्र योगायोग किन्वा दैवदुर्विलास !!! .... ~*~*~*~
वेगळी विचारधारा असली तरीही साळगावकर काही दाभोळकरांचे शत्रू नव्हते. किंबहुना दोघे कदाचित एकमेकांच्या विरोधात उभे देखील ठाकले नसतील. असे असताना दोघांना एकाच धाग्यावर श्रद्धांजली वाहणे हा विरोधाभास असू शकतो पण म्हणुन तो खोडकरपणा आहे असे नाही.

झकीर नाईक वाटतो तितका सोपा नाही. मुस्लिमेतर तत्वज्ञान सुद्धा तो मुखोद्गत ठेवतो आणि अतिशय मुद्देसूद बोलतो. 'विचारांचा मुकाबला विचारांनी' हे त्याच्याबाबत शक्य वाटते कारण तो मुसलमान धर्मतत्वांवर घेतलेले आक्षेप शांत पाने ऐकून घेऊन त्याचे खंडन तर करतोच पण वर चार गोष्टी अजून सुनावतो. त्यामुळे त्याच्याशी जाहीर वाद शक्य आहे पण त्यासाठी लागणारा व्यासंग, हजरजबाबीपणा आणि निर्भय वृत्ती हे जरुरीचे आहे. त्याच्याशी वाद विवाद करण्याची संधी बहुधा सहज सुलभ असावी, कारण त्याच्या बर्याच सभा होतांना दिसताहेत. ह्या माणसाचा वादातील पराभव पाहण्याची आत्यंतिक तळमळ आहे ...

In reply to by अनिरुद्ध.वैद्य

हा माणूस अजिबात हुशार नाही, धर्मवेड त्याच्या अंगी ठासुन भरले आहे. त्याच्या यु ट्यूब वरील क्लिप पहा , नुरा कुस्ती प्रमाणे असतात त्या, इथे फक्त हाच फर्क असतो की कुस्ती शेवटी नाइकच जिंकतो, सलमान , शाहरुख़ , आमिर सिनेमात लंबेचवड़े डायलॉग मारतात म्हणुन ते काय हुशार झाले?

In reply to by भंकस बाबा

सलमान , शाहरुख़ , आमिर सिनेमात लंबेचवड़े डायलॉग मारतात म्हणुन ते काय हुशार झाले?
काय भंकस करताय? तुम्हाला अॅक्टिंग येते का? शाहरूखचं स्ट्रगल तुम्हाला माहित्ये का? अमिरच्या समाजकार्याचा अभ्यास आहे का?किंवा तुम्ही समाजासाठी काय करता? सलमानच्या बिइंग ह्युमन संस्थेबद्दल काही माहिती आहे का? ... .. उगाच आपलं घेतली पाचची कि सुटला तर्राट... स्वमतांध दांभिक कुठचे

In reply to by खालीमुंडी पाताळधुंडी

अगदीच खाली मुंडी आहात तुम्ही! तुम्ही या नटाचे pro आहात काय? सलमानने लावलेले दिवे जगजाहिर आहेत. आमिर खानचा दांभिकपणा सत्यमेव जयतेच्या वेळी लोकांनी अनुभवला आहे. शाहरुखच्यां कोणत्या मेहनतीबद्दल बोलताय आपण? पेप्सी कंपनीच्या शीतपेयात किटकनाशके मिळाल्यावर ह्याची प्रतिक्रिया काय होती माहित आहे? किटकनाशके तर या देशाच्या पाण्यात आहेत, त्याला तुम्ही कंपनीचा दोष कसा मानणार्, जौदे , ही गुणी बाळे तुम्हीच घेऊन नाचा डोक्यावर. जकीर नाइकच्या क्लिप्स बघा, प्रश्न विचारण्यार्या माणसाच्या बाजूला ते दाढ़ीवाले कशाला उभे राहतात हो? जसा काही तो पळून जानारा आहे, जवळजवळ 20/22 क्लिप पाहिल्या आहेत मी, एकाही वेळी त्याला अडचणीत आणनारा प्रश्न विचारण्यात आलेला नाही,

In reply to by भंकस बाबा

एकाही वेळी त्याला अडचणीत आणनारा प्रश्न विचारण्यात आलेला नाही
काही परदेशी विद्यापीठात लेक्चर देताना विचारले आहेत पण जेव्हा उत्तर गोत्यात आणणारे असेल तेव्हा चिडचिड करुन प्रश्न विचारणार्याच्या कुवतीबद्दलच प्रश्न्चिन्ह उभे करतो.पण ह्या माणसाचे पाठांतर थक्क करणारे आहे. मुस्लिम धर्मातला विवेकानंदांच्या जवळ्पास जाणारे व्यक्तिमत्व असल्याचा कधी कधी विचार येतो मनात.

In reply to by कानडाऊ योगेशु

नका हो विवेकानंदांचा अपमान करु... त्याच्या पाठांतराबद्दल दोन शब्दः हे पाठांतर अचूक आहे ह्याची मला खात्री नाही. असले तरी तो जे इन्टरप्रीटेशन करतो त्यामुळे त्याच्या पाठांतराला शुन्य कींमत आहे. मी जवळपास सर्व धर्मग्रंथांचे वाचन केले आहे, बहुतेक सर्व धर्मोपदेशकांचे संदेश वाचलेले आहेत. प्रत्येक जण एकाच एकमेव सत्याकडे वेगवेगळ्या भाषेत निर्देश करत आहेत असे जाणवायचे. विपश्यनेचा कोर्स केल्यावर ते कोणत्या सत्याकडे निर्देश करत आहेत त्याची जाणीव झाली. तुकाराम-ज्ञानोबांपासून, गुरुगोविंद सिंगापर्यंत, इव्हन मोहम्मद पैगंबरापर्यंत सर्व 'पोचलेले' लोक एकाच सत्याचा पुकारा करत आहेत हे जाणवले. त्यामुळे भाषा, दॄष्टांत, तळमळ वेगवेगळी भासत असली तरी ह्या सर्व महात्म्यांच्या संदेशात एकवाक्यता आहे याची जाणीव झाली. म्हणजेच त्या सर्वांच्या संदेशाचे अचूक इन्टरप्रिटेशन मी करु शकलो असे मला वाटले व तेच असीम शांतता देणारे आहे. त्यामुळे कोणत्याही दोन धर्मांच्या तात्विक-अध्यात्मिक वादात पडणे योग्य नाही याचीही समज आली. अशी समज झानाकडे अजिबात नाही हे कळल्यामुळे झानाच्या पाठांतराचे कवडीचेही कवतिक नाही.