रत्नागिरी कट्टा.....
गेले काही दिवस बराच व्यस्त होतो आणि शेती विकत घ्यायला किती प्रयास पडतात ह्याचा अनुभव पण घेत होतो.वडीलोपार्जित शेती नसल्याने त्रास जरा जास्तच होत होता.
शोधा-शोध करत असतांनाच आमच्या एका ओळखीच्या मित्राकडून देवरूखला एका जणाला शेती विकायची आहे, असा निरोप मिळाला.आता देवरूखला जायचेच आहे तर बसणीला पण जावून येवू म्हणून मग रत्नागिरीत मुक्काम करायचे ठरवले.साहजिकच आमच्या शिरस्त्याप्रमाणे, रत्नागिरीत कुणी अहे का? अशी दवंडीपण पिटवली.
दवंडीला थोडा फार प्रतिसाद मिळाला आणि एक कट्टा करायचा बेत ठरला.आमच्या मुलाला पण रत्नागिरीला यायची ओढ असल्याने तो पण बरोबर होताच.पॅसेंजरने रडत-खडत रत्नागिरीला पोहोचे पर्यंत २ वाजले.
मुलाच्या पोटात कावळे ओरडायला लागले आणि मग आम्ही हॉटेल प्रशांतला भेट दिली.रत्नागिरीला गेलो की आधी प्रशांतला भेट देणे, हा पण आमचा शिरस्ता.प्रशांतचे जेवण अंगावर यायच्या आत, यजमानांच्या घरी मुक्काम टाकणे भाग होते.
संध्याकाळी मग काळ्या समुद्रावर कट्टा करायचा बेत होताच.यजमानांची तशी परवानगी घेवून मग मी आणि माझा मुलगा, रत्नागिरीतील इतर मिपाकरांना भेटायला निघालो.
थोडी फार फोना-फोनी आधी झाली होतीच, त्यानुसार नंदादीप आणि मंदार कात्रे हे नक्की भेटणार होतेच.तसे आम्ही डोंबोलीकर वेळेच्या बाबतीत पक्के.त्यामुळे ६च्या (म्हणजे भेटायच्या वेळेच्या) अगोदरच जावून पोहोचलो.
काळ्या समूद्रावरची जेट्टीचे स्वरूप फारच बिघडले आहे.ही एक नोंद मनांत करून ठेवली.फार पुर्वी म्हणजे जेंव्हा बोटीनेच कोकण प्रवास होत असे त्या काळात, ही जेट्टी फारच गजबजलेली असायची, असे आमच्या शेजारचे सांगायचे.इंग्रजांनी केलेल्या बांधकामाची भक्कमता म्हणजे ही जेट्टी.मी लहान असतांना तिथे एक सार्वजनिक मुतारी पण होती आणि आता ती पण नाहीशी झालेली. गेल्या ४०-५० वर्षात तिची काहीही डागडूजी न केल्याने पुर्ण जेट्टी आता म्हातारपणामुळे रया गेलेल्या एखाद्या रुपगर्वितेसारखीच.
तिचे हे रूप पाहतांना मनांत एक गढूळ असे वातावरण तयार झाले आणि तितक्यात ,"ओ मुवि." अशी हाक ऐकू आली.
नंदादीप ह्यांना मी प्रथमच भेटत होतो पण त्यांना आणि मला कुठेही संकोचल्यासारखे वाटत न्हवते.नंदादीपशी बोलत असतांनाच मनातील ती गढूळता कधी नाहीशी झाली ते पण समजले नाही.थोड्याच वेळात, मंदार कात्रे आणि अनन्या पण कट्ट्याला आल्या.
बाकरवड्या आणि आंबा-बर्फी (किंवा आंबा वडी) खाता-खाता आणि गप्पा मारता-मारता वेळ कसा गेला ते पण समजले नाही.
आता कट्ट्याची सांगता एखाद्या पेयाने व्हावी असा घाट घातला गेला आणि मग शहाळ्याच्या पाण्याच्या साथीने कट्ट्याची सांगता झाली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अरे वाह रत्नागिरी कट्टा
कट्टा महाकट्टा नसला तरी वृत्तांत मोठा हवा
अहो....
जेट्टीचे स्वरूप.....
मस्तं!
छान लेख .
मस्त वृत्तांत!
येक पन फोटू नाय ता ???
+१
होय तर!! फोटो नाय मगे कट्टा
काय सांगतास सुड भाउ...
माका वायच, तोडकीमोडकी येता रे
बरा आसा मग...
शेवटी रत्नान्ग्री ती
एकदा ठरवून कट्टा करू
ताई....
अरे वा!