Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चलत मुसाफिर on Sat, 06/18/2016 - 19:21
लेखनविषय (Tags)
कला
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
समीक्षा
शिफारस
(कोणताही रहस्यभेद/रसभंग होऊ नये अशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे) वा! काय झटका बसला राव. अगदी नटबोल्ट हलून गेले. जिभेची चित्र-चव हल्ली, तेच तेच भंगार साजिदछाप विनोद, सलमानछाप भीमउड्या, शाहरुखछाप मर्कटलीला आणि आचरट, अतर्क्य प्रेमकथांचा रतीब पाहून रद्दीत गेलेली होती, ती या 'उडता पंजाब' नामक झणझणीत मिर्चीच्या थेंबाने आधी खवळली, मग तृप्त झाली. शाब्बाश लेको! निदान चोवीस तास चित्रपट डोक्यातून जाणार नाही याची खात्री असू द्या! सर्वात आधी, सेन्सॉरशी खमकेपणाने लढून, न्यायालयाकडे दाद मागून, आर्थिक नुकसानाचा धोका पत्करून हा चित्रपट हट्टाने जसाच्या तसा ठेवल्याबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन. भक्त पहलाज आणि तत्सम संस्कृतीरक्षक कंपूच्या कानपुराखाली लालबाग काढणारा न्यायालयाचा सणसणीत निर्णय हा यापुढे अधिकाधिक निर्माते-दिग्दर्शकांना धैर्य देणारा ठरेल. 'उडता पंजाब' या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे मूळ विषयाशी कुठेही न केलेली तडजोड. चित्रपटात अनेक सुपरस्टार आहेत. पण केवळ त्या कारणासाठी हिंदी सिनेमात व्यक्तिरेखांची मूळ रूपे बदलली जातात (आठवा: नृत्यकुशल बँक कारकून कटरीना) किंवा ऐनवेळी फासे फिरवून एखाद्या कलाकाराला झुकते माप दिले जाते किंवा कथा पलायनवादी मार्गाने नेली जाते तसे इथे होत नाही. याचा असाही अर्थ होतो की प्रेक्षकांनी मनाची त्या दृष्टीने तयारी करूनच हा चित्रपट पहावा. दुसरी जमेची बाजू म्हणजे कलाकारांनीही "माझ्या चाहत्यांना काय वाटेल?" या भीतीला थारा न देता धीटपणे स्वीकारलेल्या चाकोरीबाह्य भूमिका आणि जीव तोडून केलेला अभिनय. विशेषतः शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांना पाहून 'भूमिकेचे सोने करणे' या शब्दमालेचा खरा अर्थ कळतो. पंजाबी चित्रपटांचा नायक दिलजीत दोसंझ हाही आपल्या या राष्ट्रीय पदार्पणात भरपूर वाहवा कमवेल. लहान सहाय्यक भूमिकांमधील कलाकारही अप्रतिम आहेत. तिसरा मुद्दा: बांधेसूद पटकथा. १४० मिनिटांचा लांबलचक चित्रपट असला तरी कुठलाही भाग उगाच ताणलाय असे वाटत नाही. प्रत्येक दृश्य महत्वाचे आहे आणि पुढच्या प्रसंगाशी जोडलेले आहे. तीन समांतर कथांची केलेली गुंफण कौशल्यपूर्ण आहे. व्यक्तिरेखा आणि संवाद अतिशय वेधकरीत्या लिहिलेले आहेत. ज्या अपशब्दांमुळे चित्रपट सेन्सॉरने अडवला होता, ते कथानकाच्या आणि दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातून अपरिहार्य आहेत. (अपरिहार्यतेचा मुद्दा बाजूला ठेवला तरी व्यक्तिशः मी सेन्सॉरबोर्डाला पूर्णपणे रद्दबातल करावे या मताचा आहे). अंमली पदार्थांचा घट्ट होत चाललेला भयावह विळखा अख्ख्या समाजालाच कसा हतबल करीत आहे, हे समष्टीचे चित्र लेखक-दिग्दर्शक यशस्वीपणे उभे करतात. चित्रपटात पंजाबी भाषेचा सढळ वापर केलेला असल्यामुळे मराठीभाषिक प्रेक्षकांच्या रसास्वादात अडथळा येण्याची शक्यता आहे. मी पाहिलेल्या खेळाला (उत्तर भारतातील शहर असूनही) इंग्रजी उपशीर्षके होती. चौथा: असे सर्व असूनही मनोरंजनमूल्य या कसोटीवर चित्रपट चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. अर्थात मनोरंजन कशाला म्हणतात याबद्दल प्रत्येकाचे मत वेगळे असते. "आपल्याला बुवा नाचगाणं, कॉमेडी, मारामारी, परदेशात शूटिंग, एसीची हवा, सामोसे, पॉपकॉर्न, शिट्ट्या-टाळ्या, हुल्लड असा फुल तीन तास टाईमपास पाहिजे" असा विचार बाळगणारे कदाचित माझ्याशी सहमत होणार नाहीत. (व्यक्तिगतरीत्या मी फक्त चांगला आणि वाईट असे चित्रपटांचे दोनच प्रकार मानतो.) मी उत्तर भारतातील एका लहान पंजाबीबहुल शहरात हा चित्रपट पाहिला. सिनेमा सुरू झाला आणि तीन-चार कुटुंबवत्सल लोक पहिल्या पंधरा मिनिटांतच बायकापोरांना घेऊन चालते झाले. पहिल्या संवादापासून सुरू झालेली अनिर्बंध पंजाबी शिवीगाळ त्यांना सहन झाली नव्हती हे उघड होते. (या सिनेमात अशिष्ट भाषेचा वापर आहे हे एव्हाना भारतभर सार्वजनिक झालेले आहे. कदाचित ते लोक घरी वृत्तवाहिन्या पाहत नसतील!) पाचवा: जोषपूर्ण संगीत, पार्श्वसंगीत, बुद्धिमान संकलन आणि कथेला पूर्णतः अनुरूप असे पंजाबचे नेमके दर्शन घडवणारे छायाचित्रण. सर्वच उच्च दर्जाचे घटक अशा प्रकारे जुळून येण्याचा योग विरळा असतो. लवकरात लवकर हा चित्रपट पहा.
  • Log in or register to post comments
  • 12610 views

प्रतिक्रिया

Submitted by एस on Sat, 06/18/2016 - 21:00

Permalink

हेही परीक्षण आवडले. चित्रपट

हेही परीक्षण आवडले. चित्रपट पहायला हवा.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 06/19/2016 - 03:16

In reply to हेही परीक्षण आवडले. चित्रपट by एस

Permalink

+१

परीक्षण आवडले. लवकरच पाहतो. आणि दीर्घ प्रतिसादासाठी हजर होतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on Sun, 06/19/2016 - 11:19

In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

जरूर

वाट पाहतो
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sat, 06/18/2016 - 21:35

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 06/18/2016 - 21:52

Permalink

भक्त पहलाज आणि तत्सम

भक्त पहलाज आणि तत्सम संस्कृतीरक्षक कंपूच्या कानपुराखाली लालबाग काढणारा न्यायालयाचा सणसणीत निर्णय हा यापुढे अधिकाधिक निर्माते-दिग्दर्शकांना धैर्य देणारा ठरेल. बाबौ लै दम आहे भो तुमच्यात!!! डायरेक्ट संबंधितांच्या भक्त धोतराला हात!! सहीच बाकी परीक्षण आवडले!!
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Sun, 06/19/2016 - 00:47

Permalink

पाहिला, आवडला आणि चलत मुसाफिर

पाहिला, आवडला आणि चलत मुसाफिर म्हणतात त्याप्रमाणे अंगावरही आला. कडक पिक्चर आहे कळला तर. थेटरमधून बाहेर पडून फक्त शाहिद व आलिया बद्दल बोलणा-यांना तो कळला नाही असं समजावं.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sun, 06/19/2016 - 00:52

Permalink

तुमचे मुद्दे आवडले पण किंचित

तुमचे मुद्दे आवडले पण किंचित असहमती आहे. जे फारसे महत्वाचे नाही. आत्ताच भावाने पाहिला व फोन केला की त्याच्या अंगावर आला सिनेमा! मला तर अजिबात स्वप्नातही पाहू नकोस असे बजावले आहे कारण नंतरची रडारड त्यालाच ऐकावी लागते. म्हणजे खरच शिनेमा वास्तवाशी अजिबात तडजोड न केलेला असणार. अशी सामाजिक पारिस्थिती आहे या कल्पनेनं भीती वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on Sun, 06/19/2016 - 11:17

In reply to तुमचे मुद्दे आवडले पण किंचित by रेवती

Permalink

करमणूक म्हणजे

वर म्हटल्याप्रमाणे मनोरंजन म्हणजे काय याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात. 'उडता पंजाब' सहकुटुंब पाहणे कदाचित सर्वांना जमणार नाही (पण कुणाला जमेलही). दोष चित्रपटाचा नसून प्रेक्षकांच्या पूर्वकल्पनांचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sun, 06/19/2016 - 05:52

Permalink

पंजाबमधली अमली पदार्थांच्या

पंजाबमधली अमली पदार्थांच्या वापराची परिस्थिती बरीच गंभीर झालेली आहे हे माहीत होते. त्याकरिता हा पिक्चर पाहायचा होताच. या परिक्षणाने त्याची निकड अजून वाढली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sun, 06/19/2016 - 08:49

Permalink

परिचय आवडला.

नाच-गाणं-खाणं-लढणं यापल्याडच्या पंजाबची हिंदी चित्रपटसृष्टीने पहिल्यांदाच दखल घेतली आहे असं वाटतं.
  • Log in or register to post comments

Submitted by रामदास on Sun, 06/19/2016 - 09:58

Permalink

पंजाबमधली अमली पदार्थांच्या वापराची परिस्थिती बरीच गंभीर झालेली

  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Sun, 06/19/2016 - 11:46

In reply to पंजाबमधली अमली पदार्थांच्या वापराची परिस्थिती बरीच गंभीर झालेली by रामदास

Permalink

भीषण आहे!

थरकाप झाला ही डॉक्यूमेंट्री बघून! :( खरोखर ड्र्ग्जचा हल्ला हा शस्त्रांच्या हल्ल्यापेक्षा भयंकर आणि दूरगामी परिणाम करणारा आहे.... शाळांमधून ड्रग्ज बद्दल शिकवायला हवे, दुष्परिणामांची कल्पना अतिशय गंभीर स्वरुपात द्यायला हवी अन्यथा विनाश अटळ आहे! :( (सुन्न)रंगा
  • Log in or register to post comments

Submitted by त्रिवेणी on Sun, 06/19/2016 - 10:18

Permalink

काल बघितला चित्रपट.खरच

काल बघितला चित्रपट.खरच अस्वस्थ करणारा आहे.मला पूर्वार्ध थोडा हळू वाटला. मागच्या आठवड्यात तीन आणि आता उड़ता पंजाब. आता यावर उतरा म्हणून रितेशचा ग्रैंड मस्ती की कोणता चित्रपट येतोय न तो बघणार आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sun, 06/19/2016 - 12:13

In reply to काल बघितला चित्रपट.खरच by त्रिवेणी

Permalink

तो तर अज्जिबात बघु नका...डोळे

तो तर अज्जिबात बघु नका...डोळे मिटाल =))
  • Log in or register to post comments

Submitted by विअर्ड विक्स on Sun, 06/19/2016 - 13:47

In reply to काल बघितला चित्रपट.खरच by त्रिवेणी

Permalink

same pinch for te३n आणि

same pinch for te३n आणि उडता पंजाब . रमन राघव २४ ला release होतोय…. फर्स्ट डे बघणार …
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 06/19/2016 - 11:36

Permalink

उंद्याच बघनारे! सक्काळ सक्काळ

उंद्याच बघनारे! सक्काळ सक्काळ! आट'चा शो.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 06/20/2016 - 20:02

In reply to उंद्याच बघनारे! सक्काळ सक्काळ by अत्रुप्त आत्मा

Permalink

पाहिला... साध्या पद्धतीची

पाहिला... साध्या पद्धतीची मांडणी आहे हे स्टारकास्ट पाहून मनाला स्विकारल जात नव्हतं . सैराट सारखे सगळे मुख्य कलाकार नवीन्तम असते,तर कदाचीत आणखि भावला असता(मला.) . पण काळीज हदरवून टाकणारा आणि शेवटातले काही प्रसंग चांगलच उत्तर देऊन जाणारे आहेत्,असं वाटलं.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 06/19/2016 - 11:59

Permalink

आताच पाहीला. खूप छान चित्रपट.

आताच पाहीला. खूप छान चित्रपट. आलिया भटचे काम जबरदस्त. संपूर्ण स्टारडम वीसरुन अतीशय अग्लॅमरस मेकअप स्वीकारुन मुलीने काम केलंय. हींदी चित्रपटही वास्तवाच्या जवळपास जाउ लागले आहेत हे बघून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Sun, 06/19/2016 - 14:18

Permalink

परिक्षणाशी सहमत

चित्रपट खरच अंगावर येतो. इतकं भीषण वास्तव आहे. उत्तरार्ध एक वेळ थोडा रेंगाळल्यासारखा वाटत असताना परत गतीमान होतो. 'अच्छे दिन' वर मार्मीक टिप्पणी पण छान. कामं सर्वांनीच उत्तम केलय....आलीयाचं पोटेन्शीअल जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 06/19/2016 - 16:20

Permalink

अरे वा, दोन परीक्षणं आलीत

अरे वा, दोन परीक्षणं आलीत व्हय. ओके ओके. बघणार आहेच. चार प्रमुख पात्रापैकी ३ जण तरी पंजाबी आहेत बहूधा, हे चांगलेय.
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on Sun, 06/19/2016 - 18:07

In reply to अरे वा, दोन परीक्षणं आलीत by अभ्या..

Permalink

दुरुस्ती

शाहिद कपूरची आई उत्तर प्रदेशी मुसलमान आहे. करीना कपूरची आई सिंधी.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 06/20/2016 - 09:12

Permalink

नक्की बघावा लागेल

अर्थात बाल्कांबरोबर नाही. परिक्षण आवडले. नेमके आणि रोखठोक. स्वगत : कौटुंबीक कटकारस्थानांच्या-लाछनास्पद छळाच्या मालीका मिटक्या मारत बघणार्यांना सिनेमातील शिव्याच कश्या सहन होत नाहीत याचा विचार पडलाय खरा? मुकाट नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Mon, 06/20/2016 - 09:20

Permalink

परीक्षण आवडले. परंपरेनुसार या

परीक्षण आवडले. परंपरेनुसार या चित्रपटातही अनुराग कश्यपने शिव्यांचा सढळ हाताने वापर केलेला आहे. बाकी शाहीद आणि आलियाचा अभिनय चांगला वाटला.
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Mon, 06/20/2016 - 10:11

In reply to परीक्षण आवडले. परंपरेनुसार या by किसन शिंदे

Permalink

अनुराग कश्यपने शिव्यांचा सढळ

अनुराग कश्यपने शिव्यांचा सढळ हाताने वापर केलेला आहे
तो दिग्दर्शक नव्हे काका. लेखक पण नाही. सह-निर्माता आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 06/20/2016 - 20:54

In reply to परीक्षण आवडले. परंपरेनुसार या by किसन शिंदे

Permalink

उगाचच द्यायच्या म्हणून शिव्या दिलेल्या नाहीत.

काही सीन्समध्ये (निवडणुकांमध्ये ड्रग्ज वाटणं, टाॅमीला तुरूंगातल्या फॅन्सनी ड्रग्जपायी त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल सांगणं) शिव्याच येतात तोंडात. वांझोटा संताप येतो. मी पाहिलेल्या शोमध्ये तर लोक रडत रडत शिव्या देत होते. विशेषतः इंटर्व्हलमध्ये. एका पाॅईंटनंतर शिव्या विसरल्या जातात आणि आपण समोरच्या कथेत involved होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Mon, 06/20/2016 - 13:35

Permalink

माझेही चार शब्द (चमुंचं परीक्षण वाचल्यावर चित्रपट पाहिलाय)

कुणी स्टीव्हन स्पीलबर्गचा Saving Private Ryan पाहिलाय? त्यातला दोस्तराष्ट्रांचं सैन्य नाॅर्मंडीच्या किनाऱ्यावर उतरतं तो सीन आठवतोय? अचानक समोरून गोळ्या यायला सुरूवात होते आणि सैनिक धडाधड पाण्यात कोसळतात. एका क्षणापूर्वी जिवंत असलेला सैनिक डोक्यात गोळी घुसून एक निष्प्राण जीव म्हणून बाजूला पडतो. आपण युरोपची नाझींच्या तावडीतून सुटका करायला जातो आहोत अशी romantic कल्पना घेऊन युद्धात सामील झालेले सैनिक हबकतात. प्रेक्षकाची अवस्था काही फार वेगळी नसते. असाच अनुभव उडता पंजाब पाहताना येतो. कुठेही ड्रग्ज म्हटल्यावर येणारे धुंदावलेले चेहरे आणि धूर नाही. इथे ड्रग्जचं seduction दाखवणं हा दिग्दर्शकाचा हेतूच नाही कारण त्याला ड्रग्ज हा काय भयानक प्रकार आहे आणि त्याचा विळखा भारतातल्या एका संपन्न राज्याला कसा बसलाय ते दाखवायचं आहे. हेराॅइन, स्मॅक (मुंबईत त्याला गर्द किंवा ब्राऊन शुगर म्हणतात), आणि चिट्टा - पंजाबीमध्ये सफेद - प्रत्यक्षात कोकेन यांनी पंजाबी तरुणाईची लावलेली वाट दाखवणं हा त्याचा हेतू आहे आणि त्यात तो यशस्वी होतो. सेन्सॉरने या चित्रपटाला पंजाबची बदनामी होते म्हणून आडकाठी केली हे हास्यास्पद आहे आणि शहामृगी वृत्तीचं द्योतक आहे. सरसो के खेत मे लहलहाने वाला पंजाब, लोडी आणि बैसाखी साजरा करणारा उत्सवप्रिय, रोमँटिक पंजाब हा दिग्दर्शकाला दाखवायचाच नाहीये. त्यामुळे शिव्या समर्थनीय आहेत. जेव्हा टाॅमीचे (शाहिद कपूर) फॅन्स त्याला तुरुंगात त्यांनी कसा ड्रग्जपायी आपल्या आईचा खून केला ते सांगतात तेव्हा शिव्या नाही येणार तोंडात तर काय येणार? थप्पड मारल्यावर झिणझिण्या येतातच आणि झिणझिण्या याव्यात हाच थपडेचा हेतू असतो. आणि कधीकधी सुधारण्यासाठी थप्पड गरजेची असते. उडता पंजाब ही अशीच थप्पड आहे. अभिनय, संगीत, कॅमेरा आणि संकलन निव्वळ अफाट. शाहिद आणि आलियाच्या व्यक्तिरेखा या अनियंत्रित, on the edge, बेभान आयुष्य जगणाऱ्या आहेत आणि त्यांच्यासमोर करीना आणि दलजित यांच्या व्यक्तिरेखा या नियंत्रित आणि भानावर राहणाऱ्या आहेत. हा समतोल दिग्दर्शकाने सुंदर सांभाळला आहे. त्यावरून दुस-या स्टीव्हनची - सोडरबर्गची आणि त्याच्या आॅस्कर विजेत्या Traffic ची आठवण येते. तिथेही अशाच समांतर व्यक्तिरेखा आहेत आणि ड्रग्ज हाच मुख्य विषय आहे. पण अभिषेक चौबेने भारतीयीकरण इतकं चपखल केलं आहे की कुठेही Traffic ची नक्कल केलीय असं वाटत नाही. चित्रपटातली सर्वात जबरदस्त व्यक्तिरेखा जर कुठली असेल तर ती म्हणजे पंजाब. हा ड्रग्जनी शरीर आणि मेंदू सुन्न झालेला पंजाब भयावह आहे पण तितकाच डोळे उघडणारा आहे. चित्रपटाच्या शेवटी मीही पंजाबला उद्देशून हेच म्हणालो - तेरे ड्रग्ज दी मा दी xxxx
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Mon, 06/20/2016 - 13:49

In reply to माझेही चार शब्द (चमुंचं परीक्षण वाचल्यावर चित्रपट पाहिलाय) by बोका-ए-आझम

Permalink

सुंदर प्रतिसाद

सुंदर प्रतिसाद
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 06/20/2016 - 14:21

In reply to माझेही चार शब्द (चमुंचं परीक्षण वाचल्यावर चित्रपट पाहिलाय) by बोका-ए-आझम

Permalink

जबरदस्त! अजून तपशीलवार लिहून

जबरदस्त! अजून तपशीलवार लिहून वेगळा धागा काढावा ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Mon, 06/20/2016 - 19:32

In reply to जबरदस्त! अजून तपशीलवार लिहून by आदूबाळ

Permalink

अनुमोदन

+१
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on Mon, 06/20/2016 - 23:20

In reply to अनुमोदन by तुषार काळभोर

Permalink

+१

सहमत
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 06/20/2016 - 18:04

In reply to माझेही चार शब्द (चमुंचं परीक्षण वाचल्यावर चित्रपट पाहिलाय) by बोका-ए-आझम

Permalink

हे चित्र खरंच भयानक आहे

हे चित्र खरंच भयानक आहे एकेकाळी आयएमए मध्ये पंजाबी कॅडेट्स बहुसंख्य असत ह्या वर्षी फक्त अन फक्त 27 पोरे, पासआऊट झाली/होत आहेत, काहीतरी भयानक चुकतंय बॉस अन हे दाखवले म्हणून पहलाज आबा भसकला होता काय? (कपाळ बडवी smiley)
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Mon, 06/20/2016 - 18:04

In reply to माझेही चार शब्द (चमुंचं परीक्षण वाचल्यावर चित्रपट पाहिलाय) by बोका-ए-आझम

Permalink

हे चित्र खरंच भयानक आहे

हे चित्र खरंच भयानक आहे एकेकाळी आयएमए मध्ये पंजाबी कॅडेट्स बहुसंख्य असत ह्या वर्षी फक्त अन फक्त 27 पोरे, पासआऊट झाली/होत आहेत, काहीतरी भयानक चुकतंय बॉस अन हे दाखवले म्हणून पहलाज आबा भसकला होता काय? (कपाळ बडवी smiley)
  • Log in or register to post comments

Submitted by अद्द्या on Tue, 06/21/2016 - 10:22

In reply to माझेही चार शब्द (चमुंचं परीक्षण वाचल्यावर चित्रपट पाहिलाय) by बोका-ए-आझम

Permalink

"जाबची बदनामी होते म्हणून

"जाबची बदनामी होते म्हणून आडकाठी केली हे हास्यास्पद आहे आणि शहामृगी वृत्तीचं द्योतक आहे" +१०० जबरदस्त प्रतिसाद , आपलं हि परीक्षण येउदे ,
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 06/21/2016 - 11:17

In reply to माझेही चार शब्द (चमुंचं परीक्षण वाचल्यावर चित्रपट पाहिलाय) by बोका-ए-आझम

Permalink

बोका ए आझम जबरदस्त परीक्षण!

बोका ए आझम जबरदस्त परीक्षण! शाहीदसाठी बघणारच!
  • Log in or register to post comments

Submitted by समीरसूर on Mon, 06/20/2016 - 13:49

Permalink

जबरदस्त परीक्षण! आवडले.

जबरदस्त परीक्षण! आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by काजुकतली on Mon, 06/20/2016 - 14:14

Permalink

चित्रपट सुरेख आहे. पंजाबचे

चित्रपट सुरेख आहे. पंजाबचे हेच खरे वास्तव असेल तर खुप भयानक आहे. आणि ह्याला जबाबदार लोक कोण आहेत हे बघितले की हे राज्यकर्ते की हैवान असे वाटते. आणि कुटूंबवत्सल लोक कशाला मरायला गेलेले चित्रपट पाहायला? चितपट प्रौढांसाठी आहे. कुटूंबवत्सलांना आत सोडले कोणी?? मुम्बैत आय कार्ड चेक केल्याशिवाय आत सोडत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by शान्तिप्रिय on Mon, 06/20/2016 - 14:20

Permalink

परीक्षण आवडले.

परीक्षण आवडले. मी हे ग्रुहित धरतो की मिपाकर इतके नक्कीच सूज्ञ आहेत की प्रौढांसाठीच्या चित्रपटाला कुटूंबातील १८ वर्षांपेक्षा लहान सदस्याला घेऊन जाणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेंद्र मेहेंदळे on Mon, 06/20/2016 - 18:33

Permalink

पाहिला..पण फारसा आवडला नाही

चित्रपटाचे सुत्र महत्वाचे आहे. ड्रगचा विळखाही भयंकर आहे आणि ही एक प्रकारची छुपी लढाई आहे भारताविरुद्ध . असा चित्रपट यायलाच हवा होता. आणि तो आणल्याबद्दल निर्मात्याचे अभिनंदन. पण चित्रपट म्हणुन बघावा तर पुर्वार्ध ठिक, उत्तरार्ध जरा कंटाळवाणा वाटला.अनेक दुवे मधेच सोडुन दिल्यासारखे वाटले.शिवाय एक पोलिस अधिकारी आणि एक डॉक्टर काम धाम सोडुन ड्रग माफियांच्या पाठी लागतात हे जरा अतिरंजित वाटते शेवटचा गोळीबारही उरकल्यासारखा वाटला. आलियाची भुमिका मात्र जबराट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सचु कुळकर्णी on Mon, 06/20/2016 - 20:07

Permalink

पहलाज आबा भसकला

नाय बाप्पु ते बुजाडल होत.
  • Log in or register to post comments

Submitted by पीशिम्पी on Mon, 06/20/2016 - 20:08

Permalink

सुन्न मनःस्थिती......

काल बघितला चित्रपट.खरच अस्वस्थ करणारा आहे. पण थोडा संथ झाल्यासारखा वाटला मध्ये मध्ये. आलिया भट्ट - हायवे नंतर हा चित्रपट, पोरीत दम आहे नक्की. कसली अ‍ॅक्टिंग केलीय , अगदी पंखा झालोय. अ‍ॅ वॉर्ड कॅटॅगरी , नाही मिळाले तर आश्चर्य वाटेल. करीना - खुप छान आणि संयत अभिनय , करीनाचे डोळे खुप बोलके आहेत. शाहिद - खुप छान पण थोडा लाऊड झाल्या सारखा वाटला आक्रस्ताळेपणा थोडा कमी हवा होता. दिलजीत दोसंझ - पहिल्यांदा पाहीलेय पण अत्यंत वास्तविक अभिनय कुठेही अवास्तव वाटत नाही. तरी ईतर सुपरस्टार्स असले तरी चित्रपट दिलजीत आणि त्याच्या भावा भोवतीच फिरत असतो प्रत्येक भुमिका आणि कलाकार चपखल आहेत आणि प्र्त्यकाने आपल्या भुमिकेला न्याय दिलाय निवडणूक दरम्यान ड्रग्ज वाटण्याचा प्रसंग अंगावर काटे आणतो अभिषेक चौबे - हॅटस ऑफ.. गट्स पाहिजेत असले वास्तव समोर आणायला आणि सेन्सॉर सोबत लढायला आणि जे सज्जन शिव्यांबद्दल आक्षेप घेताहेत ते हे विसरतात की सत्य हे जळजळीत आणि पचवायला कडवटच असते. ह्या भाषेशिवाय हा चित्रपट मिळमिळीत झाला असता. एकेकाळी आणि अजुनही, पंजाब माझा आवडता होता पण तेथे एव्हढे भयंकर प्रकार चालत आहेत हे पचवायला अवघड जातेय... सुन्न मनःस्थिती......
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 06/20/2016 - 22:35

Permalink

परिक्षण आवडले.

परिक्षण आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by चलत मुसाफिर on Mon, 06/20/2016 - 23:15

Permalink

धन्यवाद.

सर्वांचेच. इतके विचारप्रवर्तक आणि मनःपूर्वक प्रतिसाद लिहिल्याबद्दल.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Tue, 06/21/2016 - 11:18

Permalink

परीक्षण आणि सर्व प्रतिसाद

परीक्षण आणि सर्व प्रतिसाद आवडले! पाहणारच!
  • Log in or register to post comments

Submitted by अनिरुद्ध प्रभू on Tue, 06/21/2016 - 11:22

Permalink

ह्म्म्म

परिक्षण छान!!!! पहिल्या नंतर लिहिन सविस्तर.............
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com