Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by आदूबाळ on Fri, 06/10/2016 - 17:57
लेखनविषय (Tags)
जीवनमान
देशांतर
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
गेली दोन वर्षं लंडनमध्ये मिपाकरांचा वासंतिक कट्टा होतो आहे, पण त्याचे वृत्तांत आणि फोटो कुठेही लीक होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेतली गेली. ;) पण यंदा न्यूयॉर्क आणि रत्नागिरी या जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये मिपाकट्टे करायचं घाटत असल्याने तमाम (ग्रेटर) लंडनवासी मिपाकरांच्या हृदयांत कालवाकालव झाली. तसंच ज्येष्ठ आणि तरूण मिपाकर विजुभाऊ यांचं नुकतंच राणीच्या देशात आगमन झालं असल्याने कट्टा करायच्या बेताला पाठबळ मिळालं. तर आतापर्यंत ठरलेले तपशील असे: तारीखः १८ जून २०१६ स्थळः ग्रीनिच ग्रीनिचमध्ये सुप्रसिद्ध ग्रीनिच वेधशाळा तर आहेच, पण सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची आठवण म्हणून बांधला गेलेला "सेवेर्नदुर्ग कासल"ही आहे. मालोजीरावांनी त्याबद्दल लिहिलेला लेख येथे मिळेल. परत बदल होऊन मूळ ठिकाण नक्की झाले आहे. अनाहिता धरून जवळजवळ दहा तरी लोकांची उपस्थिती असेल असा प्राथमिक अंदाज आहे. यूकेस्थित मिपाकरांस कट्ट्यास उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास मला किंवा विजुभाऊंना व्यनि करावा. कार्य सिद्धीस नेणेस कट्टाप्पा श्रीमुवि समर्थ आहेतच ;) कळावे, आपला...
  • Log in or register to post comments
  • 20419 views

प्रतिक्रिया

Submitted by आदूबाळ on Sun, 06/19/2016 - 16:14

Permalink

विजुभौंनी वृत्तांत लिहाआ ही

विजुभौंनी वृत्तांत लिहाआ ही नम्र विनंती. मी हापिसात गेल्याशिवाय फोटो टाकू शकत नाही. :(
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Sun, 06/19/2016 - 17:15

In reply to विजुभौंनी वृत्तांत लिहाआ ही by आदूबाळ

Permalink

जुने दिवस आठवले.

जुने दिवस आठवले. सध्या मी तिथला एक फोटू टाकून ठेवतो... Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती राजेश on Sun, 06/19/2016 - 18:14

Permalink

Katta etaka chhan zala...ki..

Sagale London mi.pa.kar...ajuni tyach dhundit aahet...vijubhau lavakarch yeu det...vrutant..
  • Log in or register to post comments

Submitted by पिलीयन रायडर on Mon, 06/20/2016 - 02:59

Permalink

ओ कॉपी कॅट कट्टेकरी.. झाला का

ओ कॉपी कॅट कट्टेकरी.. झाला का कट्टा! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Tue, 06/21/2016 - 01:06

In reply to ओ कॉपी कॅट कट्टेकरी.. झाला का by पिलीयन रायडर

Permalink

++१

++१
  • Log in or register to post comments

Submitted by प्रीत-मोहर on Mon, 06/20/2016 - 15:44

Permalink

वृ कधी राणीच्या देशातले लोक्स

वृ कधी राणीच्या देशातले लोक्स? लौकर वृ टाकणे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा राऊत on Mon, 06/20/2016 - 15:50

Permalink

लोक्स दमलेत.. परत आल्यापासुन

लोक्स दमलेत.. परत आल्यापासुन कोणाचे काहीही मेसेज नाहीत :)
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 06/22/2016 - 22:33

Permalink

कट्टा..... नक्की झाला ना?

कट्टा..... नक्की झाला ना?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Wed, 06/22/2016 - 23:43

In reply to कट्टा..... नक्की झाला ना? by एस

Permalink

बिजूभाव इज बिज्जी. सो लेट इन

बिजूभाव इज बिज्जी. सो लेट इन वृत्तांतीन्ग. बट कट्टा वॉज.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 06/23/2016 - 00:09

In reply to बिजूभाव इज बिज्जी. सो लेट इन by आदूबाळ

Permalink

यु आर बिकॉज कट्टा वॉज.

यु आर बिकॉज कट्टा वॉज. अदरवाईज........ . खरं सांग आदूबाळा हं, झेडपीची नियोजन मीटिंग नाय ना केली फक्त कागदावरची? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय माने on गुरुवार, 06/23/2016 - 00:21

In reply to यु आर बिकॉज कट्टा वॉज. by अभ्या..

Permalink

कह्याचा कट्टा आन काय? उगा

कह्याचा कट्टा आन काय? उगा आपलं ह्ये केलं आन ते केलं. ना बातमी, ना फटु. आदूबाळ, बुलेट चालवा तुमि. (आठवनार नाय हे पण सांगतो) तद् माताय!
  • Log in or register to post comments

Submitted by जुइ on गुरुवार, 06/23/2016 - 00:03

Permalink

वृत्तांत आणि फोटो?

वृत्तांत आणि फोटो?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on गुरुवार, 06/23/2016 - 03:12

Permalink

http://misalpav.com/node

http://misalpav.com/node/36461
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com