✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लंडन कट्टा - सालाबादप्रमाणे यंदाही होणार!

आ
आदूबाळ यांनी
Fri, 06/10/2016 - 17:57  ·  लेख
लेख
गेली दोन वर्षं लंडनमध्ये मिपाकरांचा वासंतिक कट्टा होतो आहे, पण त्याचे वृत्तांत आणि फोटो कुठेही लीक होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेतली गेली. ;) पण यंदा न्यूयॉर्क आणि रत्नागिरी या जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये मिपाकट्टे करायचं घाटत असल्याने तमाम (ग्रेटर) लंडनवासी मिपाकरांच्या हृदयांत कालवाकालव झाली. तसंच ज्येष्ठ आणि तरूण मिपाकर विजुभाऊ यांचं नुकतंच राणीच्या देशात आगमन झालं असल्याने कट्टा करायच्या बेताला पाठबळ मिळालं. तर आतापर्यंत ठरलेले तपशील असे: तारीखः १८ जून २०१६ स्थळः ग्रीनिच ग्रीनिचमध्ये सुप्रसिद्ध ग्रीनिच वेधशाळा तर आहेच, पण सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सुवर्णदुर्ग किल्ल्याची आठवण म्हणून बांधला गेलेला "सेवेर्नदुर्ग कासल"ही आहे. मालोजीरावांनी त्याबद्दल लिहिलेला लेख येथे मिळेल. परत बदल होऊन मूळ ठिकाण नक्की झाले आहे. अनाहिता धरून जवळजवळ दहा तरी लोकांची उपस्थिती असेल असा प्राथमिक अंदाज आहे. यूकेस्थित मिपाकरांस कट्ट्यास उपस्थित राहण्याची इच्छा असल्यास मला किंवा विजुभाऊंना व्यनि करावा. कार्य सिद्धीस नेणेस कट्टाप्पा श्रीमुवि समर्थ आहेतच ;) कळावे, आपला...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
देशांतर
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
20419 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

कट्याला शुभेच्छा !!!

राघवेंद्र
Fri, 06/10/2016 - 18:57 नवीन
कट्याला शुभेच्छा !!! सर्व मिपाकर आप-आपल्या देशात कट्टा साजरा करून मिपा कट्टा विशेषांक काढता आला तर अजून छान :)
  • Log in or register to post comments

कट्ट्यास शुभेच्छा.

प्रचेतस
Fri, 06/10/2016 - 19:48 नवीन
कट्ट्यास शुभेच्छा. वृत्तांत अवश्य येऊ द्यात.
  • Log in or register to post comments

कट्याला शुभेच्छा!!!

सानिकास्वप्निल
Fri, 06/10/2016 - 20:56 नवीन
या ही वर्षी कट्टा हुकणार, सध्या भारतात आहे. समरमध्ये एखादा कट्टा याॅर्कशायरलाही होऊ द्या :)
  • Log in or register to post comments

सहमत

यश राज
Fri, 06/10/2016 - 21:52 नवीन
समरमध्ये एखादा कट्टा याॅर्कशायरलाही होऊ द्या.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

सानिकास्वप्निल नक्की करुया.

विजुभाऊ
Fri, 06/10/2016 - 21:57 नवीन
सानिकास्वप्निल नक्की करुया.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा !

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 06/11/2016 - 07:37 नवीन
कट्ट्याला शुभेच्छा ! भरपूर फोटोंसकट वृत्तांत येऊद्या.
  • Log in or register to post comments

मिपाचे आंतरराष्ट्रीय नेतृत्व

अभ्या..
Sat, 06/11/2016 - 07:56 नवीन
मिपाचे आंतरराष्ट्रीय नेतृत्व मा. श्री. आ. एक्काकाका याणी न्यूयॉर्क हितं मिपाचा आवाज घुमवण्याचा निर्धार केलेला आहे, तसंच या आवाज घुमविकरणाच्या मोहिमेला याटिकानी एकटा टैगर मा. श्री. आ. आदुबाळासाहेब लँटनकर ह्येनी तशाच स्वरूपाचा मेळावा आयोजित केलेला आहे. म्हानुन याटिकानी आपल्या उपेक्षित मराठवाड्याचे बुलंद नेतृत्व मा. श्री. आ. प्रा. डॉ. दिलीपजी बिरुटे सर साहेब यांना आवाहन करतो कि त्याच दिवशी आपल्या कार्यक्षेत्रात असाच एक मेळावा आयोजित करून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना याटिकानी शक्ती परदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. जय विश्व, जयहिंद, जय महाराष्ट्र, जय मराठवाडा, जय मिपा, जय मराठी, जय मी. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जय मी =))

टवाळ कार्टा
Mon, 06/13/2016 - 16:44 नवीन
जय मी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तो. खीच्च मेरा फोटो, खीच्च

अभ्या..
Mon, 06/13/2016 - 17:29 नवीन
तो. खीच्च मेरा फोटो, खीच्च मेरा फोटो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जय मी साठी एक मँगो मस्तानी

सूड
Mon, 06/13/2016 - 18:12 नवीन
जय मी साठी एक मँगो मस्तानी देणेत येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सूडक्या मी फक्त लिस्ट करुनच

अभ्या..
Mon, 06/13/2016 - 18:25 नवीन
सूडक्या मी फक्त लिस्ट करुनच मरणार दिसतय. आजपावेतो मस्तानीचा रिकामा गलास (ग्लासातच देतेत ना?) पण दिसायला नाही. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तो पुणेकर व्हायची प्रॅक्टिस

टवाळ कार्टा
Mon, 06/13/2016 - 18:28 नवीन
तो पुणेकर व्हायची प्रॅक्टिस कर्तोय...कधी देणार कुठे देणार काही लिहिले आहे का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

टक्या अभ्या कधी येतो आणि कधी

सूड
Mon, 06/13/2016 - 20:07 नवीन
टक्या अभ्या कधी येतो आणि कधी जातो ते कळत पण नाही, कधी देणार मस्तानी? यावेळी येणार होता तेव्हा देईन म्हटलं तर रात्री साडेदहा वाजता आमची जेवणं उरकली तरी अभ्याचा पत्ता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

एका मा. संपादकांना घरी नेऊन

अभ्या..
Tue, 06/14/2016 - 10:27 नवीन
एका मा. संपादकांना घरी नेऊन आदरसत्कार करण्यात तुम्ही गुंतलेले, आमी म्हणलं "असो. नेष्ट टाईम."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुम्हाला काय अडवलं होतं होय

सूड
Tue, 06/14/2016 - 12:07 नवीन
तुम्हाला काय अडवलं होतं होय तुम्हाला यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आरं भौ, काहुन अवांतर करतो लोकायच्या धाग्यावर. :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 06/20/2016 - 09:49 नवीन
च्यायला, अभ्याच्या प्रतिसादावर ध्यान ठेवा लागन, कुठं कुठं लिव्हित राहतं ते.... मराठवाड्यात सध्या दुष्काळ असल्यामुळे असा कोणताही कट्टा घेण्यात येणार नै असं आमचं म्हणजे माझं अन बाबा योगीराजचं ठरलं आहे. शक्तीप्रदर्शन लवकरच करण्यात येईल. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चालन वो सर,

अभ्या..
Mon, 06/20/2016 - 09:58 नवीन
चालन वो सर, आजकाल शक्तीप्रदर्शनासाठी कट्टे आयोजित होतात अशी कुणकुण आली कानी म्हणून म्हणलं. बाकी काई नाई. समस्त सोलापूर जिल्हा आपल्या पाठीशी आहे अशी ग्वाहि याटिकानी मी देऊ इच्छितो. परत जय सगळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा

नाखु
Mon, 06/20/2016 - 10:03 नवीन
पिंपरी चिंचवडकडून उभे राहुन अनुमोदन आहे. या भागाची मते प्राडाँनाच जातील अशी हमी धरणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अखिल भारतीय, शनवार, रविवार,

महासंग्राम
गुरुवार, 06/23/2016 - 15:02 नवीन
अखिल भारतीय, शनवार, रविवार, नारायण, सदाशिव, कसबा पेठ शाखा ओंकारेश्वर मित्र मंडळाची मते सुद्धा प्राडॉनाच येतील याचे भरघोस आश्वासन फक्त कट्टा पुण्यात करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कट्टयाला शुभेच्छा.दरवर्षी

अजया
Sat, 06/11/2016 - 07:58 नवीन
कट्टयाला शुभेच्छा.दरवर्षी कट्टा करायचे विसरू नका बरे.पुढच्या एक दोन वर्षात कट्टयाला हजेरी लावण्यात येईल! लोणंदकरणी आमच्या जानी दोस्तीणी आहेत!
  • Log in or register to post comments

अश्वत्थामा च्या काल फोन झाला.

विजुभाऊ
Mon, 06/13/2016 - 16:15 नवीन
अश्वत्थामा च्या काल फोन झाला. तो येतोय.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!!

सूड
Mon, 06/13/2016 - 16:27 नवीन
शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

कट्ट्याला शुभेच्छा!

हाहा
Mon, 06/13/2016 - 18:04 नवीन
यावेळी जमणार नाही :(
  • Log in or register to post comments

ह्ही ह्ही! मलाही! ;)

अत्रुप्त आत्मा
Tue, 06/14/2016 - 12:16 नवीन
ह्ही ह्ही! मलाही! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाहा

मलाही नाही जमणार :(

पद्मावति
Mon, 06/13/2016 - 18:17 नवीन
मलाही नाही जमणार :( कट्टा वृत्तांत आणि फोटो लवकर येऊ द्या. खूप शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

वेळ

पीशिम्पी
Mon, 06/13/2016 - 21:49 नवीन
वेळ काय ठरविली आहे कट्ट्यासाठीची?
  • Log in or register to post comments

अजून ठरवली नाही, पण अकराच्या

आदूबाळ
Mon, 06/13/2016 - 22:01 नवीन
अजून ठरवली नाही, पण अकराच्या आसपासची ठरवू. (विजुभाऊ, अस्वस्थामा - काय म्हणता?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पीशिम्पी

व्यनि केला आहे

लोथार मथायस
Fri, 06/17/2016 - 18:30 नवीन
व्यनि केला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कट्ट्याला शुभेच्छा....

मुक्त विहारि
Mon, 06/13/2016 - 23:13 नवीन
युरोप आणि इतर खंड अद्याप आमच्या अर्थिक कक्षेच्या बाहेर असल्याने.... तूर्त फक्त शुभेच्छा. सोनेरी पेयाच्या सार्थीने कट्टा करणार असाल तर, एक-दोन थेंब आमच्या नावाने पण उडवा.
  • Log in or register to post comments

नक्की. तसे नाही केले तर आमाला

विजुभाऊ
Tue, 06/14/2016 - 00:50 नवीन
नक्की. तसे नाही केले तर आमाला पचायचे नाही ते.
  • Log in or register to post comments

न पचायला काय झाले?

मुक्त विहारि
Tue, 06/14/2016 - 07:30 नवीन
इतके काही आम्ही दुष्ट नाही. पण त्या निमित्ताने आमची पण कट्ट्याला सुक्ष्मात राहून हजेरी होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये

नन्दादीप
Tue, 06/14/2016 - 12:24 नवीन
जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये रत्नान्ग्री चा समावेश केल्यामुळे या कट्ट्याला रत्नान्ग्रीवासीय मिपाकरांकडून लाख लाख शुभेच्छा.. असाच कट्टा करून वृत्तांत व फोटोंसाठी सगळ्याना वारंवार विचारणा करायला लावा... (अवांतर : मुवि डोंबोलीत पोचले की लगेच सविस्तर वृत्तांत टाकतीलच ही आशा )
  • Log in or register to post comments

डोन्ट वरी... कट्ट्याला जायला

विशाखा राऊत
Tue, 06/14/2016 - 14:18 नवीन
डोन्ट वरी... कट्ट्याला जायला जमले तर एक रत्नागिरीकर म्हणुनसुध्दा हजेरी लावली जाईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्दादीप

आज धागा बघितला. कट्ट्याला

विशाखा राऊत
Tue, 06/14/2016 - 14:17 नवीन
आज धागा बघितला. कट्ट्याला यायचे आहे पण हा किल्ला खुपच लांब आहे. मी सध्या रहाते तिथुन हा किल्ला जवळपास २.१५ तास अंतरावर आहे. (पब्लिक ट्रान्सपोर्टने). कट्टा करायचा म्हणजे गप्पा, खाणे, मज्जा. हा किल्ला बघायचा तर एकुण प्रवास बघता चालणे खुप जास्त आहे. मला कट्ट्याला यायचे आहे तर दुसरे ठिकाण ठरवुया का? तसे चालेल जमेल का? मी एकटीच येणार आहे त्यामुळे लंडन सिटी, एखादे पार्क असे असेल तर जास्त सोयीचे होईल. रोज २ तास प्रवास होतोच माझा त्यामुळे निदान सुट्टी दिवशी ५ तास नक्को वाटतेय. :( जर सर्वांना किल्ला पहायचा असेल तर नो प्रोब्लेम :). धमाल केलीच पाहिजे
  • Log in or register to post comments

इच्छुक...

प्रभाकर पेठकर
Tue, 06/14/2016 - 15:10 नवीन
११ ते २० जुलै दरम्यान लंडनमध्ये करणार असाल तर मी सहकुटुंब हजेरी लावू शकेन. विजूभाऊ निदान आपली तरी भेट व्हावी अशी इच्छा आहे. बाकी लंडनवासीयांच्या १८ जूनच्या कट्ट्याला मनापासून अनेकानेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

११ ते २० जुलै दरम्यान

मुक्त विहारि
Tue, 06/14/2016 - 16:51 नवीन
अजून एक कट्टा करायचा. आहे काय अन नाही काय? खरा कट्टेकरी रोज कट्टा करायला पण तयार असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

भेटु परत त्यात काय :)

विशाखा राऊत
Tue, 06/14/2016 - 18:54 नवीन
भेटु परत त्यात काय :) लंडन मुक्काम कधी ते सांगा आम्हांला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नेकी और पूछ पूछ पेठकर काका?

विजुभाऊ
Tue, 06/14/2016 - 19:22 नवीन
नेकी और पूछ पूछ पेठकर काका? तुम्हाला कोणत्या शनवारी/रैवारी वेळ आहे ते कळवा. सगळे हजर रहातो.
  • Log in or register to post comments

१६-१७ जुलै?

प्रभाकर पेठकर
Tue, 06/14/2016 - 19:49 नवीन
१० ते २० जुलै मध्ये लंडन आणि आजुबाजूला मुक्त भटकणे हाच उद्योग आहे त्यामुळे तसा सर्व दिवस मी मोकळाच आहे. १६-१७ शनिवार-रविवार आहे. मला चालेल. चला ठरवुया. आणि भेटूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

दुसरी तारीख

पीशिम्पी
Tue, 06/14/2016 - 20:18 नवीन
कट्ट्यासाठी अजुन कोणती दुसरी तारीख नाही ठरविता येणार का? १७-१८ फुल्ल आहे आधीच बुकिंग झाले आहे म्हणून विचारतोय. कट्ट्याला यायची खुप ईच्च्छा आहे. किती वाजेपर्यंत असणार आहे प्रोग्रॅम?
  • Log in or register to post comments

लोकाग्रहास्तव चेंज इन

आदूबाळ
गुरुवार, 06/16/2016 - 09:27 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

मी येणार आता कट्ट्याला :)

विशाखा राऊत
Wed, 06/15/2016 - 15:06 नवीन
मी येणार आता कट्ट्याला :) नक्की भेटु
  • Log in or register to post comments

मी नाही येणार.

विशाखा राऊत
Fri, 06/17/2016 - 18:46 नवीन
मी नाही येणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा राऊत

मी पण येणार

लोथार मथायस
Fri, 06/17/2016 - 18:25 नवीन
मी पण येणार
  • Log in or register to post comments

स्वागत आहे लोथारजी.

विजुभाऊ
Fri, 06/17/2016 - 20:05 नवीन
स्वागत आहे लोथारजी.
  • Log in or register to post comments

कट्टेकर्‍यांसाठी:

आदूबाळ
Fri, 06/17/2016 - 22:46 नवीन
कट्टेकर्‍यांसाठी: उद्या दु. १२ वाजता ग्रीनिच वेधशाळेपाशी भेटावे. जवळचं स्टेशन - कटी सार्क (डीएलआर). हवामानः १५ अंश से. ढगाळ. http://www.bbc.co.uk/weather/2647937 पार्किंगः ग्रीनिच मेरीटाईम म्यूझियमचं पार्किंग http://www.rmg.co.uk/plan-your-visit/getting-here-facilities-access/parking व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप काढला आहे. अनिवासि यांनी आपला मोबाईल क्रमांक व्यनि करावा.
  • Log in or register to post comments

कट्टा???

अभ्या..
Sun, 06/19/2016 - 14:43 नवीन
कट्टा??? फोटो????? वृत्तांत????? खादाडी?????? . ओ लंडनवाले.... फशिवता काय????
  • Log in or register to post comments

+१

पद्मावति
Sun, 06/19/2016 - 14:59 नवीन
+१
  • Log in or register to post comments

वृतांत लिहिण्यासाठी सगळे लंडन

पद्मावति
Sun, 06/19/2016 - 15:04 नवीन
वृतांत लिहिण्यासाठी सगळे लंडन वाले एकमेकांना पेहेले आप, पेहेले आप करत असतील =)
  • Log in or register to post comments

ब्रिटीश म्यानर्स सोडा.

अभ्या..
Sun, 06/19/2016 - 15:59 नवीन
ब्रिटीश म्यानर्स सोडा. मिपावरचे ब्रिटीश पण आगरी बोलतेत तस्मात फॉक्कन वृत्तांत टाकावा ही नम्र इनंती. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा