तबला/ढोलकिच जग
मंडळी
काही गोष्टी आयुष्यात फार उशिरा घडतात.पण देर आये दुरुस्त आये प्रमाणे पुढे पुढे मग त्यातली गोडी वाढत जाते आणि जो आनंद मिळतो त्याचे नाव तेच.
लहानपणापासुन तबला शिकायचे मनात होते. पण अनेक कारणांनी ते जमले नाही.गावे बदलली,नोकर्या बदलत गेल्या, जबाबदार्या वाढल्या.आयुष्य वाहातच होते.तबला शिकायच्या ईच्छेने पुन्हा उचल खाल्ली. जाता येता एका रस्त्याला मी सरांच्या नावाची पाटी बघायचो. असाच एक दिवस त्यांना भेटायला गेलो आणि माझी ओळख करुन दिली.
माणुस सत्तरीच्या पुढे. २५ वर्षे चित्रपटात आणि पुढे वीसेक वर्षे पुणे आकाशवाणीवर नोकरी केलेली.लताबाई,आशाबाई,भीमसेन्,कुमारजी सगळ्यांबरोबर वाजवलेले.पण वागण्यात कुठे ताठा नाही.
"तबला घ्या"--"वाजवुन दाखवा काहीतरी" -- सर
"अहो मला काहीच येत नाही. म्हणुन तर तुमच्याकडे आलो."--मी.
"ते ठिक आहे. पण कधीतरी वाजवलं असेलच ना? टेबल्,दरवाजा कुठेतरी ठेका धरला असेल?" ---सर
एक दोन बोटे चाटीवर आपटुन दाखविली. सर म्हणाले..बरं. यायला लागा. शिकाल तुम्ही. पण तबला घ्यावा लागेल. प्रॅक्टीस करावी लागेल घरी. तबला कसा घ्याल? ते समजावले. शिसमचे लाकुड असलेला, काळी चार् /पाच (मोठया तोंडाचा), जड पितळेचा डग्गा,हातोडी सगळा सरंजाम जमत गेला.
आणि मग एक सुरु झाला एक प्रवास.तबला शिकायला प्रथम फक्त रविवारीच जायचो. काय करणार? नोकरीची वेळच तशी.पण नंतर लक्षात आले की सोमवार/गुरुवार संध्याकाळी गेलो तर अनेक नमुने भेटतात क्लासमधे. प्रत्येकाची पायरी वेगळी,प्रत्येकाचे कसब वेगळे. १० वर्षाच्या मुलापासुन ते ७० वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत. स्वानंदासाठी शिकणार्यापासुन ते मैफलीत वाजवणार्यापर्यंत.कोणाला उत्तम वाजवता येते पण त्यामागचे बोलांचे व्याकरण माहीत नाही. तर कोणी बोल म्हणतो पण हात फार चालत नाही.पण कधी कधी पर्वणी असेल तर असे जंगड भेटतात की ज्याचे नाव ते. अक्षरशः दैवी देणगी असते एकेकाला. दुसरा शब्दच नाही.
असाच आज सकाळी गेलो, आणि जिन्यातच ढोलकीचा कडाडण्याचा आवाज आला. अरेच्चा? रविवारी कोण आलंय बुवा?
एक गाणे संपले आणि दरवाजा वाजवुन मी आत गेलो. मैफल एकदम रंगात आली होती. जळगावचे राम शाम गिराड बंधु आणि त्यांचे बाबा. एकजण पेटीवर, दोन ढोलकी आणि एक झांज. आहाहा...अशी सुवर्णसंधी कधीतरीच येते. चुपचाप वही मिटुन बाजुला ठेवली आणि ऐकत बसलो. तास दोन तास कसे गेले समजलेच नाही.
बाबा गिराड आषाढी वारीसाठी अळंदीला आले होते आणि वेळ काढुन सरांना भेटायला आले होते. त्यांचा एक ऑर्केस्ट्रा आहे. राम जवळ जवळ ४० वाद्ये वाजवु शकतात. शामही ढोलकी उस्ताद आहे.पण दोघे सध्या संगीतात पी.एच.डी करायला ईथेच राहिलेत.राम एकावर एक आश्चर्ये लीलया सादर करत होते. एकच गाणे बाई आणि बुवाच्या आवाजात म्हणणे हा तर त्यांचा हातखंडा. खालील लिंक पहा
राम/शाम
मैफलीच्या शेवटी सरांना ढोलकी वादन करायचा आग्रह झाला आणि अजुन एक मेजवानी पदरात पडली.
खालील लिंक पहा
सरांची ढोलकि
वर्गीकरण
प्रतिक्रिया
क्या बात है! आपला छंद
वा वा क्या बात है!
दोन्ही लिंक्स उघडत नाही आहेत.
वाह उस्ताद
आपला तबला ऐकवा की
नाही .. माझी अजुन तेव्हढी प्रगती झाली नाहिये.
संपादन करता येत नाहिये... त्यामुळे लिंक खाली देत आहे.
अजून पण लिंक उघडत नाही.
साधारण सारखा प्रवास असल्याने
चुकलेला तालही कधीतरी समेवर येतोच, तसंच माणसाचं आहे.
क्या बात है!
@ रा मे
खूप छान
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
धन्यवाद
धन्यवाद
वा.छंद असण्यासारखं सुख नाही.