मंडळी
काही गोष्टी आयुष्यात फार उशिरा घडतात.पण देर आये दुरुस्त आये प्रमाणे पुढे पुढे मग त्यातली गोडी वाढत जाते आणि जो आनंद मिळतो त्याचे नाव तेच.
लहानपणापासुन तबला शिकायचे मनात होते. पण अनेक कारणांनी ते जमले नाही.गावे बदलली,नोकर्या बदलत गेल्या, जबाबदार्या वाढल्या.आयुष्य वाहातच होते.तबला शिकायच्या ईच्छेने पुन्हा उचल खाल्ली. जाता येता एका रस्त्याला मी सरांच्या नावाची पाटी बघायचो. असाच एक दिवस त्यांना भेटायला गेलो आणि माझी ओळख करुन दिली.
माणुस सत्तरीच्या पुढे. २५ वर्षे चित्रपटात आणि पुढे वीसेक वर्षे पुणे आकाशवाणीवर नोकरी केलेली.लताबाई,आशाबाई,भीमसेन्,कुमारजी सगळ्यांबरोबर वाजवलेले.पण वागण्यात कुठे ताठा नाही.
"तबला घ्या"--"वाजवुन दाखवा काहीतरी" -- सर
"अहो मला काहीच येत नाही. म्हणुन तर तुमच्याकडे आलो."--मी.
"ते ठिक आहे. पण कधीतरी वाजवलं असेलच ना? टेबल्,दरवाजा कुठेतरी ठेका धरला असेल?" ---सर
एक दोन बोटे चाटीवर आपटुन दाखविली. सर म्हणाले..बरं. यायला लागा. शिकाल तुम्ही. पण तबला घ्यावा लागेल. प्रॅक्टीस करावी लागेल घरी. तबला कसा घ्याल? ते समजावले. शिसमचे लाकुड असलेला, काळी चार् /पाच (मोठया तोंडाचा), जड पितळेचा डग्गा,हातोडी सगळा सरंजाम जमत गेला.
आणि मग एक सुरु झाला एक प्रवास.तबला शिकायला प्रथम फक्त रविवारीच जायचो. काय करणार? नोकरीची वेळच तशी.पण नंतर लक्षात आले की सोमवार/गुरुवार संध्याकाळी गेलो तर अनेक नमुने भेटतात क्लासमधे. प्रत्येकाची पायरी वेगळी,प्रत्येकाचे कसब वेगळे. १० वर्षाच्या मुलापासुन ते ७० वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत. स्वानंदासाठी शिकणार्यापासुन ते मैफलीत वाजवणार्यापर्यंत.कोणाला उत्तम वाजवता येते पण त्यामागचे बोलांचे व्याकरण माहीत नाही. तर कोणी बोल म्हणतो पण हात फार चालत नाही.पण कधी कधी पर्वणी असेल तर असे जंगड भेटतात की ज्याचे नाव ते. अक्षरशः दैवी देणगी असते एकेकाला. दुसरा शब्दच नाही.
असाच आज सकाळी गेलो, आणि जिन्यातच ढोलकीचा कडाडण्याचा आवाज आला. अरेच्चा? रविवारी कोण आलंय बुवा?
एक गाणे संपले आणि दरवाजा वाजवुन मी आत गेलो. मैफल एकदम रंगात आली होती. जळगावचे राम शाम गिराड बंधु आणि त्यांचे बाबा. एकजण पेटीवर, दोन ढोलकी आणि एक झांज. आहाहा...अशी सुवर्णसंधी कधीतरीच येते. चुपचाप वही मिटुन बाजुला ठेवली आणि ऐकत बसलो. तास दोन तास कसे गेले समजलेच नाही.
बाबा गिराड आषाढी वारीसाठी अळंदीला आले होते आणि वेळ काढुन सरांना भेटायला आले होते. त्यांचा एक ऑर्केस्ट्रा आहे. राम जवळ जवळ ४० वाद्ये वाजवु शकतात. शामही ढोलकी उस्ताद आहे.पण दोघे सध्या संगीतात पी.एच.डी करायला ईथेच राहिलेत.राम एकावर एक आश्चर्ये लीलया सादर करत होते. एकच गाणे बाई आणि बुवाच्या आवाजात म्हणणे हा तर त्यांचा हातखंडा. खालील लिंक पहा
राम/शाम
मैफलीच्या शेवटी सरांना ढोलकी वादन करायचा आग्रह झाला आणि अजुन एक मेजवानी पदरात पडली.
खालील लिंक पहा
सरांची ढोलकि
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है! आपला छंद
क्या बात है! आपला छंद जोपासण्याची संधी आयुष्यात उशिराने मिळाली तरी तिचे सोने करायला हवे.
वा वा क्या बात है!
छंद असणं आणि कधी ना कधी तो पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास सुरु होणं दोन्ही गोष्टी महान आहेत!
तुमच्या सरांचं ढोलकीवादन ऐकलं, सुंदरच वाजवलंय!
(राम्/शाम गाण्याची लिंक मात्र उघडली नाही - पेज नॉट फाउंड एरर येतेय)
अजून लिहा.
-रंगा
दोन्ही लिंक्स उघडत नाही आहेत.
छंद जोपासायच्या इच्छेला सलाम..
वाह उस्ताद
वाह उस्ताद . छान माहिती .
आपला तबला ऐकवा की
आपला तबला ऐकवा की
(लिंक उघडता आलेल्या नाहीत)
धन्यवाद...
नाही .. माझी अजुन तेव्हढी प्रगती झाली नाहिये.
In reply to आपला तबला ऐकवा की by असंका
वेळ आली की ऐकवीनच.
संपादन करता येत नाहिये... त्यामुळे लिंक खाली देत आहे.
राम/शाम बंधु
https://www.flickr.com/photos/136559741@N02/27736608426/in/photostream/#
सरांची ढोलकी
https://www.flickr.com/photos/136559741@N02/27696883891/in/photostream/#
अजून पण लिंक उघडत नाही.
In reply to संपादन करता येत नाहिये... त्यामुळे लिंक खाली देत आहे. by राजेंद्र मेहेंदळे
जमल्यास हे व्हिडिओ, यु-ट्युब वर अपलोड कराल का?
साधारण सारखा प्रवास असल्याने
मी तुमच्या मानाने फार लवकर शिकलोय बहुदा त्यामुळे माझ्याकडे सबबी कमी होत्या. तरीही शिकण्यात खंड पडला तो पडलाच. तेंव्हा, अगदी तसाच नाही पण साधारण सारखा प्रवास असल्याने सांगतो; सोडू नका. थोडं थोडकं, तोडकं मोडकं का होईना, वाजवत रहा.
चुकलेला तालही कधीतरी समेवर येतोच, तसंच माणसाचं आहे. आता लय सोडू नका.
चुकलेला तालही कधीतरी समेवर येतोच, तसंच माणसाचं आहे.
In reply to साधारण सारखा प्रवास असल्याने by वेल्लाभट
+ १
क्या बात है!
मेहेंदळेसर तबला प्रवासासाठी तुम्हांला खूप शुभेच्छा आणि इतका सुंदर लेख वाचायला दिलात त्याबद्दल धन्यवादही!!
Sandy
@ रा मे
ढोलकीची लिंक पाहिली. पहिली लिंक ओपन होत नाही आहे.
ढोलकी खासच !!!!!!!!
छंदासाठी शुभेच्छा ….
खूप छान
मी पण तबला ढोलकी वाजवत होतो आता सराव नाही धूळ खात पडून आहे ....
आत्ता लोक मला वाजवून जातात हा हा हा हा हा हा हा हः
अभिनंदन आणि खूप शुभेच्छा
तबला शिकण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा.
एक छोटीशी सूचना - शिकण्याबरोबरच गाणं ऐकणंही खूप महत्त्वाचं. जसं जमेल तसं-तेव्हा-तिथे गाणं ऐकावं - विशेषतः शास्त्रीय संगीताची लाइव्ह मैफल. तसंच, हल्ली टीव्हीवर 'इन सिंक' वाहिनीवर विविध प्रकारचं संगीत ऐकायला मिळतं.
तुम्ही मुंबईत राहता का? मुंबईत राहत असाल, तर जरूर कळवा. आपण एकत्रच जात जाऊ मैफलींना.
धन्यवाद
आपला सल्ला जरूर आइकेन
मी पुण्यात राहतो
पण मैफली इथेही असतील
धन्यवाद
आपला सल्ला जरूर ऎकेन
मी पुण्यात राहतो
पण मैफली इथेही असतील
वा.छंद असण्यासारखं सुख नाही.
वा.छंद असण्यासारखं सुख नाही.
आमच्या गावात मध्ये वारकरी भजनी परंपरा मोठी आहे.इथली काही मुलं गुरुकूल प्रथेसारखी नामांकित पखावजवादकांकडे राहून शिकतात.त्यांचे गुरु अधूनमधून इथे सप्ताहासाठी येतात.तेव्हा अप्रतिम जुगलबंद्या ऐकायला मिळतात.