✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तबला/ढोलकिच जग

र
राजेंद्र मेहेंदळे यांनी
Sun, 06/19/2016 - 20:51  ·  लेख
लेख
मंडळी काही गोष्टी आयुष्यात फार उशिरा घडतात.पण देर आये दुरुस्त आये प्रमाणे पुढे पुढे मग त्यातली गोडी वाढत जाते आणि जो आनंद मिळतो त्याचे नाव तेच. लहानपणापासुन तबला शिकायचे मनात होते. पण अनेक कारणांनी ते जमले नाही.गावे बदलली,नोकर्‍या बदलत गेल्या, जबाबदार्‍या वाढल्या.आयुष्य वाहातच होते.तबला शिकायच्या ईच्छेने पुन्हा उचल खाल्ली. जाता येता एका रस्त्याला मी सरांच्या नावाची पाटी बघायचो. असाच एक दिवस त्यांना भेटायला गेलो आणि माझी ओळख करुन दिली. माणुस सत्तरीच्या पुढे. २५ वर्षे चित्रपटात आणि पुढे वीसेक वर्षे पुणे आकाशवाणीवर नोकरी केलेली.लताबाई,आशाबाई,भीमसेन्,कुमारजी सगळ्यांबरोबर वाजवलेले.पण वागण्यात कुठे ताठा नाही. "तबला घ्या"--"वाजवुन दाखवा काहीतरी" -- सर "अहो मला काहीच येत नाही. म्हणुन तर तुमच्याकडे आलो."--मी. "ते ठिक आहे. पण कधीतरी वाजवलं असेलच ना? टेबल्,दरवाजा कुठेतरी ठेका धरला असेल?" ---सर एक दोन बोटे चाटीवर आपटुन दाखविली. सर म्हणाले..बरं. यायला लागा. शिकाल तुम्ही. पण तबला घ्यावा लागेल. प्रॅक्टीस करावी लागेल घरी. तबला कसा घ्याल? ते समजावले. शिसमचे लाकुड असलेला, काळी चार् /पाच (मोठया तोंडाचा), जड पितळेचा डग्गा,हातोडी सगळा सरंजाम जमत गेला. आणि मग एक सुरु झाला एक प्रवास.तबला शिकायला प्रथम फक्त रविवारीच जायचो. काय करणार? नोकरीची वेळच तशी.पण नंतर लक्षात आले की सोमवार/गुरुवार संध्याकाळी गेलो तर अनेक नमुने भेटतात क्लासमधे. प्रत्येकाची पायरी वेगळी,प्रत्येकाचे कसब वेगळे. १० वर्षाच्या मुलापासुन ते ७० वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत. स्वानंदासाठी शिकणार्‍यापासुन ते मैफलीत वाजवणार्यापर्यंत.कोणाला उत्तम वाजवता येते पण त्यामागचे बोलांचे व्याकरण माहीत नाही. तर कोणी बोल म्हणतो पण हात फार चालत नाही.पण कधी कधी पर्वणी असेल तर असे जंगड भेटतात की ज्याचे नाव ते. अक्षरशः दैवी देणगी असते एकेकाला. दुसरा शब्दच नाही. असाच आज सकाळी गेलो, आणि जिन्यातच ढोलकीचा कडाडण्याचा आवाज आला. अरेच्चा? रविवारी कोण आलंय बुवा? एक गाणे संपले आणि दरवाजा वाजवुन मी आत गेलो. मैफल एकदम रंगात आली होती. जळगावचे राम शाम गिराड बंधु आणि त्यांचे बाबा. एकजण पेटीवर, दोन ढोलकी आणि एक झांज. आहाहा...अशी सुवर्णसंधी कधीतरीच येते. चुपचाप वही मिटुन बाजुला ठेवली आणि ऐकत बसलो. तास दोन तास कसे गेले समजलेच नाही. बाबा गिराड आषाढी वारीसाठी अळंदीला आले होते आणि वेळ काढुन सरांना भेटायला आले होते. त्यांचा एक ऑर्केस्ट्रा आहे. राम जवळ जवळ ४० वाद्ये वाजवु शकतात. शामही ढोलकी उस्ताद आहे.पण दोघे सध्या संगीतात पी.एच.डी करायला ईथेच राहिलेत.राम एकावर एक आश्चर्ये लीलया सादर करत होते. एकच गाणे बाई आणि बुवाच्या आवाजात म्हणणे हा तर त्यांचा हातखंडा. खालील लिंक पहा राम/शाम मैफलीच्या शेवटी सरांना ढोलकी वादन करायचा आग्रह झाला आणि अजुन एक मेजवानी पदरात पडली. खालील लिंक पहा सरांची ढोलकि
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
3797 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

क्या बात है! आपला छंद

एस
Sun, 06/19/2016 - 21:16 नवीन
क्या बात है! आपला छंद जोपासण्याची संधी आयुष्यात उशिराने मिळाली तरी तिचे सोने करायला हवे.
  • Log in or register to post comments

वा वा क्या बात है!

चतुरंग
Mon, 06/20/2016 - 01:38 नवीन
छंद असणं आणि कधी ना कधी तो पूर्ण करण्याच्या दिशेने प्रवास सुरु होणं दोन्ही गोष्टी महान आहेत! तुमच्या सरांचं ढोलकीवादन ऐकलं, सुंदरच वाजवलंय! (राम्/शाम गाण्याची लिंक मात्र उघडली नाही - पेज नॉट फाउंड एरर येतेय) अजून लिहा. -रंगा
  • Log in or register to post comments

दोन्ही लिंक्स उघडत नाही आहेत.

मुक्त विहारि
Mon, 06/20/2016 - 08:07 नवीन
छंद जोपासायच्या इच्छेला सलाम..
  • Log in or register to post comments

वाह उस्ताद

सिरुसेरि
Mon, 06/20/2016 - 08:45 नवीन
वाह उस्ताद . छान माहिती .
  • Log in or register to post comments

आपला तबला ऐकवा की

असंका
Mon, 06/20/2016 - 08:51 नवीन
आपला तबला ऐकवा की (लिंक उघडता आलेल्या नाहीत) धन्यवाद...
  • Log in or register to post comments

नाही .. माझी अजुन तेव्हढी प्रगती झाली नाहिये.

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 06/20/2016 - 11:20 नवीन
वेळ आली की ऐकवीनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

संपादन करता येत नाहिये... त्यामुळे लिंक खाली देत आहे.

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 06/20/2016 - 11:18 नवीन
राम/शाम बंधु https://www.flickr.com/photos/136559741@N02/27736608426/in/photostream/# सरांची ढोलकी https://www.flickr.com/photos/136559741@N02/27696883891/in/photostream/#
  • Log in or register to post comments

अजून पण लिंक उघडत नाही.

मुक्त विहारि
Mon, 06/20/2016 - 11:49 नवीन
जमल्यास हे व्हिडिओ, यु-ट्युब वर अपलोड कराल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे

साधारण सारखा प्रवास असल्याने

वेल्लाभट
Mon, 06/20/2016 - 12:12 नवीन
मी तुमच्या मानाने फार लवकर शिकलोय बहुदा त्यामुळे माझ्याकडे सबबी कमी होत्या. तरीही शिकण्यात खंड पडला तो पडलाच. तेंव्हा, अगदी तसाच नाही पण साधारण सारखा प्रवास असल्याने सांगतो; सोडू नका. थोडं थोडकं, तोडकं मोडकं का होईना, वाजवत रहा. चुकलेला तालही कधीतरी समेवर येतोच, तसंच माणसाचं आहे. आता लय सोडू नका.
  • Log in or register to post comments

चुकलेला तालही कधीतरी समेवर येतोच, तसंच माणसाचं आहे.

मुक्त विहारि
Mon, 06/20/2016 - 13:22 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

क्या बात है!

चांदणे संदीप
Mon, 06/20/2016 - 12:14 नवीन
मेहेंदळेसर तबला प्रवासासाठी तुम्हांला खूप शुभेच्छा आणि इतका सुंदर लेख वाचायला दिलात त्याबद्दल धन्यवादही!! Sandy
  • Log in or register to post comments

@ रा मे

विअर्ड विक्स
Mon, 06/20/2016 - 14:28 नवीन
ढोलकीची लिंक पाहिली. पहिली लिंक ओपन होत नाही आहे. ढोलकी खासच !!!!!!!! छंदासाठी शुभेच्छा ….
  • Log in or register to post comments

खूप छान

अजय देशपांडे
Mon, 06/20/2016 - 17:45 नवीन
मी पण तबला ढोलकी वाजवत होतो आता सराव नाही धूळ खात पडून आहे .... आत्ता लोक मला वाजवून जातात हा हा हा हा हा हा हा हः
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि खूप शुभेच्छा

सुधांशुनूलकर
Tue, 06/21/2016 - 20:17 नवीन
तबला शिकण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. एक छोटीशी सूचना - शिकण्याबरोबरच गाणं ऐकणंही खूप महत्त्वाचं. जसं जमेल तसं-तेव्हा-तिथे गाणं ऐकावं - विशेषतः शास्त्रीय संगीताची लाइव्ह मैफल. तसंच, हल्ली टीव्हीवर 'इन सिंक' वाहिनीवर विविध प्रकारचं संगीत ऐकायला मिळतं. तुम्ही मुंबईत राहता का? मुंबईत राहत असाल, तर जरूर कळवा. आपण एकत्रच जात जाऊ मैफलींना.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 06/29/2016 - 11:27 नवीन
आपला सल्ला जरूर आइकेन मी पुण्यात राहतो पण मैफली इथेही असतील
  • Log in or register to post comments

धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 06/29/2016 - 11:37 नवीन
आपला सल्ला जरूर ऎकेन मी पुण्यात राहतो पण मैफली इथेही असतील
  • Log in or register to post comments

वा.छंद असण्यासारखं सुख नाही.

अजया
Wed, 06/29/2016 - 14:20 नवीन
वा.छंद असण्यासारखं सुख नाही. आमच्या गावात मध्ये वारकरी भजनी परंपरा मोठी आहे.इथली काही मुलं गुरुकूल प्रथेसारखी नामांकित पखावजवादकांकडे राहून शिकतात.त्यांचे गुरु अधूनमधून इथे सप्ताहासाठी येतात.तेव्हा अप्रतिम जुगलबंद्या ऐकायला मिळतात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा