'फुंथ्रू'..........
मराठी चित्रपट्स्रुष्टी हीच भारतीय चित्रपट्स्रुष्टीची जननी आहे यात कितीही वाद असले तरी ते सत्य आहे. बर मग सांगा कि पहिला चित्रपट हिंदी होता का मराठी असले गौण प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही. या मराठी चित्रस्रुष्टीचे आजपर्यंत तीन भाग पडतात- एक १९१३ ते १९८० चा काळ ज्यात विविध प्रयोग रसिकांसमोर येत होते. या बाबतीत तरी मराठी हिंदी चित्रस्रुष्टीपेक्षा पुढे होती. दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४ पर्यंतचा काळ. या कालखंडात एक निराशावादी मरगळजन्य स्थिती निर्माण झाली होती. काही वेळानंतर २००४ साली 'श्वास' प्रदर्शीत झाला. तिसरा म्हणजे श्वासपासुन म्हणजे २००४ ते आज २०१६ पर्यंतचा काळ. हा काळ आजपर्यंत काहीतरी वेगळेपणा दाखवण्यात यशस्वी ठरलाय. बर्याच प्रमाणावर प्रयोग होताहेत. कथेपासुन ते व्यक्त होण्याच्या माध्यमापर्यंत प्रत्येक गोष्टीत वेगवेगळेपणा तपासुन पाहिला जातोय. बरेच समीक्षक या काळाला मराठीच सुवर्णयुग म्हणतात ते याचसाठी. असाच एक वेगळा प्रयोग म्हणजे 'फुंथ्रू'.
सुजय डहाकेची तिसरी कलाक्रुती....ही एक सायन्स फिक्शन फिल्म आहे. म्हणुन ती वेगळी वगैरे नाही पण अगदी नावापासुन स्वतःच वेगळेपण ती जपते हे नक्की. मुळात 'फुंथ्रू' हे नावच मनात उत्सुकता निर्माण करत. जेवढं चित्रपताची निर्मीतीप्रक्रिया महत्वाची तेवढ्च त्याचं नाव ही महत्वाचं. या बाबतीत तरी लेखक आणि दिग्दर्शक म्हणुन सुजयचं कौतुक केल पाहिजे. नावापासुन ट्रेलरपर्यंत त्यानं उत्सुकता वाढवत नेली. यात त्याच्या कामाचं यश आहे.
ही कथा आहे एका इंजिनिअरींग कॉलेजमधली. विराकस्,अनया, नॅनो, आणि फुंथ्रू ही मध्यवर्ती पात्र. वीराकस आणि फूंथ्रू हे मुख्य तर अनया आणि नॅनो ही दुय्यम पात्र. यांच्या बरोबर ओनलाइन हा हॅकर असलेला वर्गमित्र आणि त्याची मैत्रीण श्रुती,गल्ला नावाचा कँटींन चालक अन या सगळ्यांच्या विरुद्ध काही काळासाठी प्रकाशन...कथानक म्हणायच तर वीरा हा फार हुशार मुलगा अनयाच्या प्रेमात पडतो... अनया नॅनोची मित्र असते. ओनलाइन, श्रुती, वीरा,नॅनो आणि गल्ला यांचा एक ग्रुप आहे. नॅनोच्या शेवतच्या वर्षच्या प्रोजेक्टसाठी मदतीसाठी या ग्रुपमधे अनया येते. एके दिवशी वीरा तिला प्रपोस करतो, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणते. दुसरी कडे कॉलेजचे फाऊंडर एक होलोग्राम बनवताना म्रुत्यु पावतात. तो होलोग्राम वीराला मिळतो. तो त्याला अनयाचं रूप देतो आणि कथा पुढे चालत राहते. पुढे काय काय होतं यासाठी चित्रपट पाहणं उत्तम. दरवेळीपेक्षा वेगळी कथा हा जमेचा मुद्दा पण कथेबरोबरच पटकथा हा एक मुद्दा अजुन महत्वाचा.
दिग्दर्शक हाच कथा आणि पटकथाकार असल्याचा फायदा हा पहिल्याच भागापर्यंत होतो. ज्या वेगानं पहिल्या भागात कथा आपल्यावर पकड घेत मार्गस्थ होते त्याच वेगानं ती दुसर्या भागात संथ होते. पटकथेबाबतही तेच जाणवत. अर्चना बोराडेच्या फ्रेम्स पहिल्यातच खूप सुंदर जाणवतात. बर्याच बाबतीत दुसर्याभागापेक्षा पहिला भाग हा उत्तम ठरतो. दोन्हीकडे समतोल नसणं ही एक उणी बाजु. मी स्वतः सुजय डहाकेचा काही ग्रेट फॅन नाही. तरीही त्याचं कथा आणि काहितरी नवीन करण्याची ढडपड याच कौतुक वाटत. संगीत ही इथे एक खूप मोठी जमेची बाजु आहे. 'मंगलास्टका वन्स मोअर' नंतर बर्याच कालावधीनंतर गाणी उत्तम या सदरात मोडणारी आहेत. ह्रिषिकेश-सोरभ-जसराज या तिकडीनं आपलं काम चोख बजावलय.
अभिनय हा खरतर महत्वाचा मुद्दा. एकिकडे अनया आणि दुसरीकडे 'फुंथ्रू' साकारतानाची मेहनत केतकीच्या अभिनयात जाणवते. मदन देवधर हा उत्तम अभिनेता आहे हे त्याच्या वीरा साकारण्याच्या पद्धतीवरुण लक्षात येतं. शिवराज वाइकरचा नॅनो सुद्धा उत्तम जमलाय. ओनलाइन हे पात्र का निर्माण केलय हा महत्वाचा प्रश्न. त्याचबरोबर श्रुतीही निर्माण करवी हे विशेष. दोघंही एक चुंबनद्रुष्याव्यतिरिक्त लक्षात राहत नाहीत. रोहित निकमचा गल्ला हा पडद्यावर कमी काळ असला तरी भाव खाउन जातो. बाकी फाउंडरच्या भूमिकेत असलेल्या मोहन आगाशेंविषयी काय बोलावं ......त्यांना पाहतच आम्ही मोठे झालो. त्यांच्या अभिनयात एक जादु आजही आहे हे नक्की.
एकंदरीत सुजयचा हा चित्रपट एक प्रयोग म्हणुन पुढे बराच काळ लक्षात राहील हे नक्की असलं तरी तो उत्तम प्रयोग म्हणुन लक्षात राहीला असता तर अजुन चांगलं झाल असतं. ज्या पद्धतीनं नाव आणि ट्रेलर मधुन त्यां उत्सुकता वाढवली होती, ज्या अपेक्शा निर्माण केल्या होत्या त्यावर हा चित्रपट खरा उतरत नाही हे निश्चित...
शेवटी कथेसाठी, एक प्रयोग म्हणुन आणि अभिनयासठी एकदा तरी जरूर पहावा.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४
दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४ पर्यंतचा काळ. या कालखंडात एक निराशावादी मरगळजन्य स्थिती निर्माण झाली होती.प्रचंड असहमत!! कदाचित तुम्ही सचिन, अशोक, लक्ष्या, महेशचे चित्रपट बघितले नसावेत असे वाटते. मी तर म्हणेन उलट त्या मरगळलेल्या वेळी सचिन आणि महेशच्या चित्रपटांनी मराठी चित्रपट सृष्टीला संजीवनी दिली. चंद्रकांत कुलकर्णीने बनवलेला 'बिनधास्त'ही याच काळातला. सरकारनामा सारखा यशवंत दत्तच्या अभिनयाने गाजलेला चित्रपटही याच काळातला.अगदी अगदी! पूर्ण सहमत. निखळ
तुक्या तुकवला नाग्या नाचवला
पेश्शल आदूबाळासाठी.
क्या बात है!
हे घ्या
बर मग सांगा कि पहिला चित्रपट
@किसनराव, अनुपसाहेब.....
बकवास चित्रपट
थर्ड क्लास चित्रपट . पैसे आणि
असहमत......
हायला तू बघलास की काय हा