✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

'फुंथ्रू'..........

अ
अनिरुद्ध प्रभू यांनी
Sun, 06/12/2016 - 10:46  ·  लेख
लेख
मराठी चित्रपट्स्रुष्टी हीच भारतीय चित्रपट्स्रुष्टीची जननी आहे यात कितीही वाद असले तरी ते सत्य आहे. बर मग सांगा कि पहिला चित्रपट हिंदी होता का मराठी असले गौण प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही. या मराठी चित्रस्रुष्टीचे आजपर्यंत तीन भाग पडतात- एक १९१३ ते १९८० चा काळ ज्यात विविध प्रयोग रसिकांसमोर येत होते. या बाबतीत तरी मराठी हिंदी चित्रस्रुष्टीपेक्षा पुढे होती. दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४ पर्यंतचा काळ. या कालखंडात एक निराशावादी मरगळजन्य स्थिती निर्माण झाली होती. काही वेळानंतर २००४ साली 'श्वास' प्रदर्शीत झाला. तिसरा म्हणजे श्वासपासुन म्हणजे २००४ ते आज २०१६ पर्यंतचा काळ. हा काळ आजपर्यंत काहीतरी वेगळेपणा दाखवण्यात यशस्वी ठरलाय. बर्‍याच प्रमाणावर प्रयोग होताहेत. कथेपासुन ते व्यक्त होण्याच्या माध्यमापर्यंत प्रत्येक गोष्टीत वेगवेगळेपणा तपासुन पाहिला जातोय. बरेच समीक्षक या काळाला मराठीच सुवर्णयुग म्हणतात ते याचसाठी. असाच एक वेगळा प्रयोग म्हणजे 'फुंथ्रू'. सुजय डहाकेची तिसरी कलाक्रुती....ही एक सायन्स फिक्शन फिल्म आहे. म्हणुन ती वेगळी वगैरे नाही पण अगदी नावापासुन स्वतःच वेगळेपण ती जपते हे नक्की. मुळात 'फुंथ्रू' हे नावच मनात उत्सुकता निर्माण करत. जेवढं चित्रपताची निर्मीतीप्रक्रिया महत्वाची तेवढ्च त्याचं नाव ही महत्वाचं. या बाबतीत तरी लेखक आणि दिग्दर्शक म्हणुन सुजयचं कौतुक केल पाहिजे. नावापासुन ट्रेलरपर्यंत त्यानं उत्सुकता वाढवत नेली. यात त्याच्या कामाचं यश आहे. ही कथा आहे एका इंजिनिअरींग कॉलेजमधली. विराकस्,अनया, नॅनो, आणि फुंथ्रू ही मध्यवर्ती पात्र. वीराकस आणि फूंथ्रू हे मुख्य तर अनया आणि नॅनो ही दुय्यम पात्र. यांच्या बरोबर ओनलाइन हा हॅकर असलेला वर्गमित्र आणि त्याची मैत्रीण श्रुती,गल्ला नावाचा कँटींन चालक अन या सगळ्यांच्या विरुद्ध काही काळासाठी प्रकाशन...कथानक म्हणायच तर वीरा हा फार हुशार मुलगा अनयाच्या प्रेमात पडतो... अनया नॅनोची मित्र असते. ओनलाइन, श्रुती, वीरा,नॅनो आणि गल्ला यांचा एक ग्रुप आहे. नॅनोच्या शेवतच्या वर्षच्या प्रोजेक्टसाठी मदतीसाठी या ग्रुपमधे अनया येते. एके दिवशी वीरा तिला प्रपोस करतो, नेहमीप्रमाणे ती नाही म्हणते. दुसरी कडे कॉलेजचे फाऊंडर एक होलोग्राम बनवताना म्रुत्यु पावतात. तो होलोग्राम वीराला मिळतो. तो त्याला अनयाचं रूप देतो आणि कथा पुढे चालत राहते. पुढे काय काय होतं यासाठी चित्रपट पाहणं उत्तम. दरवेळीपेक्षा वेगळी कथा हा जमेचा मुद्दा पण कथेबरोबरच पटकथा हा एक मुद्दा अजुन महत्वाचा. दिग्दर्शक हाच कथा आणि पटकथाकार असल्याचा फायदा हा पहिल्याच भागापर्यंत होतो. ज्या वेगानं पहिल्या भागात कथा आपल्यावर पकड घेत मार्गस्थ होते त्याच वेगानं ती दुसर्‍या भागात संथ होते. पटकथेबाबतही तेच जाणवत. अर्चना बोराडेच्या फ्रेम्स पहिल्यातच खूप सुंदर जाणवतात. बर्‍याच बाबतीत दुसर्‍याभागापेक्षा पहिला भाग हा उत्तम ठरतो. दोन्हीकडे समतोल नसणं ही एक उणी बाजु. मी स्वतः सुजय डहाकेचा काही ग्रेट फॅन नाही. तरीही त्याचं कथा आणि काहितरी नवीन करण्याची ढडपड याच कौतुक वाटत. संगीत ही इथे एक खूप मोठी जमेची बाजु आहे. 'मंगलास्टका वन्स मोअर' नंतर बर्‍याच कालावधीनंतर गाणी उत्तम या सदरात मोडणारी आहेत. ह्रिषिकेश-सोरभ-जसराज या तिकडीनं आपलं काम चोख बजावलय. अभिनय हा खरतर महत्वाचा मुद्दा. एकिकडे अनया आणि दुसरीकडे 'फुंथ्रू' साकारतानाची मेहनत केतकीच्या अभिनयात जाणवते. मदन देवधर हा उत्तम अभिनेता आहे हे त्याच्या वीरा साकारण्याच्या पद्धतीवरुण लक्षात येतं. शिवराज वाइकरचा नॅनो सुद्धा उत्तम जमलाय. ओनलाइन हे पात्र का निर्माण केलय हा महत्वाचा प्रश्न. त्याचबरोबर श्रुतीही निर्माण करवी हे विशेष. दोघंही एक चुंबनद्रुष्याव्यतिरिक्त लक्षात राहत नाहीत. रोहित निकमचा गल्ला हा पडद्यावर कमी काळ असला तरी भाव खाउन जातो. बाकी फाउंडरच्या भूमिकेत असलेल्या मोहन आगाशेंविषयी काय बोलावं ......त्यांना पाहतच आम्ही मोठे झालो. त्यांच्या अभिनयात एक जादु आजही आहे हे नक्की. एकंदरीत सुजयचा हा चित्रपट एक प्रयोग म्हणुन पुढे बराच काळ लक्षात राहील हे नक्की असलं तरी तो उत्तम प्रयोग म्हणुन लक्षात राहीला असता तर अजुन चांगलं झाल असतं. ज्या पद्धतीनं नाव आणि ट्रेलर मधुन त्यां उत्सुकता वाढवली होती, ज्या अपेक्शा निर्माण केल्या होत्या त्यावर हा चित्रपट खरा उतरत नाही हे निश्चित... शेवटी कथेसाठी, एक प्रयोग म्हणुन आणि अभिनयासठी एकदा तरी जरूर पहावा.....
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
3331 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४

किसन शिंदे
Sun, 06/12/2016 - 16:52 नवीन
दुसरा भाग म्हणजे १९८१ ते २००४ पर्यंतचा काळ. या कालखंडात एक निराशावादी मरगळजन्य स्थिती निर्माण झाली होती. प्रचंड असहमत!! कदाचित तुम्ही सचिन, अशोक, लक्ष्या, महेशचे चित्रपट बघितले नसावेत असे वाटते. मी तर म्हणेन उलट त्या मरगळलेल्या वेळी सचिन आणि महेशच्या चित्रपटांनी मराठी चित्रपट सृष्टीला संजीवनी दिली. चंद्रकांत कुलकर्णीने बनवलेला 'बिनधास्त'ही याच काळातला. सरकारनामा सारखा यशवंत दत्तच्या अभिनयाने गाजलेला चित्रपटही याच काळातला.
  • Log in or register to post comments

अगदी अगदी! पूर्ण सहमत. निखळ

अनुप ढेरे
Sun, 06/12/2016 - 16:38 नवीन
अगदी अगदी! पूर्ण सहमत. निखळ करमणुक करणारे एकापेक्षा एक, अशी ही बनवाबनवी, थरथराट, झपाटलेला, धडाकेबाज, धुमधडाका हे आणि याहून अधिक अनेक छान सिनेमे या काळात आले. संजय सूरकरांचे अनेक सिनेमे तेव्हाचेच. भिकार सिनेमे काय कुठल्याही काळात निघतात. आत्ताच्या 'प्रगल्भ' काळातपण तुक्या तुकवला नाग्या नाचवला सारखे सिनेमे येतातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

तुक्या तुकवला नाग्या नाचवला

आदूबाळ
Sun, 06/12/2016 - 17:17 नवीन
तुक्या तुकवला नाग्या नाचवला
लोल! असा सिनेमा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

पेश्शल आदूबाळासाठी.

किसन शिंदे
Sun, 06/12/2016 - 17:38 नवीन
http://youtu.be/QaJeyJwXYTg वेन्जोय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

क्या बात है!

बोका-ए-आझम
Sun, 06/12/2016 - 20:08 नवीन
आजवर बाबुरावला पकडा हेच एक ultimate नाव वाटलं होतं. पण याने त्याला मागे टाकलं. अगदी हॅटस् आॅफ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

हे घ्या

नाखु
Mon, 06/13/2016 - 16:25 नवीन
आणखी काही मासले.. लावू का लाथ ढगाला लागली कळ माझा नवरा तुझी बायको चतुर नवरा चिकणी बायको झक मारली बायको केली बहुतांश सिनेमात सुपरस्टार आहेच. तेंव्हा ज्या जमान्यात तेंडुलकर-द्र्वीड-सेहवाघ होते तेव्हाही डोड्डा गणेश्,सदागोपान रमेश होतेच.. संकलनी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

बर मग सांगा कि पहिला चित्रपट

बोका-ए-आझम
Sun, 06/12/2016 - 20:11 नवीन
बर मग सांगा कि पहिला चित्रपट हिंदी होता का मराठी असले गौण प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही.
पहिल्या चित्रपटाला भाषाच नव्हती. तो ख-या अर्थाने 'चित्र' पट होता.
  • Log in or register to post comments

@किसनराव, अनुपसाहेब.....

अनिरुद्ध प्रभू
Mon, 06/13/2016 - 13:05 नवीन
मला तुमच्या मतांविषयी आदर आहे पण तरीही त्या काळात प्रयोगाच्या द्रुष्टीने फारसे चित्रपट झाले नाहीत आणि ज्या शिलेदारांची आपण नावे घेत आहात ते स्वतः आपण दुसर्‍या चित्रक्रुतीवरुन आपली चित्रक्रुती बनवत असल्याचे कबूल केले आहे हे आपणास माहित असेलच. त्यांनी निर्माण केलेल्या वातावरणामुळेच आज तुक्या तुकवला नाग्या नाचवला सारखे सिनेमे बनवण्याच धाडस होत हे ही नाकारु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments

बकवास चित्रपट

जगप्रवासी
Mon, 06/13/2016 - 14:27 नवीन
पहिला सायन्स फिक्शन असलेला चित्रपट अशी जाहिरात बघून बघायला गेलो आणि चित्रपट बघत असताना पैसे फुकट गेले हे लक्षात आल. नॅनो इतक्या वेळेला चुकतो तरी अनया त्याच्या सोबत असते, नॅनोला बेस्ट प्रोजेक्टच बक्षीस मिळत पण तो नेमक काय करतो कळत नाही. जो होलोग्राम प्रोफेसरना बनवायला इतकी वर्ष लागली तो होलोग्राम वीरा एका वर्षात सहज बनवतो + तो होलोग्राम स्वतःला डेव्हलप करत असतो सगळच अनाकलनीय. चित्रपट बघून झाल्यावर परीक्षण लिहायचा विचार केला होता पण जमेची बाजू काहीच नसल्यामुळे टाळल होत. कमालीचा संथ चित्रपट, शेवट काहीच कळत नाही. सुजय डहाके याचा आधी आलेला चित्रपट शाळा जसा तुकड्या तुकड्यात दिसतो तोच अनुभव हा चित्रपट बघताना आला.
  • Log in or register to post comments

थर्ड क्लास चित्रपट . पैसे आणि

प्रसाद गोडबोले
Mon, 06/13/2016 - 14:35 नवीन
थर्ड क्लास चित्रपट . पैसे आणि वेळ वाया गेले .
  • Log in or register to post comments

असहमत......

अनिरुद्ध प्रभू
Mon, 06/13/2016 - 14:37 नवीन
अगदीच थर्ड क्लास पण सेकंड क्लास मात्र नक्की.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हायला तू बघलास की काय हा

अभ्या..
Mon, 06/13/2016 - 14:42 नवीन
हायला तू बघलास की काय हा पिक्चर? कमाल आहे. मला तर हॉलोग्राम म्हणजे ऑथेंटीसिटी पटवून देण्यासाठी पूर्वी व्होटर्स कार्डवर, काही उत्पादनांवर सिल्व्हर कलरचे मॅटॅलिक स्टीकर असायचे. त्यावर थ्रीडी भास होइल असे प्रिंट केले असायचे तेच वाटलेले. हे हॉलोग्राम कायतरी येगळेच दिसतेय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा