परदेशात पदवीचे शिक्षण घ्यावे काय?
दहावी बारावीत चमकायचे किंवा बरे गुण मिळवायचे , भारतात इंजिनियरिंग करायचे आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी म्हणून परदेशी जायचं ते न परतण्यासाठीच ! असा सर्वसाधारण प्रवास दोन पिढ्यानी केल्यावर आता कल बदलतोय की काय असं वाटतंय. पदवीलाच परदेशी जाणारे चारपाच जण पाहिले अन बरेच तसा विचार करताहेत.
माझा एक शाळूमित्र व्यावसायिक असल्याने तिकडे गावाकडेच रहातो. गेल्या महिन्यात तो विचारत होता की मुलाला बारावीनंतर पदवीसाठी कुठल्यातरी (!) देशात पाठवायचंय, ही कल्पना कशी आहे सांग ? असं करणारे लोक माहीत आहेत का?
मला खरंच माहीत नाही - त्यानी विचार करायचं एकच साधं कारण- ते म्हणजे त्याची मुलगी रशियात डॉक्टर व्हायला गेलीय. मग मुलाला का नाही पाठवायचं ? शिवाय पदव्युत्तर शिकायला जाण्यापूर्वी इथे आधी बरेच पापड लाटावे लागतात, सगळीकडे नुसती स्पर्धा आहे, ते त्याला नकॊय.
त्याच्याशी बोलताना आणि अन्य देशातल्या अमिपाकर मित्रांशी बोलताना या प्रश्नाचे अनेक पैलू समोर आले. खफ वर याविषयी चर्चा सुरु होऊ घातली होती म्हणून म्हटलं धागाच काढू !
मुळात आज असा विचार करणारे माझ्या पिढीतले पालक कांही करणाने नव्वदच्या लाटेच्या दशकात परदेशात जाऊनही तिथे स्थायिक होऊ शकले नाहीत. तर काहीजणांना शक्य असून ते गेले नाहीत, गेलेले परतले, किंवा आजारी/ एकटे पालक, स्वत:चा व्यवसाय अथवा पूर्णत: वेगळ्याच क्षेत्रात काम करण्यामुळे वगैरे परदेशी जाण्याचा संबंध नव्हता.
२००० नंतर स्वत: फिरून आल्यावर आणि माहिती वाहू लागल्यावर अनेकांना असे वाटू लागले की शक्य असेल तर परदेशात विनासायास रहाणे बरे. इथे क्षुल्लक गोष्टीसाठी होणारी परवड त्यांना नको वाटते. त्यामुळे मुलांनी तरी परदेशी शिकावे आणि जमल्यास एका बऱ्या देशात स्थायिक व्हावे. याउलट काहीना वाटते इथेच भविष्यात संधी निर्माण होतील तर कशाला कुठे जायचे? तर काहींच्या बाबतीत फक्त मुलांनाच त्यांच्या मित्रपरिवारामुळे परदेशी राहू असे वाटत असते.
अलिकडे पाहिलेली कांही उदाहरणे:
एक वर्गमित्र अबु धाबीला काम करतो त्याने जाणीवपूर्वक मुलाला तिथल्या सी बी एस ई शाळेत बारावी करून अनिवासी कोट्यातून भारतात शासकीय अभियांत्रिकीला घातले. आता पुढे जर्मनी / अमेरिका…
दुसरा अमेरिकेत रहातो. त्याने आठवीपासून मुलाला भारतात पाठवले. अनिवासी कोट्यातून खासगी अभियांत्रिकी कॉलेजात भरपूर पैसे भरले . पुढच्या शिक्षणाला मात्र अमेरिकेत परत जाणार म्हणे. असे एकच उदाहरण पाहाण्यात आहे.
एकाने भरपूर ऑन साईट जाऊन आता पैसे जमवून माहिती तंत्रज्ञान विषयक व्यवसाय चालवला आहे. त्याने मुलाला इथे 'आय बी' करून थेट अनीमेशन शिकायला अमेरिकेस पाठवले. असे अजून दोन जण पालक बंगळूरू कार्यालयात माहितीत आहेत.
मुख्य कल भारतात पदवी आणि बाहेर पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा आहे, तरी हल्ली लवकर बाहेर पाठवण्याचा विचार होऊ लागलाय. त्यात नक्की काय चांगले? पैसा आहे म्हणून खर्च करायचा असा प्रकार आहे का?
नव्वदच्या दशकात अमेरिकादि देशांत गेलेल्या आणि आता पालक असलेल्या मंडळीना काय वाटते?
वरील प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी हा काकू …
१. विविध देशांत फक्त पदवीपर्यंत शिक्षणाची माहिती इथे मिळावी. आपल्या परिचयात कुणी असं शिकायला गेलंय का?
२. अमेरिकेव्यतिरिक्त अजून कोणते देश अशा शिक्षणासाठी चांगले आहेत?
यामध्ये शिक्षण संपल्यावर तिथेच काम करण्याची आणि कदाचित नागरिकत्व/ साठीपर्यंत रहाण्याची मुभा कुठे असेल?
३. अभियांत्रिकी , तांत्रिक सोडून अजून कुठले अभ्यासक्रम चांगले आहेत ?
४. विविध देशांत पात्रता परीक्षा आणि भाषेच्या परीक्षा कुठल्या द्याव्या लागतात ?
५. परदेशात थेट व्यवस्थापनाला प्रवेश घेणे किती योग्य?
( कुशंका : बदलत्या जागतिक परिस्थितीत हे बाहेर जाऊन शिक्षण घ्यायचे सगळे विचारच कालबाह्य किंवा आर्थिक नुकसानीचे होणार नाहीत ना?)
आयडीपी किंवा तत्सम संस्था यात मदत करतात पण त्यांच्या शाखा सगळ्या गावांत नसतात.
सरसकट माहिती न देता ते वेळ ठरवून भेटायला बोलावून प्रत्येकाला वेगळे मार्गदर्शन करतात. विविध शहरांत मेळावे आयोजित करतात. त्यासाठी तिकडची विद्यापीठे त्यांना आर्थिक मदत करतात आणि मेळाव्याला इथे येतात देखील.
दाड ही जर्मनीची सरकारी संस्था शिष्यवृत्ती अन बरेच कांही देते.
केनडा मध्ये शिकण्यासाठी हा दुवा
अजून माहिती, अनुभव, सावधानतेचे इशारे वगैरेंच्या प्रतीक्षेत …. !
- (जि. प. प्राथमिक शाळेत शिकलेला) खेडूत
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझ्या पहाण्यात तरी अशी
काहीसे विस्कळीत
दुसरे म्हणजे अमेरिकेसारख्या
+१ उत्तम प्रतिसाद!
कुणाच्या खांद्यावर, कुणाचे ओझे?
प्रदीपजी, हे मुद्दाम लिहिले आहे!!
:)
खूप छान लिहिलय. मला प्रत्यक्ष
+१
अनुमोदन.....
धागा काढल्याबद्दल अनेक
चांगला धागा
परदेशी अंडरग्रॅड अतिशय महाग
जर पदव्युत्तर शिक्षण परदेशात
मुद्दे
खाजगी इंजिनिअरींग काॅलेजचा विचारही करु नका
सांगली चा विचार करावा, उत्तम
धन्यवाद उल्का.लिंक उपयुक्त
यू एस डिपार्टमेंट ऑफ स्टेट्स ने प्रसिद्ध केलेली
दहा-वीस वर्षांपूर्वीचं
अगदी सही मुद्द मांडलाय ननि.
"माझ्या माहितीप्रमाणे" -
+१११११११
माझा मुलगा ज्या विद्यापिठात
अमेरीकेत अंडरग्रॅड अ
!!!!
भारत माता की!
माहितीपूर्ण प्रतिसादांबद्दल
यू. के.
+१००
जर मुलाला पाठवायचे नक्की
ओपन कॅटेगरी मध्ये येत असाल तर
आणि पैसा ??
हे करुन पुढे काय करायचे?
अर्थातच स्थायिक होण्यासाठी