मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उद्या रत्नागिरीला एक छोटासा कट्टा करायचा का?

मुक्त विहारि · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
प्रिय मिपाकरांनो, मी उद्या दुपारपासून रत्नागिरीला आहे. बुधवारी सकाळी परत मुंबईला येणार आहे. बरेच दिवसापासून रत्नांग्रीकरांना भेटायची इच्छा होती, ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण होईल, अशी आशा आहे. आपला लोभ आहेच. तो अशा भेटी-गाठीने वाढेल अशी अपेक्षा, आपलाच मुवि

वाचने 7544 वाचनखूण प्रतिक्रिया 42

In reply to by पैसा

मुक्त विहारि 06/06/2016 - 10:10
नक्कीच. तसेही मुले, गोव्याला जावू या, म्हणून मागे लागली आहेत. त्यामुळे बहूदा नवरात्रीच्या सुमारास गोव्याला यायचा बेत आहे. त्यासुमारास लिलावात सुंदर साड्या स्वस्त दरांत मिळतात म्हणून बायको पण खूष आणि मच्छी पण उत्तम मिळत असल्याने आम्ही पण खूष.

उडन खटोला 06/06/2016 - 10:16
कुठे कधी भेटायचे डिटेल्स फायनल करा

निधी 06/06/2016 - 15:00
इतक्या घाईत का हो??? मी नाहीये रत्नागिरीत. ११ ला येणार. नंतर येणार असाल तेव्हा भेटुया. :)

माईसाहेब कुरसूंदीकर 06/06/2016 - 15:17
'खाली' 'विहार'मध्ये बटाटेवडा खात मिपा कट्टा करा असा ह्यांचा सल्ला.!!

अजया 06/06/2016 - 18:55
माई येणार असतील तर मी विमानाने पण रत्नांग्री कट्टयाला येईन.पण माईंची एकदा ओटी भरेनच म्हणते _/\_

In reply to by अजया

विशाखा राऊत 06/06/2016 - 18:58
माई येणार तर मी स्काईप कॉल करेन. तु माझ्याकडुन विहारचा वडा, आंबावडी दे. (खावुन सांगतील चव कशी ते... खाताना दात की कवळी बघता येईल का तुला ;) )

In reply to by मुक्त विहारि

उल्का 06/06/2016 - 22:07
बंदरावर भेळ आणि शहाळ्याचं पाणी कट्टा का? फोटो डकवलेत तर आम्ही पण बन्दरावर इथुनच फेरफटका मारु. :) खूप शुभेच्छा रत्नागिरी कट्ट्यासाठी!

नन्दादीप 08/06/2016 - 11:47
a डावीकडून - नन्दादीप, मुवि आणि मंदार कात्रे... याशिवाय अनन्या ताई आणि मुवि चिरंजीव पण होते कट्ट्याला... नेहमीप्रमाणे खादाडी करिता मुविनी बाकरवडी आणली होती व अनन्या ताई येताना खास रत्नान्ग्री पेश्शल आंबा वडी घेवून आलेली. अधिक सविस्तर आणि बारीक बारीक तपशीलासकट वृत्तांत येईलच लवकर...

इरसाल 09/06/2016 - 14:05
फोटु दाल्नेमे बी इत्ता कंजुसी कर रेले क्या तुम लोगा ?

नाखु 10/06/2016 - 08:32
कट्टा झाला जोषात सहाला वुत्तांत येइना (इथे) दहाला, चारोळीवाले आत्मुदा (सध्या संसारी व्यग्र असल्याने लेखणी म्यान) यांचे तर्फे आम्चे कडून कवन सादर