Skip to main content

उद्या रत्नागिरीला एक छोटासा कट्टा करायचा का?

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/06/2016 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, मी उद्या दुपारपासून रत्नागिरीला आहे. बुधवारी सकाळी परत मुंबईला येणार आहे. बरेच दिवसापासून रत्नांग्रीकरांना भेटायची इच्छा होती, ती इच्छा ह्या निमित्ताने पुर्ण होईल, अशी आशा आहे. आपला लोभ आहेच. तो अशा भेटी-गाठीने वाढेल अशी अपेक्षा, आपलाच मुवि
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7574
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

In reply to by पैसा

नक्कीच. तसेही मुले, गोव्याला जावू या, म्हणून मागे लागली आहेत. त्यामुळे बहूदा नवरात्रीच्या सुमारास गोव्याला यायचा बेत आहे. त्यासुमारास लिलावात सुंदर साड्या स्वस्त दरांत मिळतात म्हणून बायको पण खूष आणि मच्छी पण उत्तम मिळत असल्याने आम्ही पण खूष.

'खाली' 'विहार'मध्ये बटाटेवडा खात मिपा कट्टा करा असा ह्यांचा सल्ला.!!

In reply to by विशाखा राऊत

१९५२ चे हॉटेल ते हो विशाखे.'वरचे' विहार डिलक्स होण्यापूर्वी वडा खाल्ल्याचे आठवते.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

विशाखे... ह्म्म्म माई लईच जुन्या तुम्ही.. जोरात टेक्नो वरात घेवुन येता नेहमी :)

In reply to by अजया

माई येणार तर मी स्काईप कॉल करेन. तु माझ्याकडुन विहारचा वडा, आंबावडी दे. (खावुन सांगतील चव कशी ते... खाताना दात की कवळी बघता येईल का तुला ;) )

उद्या (मंगळवार, दिनांक ===> ०७-०६-२०१६) संध्याकाळी ठीक ६ वाजता, काळ्या समुद्रावर भेटू या.

In reply to by मुक्त विहारि

बंदरावर भेळ आणि शहाळ्याचं पाणी कट्टा का? फोटो डकवलेत तर आम्ही पण बन्दरावर इथुनच फेरफटका मारु. :) खूप शुभेच्छा रत्नागिरी कट्ट्यासाठी!

a डावीकडून - नन्दादीप, मुवि आणि मंदार कात्रे... याशिवाय अनन्या ताई आणि मुवि चिरंजीव पण होते कट्ट्याला... नेहमीप्रमाणे खादाडी करिता मुविनी बाकरवडी आणली होती व अनन्या ताई येताना खास रत्नान्ग्री पेश्शल आंबा वडी घेवून आलेली. अधिक सविस्तर आणि बारीक बारीक तपशीलासकट वृत्तांत येईलच लवकर...

फोटु दाल्नेमे बी इत्ता कंजुसी कर रेले क्या तुम लोगा ?

डोंबोलीत काही जाणे होत नाही, पण रत्नागिरीला मध्यवर्ती ठिकाणी मुविंचा कट्टा झाला आणि तोही चक्क नारळपाणी पिऊन!!

कट्टा झाला जोषात सहाला वुत्तांत येइना (इथे) दहाला, चारोळीवाले आत्मुदा (सध्या संसारी व्यग्र असल्याने लेखणी म्यान) यांचे तर्फे आम्चे कडून कवन सादर