Skip to main content

होऊ द्या खर्चाला थोडा विलंब

लेखक अभ्या.. यांनी बुधवार, 25/11/2015 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'होऊ द्या खर्च"च्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी हे टीशर्ट डिझाईन करण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी हे टीशर्ट डिझाईनिंग सुरु केले तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील डिझाईनपासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले मिपाकर अशा प्रकारच्या चेष्टेसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही मिपावरती घडले. कुठेतरी मिपावर सहिष्णुता, विनोदीवृत्ती ह्यात प्रगल्भता वाढली आहे असे मला मनोमन कुठेतरी जाणवले आणि मी पुन्हा ह्या डिझाईनांना हात घातला. मात्र अशा कामाची दखल तातडीने घेतली गेली आणि पुन्हा एकदा माझ्या कामाला चाप बसली आहे. खाली काही चोरलेल्या डिझाईनची सॅम्पल्स देतो आहे. मी टीशर्टांचा पहिला भाग प्रकाशित करताच दोनच दिवसात हे घडणे हा योगायोग नक्कीच नाही. टीशर्ट डिझाईन विषयी अजून काही प्रयोग करण्याआधी मला स्वतःला ह्या संदर्भात कायदा नक्की काय सांगतोय ते जाणून घ्यायचे आहे. कारण मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही. अर्थात, अमेरिकेत तसेच अन्य बर्‍याच देशांमध्ये ह्या विषयावरती अगदी अ ते ज्ञ माहिती उपलब्ध आहे. मात्र अपल्याकडेच हे का रोखले जात आहे ह्याची कल्पना नाही. खरेतर एका वेगळ्या वस्त्राची ओळख आणि आरामदायकता वाढवणे आणि मनोरंजन हेच उद्देश्य ह्या डिझाईन्समागे होते आणि राहतील. डिझाईनचा आत्मा सोडून किंवा बदलून कलाकृती करण्यात मला स्वारस्य नाही आणि मिपाकरांचीची फसवणूक देखील करायची नाही. तरी योग्य ती माहिती घेऊन आणि पूर्ण कायदेशीर समाधान झाल्यावरच पुढचे डिझाईन करण्याचे योजले आहे. मिपाकर अडचण समजून घेतील आणि पाठींबा देतील ही आशा आहेच. धन्यवाद. t1 t2 ............................................... चित्तरकथेतील अभिकुमार
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18055
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

In reply to by नीलमोहर

@ फैण्डिंग्नीमो, चित्र पण जरा गळपाटलेय. त्यो कूंकूवाला अर्नॉल्ड असा होता. a त्यातल्या आद्य समाजहितेला डावलल्याबद्दल एक सोलापुरी टर्कीश बीच टॉवेल देऊन निषेध.

In reply to by अभ्या..

मैंसाहेबांचा असा शिवाजीनगरसोबत जाहीर फोटो लावल्याबादल तीव्र णीषेध…

In reply to by नीलमोहर

करेक्ट... ते चित्र "माहेरचा कमांडो"चं आहे.

झकास.

धाग्यानिमित्त वाचकांच्या शब्दकोशात पडलेली भरः पथेटिक भेंडी, अरेबिक शेंडी, अटलांटिक रेडा, अंटार्क्टिक मेंढी, मांजरचोर, चादरसोड... कुठे नेऊन ठेवलीय मराठी मिपाची ??

In reply to by नीलमोहर

कलेक्शन करणारच होतो. धाग्याचा विषय अभ्या ची कुचंबणा असा असताना धागा भरकटवणार्‍या सर्व ज्येश्ठ मिपाकरांना पाहून एक ड्यु मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटली. - सिंथेटीक भांडी

In reply to by अभ्या..

यांच्यापेक्षाही चिवट एक सरजी होते इथे ..हेवनवासी झाले बिचारे ! बादवे गेंडी ही गेंड्यापेक्षा चिवटपणात सरस असते का ?

In reply to by बिपिन कार्यकर्ते

प्रतिसादातला (उठवलेला) (भेंडी)बाजारही आवाल्डा!
तुम्हाला आवड्ला, तर मग आम्ही धन्य जाहलो._/\_ -म्हैसा

अभ्याजी , ते आपल्या कंपुचे मागील कट्ट्याला बोललेले डिजाईन तयार करायला घ्या ना गडे ! सच्चं भण गोदावरी !!