✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

होऊ द्या खर्चाला थोडा विलंब

अ
अभ्या.. यांनी
Wed, 11/25/2015 - 16:44  ·  लेख
लेख
नमस्कार, गेले काही दिवस मला सातत्याने 'होऊ द्या खर्च"च्या दुसर्‍या भागासाठी विचारणा होते आहे. काही कारणाने मी हे टीशर्ट डिझाईन करण्यास विलंब करत होतो अणि त्या मागे काही कारणे होती. वर्षभरापूर्वी जेव्हा मी हे टीशर्ट डिझाईनिंग सुरु केले तेव्हा देखील काही मित्रांनी तातडीने मला पुढील डिझाईनपासून थांबवले होते. त्यांचे म्हणणे होते, की अजून तरी आपले मिपाकर अशा प्रकारच्या चेष्टेसाठी सज्ज किंवा 'तयार' नाहीत. ह्यातून काही नको ते आकर्षण वाढायला नको. मला ते पटले आणि मी थांबलो. वर्षभरात बरेच काही मिपावरती घडले. कुठेतरी मिपावर सहिष्णुता, विनोदीवृत्ती ह्यात प्रगल्भता वाढली आहे असे मला मनोमन कुठेतरी जाणवले आणि मी पुन्हा ह्या डिझाईनांना हात घातला. मात्र अशा कामाची दखल तातडीने घेतली गेली आणि पुन्हा एकदा माझ्या कामाला चाप बसली आहे. खाली काही चोरलेल्या डिझाईनची सॅम्पल्स देतो आहे. मी टीशर्टांचा पहिला भाग प्रकाशित करताच दोनच दिवसात हे घडणे हा योगायोग नक्कीच नाही. टीशर्ट डिझाईन विषयी अजून काही प्रयोग करण्याआधी मला स्वतःला ह्या संदर्भात कायदा नक्की काय सांगतोय ते जाणून घ्यायचे आहे. कारण मला स्वतःला आणि मुख्य म्हणजे मिपाला कोणत्याही संकटात पाडण्याची इच्छा नाही. अर्थात, अमेरिकेत तसेच अन्य बर्‍याच देशांमध्ये ह्या विषयावरती अगदी अ ते ज्ञ माहिती उपलब्ध आहे. मात्र अपल्याकडेच हे का रोखले जात आहे ह्याची कल्पना नाही. खरेतर एका वेगळ्या वस्त्राची ओळख आणि आरामदायकता वाढवणे आणि मनोरंजन हेच उद्देश्य ह्या डिझाईन्समागे होते आणि राहतील. डिझाईनचा आत्मा सोडून किंवा बदलून कलाकृती करण्यात मला स्वारस्य नाही आणि मिपाकरांचीची फसवणूक देखील करायची नाही. तरी योग्य ती माहिती घेऊन आणि पूर्ण कायदेशीर समाधान झाल्यावरच पुढचे डिझाईन करण्याचे योजले आहे. मिपाकर अडचण समजून घेतील आणि पाठींबा देतील ही आशा आहेच. धन्यवाद. t1 t2 ............................................... चित्तरकथेतील अभिकुमार
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
17972 वाचन

💬 प्रतिसाद (92)

प्रतिक्रिया

कॅापी राइटच्या तंगड्यात अडकले

कंजूस
Wed, 11/25/2015 - 18:49 नवीन
कॅापी राइटच्या तंगड्यात अडकले टीशर्ट्स?
  • Log in or register to post comments

"काल्पनिक" असा शिक्का मारलेले

पिशी अबोली
Wed, 11/25/2015 - 19:00 नवीन
"काल्पनिक" असा शिक्का मारलेले सत्याच्या जवळपास जाणारे डिजाइन्स बहुधा कायद्याच्या कचाट्यात सापडत नसावे . तरीही योग्य शहनिशा करूनच डिजाइन्स प्रकाशीत करावे . उगाच आम्हाला दर्शनाची मेजवानी देण्याच्या नादात तुम्हाला वैयक्तिकरित्या काही नुकसान होऊ नये असे वाटते . तरी शक्य असल्यास (आपल्याला कुठलाही त्रास न होता) पुढील भाग प्रकाशीत करावेत . ही नम्र विनंती. मुद्दाम काहीतरीच
  • Log in or register to post comments

आता तर आमचा प्रतिसादही सेफ

उगा काहितरीच
गुरुवार, 11/26/2015 - 00:26 नवीन
आता तर आमचा प्रतिसादही सेफ रहात नाही. लै बेक्कार असहिष्णुता चाल्लीये बॉ मिपावर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली

=))=))

अजया
गुरुवार, 11/26/2015 - 09:54 नवीन
विडंबन आवडले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

आँ, आता 'सेफ' पण सामील झाला

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/26/2015 - 10:44 नवीन
आँ, आता 'सेफ' पण सामील झाला काय असहिष्णूता नाटकात ? ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

विडंबन आवडले

मित्रहो
Wed, 11/25/2015 - 19:21 नवीन
मला वाटते डार्क टी शर्टच्या माहीतीत जे धोके आहेत ते कदाचित मिपाकर समजून घेऊ शकनार. व्हाइट टी शर्ट घालून मिसळपाव खायला हरकत नसावी.
  • Log in or register to post comments

ह्यावर एक छान मालिका येत असते

सूड
Wed, 11/25/2015 - 19:45 नवीन
ह्यावर एक छान मालिका येत असते फ्याशन टिव्हि वर. "लोभसराव"
  • Log in or register to post comments

(No subject)

सतिश गावडे
Wed, 11/25/2015 - 23:21 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लोल

रामपुरी
गुरुवार, 11/26/2015 - 04:04 नवीन
लोल
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/26/2015 - 07:18 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

डिझाईनकार

प्रभू-प्रसाद
गुरुवार, 11/26/2015 - 10:22 नवीन
विडंबणकार झाले म्हणायचे.
  • Log in or register to post comments

५०

नीलमोहर
गुरुवार, 11/26/2015 - 10:40 नवीन
धाग्याच्या पन्नाशी निमित्त मा.अभ्या आणि शब्द्प्रभू प्रचेतसजी यांचा शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार खालील टी-शर्ट आणि सव्वाशेर पथेटीक नसलेली ताजी ताजी भेंडी देऊन करण्यात यावा ही माननीयांना नम्र विनंती. Image removed. ता.क: डिझाईन अजिबात ढापलेले नसून आत्ताच ताजे छापलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

आग्गाग्गा..तो आरनॉल्ड मन्या

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/26/2015 - 11:08 नवीन
आग्गाग्गा..तो आरनॉल्ड मन्या सुर्वे छाप दिस्तोय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

श्या !!!

नीलमोहर
गुरुवार, 11/26/2015 - 11:16 नवीन
पारच गळपाटलाय प्रतिसाद... सत्काराची घाई नडली अजून काय, ;) " धाग्याच्या पन्नाशी निमित्त मा.अभ्या आणि शब्द्प्रभू प्रचेतसजी यांचा शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार खालील टी-शर्ट आणि सव्वाशेर पथेटीक नसलेली ताजी ताजी भेंडी देऊन करण्यात यावा ही माननीयांना नम्र विनंती. * टी शर्ट * ता.क: डिझाईन अजिबात ढापलेले नसून आत्ताच ताजे छापलेले आहे याची कृपया नोंद घ्यावी." कृपया असे वाचावे सर्वांनी :) [कॉलिंग सं.मं]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

शुभेच्छूक

नाखु
गुरुवार, 11/26/2015 - 11:22 नवीन
मध्ये: नीमोप्रीमोजीमो आणि तमाम सेल्फी(श) नसलेले कार्यकर्ते असे ल्हायचे र्हायले काय? शंखा-नै-वाजम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

सत्कार शनिवार वाड्यावर?

pacificready
गुरुवार, 11/26/2015 - 11:26 नवीन
सत्कार शनिवार वाड्यावर? लकडी पूलाचा अनुल्लेख? निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

लकडी पुलावर मुका घ्यायचा

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/26/2015 - 11:31 नवीन
लकडी पुलावर मुका घ्यायचा अस्तो ना? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

मग झेड ब्रिजवर काय घेतात?

pacificready
गुरुवार, 11/26/2015 - 11:34 नवीन
मग झेड ब्रिजवर काय घेतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

त्याच्या पुढचे ;)

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/26/2015 - 12:21 नवीन
त्याच्या पुढचे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

>>[कॉलिंग सं.मं] >> अगा जे

यशोधरा
गुरुवार, 11/26/2015 - 11:41 नवीन
>>[कॉलिंग सं.मं] >> अगा जे नसतेची सद्ध्या. कॉनिंग निळूभाव, असे म्हणा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

*कॉलिंग.

यशोधरा
गुरुवार, 11/26/2015 - 11:55 नवीन
*कॉलिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

@ फैण्डिंग्नीमो,

अभ्या..
गुरुवार, 11/26/2015 - 11:42 नवीन
@ फैण्डिंग्नीमो, चित्र पण जरा गळपाटलेय. त्यो कूंकूवाला अर्नॉल्ड असा होता. Image removed. त्यातल्या आद्य समाजहितेला डावलल्याबद्दल एक सोलापुरी टर्कीश बीच टॉवेल देऊन निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

णीषेध

पगला गजोधर
गुरुवार, 11/26/2015 - 11:55 नवीन
मैंसाहेबांचा असा शिवाजीनगरसोबत जाहीर फोटो लावल्याबादल तीव्र णीषेध…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हा हा !!

नीलमोहर
गुरुवार, 11/26/2015 - 11:59 नवीन
अभ्या स वाढवा.. Image removed. मूळ चित्रपट हा आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

करेक्ट...

असंका
गुरुवार, 11/26/2015 - 12:06 नवीन
करेक्ट... ते चित्र "माहेरचा कमांडो"चं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

हा कधी आला?? माहेरचा

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/26/2015 - 12:21 नवीन
हा कधी आला?? माहेरचा टर्मिनेटर होता ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

आता तो कधी आला म्हणे!!!

असंका
गुरुवार, 11/26/2015 - 13:18 नवीन
आता तो कधी आला म्हणे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अशी हि कमांडो कमांडी आल्यावर

अद्द्या
गुरुवार, 11/26/2015 - 13:22 नवीन
अशी हि कमांडो कमांडी आल्यावर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

>> समाजहितेला =))

सतिश गावडे
गुरुवार, 11/26/2015 - 18:35 नवीन
>> समाजहितेला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

टीळा थोडा उरला व्हता का काय?

नाव आडनाव
गुरुवार, 11/26/2015 - 18:06 नवीन
टीळा थोडा उरला व्हता का काय? अरनॉल्ड भाऊंच्या गागलाव लावलाय ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

:-)

आतिवास
गुरुवार, 11/26/2015 - 14:58 नवीन
झकास.
  • Log in or register to post comments

;)

नीलमोहर
गुरुवार, 11/26/2015 - 17:59 नवीन
धाग्यानिमित्त वाचकांच्या शब्दकोशात पडलेली भरः पथेटिक भेंडी, अरेबिक शेंडी, अटलांटिक रेडा, अंटार्क्टिक मेंढी, मांजरचोर, चादरसोड... कुठे नेऊन ठेवलीय मराठी मिपाची ??
  • Log in or register to post comments

कलेक्शन करणारच होतो.

pacificready
गुरुवार, 11/26/2015 - 18:49 नवीन
कलेक्शन करणारच होतो. धाग्याचा विषय अभ्या ची कुचंबणा असा असताना धागा भरकटवणार्‍या सर्व ज्येश्ठ मिपाकरांना पाहून एक ड्यु मिपाकर म्हणून शरम वगैरे वाटली. - सिंथेटीक भांडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

तुमच्या आयडीला पण शरम वाटली

सूड
गुरुवार, 11/26/2015 - 19:22 नवीन
तुमच्या आयडीला पण शरम वाटली म्हटल्यावर खरंच काहीतरी सिरीयस म्याटर आहे. -काकांची कोंडी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

प्रयत्नपूर्वक जमलं.

pacificready
गुरुवार, 11/26/2015 - 19:28 नवीन
प्रयत्नपूर्वक जमलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तुमच्या इतका चिवटपणा दुसरीकडे

अभ्या..
गुरुवार, 11/26/2015 - 19:33 नवीन
तुमच्या इतका चिवटपणा दुसरीकडे कुठे? . आसामी गेंडी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: pacificready

होते होते...

सस्नेह
गुरुवार, 11/26/2015 - 19:49 नवीन
यांच्यापेक्षाही चिवट एक सरजी होते इथे ..हेवनवासी झाले बिचारे ! बादवे गेंडी ही गेंड्यापेक्षा चिवटपणात सरस असते का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

आम्ही बॅक अप म्हणून

pacificready
गुरुवार, 11/26/2015 - 20:39 नवीन
आम्ही बॅक अप म्हणून पुनर्जन्माची तरतूद करुन ठेवली होती ओ. तुम्हाला त्रास नको का द्यायला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

हाहाहा! झकास रे अभ्या! एकच

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 11/26/2015 - 18:06 नवीन
हाहाहा! झकास रे अभ्या! एकच नंबर. प्रतिसादातला (उठवलेला) (भेंडी)बाजारही आवाल्डा!
  • Log in or register to post comments

धन्य जाहलो._/\_

पगला गजोधर
गुरुवार, 11/26/2015 - 20:37 नवीन
प्रतिसादातला (उठवलेला) (भेंडी)बाजारही आवाल्डा!
तुम्हाला आवड्ला, तर मग आम्ही धन्य जाहलो._/\_ -म्हैसा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अभ्याजी ,

प्रसाद गोडबोले
Wed, 06/08/2016 - 12:50 नवीन
अभ्याजी , ते आपल्या कंपुचे मागील कट्ट्याला बोललेले डिजाईन तयार करायला घ्या ना गडे ! सच्चं भण गोदावरी !!
  • Log in or register to post comments

च्या मारी

सरल मान
Wed, 06/08/2016 - 14:40 नवीन
लय धुमाळी झालीय राव....;-)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा