✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जगतल्या सर्वात बोरिंग जगांपैकी एक जागा म्हणजे बैंक!

अ
अज्ञात यांनी
Wed, 06/01/2016 - 16:01  ·  लेख
लेख
कूपन घ्या, चेक, डिपाजिट, विड्रोवल, लोन, लाकर्स अणि कित्येक व्यवहारिक धुमाकूळ असतो, त्यात अर्ध्या लोकांना फॉर्म भरता येत नसतात, ती दोऱ्यानी लटकणारी पेनं दर वेळी गळफास लाऊन आत्महत्या करतात असच वाटतं...त्यापेक्षा लोक्स् त्यांना तसं करायला भाग पडतात असं म्हणनं जास्त योग्य! कारण काम सरो वैद्य मरो हीच भावना ठेऊन लोक्स् त्या पेनाचा अपमान करतात! आणि कधी कधी तर ते पनही गायब असतं! नेमकं आपल्याकडे पेन नसतं.. मग "दे माय..२दीस लिहला नाय... थोडं लिहायचय माय... दया कर माय... तुझं ल्वोन माफ़ व्हइल माय...तुझा च्येक कधी बॉउंस नाय होणार माय... तुला येक टका ज्यास्त याज मिलल माय.." अश्या .झिप फाइलच्या इमोशनल स्माइली तोंडावर लोड करून 'पेन' हे अमूल्य शस्त्र थोड्या वेळपुरती मिळवण्याची कसरत करावी लागते. मग टोकन नंबर हातात आला की • सोन्याच्या बिस्किटा सारखं त्याला वरून खालून निहाळत बसणे! • टॉस करत... खाली पडला की तो घोंगाळत कोणाच्या पायखली आला की कपाळावर आठ्या देत हसून आपल्या बालमनाचा मोठेपणा सिद्ध करणे • ओळखीचे कोणी दिसले की.. "काय इथे कुठे!?" सारखा वह्यात प्रश्नांची दगडफेक करणे • बँकेच्या लोन/व्याजदराची माहिती भिंतींवर असतानाही उगाच गरज नसताना 'बीझी' कार्यकर्त्यांना विचारपुस करणे • महत्वाची कागदपत्र विसरल्यास ९९वर आउट होण्याचा भाव आणणे • सेक्युरिटी गार्डच्या बंदुकीकड़े पाहुन आपण उगाच काहेतरी गुन्हा करणार आहोत आणि तो आपल्याला आता गोळी मारणार आहे असा भास होणे • केशियर काउंटर वर तो केशियर निश्काम कर्मयोगी भावनेने पैसे मोजून देणे / घेणे. • लॉकररूम मध्ये गेल्यास डबल चावी घेऊन येणारा इसम आपल्यास त्या कमी प्राणवायु असलेल्या खोलीत आपला शेवटचा श्वास घेण्यासाठी सोडून गेला की काय अशी वाइट कल्पना येणे. • कूपन क्रमांक आपलाच आहे का.. जरी आपला नंबर अगदी दहा नंबर पुढे असला तरी तो लगेचच येणार आहे अशी निरर्थक अपेक्षा करत तो अंकफलक डोळे न झापता बघत बसणे • मध्येच कोणाचा फोन आला की उगाच बैंक लूटण्यासाठी कोणाचा कॉल आलाय असे संशय आणून सिक्युरिटी गार्ड येऊन आपणास फोन बंद करण्यास लावणे. • त्यात बैंक बंद व्हायची वेळ आली की चोराला पळून जाण्यास मदत कारवी असा काही प्रसंग आल्यासारखा अर्धवट शटर कडे बोट दाखवत तो गार्ड एक फेक निरागस स्माइल देतो... असे खुप प्रसंग आहेत. पण काही बँकामध्ये वर्षोंवर्ष जर येणजाणं असेल तर लगेच गार्ड पासून अगदी मेनेजरपण घरी पाहुणे आल्या सारखे वागतात! चहा पाणी विचारतात.. मस्तच वाटतं, आणि जे काम करायला आलोय ते होताच परत अजुन काही कामं पण होतात उदा. पासबुक क्यू वीना भरून मिळतं, काही कागदपत्रांची झेरॉक्स वगैरे नसतील तर "काही हरकत नाही हो... ऐ राकेश ह्या डाक्यूमेंट्सच्या ३झ्येराक्स आण पाहू" असा काहीसं अल्हाद्दायक मदतकार्य मिळतं! पण तरीही... जाम बोरिंग... नाहीच आवडत मला बँकांची विझीट, तरी बरे आहे हल्ली ऐटीएम् + डिपॉज़िट+व्हीड्रॉवल मशीन्स मुळे पूर्वीसरखं हागल्या मुतल्या बॅंकेचं थोबाड बघावं लागत नाही! बैंक ऑफ़ अमुक अमुक, अमुक बैंक सगळ्या सारख्याच... आल बैरिंग यो! ‪#‎सशुश्रीके‬ |
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8338 वाचन

💬 प्रतिसाद (56)

प्रतिक्रिया

...

आशु जोग
Sat, 06/04/2016 - 20:41 नवीन
खूप बारकाईने निरिक्षण नोंदवले आहे पुढील भागही येऊ द्या
  • Log in or register to post comments

काहीही हा . अगदीच काहीही :)

सुजल
Sun, 06/05/2016 - 04:58 नवीन
काहीही हा . अगदीच काहीही :)
  • Log in or register to post comments

रविवारची सकाळ सार्थकी लागली !

उगा काहितरीच
Sun, 06/05/2016 - 08:37 नवीन
रविवारची सकाळ सार्थकी लागली ! ;-)
  • Log in or register to post comments

थायलंडच्या बँका

बाजीप्रभू
Mon, 06/06/2016 - 08:20 नवीन
इकडे थायलंडमधे सगळा आनंदी आनंद आहे. आयमिन खरोखरचा आनंद आहे. एकाच दिवशी ५० हजारापेक्षा जास्त कॅश काढायची असेल तरच बँकेत जावं लागत. आपण फक्त टोकन घ्यायचं काम करायचं. बाकी स्लीप भरणं वैगरे कॅश काउंटरवरची सुंदरी करते. १० मिनिटापेक्षा जास्त वेळ बँकेत एखाद्या कामासाठी लागला तर आपल्याआधी मॅनेजरला अजीर्ण होतं. अगदी नवीन अकाउंट उघडायला देखील १० मिनिट पुरेशी असतात त्यांना. ATM कार्ड/पिन कोड/पासबुक ऑन दि स्पॉट देतात, आपल्यासारखी पोस्टाने पाठवायच्या भानगडी इथे नाहीत. थाई लोकांसाठी नॅशनल आयडी आणि फॉरिनर करिता पासपोर्ट हे एकच डॉक्युमेंट पुरेस असतं त्यांना. आवांतर, १) मी इकडच्या बऱ्याच बँकांत मुद्दामहून जाऊन आलोय. एखादी म्हातारी बाई/बाप्या स्टाफमधे आहे का म्हणून बघायला. एखाद दुसरी/दुसरा सोडले तर सगळा यंग स्टाफ. २) इकडे बँका कलर कोड ने ओळखल्या जातात. म्हणजे टुक-टुकवाल्याला जरी सागितलं 'ग्रीन बँक" ला घेऊन जा तर तो बरोबर "कासिकॉन" बँकेत घेऊन जातो. किंवा "यल्लो" सांगितलं तर "खुन्ग्सरी" बँकेत घेऊन जातो. ३) बँकेचा स्टाफ त्याच कलरकोडचा ड्रेस घालतो. ४) बँकेत वाटणे सोलणारा, पालेभाजी निवडत बसलेला किंवा स्वेटर विणत बसलेला स्टाफ अजूनतरी थायलंडमधे बघितला नाहीये.
  • Log in or register to post comments

व्हेकंसी असेल तर कळवा मला :)

टवाळ कार्टा
Mon, 06/06/2016 - 16:50 नवीन
व्हेकंसी असेल तर कळवा मला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

आता आपल्याकडेही सुधारणा आहे..

उगा काहितरीच
Tue, 06/07/2016 - 06:46 नवीन
आता आपल्याकडेही सुधारणा आहे.. Standard chartered , axis , या बँकांचा अनुभव आहे. अकाउंट उघडल्यापासून आत्तापर्यंत एकदाही गेलो नाही बँकेत . पिन, ATM सगळं जागच्या जागी अकाउंट उघडतानाच. काही कागदपत्रे लागली तर सरळ whatsapp वर पाठवायला सांगितलं . बस की अजून काय हवं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा