✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जगतल्या सर्वात बोरिंग जगांपैकी एक जागा म्हणजे बैंक!

अ
अज्ञात यांनी
Wed, 06/01/2016 - 16:01  ·  लेख
लेख
कूपन घ्या, चेक, डिपाजिट, विड्रोवल, लोन, लाकर्स अणि कित्येक व्यवहारिक धुमाकूळ असतो, त्यात अर्ध्या लोकांना फॉर्म भरता येत नसतात, ती दोऱ्यानी लटकणारी पेनं दर वेळी गळफास लाऊन आत्महत्या करतात असच वाटतं...त्यापेक्षा लोक्स् त्यांना तसं करायला भाग पडतात असं म्हणनं जास्त योग्य! कारण काम सरो वैद्य मरो हीच भावना ठेऊन लोक्स् त्या पेनाचा अपमान करतात! आणि कधी कधी तर ते पनही गायब असतं! नेमकं आपल्याकडे पेन नसतं.. मग "दे माय..२दीस लिहला नाय... थोडं लिहायचय माय... दया कर माय... तुझं ल्वोन माफ़ व्हइल माय...तुझा च्येक कधी बॉउंस नाय होणार माय... तुला येक टका ज्यास्त याज मिलल माय.." अश्या .झिप फाइलच्या इमोशनल स्माइली तोंडावर लोड करून 'पेन' हे अमूल्य शस्त्र थोड्या वेळपुरती मिळवण्याची कसरत करावी लागते. मग टोकन नंबर हातात आला की • सोन्याच्या बिस्किटा सारखं त्याला वरून खालून निहाळत बसणे! • टॉस करत... खाली पडला की तो घोंगाळत कोणाच्या पायखली आला की कपाळावर आठ्या देत हसून आपल्या बालमनाचा मोठेपणा सिद्ध करणे • ओळखीचे कोणी दिसले की.. "काय इथे कुठे!?" सारखा वह्यात प्रश्नांची दगडफेक करणे • बँकेच्या लोन/व्याजदराची माहिती भिंतींवर असतानाही उगाच गरज नसताना 'बीझी' कार्यकर्त्यांना विचारपुस करणे • महत्वाची कागदपत्र विसरल्यास ९९वर आउट होण्याचा भाव आणणे • सेक्युरिटी गार्डच्या बंदुकीकड़े पाहुन आपण उगाच काहेतरी गुन्हा करणार आहोत आणि तो आपल्याला आता गोळी मारणार आहे असा भास होणे • केशियर काउंटर वर तो केशियर निश्काम कर्मयोगी भावनेने पैसे मोजून देणे / घेणे. • लॉकररूम मध्ये गेल्यास डबल चावी घेऊन येणारा इसम आपल्यास त्या कमी प्राणवायु असलेल्या खोलीत आपला शेवटचा श्वास घेण्यासाठी सोडून गेला की काय अशी वाइट कल्पना येणे. • कूपन क्रमांक आपलाच आहे का.. जरी आपला नंबर अगदी दहा नंबर पुढे असला तरी तो लगेचच येणार आहे अशी निरर्थक अपेक्षा करत तो अंकफलक डोळे न झापता बघत बसणे • मध्येच कोणाचा फोन आला की उगाच बैंक लूटण्यासाठी कोणाचा कॉल आलाय असे संशय आणून सिक्युरिटी गार्ड येऊन आपणास फोन बंद करण्यास लावणे. • त्यात बैंक बंद व्हायची वेळ आली की चोराला पळून जाण्यास मदत कारवी असा काही प्रसंग आल्यासारखा अर्धवट शटर कडे बोट दाखवत तो गार्ड एक फेक निरागस स्माइल देतो... असे खुप प्रसंग आहेत. पण काही बँकामध्ये वर्षोंवर्ष जर येणजाणं असेल तर लगेच गार्ड पासून अगदी मेनेजरपण घरी पाहुणे आल्या सारखे वागतात! चहा पाणी विचारतात.. मस्तच वाटतं, आणि जे काम करायला आलोय ते होताच परत अजुन काही कामं पण होतात उदा. पासबुक क्यू वीना भरून मिळतं, काही कागदपत्रांची झेरॉक्स वगैरे नसतील तर "काही हरकत नाही हो... ऐ राकेश ह्या डाक्यूमेंट्सच्या ३झ्येराक्स आण पाहू" असा काहीसं अल्हाद्दायक मदतकार्य मिळतं! पण तरीही... जाम बोरिंग... नाहीच आवडत मला बँकांची विझीट, तरी बरे आहे हल्ली ऐटीएम् + डिपॉज़िट+व्हीड्रॉवल मशीन्स मुळे पूर्वीसरखं हागल्या मुतल्या बॅंकेचं थोबाड बघावं लागत नाही! बैंक ऑफ़ अमुक अमुक, अमुक बैंक सगळ्या सारख्याच... आल बैरिंग यो! ‪#‎सशुश्रीके‬ |
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
8338 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

आवरा.

एस
Wed, 06/01/2016 - 16:03 नवीन
आवरा.
  • Log in or register to post comments

भाऊ - तुमचं आणि शुद्धलेखनाचं

आदूबाळ
Wed, 06/01/2016 - 16:10 नवीन
भाऊ - तुमचं आणि शुद्धलेखनाचं काही विशेष वैर आहे का? पुरानी दुश्मनी वगैरे?
  • Log in or register to post comments

काय होतंय तुम्हाला ? औषध घ्या

स्पा
Wed, 06/01/2016 - 16:15 नवीन
काय होतंय तुम्हाला ? औषध घ्या ना काहीतरी
  • Log in or register to post comments

काय हे रॉजर्स....!!!

प्रचेतस
Wed, 06/01/2016 - 16:17 नवीन
काय हे रॉजर्स....!!! तुमच्यासारखे क्याप्टन अम्रिकेला असे खवचट प्रतिसाद देणं शोभत नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मग तुम्हा ख फ क्रांसारखे गो

स्पा
Wed, 06/01/2016 - 16:20 नवीन
मग तुम्हा ख फ क्रांसारखे गो गोड बोलू का ? सु प्र , शु रा , हिमालय कॉलिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

निदान आयडीनावाचा तरी माण राखा

प्रचेतस
Wed, 06/01/2016 - 16:21 नवीन
निदान आयडीनावाचा तरी माण राखा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

=))

स्पा
Wed, 06/01/2016 - 16:23 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कोण म्हणे हे?

सूड
Wed, 06/01/2016 - 16:37 नवीन
कोण म्हणे हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

स्पांडु आहे होय

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 06/01/2016 - 17:34 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ओह आय सी! =))

सूड
Wed, 06/01/2016 - 17:37 नवीन
ओह आय सी! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी

हेहेहे

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 06/01/2016 - 16:15 नवीन
भलताच विनोदी लेख बुवा..पण काय हो? बँकेत जायचेच कशाला? मी तर अकाउंट उघडणे आणि बंद करणे याशिवाय जातच नाहि तिथे.
  • Log in or register to post comments

झालं का? #पु.ढे.स.रा.

सूड
Wed, 06/01/2016 - 16:36 नवीन
झालं का? #पु.ढे.स.रा.
  • Log in or register to post comments

एकदम बँकेच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या .

शुभां म.
Wed, 06/01/2016 - 16:43 नवीन
एकदम बँकेच्या सगळ्या आठवणी दाटून आल्या . राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय सहकारी बँक पतपेढी ग्रामीण बँक इत्यादी ................................ प्रत्येक बँकेचा अनुभव वेगळाच.............................................
  • Log in or register to post comments

ग्रामीण बॅंक सोडून बाकी

असंका
Wed, 06/01/2016 - 17:18 नवीन
ग्रामीण बॅंक सोडून बाकी सगळ्याला +१..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुभां म.

ज्या बॅंकेत लोक फक्त

जेपी
Wed, 06/01/2016 - 17:39 नवीन
ज्या बॅंकेत लोक फक्त पैश्यासाठी येतात तिथल वातावरण निरस असणारच.. पैसे काढले/ठेवले ..काम संपल. धागाकर्ते तिथ काय पिकनीकला जातात काय ??.!
  • Log in or register to post comments

उद्यापासून सर्व ब्याम्काना

विजुभाऊ
Wed, 06/01/2016 - 17:53 नवीन
उद्यापासून सर्व ब्याम्काना कष्टमरांसाठी " कुणाचे पैशे कोणासाठी अर्थात सख्खा भाऊ कच्चा खाऊ " हे वगनाट्य कष्टमर लाउंज मधे लाईव्ह दाखवायचे वेवस्था करावी असा ठराव आणायचा विचार येतोय सदनात.
  • Log in or register to post comments

ते जौ द्या.

खेडूत
Wed, 06/01/2016 - 18:05 नवीन
ते जौ द्या. तुमचं नाटक पुण्यात कधी आहे ते आठवणीनं कळवा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

लेखावरील प्रतिसाद वाचून ह्ह्पुवा !!

बबन ताम्बे
Wed, 06/01/2016 - 17:59 नवीन
सकाळ मुपि वरील काही प्रसिद्ध लेखांवरच्या प्रतिसादांची आठवण झाली. :-)
  • Log in or register to post comments

मुपि सम्राट पण ब्रम्हे च राहणार

ईश्वरसर्वसाक्षी
Wed, 06/01/2016 - 18:03 नवीन
.
  • Log in or register to post comments

मोबाईल मध्ये काही नसतं का

रमेश भिडे
Wed, 06/01/2016 - 18:05 नवीन
मोबाईल मध्ये काही नसतं का तुमच्या? सापाची गेम वगैरे असते जनरली. खेळत जा बँकेत गेल्यावर. वेळ जाईल.
  • Log in or register to post comments

सेक्युरिटी गार्डच्या

असंका
Wed, 06/01/2016 - 18:05 नवीन
सेक्युरिटी गार्डच्या बंदुकीकड़े पाहुन आपण उगाच काहेतरी गुन्हा करणार आहोत आणि तो आपल्याला आता गोळी मारणार आहे असा भास होणे
बंदूक पाहून भिती वाटते बुवा... मी सगळ्यात पहिले गार्डशी विशेष मैत्री करतो. त्याने मला जरा सुरक्षित वाटतं. गनवाले गार्ड बहुतेक सगळे रीटायर्ड जवान असतात. त्यांच्याकडे चिक्कार गोष्टी असतात सांगायला. पण खरं म्हणजे बँकेत आता सर्रास बिना बंदूकीचे गार्ड असतात. त्यांच्याकडे गनचं लायसन नसतं बहुतेक वेळा. आता सिक्युरीटी गार्डना गनची नवीन लायसन सहज मिळत नाहीत. त्यामुळे एक दंडूका असतो फक्त प्लास्टीकचा. बँकेला गनचा तसाही त्रासच फार. लायसन काढा, रीन्यु करा, गनचा मेंटेनंस, गार्डचं ट्रेनिंग, बुलेटचं टेस्टींग, गनची सेफ (-कपाट या अर्थी), लायसन्सड गनमॅन नसेल तेव्हा गनची कस्टडी, इ. शिवाय त्या गनची आपल्यासारख्यांना भिती, दरोडेखोरांना काय? बँकेच्या एवढ्याशा जागेत आणि प्रचंड गर्दीत एवढी भली मोठी गन धरून साधा एक नेम धरेपर्यंत दरोडेखोरांनी दुनिया इकडची तिकडे केली असेल.
  • Log in or register to post comments

तसं काय नाय. आमच्या हितं

अभ्या..
Wed, 06/01/2016 - 19:30 नवीन
तसं काय नाय. आमच्या हितं सगळ्या खाकी गार्डाकडे वेग्वेगळ्या नमुन्याच्या गन्स पाह्यल्यात. अगदी कार्बाइन पासून एसेलार पर्यंत. खाकीवाले बहुतेक एक्स आर्मीमन असतात. नॅशनलाइज बँकाना असतात. पण ते एजन्सीच्या गार्डाकडं (निळ्या ड्रेसातल्या) काही नसते. ते गार्ड कमी आणी हेल्पर जास्त असतेत. अनपढांना फॉर्म भरुन देण्यापासून सीडीएम मध्ये पैसे भरुन देण्यापर्यंत सगळी कामे करतेत. असले कार्टून अ‍ॅक्सिस बिक्सीस सारख्या बँकात असतात. एसबीआयला पण दिसतात. मला लहानपणापासून बँकेची अन त्यांच्या व्यवहारांची फार भीती वाटते.(वडील बँकेत असून) अजूनही मी माझे बँकेचे काम असले की मित्राला किंवा हपिसच्या मुलाला पाठवतो. दुसर्‍यांसोबत जायला मात्र मज्जा वाटते. स्वतः फक्त अकाउंट ओपन करायला गेलेलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

ब्यांकेत कारबाइन! अशक्य! पैले

असंका
Wed, 06/01/2016 - 22:13 नवीन
ब्यांकेत कारबाइन! अशक्य! पैले बंद करा राव तिथलं अकाउंट! काय ब्यांक म्हणायची का काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ती नक्की

नाखु
गुरुवार, 06/02/2016 - 09:11 नवीन
नादूरुस्त (उगा धाक दाखवायला बरी म्हणुन असणार है), खरी कार्बाईन पोलिसांकडे पण सतत नसते.
बँका लूटायला आज्काल बाहेरून फार कमी लुटारू येतात (आतले त्यांना तशी संधीच देत नाहीत).

अभ्या प्रकाशीत बाबा "(ऊ)संतवचने भाग ५ पृष्ठ ६ वरील ओळ ११"

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

अरे हो की!... ह्याबद्दल विचार

Ea imputo praemitto
गुरुवार, 06/02/2016 - 13:09 नवीन
अरे हो की!... ह्याबद्दल विचार नव्हता केलेला कधी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

बॅंक बरी

सत्याचे प्रयोग
Wed, 06/01/2016 - 18:48 नवीन
बॅंक बरी एक वेळा पण पोस्ट सगळ्यात रटाळ जागा असते
  • Log in or register to post comments

कालपासून पोस्ट पण बँक समजली

शाम भागवत
गुरुवार, 06/02/2016 - 12:19 नवीन
कालपासून पोस्ट पण बँक समजली जाणार आहे. शाखा,मनुष्यबळ,विस्तार वगैरेंचा विचार करता जगातील सर्वात मोठी बँक. कालच मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केलेय. कोणत्याही ग्राहकाबद्दलचा के.वाय.सी. नॉर्म पूर्ण करणे या बँकेला अगदी सहज सोपे होणार आहे. बँकेच्या ग्राहकाचे घर या बँकेच्या कोणत्यातरी कर्मचार्‍याला माहिती असणार आहे व तो कर्मचारी निदान एकदा तरी त्याच्या घरी गेलेला असणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सत्याचे प्रयोग

वाह!.. हे उत्तम झालं!

Ea imputo praemitto
गुरुवार, 06/02/2016 - 13:10 नवीन
वाह!.. हे उत्तम झालं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

खिक्क!

जव्हेरगंज
Wed, 06/01/2016 - 18:53 नवीन
खिक्क!
  • Log in or register to post comments

३ रुपयांचा पेन

mandarbsnl
Wed, 06/01/2016 - 19:20 नवीन
ज्या बँकेत मी आणि बऱ्याच लोकांनी लाखो रुपये ठेवले आहेत ज्यांच्या विश्वासावर, ते बँकवाले ३ रुपयाचा पेन, मी किंवा ते लोक ते पेन घरी घेऊन जाऊ म्हणून चक्क विद्युत पुरवठा करणाऱ्या वायर...(विद्युत पुरवठा सुरु नसलेला वायर चा एक लांबडा तुकडा)..किंवा मजबूत सुतळी ई..ने बांधून ठेवतात... साल काय प्रकार आहे ना?? केवढी असुरक्षिततेची भावना..
  • Log in or register to post comments

इलाज नाही.

बबन ताम्बे
Wed, 06/01/2016 - 19:24 नवीन
कंपनी भरपूर पगार देत असली तरी हाफीसातून पेन/ नोट पॅड घरी घेऊन जातातच ना !! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mandarbsnl

पेन गडगडत जाऊन कुठेतरी हरवेल

रेवती
Wed, 06/01/2016 - 19:29 नवीन
पेन गडगडत जाऊन कुठेतरी हरवेल व पुढील कष्टंबरला सारखे सारखे शोधून द्यावे लागेल म्हणून तसे करत असावेत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mandarbsnl

बबन तुम्ही स्वतन्त्र विदर्भ

विजुभाऊ
Wed, 06/01/2016 - 19:27 नवीन
बबन तुम्ही स्वतन्त्र विदर्भ वाले का हो
  • Log in or register to post comments

नाही हो. मी पुण्याचाच .

बबन ताम्बे
Wed, 06/01/2016 - 19:45 नवीन
तो सकाळ मुपि प्रतिसादांमधील वेगळा विदर्भ वाला बबन मी नव्हे. आता मी मुपि वाचत नाही. त्यामुळे आता तो तशा कॉमेंट लिहितो की नाही माहीत नाही. पण त्यावेळी त्याने उच्छाद मांडला होता हे खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

व्हॉट्सॅपवरून साभार :

आनंदी गोपाळ
गुरुवार, 06/02/2016 - 09:23 नवीन
व्हॉट्सॅपवरून साभार : गरमीच्या दिवसां मध्ये फिरायला जाण्याची थंड हवेची ठिकाणे : 1) HDFC BANK 2) ICICI BANK 3) AXIS BANK 4) KOTAK MAHINDRA BANK 5) CITY BANK चुकून सुद्धा SBI,BOB,BOI,BOM आदि ठिकाणी जाउ नये.. A.C. SLOW असतो
  • Log in or register to post comments

आअ‍ॅ??

वपाडाव
गुरुवार, 06/02/2016 - 11:55 नवीन
आमच्यासाठी जगातली सर्वात बोरिंग जागा म्हणजे पाचवी खोली...! तिथे वेळ कटता कटत नाही.
  • Log in or register to post comments

हवाबाण हरडे घेत चला, फॉक्कन

सूड
गुरुवार, 06/02/2016 - 14:44 नवीन
हवाबाण हरडे घेत चला, फॉक्कन मोकळे व्हाल!! *सदर औषधाचा वैयक्तिक अनुभव नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

फॉक्कन मोकळे व्हाल!!

ईश्वरसर्वसाक्षी
Fri, 06/03/2016 - 15:48 नवीन
ह्या वरुन मिपा चा बाल्या ब्रिटिश ह्यांचे एक अमुल्ल्य साहित्य रत्न आठवले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

रादर, ते आठवावे म्हणुनच

वपाडाव
Mon, 06/06/2016 - 13:44 नवीन
रादर, ते आठवावे म्हणुनच लिहिलेले आहे. पाचव्या खोलीवरुन काही आठवले नाही ह्याचे वैषम्य सुद्धा आहेच्च...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी

त्या पाच्व्या खोलीचे जनक

टवाळ कार्टा
Mon, 06/06/2016 - 16:49 नवीन
त्या पाच्व्या खोलीचे जनक सध्ध्या अंमळ जास्तच बीजी झालेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

पाचव्या खोलीचे जनक हे आहेत,

सूड
Mon, 06/06/2016 - 17:03 नवीन
पाचव्या खोलीचे जनक हे आहेत, तुम्हाला अभिप्रेत असलेले वेगळे दिसतायेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आम्हीही यांच्याबद्दलच बोलत

टवाळ कार्टा
Mon, 06/06/2016 - 17:05 नवीन
आम्हीही यांच्याबद्दलच बोलत आहोत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

फॉक्कन ही ब्रिटिश

सूड
Mon, 06/06/2016 - 14:58 नवीन
फॉक्कन ही ब्रिटिश यांच्यामुळेच आमच्या शब्दसंग्रहात पडलेली भर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी

एक नंबर

बाजीप्रभू
गुरुवार, 06/02/2016 - 12:12 नवीन
महत्वाची कागदपत्र विसरल्यास ९९वर आउट होण्याचा भाव आणणे.
एक नंबर
  • Log in or register to post comments

:)

Ea imputo praemitto
गुरुवार, 06/02/2016 - 13:11 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

बरं, मग?

पैसा
गुरुवार, 06/02/2016 - 16:13 नवीन
बरं, मग?
  • Log in or register to post comments

आता हा प्रतिसाद कोणाला दिलाय

शाम भागवत
गुरुवार, 06/02/2016 - 16:41 नवीन
आता हा प्रतिसाद कोणाला दिलाय काही कळेना झालयं. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

लेखकांना ओ

पैसा
गुरुवार, 06/02/2016 - 17:07 नवीन
त्यांना बँका आवडत नाहीत तर सगळे बँक अकाउंट बंद करून टाकावेत आणि सगळे व्यवहार रोखीने करावेत. हाकानाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

:-))

शाम भागवत
गुरुवार, 06/02/2016 - 18:25 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

प्रतिसाद आवडला..पण माझ्या मते

असंका
Fri, 06/03/2016 - 09:55 नवीन
प्रतिसाद आवडला..पण माझ्या मते त्यांना बँका आवडत नाही असे नसून, तिथे जाउन बसल्यावर बोअर होते एवढाच त्रास आहे. त्याच्यावर माझ्याकडे अनेक उपाय आहेत. कुणाशी तरी गप्पा मारायच्या हे तर अगदीच प्राथमिक. कुणाशीतरी भांडण काढायचं हा दुसरा जालीम उपाय, त्याने तेच काय त्यांच्या आजुबाजुचे अनेक लोक बोअरडम मधून बाहेर येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा