✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वप्नातली शामली

द — दिनु गवळी, Wed, 06/01/2016 - 22:39
तुझी आठवण आता येतच नाही , समजावलय मी या वेड्या मनाला. पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे, पण या काळजावर दगड ठेवला .. तुझा तो हसरा चेहरा खरच खुप आवडत होता ग मला , मग का नकार दिलास तु या वेड्या जीवाला. तुझ्या डोळ्यातील ती काजळ मला क्षणात घायाळ करायची सखे. पण हळुहळु ती काजळ फिकी पडली. आता तुला माझी नजर नाही शोधणार .. कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार. तुझ्या विना खरचं मी काहीच नाही . पण आता अस वाटतय मी एकटा आहे हेच बरं आहे. तु माझी मी तुझा हे आता होणे अशक्यच आहे. ( स्वप्नातली शामली)

प्रतिक्रिया द्या
11420 वाचन

💬 प्रतिसाद (27)

अहाहा

अभ्या..
Wed, 06/01/2016 - 22:55 नवीन
अहाहा वैश्विक महाकाव्य. दिनूमामा तुम्ही ह्या मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.
  • Log in or register to post comments

काय लिहिलं ते वाचलं का? की

रमेश भिडे
Wed, 06/01/2016 - 22:58 नवीन
काय लिहिलं ते वाचलं का? की अशीच प्रतिक्रिया देता? आणि स्वतः काही लिहिता की असंच टिवल्याबावल्या करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष

अभ्या..
Wed, 06/01/2016 - 23:03 नवीन
प्यारेकाका तुम्ही दुर्लक्ष करणार होतात ना माझ्याकडे? इतर भीष्म प्रतिज्ञासारखा वाजला का बोऱ्या?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

काय ते???? कोण ते????

रमेश भिडे
गुरुवार, 06/02/2016 - 00:17 नवीन
काय ते???? कोण ते????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ये मारा..

संजय पाटिल
गुरुवार, 06/02/2016 - 11:30 नवीन
ये मारा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गप राव अभ्या.. स्वतःच्या ड्यु

रमेश भिडे
गुरुवार, 06/02/2016 - 12:02 नवीन
गप राव अभ्या.. स्वतःच्या ड्यु आयडी ने लिहित जाऊ नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

@मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.››

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 06/02/2016 - 12:40 नवीन
@मिलेनियमाचे वाल्मिकी आहात.››› आ ंSSssss. Lluuuuuu Image removed.. दू दू दू! Image removed. ते वाल मिकी नै! गवळी आहेत. दूध टाकतात. पांडूचे मित्र असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

पहिल्यांदा खुप त्रास झाला ग

खालीमुंडी पाताळधुंडी
Wed, 06/01/2016 - 23:05 नवीन
पहिल्यांदा खुप त्रास झाला ग वेडे,
आव्वा चिव्वा,,,,
पण या काळजावर दगड ठेवला ..
दगड गिळलात कि काय?? आणि तो बरोबर काळजावरच कसा जाऊन बसला?? खॅ खॅ खॅ(ह घ्या)
  • Log in or register to post comments

शाल्मली का?

एस
गुरुवार, 06/02/2016 - 00:30 नवीन
शाल्मली का?
  • Log in or register to post comments

मी

दिनु गवळी
गुरुवार, 06/02/2016 - 07:09 नवीन
प्रयत्न केलाय काव्य करण्याचा बाकी काही नाही
  • Log in or register to post comments

मस्त आहे कविता! अजून एक कराच!

जव्हेरगंज
गुरुवार, 06/16/2016 - 12:33 नवीन
मस्त आहे कविता! अजून एक कराच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिनु गवळी

bar असू दे

चांदणे संदीप
गुरुवार, 06/02/2016 - 11:17 नवीन
तेवढा काळजावरचा दगड बाजूला काढा आता...बराच वेळ झालाय की ओ दिनुराव आता! :-/ Sandy
  • Log in or register to post comments

दिनुजी, तुम्ही गद्यच लिहा.

बोका-ए-आझम
गुरुवार, 06/02/2016 - 12:25 नवीन
निदान समजतं तरी.
  • Log in or register to post comments

असा

नाखु
गुरुवार, 06/02/2016 - 12:48 नवीन
बर्याच जणांचा समज आहे असं पुढे लिहून परत का खोडलंत बोकोशभाऊ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हो

दिनु गवळी
गुरुवार, 06/02/2016 - 12:55 नवीन
लिहीतोय
  • Log in or register to post comments

आमची सगळी शमली

आनन्दा
गुरुवार, 06/02/2016 - 14:29 नवीन
आमची सगळी शमली
  • Log in or register to post comments

=))

चांदणे संदीप
गुरुवार, 06/02/2016 - 15:08 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

=))

जव्हेरगंज
गुरुवार, 06/16/2016 - 12:30 नवीन
=)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

अगायायाया!! एकदम कै जी प्रतिसाद!!

चतुरंग
गुरुवार, 06/16/2016 - 23:15 नवीन
=))=))=))=))=)) =))=)) =))=))=))=)) =)) =))=))=)) =)) =))=)) =)) =)) =)) =))=)) =)) =))=))=)) =)) =))=))=))=)) =)) =))=)) =))=))=))=))=)) =))=))=)) (कै जी प्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

आता तुला माझी नजर नाही शोधणार

चिनार
Fri, 06/17/2016 - 13:47 नवीन
आता तुला माझी नजर नाही शोधणार .. कारण तुझे बिन काजळीचे डोळे मला नाही आवडणार.
डोळे आले असतील रे दिनुभाऊ तिचे म्हणून काजळ लावणं बंद केलंय तिने.. बाकी वेगवेगळ्या साहित्यप्रकार आजमावून बघण्याची तुझी हिम्मत वाखाणण्याजोगी आहे...लिहित राहा..आम्ही वाचत राहू..
  • Log in or register to post comments

नेत्रदिपात कुणीतरी तेल घालून

अभ्या..
Fri, 06/17/2016 - 13:50 नवीन
नेत्रदिपात कुणीतरी तेल घालून वात सरशी केली असेल म्हणून काजळी नसेल आता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

वात, पित्त आणि कफ यामधला वात

चिनार
Fri, 06/17/2016 - 14:02 नवीन
वात, पित्त आणि कफ यामधला वात का रे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वात आणतोस बघ चिनार्या तू.

अभ्या..
Fri, 06/17/2016 - 14:50 नवीन
वात आणतोस बघ चिनार्या तू. वातरट कुठला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार

मी कसला वात आणणार रे बाबा...

चिनार
Fri, 06/17/2016 - 14:56 नवीन
मी कसला वात आणणार रे बाबा... अकुकाका आणि दिनुभाऊ मिपावाराचे आधुनिक वातमहर्षी आहेत ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

काय राव ससुश्रीके, साहित्यसुर्य णिसो विसरलात का

ईश्वरसर्वसाक्षी
Fri, 06/17/2016 - 15:18 नवीन
::)
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 06/19/2016 - 03:21 नवीन
:) लिहितं राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हो

दिनु गवळी
Sat, 06/25/2016 - 11:01 नवीन
लिहितो
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा