Skip to main content

"मोरेंचे डोके ठिकाणावर आहे काय?" किंवा, "मोरे तुम्ही स्वतःला काय समजता?" किंवा, "माझी नस्ती उठाठेव."

लेखक Anand More यांनी रविवार, 21/02/2016 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आरोप: तुम्ही फार मानभावी आणि कृत्रिम होत चालला आहात. स्पष्ट शब्दात दिलेली समज:
  1. तुम्हाला कुणीही त्रास वगैरे दिलेला नाही, नियम वगैरे सांगितलेले नाहीत. माझे मत आहे असे त्यात स्पष्ट लिहिलेले आहे. साधं सोपं म्हणलं तर नवे लेखन यामध्ये वर्गीकरण स्पष्ट लिहिलेले आहे.
  2. फेसबुकावर आपण लिहिता आनंदच आहे. ब्लॉग पण असावा. पण तिथे जसे वातावरण असेल तसेच इथे नाही. रॅगिंग सर्वानाच झालेय. नुसते हार मिळाले की वावावा अन कांदे बटाटे येताच मेंबरावर आगपाखड करायची ही सवय काही आज पाहीलेली नाही.
प्रश्न: तुम्हाला जसे प्रतिसाद मिळावे असे वाटते अन लिहिता तसेच इतर बरेच जण लिहितात. आपण किती जणांचे वाचता? किती प्रतिसाद दिलेत? आज्ञार्थक विनंती: वेलकम टू "जातो मी" क्लब ;) मला आठवणारा एक प्रसंग: याशिवाय काही प्रकट न झालेले पण कधीही प्रकट होऊ शकणारे विचार : हा मोरे; नाव, आडनाव, आणि टोपणनावावरून फार कमेंट करतो. काही नियम बनवावा का या संदर्भात ! माझ्यापुढला ज्वलंत प्रश्न:
  1. हे आपलं मैत्रीपूर्ण रॅगिंग चालू आहे की आपण लॉर्ड ऑफ द फ्लाइज खेळतोय? आणि मला जरी मी पिग्गी किंवा सायमन वाटलो तरी कदाचित मी राल्फ किंवा जॅक नसीन कशावरून?
  2. आता हे मिपावर टाकू की नको ?
  3. आणि टाकलंच तर कुठे टाकू? जनातलं मनातलं मध्ये की, काथ्याकूट मध्ये? (बरेचसे माझ्या मनातील विचार आहेत म्हणून, "जनातलं मनातलं" मध्ये टाकतो)
  4. यातली गंमत मिपाकरांना आवडेल का? की एका धाग्यावरून गाशा गुंडाळल्यानंतर पूर्ण मिपाने आपल्याला वाळीत टाकले आहे काय?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6105
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by Anand More

मोरेसाहेव, जरा चिल माडी (प्यायची नव्हे, कानडीमधली) हो. चांगलं लिहिता तुम्ही. अगोदरचं आणि राशोमोनही आवडलं होतं.

In reply to by प्रचेतस

अगदी हेच वाटले. राशोमान सारखी विचारांना खुराक देणारी उत्तम वैचारीक लेखमाला लिहिल्यानंतर असा धागा येणं काही आवडलं नाही.

:)

असा सगळा प्रकार झाला तर, खूप वाईट झाले

ह्या प्रसंगाची पुनरावॄत्ती 'होईल' ह्याची पुरेपुर काळजी घेऊ आम्ही सर..!!!

तुम्ही लिहा...वाचणारे वाचतीलच!! अवांतर-- फार दुखतंय का?

ज्या माणसाकडे डोके असते तो मिसळपाव वाचण्या आणि लिहिण्या साठी आपला बहुमूल्य वेळ का खर्च करेल? त्या पेक्षा मिसळपावची टपरी टाकून पैका कमवेल. दुपारी मस्त पैकी झोपण्या एवजी मी इथे प्रतिसाद का देतो आहे मलाच समजत नाही. कदाचित माझे डोके हि ....

In reply to by विवेकपटाईत

तुमचा हा प्रतिसाद माझा विवेक जागृत करण्यात कदाचित मला पटाईत करू शकेल … पण हाय दैवा तरीही हा प्रतिसाद देण्याची सुरसुरी काही मला रोखता आली नाही…. त्यामुळे माझे आभासी डोके त्याच्या आभासी ठिकाणावर आणण्याचा माझा प्रयत्न चालूच ठेवावा लागेल मला.