५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे. या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
_________________________________________________________________
(१) तामिळनाडू
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २३४
अद्रमुक+ : एकूण २०३ (अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १)
द्रमुक+ : एकूण २०३ (द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३)
भाजप व इतर पक्ष - ०
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ३९
अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७
सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतकः अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४
न्यूज नेशन: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४
चाणक्यः अद्रमुक+ ८१-९९, द्रमुक+ १२९-१५१
अॅक्सिसः अद्रमुक+ ८९-१०१, द्रमुक+ १२४-१४०
सीव्होटरः अद्रमुक+ १३९, द्रमुक+ ७८
मतदानपूर्व सर्वेक्षणात अद्रमुक+ आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु मतदानोत्तर चाचणीत ५ पैकी फक्त एका चाचणीत अद्रमुक+ आघाडीला बहुमताचा अंदाज आहे.
तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही तीच परंपरा कायम राहणार असा माझा अंदाज आहे.
_________________________________________________________________
(२) केरळ
२०११ मधील विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४०
संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७)
डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५)
भाजप - (६:०३% मते) आणि शून्य जागा
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २०
काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते)
सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १
भाजप - ० (१०.३० % मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १
सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ०
सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३, भाजप ०-३
सी व्होटरः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४
टाइम्स नाऊ: डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८
चाणक्यः डालोआ ६६-८५, संलोआ ४८-६६, भाजप+ ४-१२
केरळमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात डालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. केरळमध्ये सुद्धा दर ५ वर्षांनी सत्तांतर होत असल्याने यावेळी डालोआ सत्तेवर येणार असा माझा अंदाज आहे. भाजप स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच केरळ विधानसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(३) पश्चिम बंगाल
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - २९४
तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते
डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते
भाजप - शून्य जागा, ४.०६% मते
बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ४२
तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३
नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८
एबीपी न्यूजः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११०
सी व्होटरः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९
टाइम्स नाऊ: तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२०
चाणक्यः तृणमूल १९६-२२४, काँग्रेस्+डावे पक्ष ६१-७९, भाजप ९-१९
पश्चिम बंगालमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल न करण्याची व स्थिर सरकारची परंपरा आहे. भाजप बर्याच कालावधीनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(४) आसाम
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - १२६
काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४
काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: काँग्रेस - ४४, भाजप+ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६
सी व्होटर: काँग्रेस - ५३, भाजप+ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६
नेल्सन: काँग्रेस - ३६, भाजप+ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २
एव्हीसी: काँग्रेस - ४०, भाजप+ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३
एबीपी न्यूजः भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३
सी व्होटरः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१
न्यूज नेशनः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७
चाणक्यः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७
_________________________________________________________________
बहुतेक सर्व मतदानपूर्व चाचण्यांचा असा अंदाज होता की आसाममध्ये भाजप आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असेल, परंतु ते बहुमतापासून थोडेसे दूर राहतील. पण बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज असा आहे की आसाममध्ये भाजप+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर प्रथमच पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपची सत्ता येईल.
एकंदरीत आसाममध्ये भाजप चांगली कामगिरी करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसची पराभवाची परंपरा सुरूच राहणार असून काँग्रेस केरळ व आसाममध्ये सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. बदल न करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ व तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा सुरू राहण्याची शक्यता आहे.
वाचने
35885
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजपने सुरवातीला १३५+१३५+१८
In reply to ही लिंक पाहा गा.पै. by बोका-ए-आझम
युती भाजपने तोडली आहे.
In reply to युती आणि भाजप by गामा पैलवान
युती तोडण्यामागील कारणे
In reply to युती भाजपने तोडली आहे. by श्रीगुरुजी
भाजपला युती स्वतःच्या अटींवर
In reply to युती तोडण्यामागील कारणे by गामा पैलवान
१५१/११९ मागचे तर्कशास्त्र
In reply to भाजपला युती स्वतःच्या अटींवर by श्रीगुरुजी
आकड्यांचा संदर्भ?
In reply to १५१/११९ मागचे तर्कशास्त्र by गामा पैलवान
+१
In reply to आकड्यांचा संदर्भ? by गॅरी ट्रुमन
आकड्यांचा घोळ झाला की काय .... !
In reply to +१ by श्रीगुरुजी
सर्वात प्रथम माझी झालेली चूक
In reply to आकड्यांचा घोळ झाला की काय .... ! by गामा पैलवान
आणखी थोडे मुद्दे
In reply to सर्वात प्रथम माझी झालेली चूक by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी,
In reply to सर्वात प्रथम माझी झालेली चूक by श्रीगुरुजी
गा.पै.
In reply to श्रीगुरुजी, by गामा पैलवान
राजीव प्रताप रूडींच्या जाहीर
In reply to १५१/११९ मागचे तर्कशास्त्र by गामा पैलवान
गामा पैलवान व damn यांना
२०१४ महाराष्ट्र विधानसभा
In reply to गामा पैलवान व damn यांना by श्रीगुरुजी
एकंदर विश्लेषणाबद्दल धन्यवाद
In reply to गामा पैलवान व damn यांना by श्रीगुरुजी
अवांतर,
In reply to एकंदर विश्लेषणाबद्दल धन्यवाद by damn
माझ्या राजकीय ज्ञानाच्या व
In reply to अवांतर, by शाम भागवत
मला
सद्य जमान्यात ?
हो. गेला बाजार चॉपर रामपुरी
In reply to सद्य जमान्यात ? by शाम भागवत