कालच लोकसत्तमध्ये एक बातमी वाचनात आली.कृषी उत्पन्न बाजार समीतीचे नियंत्रण हटवून्/शिथील करण्याचे सरकारने ठरविले आहे. त्यामुळे शेतकरी थेट ग्राहकाला आपला भाजीपाला (कांदे बटाट्यासह विकू शकतो).अता या अनुषंगाने आणखी एक बातमी दोन दिवसांपुर्वी वाचनात आली
देविदास मारुती परमाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 10 मे रोजी त्यांनी 952 किलो कांदा पुण्याच्या बाजारात विक्रीस पाठविला होता. 18 गोणी भरून पाठविलेल्या या कांद्याला प्रति 10 किलोला 16 रुपये म्हणजे प्रति किलोला एक रुपया 60 पैसे इतका भाव मिळाला. त्यानुसार शेतकऱ्याच्या मालाचे मूल्य एक हजार 523 रुपये 20 पैसे इतके झाले. या रकमेतून अडत्याने त्याची 91 रुपये 35 पैसे अडत कापून घेतली. हमालीचे 59 रुपये, भराईचे 18 रुपये 55 पैसे इतका खर्च बाजारात झाला, तर माल वाहतुकीचा 1 हजार 320 रुपये इतका खर्च त्याला द्यावा लागला. हा व इतर सर्व खर्च कांद्याच्या पैशांतून वजा केला तर शेतकऱ्याच्या हातात केवळ एक रुपयाच आला.सविस्तर बातमी इथे कालच लोकसत्ताने एक चांगला (कधी कधी असे सुखद धक्के द्यायची सवय आहे लोकसत्ताला) या प्रश्नाची चहुअंगाने उहा पोह करणारा अग्रलेख छापला आहे. अग्रलेख दुवा
हा दलालांचा अडथळा दूर करून भाजीपाला, फळे आणि कांदा-बटाटा एपीएमसीच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची सूचना केंद्र सरकारची. काही राज्यांनी ती पाळलीही. महाराष्ट्रात मात्र घोडय़ाने पेंड खाल्ली. सरकार सांगते, की व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्या विरोधामुळे हा निर्णय बारगळला. खरे तर सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांचे अनेक आमदार एपीएमसीवर असल्यानंतर तो निर्णय बारगळणारच होता. पण आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उचल खाल्ली आहे. यासाठी लवकरच ते अध्यादेश काढणार आहेत. त्यालाही जोरदार आणि संघटित विरोध होईलच. माथाडी कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न यातून कसा निर्माण होईल हेही सांगितले जाईल. म्हणजे घाम गाळून शेती पिकवणारा शेतकरी मेला तरी चालेल, पण त्याच्या जिवावर जगणारे जगले पाहिजेत असा हा युक्तिवाद.अता या दोन्ही बातम्या वाचल्याबरोबर आणखी एका बातमीने लक्ष्य वेधून घेतले (चार आण्याचा शेतकरी नसून या बातम्या वाचायची/पाठपुराव्याची खोड काही सुटेना) माथाडी/आडते/मापाडी संघटनांनी याला कडाडून विरोध केला आहे. अता सजग/सुजाण मिपाकरांनी यात त्यांना काय वाटते ते मत्/शिफारस द्यावे. साधारण मते/अनुभव्/सल्ला या मुद्द्यांवर असावा म्हणजे राजकीय हाणामारी/हेत्वारोप टाळता येतील.
- आंध्रा मध्ये रयतु बाजार आहे काय? तो नक्की कसा चालतो (हैद्राबाद्वासी मिपाकरांना माहीत असेल तर त्यांनी अनुभव द्यावेत)
- चंदीगड व हरियाणा पंजाब येथेही याची अंमल्बजावणी झाली आहे,कुणी चंदीगडमधील मित्रांकडून माहीती मिळवून इथे टाकली तर चांगले होईल.
- मुंबईत थेट विक्री केंन्द्रे चालू केली होती ती का बंद पडली असावीत.
- मोठ्या सोसायटी (किमान ५० ते ६०० सदनिका असलेले) या करीता काय करू शकतात शेतकरी गटाशी संपर्क करून (त्याकरीता सोसायटीतील कुणी न कुणी तरी गावाकडे घर-जमीन-संपर्क असलेले असेल्च) बचत गट धर्तीवर शेतकरी समूह गट स्थापन करून त्यांचे द्वारे सुनियोजीत विक्री केंद्रे उभारता येतील. सहकारी संकुलातील एखाद्याला रोजगार मिळू शकेल का?
- शेतकर्यांना त्यांच्या उत्पादनाचा रास्त भाव मिळालाच पाहिजे पण त्याच्या अनावश्यक बोजा ग्राहकावर पडता कामा नये.(शहरातील सग्ळेच मॉल मध्ये भाजी घेत नाहीत). प्रतिसाद किमान असा तरी असावा
वर्गीकरण
वाचने
31023
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
अअॅग्रोवन मधील आजची बातमी
बाजार समित्यांचा ‘बाजार’ उठणारच...! -
Thursday, May 26, 2016 AT 06:30 AM (IST) Tags: mumbai, maharashtra, market rate कायद्यातील दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण - आता प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मंजुरीची मुंबई - कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील लुटमारीला कायमची मूठमाती देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील दुरुस्तीला सर्व संबंधित विभागांनी सहमती दिली असून, येत्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र बाजार समिती आवारापर्यंत मर्यादित करणारा पणन विभागाचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मंजूर होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी बाजार (National Agriculture Market) संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी बाजार समिती क्षेत्र सीमित करणे आवश्यक ठरले आहे. केंद्राने अर्थसंकल्पात या संबंधीची घोषणा केली आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी सर्व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय कृषी बाजार योजनेचा आढावा घेतला होता. त्यामध्येच खुद्द पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा या महत्त्वपूर्ण योजनेत सहभाग का नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याचबरोबरच गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान कार्यालयाकडून राज्य सरकारकडे केलेला पत्रव्यवहार आणि त्यावरील कार्यवाहीची विचारणा करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर तातडीने पणन विभागाला कामाला लावल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. फळे आणि भाजीपाला विनियमनमुक्ती ही साधी प्रशासकीय बाब आहे. पंरतु राष्ट्रीय कृषी बाजारामधे राज्याचे स्थान बळकट करण्यासाठी सध्याच्या महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमात बदल करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. त्यानुसार पणन विभागाचा प्रस्ताव तयार करून बाजार समिती अधिनियमात कृषी उत्पन्न बाजार समितींच्या कार्यक्षेत्राची तरदूत रद्द करून राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र संबंधित बाजार समिती आवारापुरते मर्यादित ठेवले जाणार आहे. पणन विभागाच्या या प्रस्तावाला विधी व न्याय आणि इतर संबंधित वित्त विभागांनी मंजुरी दिली आहे. सध्याच्या घटकेला मंजूर प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या मंगळवारी (ता. ३१ मे २०१६) मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या कायदा दुरुस्तीला अध्यादेशाचे स्वरूप देऊन राज्यभरात नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. आगमी विधिमंडळाच्या पावसाळी आधिवेशनात या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होणार आहे. बाजार समिती कायदा दुरुस्तीने काय होणार ? सध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियम १९६३ ने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. उदा. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिचीचे कार्यक्षेत्र मुंबई महानगर क्षेत्र आहे. त्यामुळे या क्षेत्रात विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर बाजार समिती सेस आणि इतर शुल्क वसूल करून नियमन करते. कायद्यातील दुरुस्तीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे क्षेत्र हे फक्त वाशी (तुर्भे) येथील समितीचा आवार राहील. त्यामुळे मुंबई शहरात मुक्तपणे शेतमाल ने-आण आणि विक्री करणे शक्य होईल. शहरात विक्री न झालेला शेतमाल किंवा बाजार समिती अधिक दर देत असेल, तर शेतकरी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल नेतील. समितीच्या प्रवेशद्वारावर संबंधित सेस आणि नियमन प्रक्रिया होईल. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध पर्याय उपलब्ध होतील. परिणामी बाजार समित्या अधिक कार्यक्षम आणि कार्यप्रवण होतील, असा सरकारचा मानस आहे. कायद्यातील दुरुस्तीमुळे प्रशासकीय बाब असलेली फळे आणि भाजीपाल्याची विनियमनमुक्ती आपोआपच अमलात येईल, असे पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटले आहेहम्म
सध्या पुणे जिल्हयात शेतीभागात
+१
In reply to सध्या पुणे जिल्हयात शेतीभागात by संदीप डांगे
छान माहिती
In reply to सध्या पुणे जिल्हयात शेतीभागात by संदीप डांगे
मी कोकणातला त्यामुळे कांदा
त्रास कसा टाळावा??
In reply to मी कोकणातला त्यामुळे कांदा by खटपट्या
पहील्यांदा या लोकांना गाड्या
In reply to त्रास कसा टाळावा?? by damn
कसं आहे ना. जेव्हा ट्रक मध्ये
In reply to पहील्यांदा या लोकांना गाड्या by खटपट्या
ओके पिंगू साहेब. पण स्वतःच्या
In reply to कसं आहे ना. जेव्हा ट्रक मध्ये by पिंगू
सर्वप्रथम खालील पावत्या
In reply to ओके पिंगू साहेब. पण स्वतःच्या by खटपट्या
उत्तम विषय नाखु काका
+१ सोन्याबापू.
In reply to उत्तम विषय नाखु काका by कैलासवासी सोन्याबापु
भारीच की
In reply to उत्तम विषय नाखु काका by कैलासवासी सोन्याबापु
एखा अल्पभूधारक शेतकरी जो
शेतकऱ्याने
शेतकरी मजुरी, बियाणं, खतं,
In reply to शेतकऱ्याने by अनिरुद्ध.वैद्य
सहमत आहे ढेरेसाहेब. शेती हा
In reply to शेतकरी मजुरी, बियाणं, खतं, by अनुप ढेरे
मान्य आहे ढेरे साहेब!
In reply to शेतकरी मजुरी, बियाणं, खतं, by अनुप ढेरे
ग्राहक म्हणून अनुभव
चौकटराजा +१०००१
In reply to ग्राहक म्हणून अनुभव by चौकटराजा
तुमची भूमिका रास्त आहे.
In reply to ग्राहक म्हणून अनुभव by चौकटराजा
संदीपराव,
In reply to तुमची भूमिका रास्त आहे. by संदीप डांगे
माझी ऐकिव माहिती फक्त. खरं
In reply to संदीपराव, by अभ्या..
अगदी खरे आहे.
In reply to ग्राहक म्हणून अनुभव by चौकटराजा
भरपुर पाणी असेल तर - टनाला
योग्य तप्शील मिळाला की
In reply to भरपुर पाणी असेल तर - टनाला by मार्मिक गोडसे
आदरणीय मित्र नाखु,
ह्या विषयावर इथे चर्चा चालू
In reply to आदरणीय मित्र नाखु, by प्रसाद गोडबोले
अॅङ्रीकल्चराल प्रॉडक्ट्स वर
एक एकर शेतीत फारतर 20-30 टन ऊ
कैच्या कै.
In reply to एक एकर शेतीत फारतर 20-30 टन ऊ by जेपी
ऊप्स माय मिस्टेक..
In reply to कैच्या कै. by अभ्या..
सर्वांना धन्य्वाद
या विषयाच्या अनुषंगाने अग्रोवनमधील ही एक सुखद बातमी.
माहीती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करीत असताना त्याचा आपल्या शेतीसाठी आणि शेतीमाल विकण्यसाठी उपयोग करणारा आनंद नक्कीच तुम्हाला भावेल. पुण्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कंपनीत कार्यरत असणाऱ्या आनंद उंडे या तरुणाने वडिलोपार्जित शेती आणि गीर गायींच्या संगोपनाकडे चांगले लक्ष दिले आहे. दर शनिवार, रविवार शेती आणि गोठ्याच्या नियोजनातून शाश्वत शेतीकडे त्याने पाऊल टाकले. शेती आणि पशुपालनासाठी मित्रांची चांगली साथ मिळाली आहे. पुणे शहरापासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या पणदरे (ता. बारामती) गावात आनंद शशिकांत उंडे याची वडिलोपार्जित शेती आहे. वडिलांच्या बरोबरीने त्यांचे शेतीवर जाणे असायचे. शिक्षण पूर्ण झाल्यावर आनंद माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीमध्ये रुजू झाला. वडिलांचे निधन झाल्याने नोकरी सांभाळत गेल्या सहा वर्षांपासून आनंदने दर शनिवार- रविवार गावी जात शेती सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला. मित्रांचीही चांगली साथ मिळाली. गीर गायींच्या संगोपनाला सुरवात ः शेती सुधारण्याबरोबरीने आनंदचे लक्ष गीर गायींच्या संगोपनाकडे गेले. यासाठी कारण ठरले ते दै. ॲग्रोवनचे देशी गोवंश चर्चासत्र. याबाबत आनंद म्हणाला, की चर्चासत्रामध्ये गायींच्या संगोपनाची माहिती मिळाली. पशुपालकांच्या गोठ्याला भेट देऊन व्यवस्थापन समजाऊन घेतले. वलसाड (गुजरात) येथील शेतकऱ्याने ओएलएक्सवर गीर गायींची माहिती दिली होती. मी तेथे जाऊन जातिवंत गीर गाय निवडली. पशुतज्ज्ञांकडून गाय आणण्याचे सोपस्कार पूर्ण केले. अॉक्टोबर, २०१४ मध्ये दसऱ्याला गीर गाय आणली. दुसऱ्या वेताची गाभण गीर गाय मला वाहतूक खर्चासह ५४ हजार रुपयांना पडली. शेतातील वातावरणात रुळल्यानंतर ही गाय प्रति दिन सात लिटर दूध देऊ लागली. माझी तीन एकर शेती सांभाळण्यासाठी गडी असल्यामुळे गायीचे संगोपन सोपे झाले. दर आठवड्याला शनिवार- रविवार शेतीवर राहून शेती आणि गायीच्या पुढील संगोपनाचे नियोजन सुरू झाले. गायीला कालवड झाली. गावातील ओळखीच्यांना दररोज दुधाचा चाळीस रुपये लिटर या दराने रतीब सुरू केला. यातून किमान व्यवस्थापन खर्च निघू लागला. शेतीला शेणखत, गोमूत्राची सोय झाली. वर्षभरात ग्राहकांच्याकडून दुधाची मागणी सुरू झाली. याच काळात पुण्यात मित्रांच्या सहकार्याने देशी गायींच्या दुधाच्या मागणीचा अभ्यास केला आणि टप्प्याटप्प्याने गुजरातमधून गीर गायी आणल्या. पैशाची जुळणी करून शेताजवळ मुक्त संचार गोठ्यासाठी १५ गुंठे जागा घेतली. तेथे कूपनलिकेला पाणी लागले. सध्या गोठ्यात ३० गायी, २२ वासरे आहेत. गायी आणि वळूच्या पशुवैद्यकाकडून तपासण्या केल्या. गायींच्या व्यवस्थापनासाठी गोठ्यात कायमस्वरूपी दोन मजूर आहेत. दररोज त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क असतो. शनिवार-रविवार शेतीवर जाऊन पुढील आठवड्याचे नियोजन करतो. माझी आई गावातच राहत असल्याने तिचे दैनंदिन व्यवस्थापनावर लक्ष असते. मुक्त संचार गोठा ः १) पाच गुंठे क्षेत्रावर मुक्त संचार गोठा. निम्म्या गोठ्यावर शेडनेटचे छत. गाभण गायी, दुधाळ गायी, वळू आणि वासरांसाठी स्वतंत्र कप्पे. गव्हाण आणि पाण्याची सोय. २) दूध काढण्यासाठी फक्त बांधिव गोठ्यात गायी बांधल्या जातात. इतर वेळी मुक्त संचार गोठ्यात सोडल्या जातात. ३) बांधिव गोठ्याचा आकार ः २८ बाय ३३ फूट. सोळा गायी आणि वासरे बांधण्याची सोय. ४) योग्य उंचीची गव्हाण. गव्हाणीमध्ये २४ तास पाण्याची सोय. ५) जनावरे धुतलेले पाणी, गोमूत्र स्वतंत्रपणे टाकीत जमा. शेणखतासाठी स्वतंत्र खड्डा. ६) मुक्त संचार गोठ्यामुळे गायींना पुरेसा व्यायाम, गरजेनुसार आहार, पाणी मिळाल्यामुळे दुग्धोत्पादनात सातत्य. ७) गोठ्यात एक वळू. पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने नैसर्गिक किंवा कृत्रिम रेतन. पशुवैद्यकाकडून आरोग्य तपासणी आणि लसीकरण. ८) जातिवंत कालवडी तयार करण्यावर भर. सध्या १० ते १२ लिटर दूध देणाऱ्या गायी तयार होताहेत. वर्षभर चारा नियोजन ः १) तीन एकर क्षेत्रापैकी दोन एकरांवर संकरित नेपिअर आणि हंगामानुसार मका, कडवळ लागवड. गावातील दोन मित्रांशी तीन एकरांतून वर्षभर चारापुरवठ्याचा करार. या मित्रांना वर्षभरासाठी चाऱ्याचा दर बांधून दिला. २) लोणी भापकर येथून वर्षभरासाठी दहा हजार कडबा पेंडीची एकदाच खरेदी. ३) एका गायीला ओला, सुका चारा कुट्टी तीस किलो सकाळ- संध्याकाळ दिली जाते. शिफारशीनुसार खनिज मिश्रणाचा पुरवठा, त्यामुळे गायींचे आरोग्य चांगले. मित्रांच्या सहकार्याने दुधाचे वाटप ः दुग्धेत्पादनाबाबत आनंद उंडे म्हणाला, की सध्या ३० पैकी १२ गायी दुधात आहेत. एक गाय प्रति दिन वासरू पाजून सात लिटर दूध देते. रोजचे सरासरी ९० लिटर दूध गोळा होते. सकाळी चार वाजता आणि सायंकाळी पाच वाजता दूध काढले जाते. दुधाला ४.८ फॅट, एसएनएफ ८.५ आहे. जवळील शेटफळ गढे गावातील मित्र अमोल कदमकडे १२ गीर गायी आहेत. त्याचे ४५ लिटर दूध जमा होते. संध्याकाळी काढलेले दूध एक आणि अर्धा लिटर पिशवी पॅक करून डीफ्रिजमध्ये ठेवले जाते, तसेच सकाळी चार वाजता काढलेले दूध पिशवी पॅक करून डीफ्रिज केले जाते. सौरभेयी ब्रॅंडने विक्री ः बाजारपेठेत वेगळेपण जपण्यासाठी आनंदने सौरभेयी ब्रॅंड तयार केला. नंदिनी डेअरी फार्म नावाने व्यावसायिक नोंदणी केली. दूध पॅकिंगसाठी अन्न आणि प्रशासन विभागाच्या मानांकनाप्रमाणे निकष पूर्ण करून प्रमाणपत्र घेतले. प्रयोगशाळेतून दुधाची तपासणी केली. पिशवीवर दुधातील घटक छापले. आनंद दर शनिवार, रविवार ग्राहकांना शेती, गोठ्यावर नेऊन व्यवस्थापन दाखवितो, त्यामुळे ग्राहकांना दुधाबाबत खात्री तयार झाली. उत्पन्नाबाबत आनंद म्हणाला, की मित्रांच्या सहकार्याने हा व्यवसाय वाढवीत आहे. एका गायीचे रोजचे व्यवस्थापन आणि दूध वाहतूक, वितरकाचे कमिशन हा खर्च वगळता दूध विक्रीतून सरासरी १५० रुपये उरतात. घरचा हिरवा चारा असल्याने अतिरिक्त खर्च नाही. मिळणारा नफा मी शेती आणि पशुपालनात गुंतवितो. परिसरातील शेतकऱ्यांना शेणखत आणि गोमूत्र विक्रीतून वर्षाला अडीच लाख रुपये मिळतात. त्यातून मजुरांचा पगार, गोठा व्यवस्थापनाचा खर्च निघतो. सध्या दूध, शेण, गोमूत्र आणि कालवड हे उत्पन्नाचे स्रोत आहेत. आयुर्वेदिक कंपनीच्या मदतीने धूप कांडी, गोमूत्र अर्क, साबण, फिनेल, उदबत्ती, शाम्पूनिर्मितीचे नियोजन आहे. जमिनीची सुपीकता वाढली... शेतीबाबत आनंद म्हणाला, की एक एकरावर फुले २६५ उसाच्या जातीची लागवड आणि दोन एकरांवर चारापिकांची लागवड आहे. विहिरीमुळे शाश्वत पाणीपुरवठा आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांच्या सल्ल्याने पीक व्यवस्थापनात बदल करतो. शेणखताचा वापर आणि पाचटाचे आच्छादन असते. पिकांना माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन तसेच पाट पाण्यातून शेण, गोमूत्राची स्लरी देतो. एकरी ५८ टनांवरून ७४ टनांवर गेलो. बांधावर ४५ नारळाच्या झाडांची लागवड आहे. येत्या चार वर्षांत शहाळ्याचे उत्पन्न सुरू होईल. संपर्क ः आनंद उंडे ः ९८२२६२६८३४उत्तम प्रतिसाद.
In reply to सर्वांना धन्य्वाद by नाखु
हेच म्हणतो, प्रत्यक्ष भेटायला
In reply to उत्तम प्रतिसाद. by प्रचेतस
यज्ञवराहावरून आठवले, भाज्या
In reply to उत्तम प्रतिसाद. by प्रचेतस
ही बातमी खरी आहे का....?
In reply to यज्ञवराहावरून आठवले, भाज्या by अभ्या..
अरेच्या, काय रे प्रचेतस
In reply to उत्तम प्रतिसाद. by प्रचेतस
चोळेगाव
In reply to अरेच्या, काय रे प्रचेतस by चतुरंग
लोणी भापकरवर एक लेखच लिहिला
In reply to अरेच्या, काय रे प्रचेतस by चतुरंग
वा वा मस्तच!
In reply to सर्वांना धन्य्वाद by नाखु
अस्सल देशी गाय असेल (म्हणजे
In reply to वा वा मस्तच! by चतुरंग
आपला हा प्रतिसाद व वरील
In reply to अस्सल देशी गाय असेल (म्हणजे by शाम भागवत
:))
In reply to आपला हा प्रतिसाद व वरील by मार्मिक गोडसे
चतुरंग आप्ल्या माहीती साठी आणि
In reply to वा वा मस्तच! by चतुरंग
आयला...एव्हढं सगळं करावं लागतं होय...
In reply to सर्वांना धन्य्वाद by नाखु
उत्तम
In reply to सर्वांना धन्य्वाद by नाखु
नाखुदा तुम्ही....
उत्तम धागा
ऊसाची काळी गोडी
ऊसाची काळी गोडी
एक चांगली बातमी
काही शंका
- सर्वत्र अशीच पद्धत असते काय?
- शेतकरी संघटना मुग गिळून का गप्प आहे? अपवाद स्वाभेमानी शेतकरी संघटना (राजू शेट्टी यांची)
- शेतकरी कांद्याची (पक्षी शेतमालाची प्रतवारी प्रामाणिकपणे आणि काटेकोरपणे करीत नसेल तर त्याचा भुर्दंड व्यापार्याने आणि नंतर किरकोळ विक्रेत्याने का सोसावा?(स्थानीक मंडईत कांदा २० रू सव्वा किलो आहे आणि अगदी काळजीपुर्वक तपासून घ्यावा लागतोय कारण काळा पडलेला काही कांदा त्यात मिसळलेला आहे)
- कृषी उत्पन्न बाजार समीती (प्रतवारी व योग्य मापन (वजन) साठी काहीच करू इच्छीत नाही का? मोशी बाजारातील बहुतांश गाळे अजूनही रिकामेच आहेत.
- खाजगी व्यावसायीक सुसज्ज साठवणकेंद्रे उभारून असा नाशवंत माल साठवण्यासाठी भाडेतत्वावर देऊ शकतील काय. कंपन्यांसाठी केंद्रीय उत्पादन्शुल्क विभागाची गोदामे आहेत.
- चिंचव्ड स्ते स्टेषनजवळील वखार महामंडळाची जागा खाजगी शीतप्रक्रिया माल केंद्राला दिली आहे. तिथे एक साठव्ण ग्रूह उभारले जाऊ शकते
जाणकारांकडून माहीती अपेक्षीत ==================================================खरा उपाय.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
+१
In reply to कृषी उत्पन्न बाजार समितीच्या by खटपट्या
निर्णय लांबला.
नियमनमुक्तीचा निर्णय पुन्हा लांबणीवर
- Wednesday, June 29, 2016 AT 04:15 AM (IST) Tags: mumbai, maharashtra, farmers मुंबई - भाजीपाला, फळे नियमनमुक्तीचा निर्णय आणखी काही दिवस लांबणीवर पडला आहे. नियमनमुक्तीचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी (ता. २८) बैठकीत घेण्यात आला. तसेच निर्णय घेण्यासाठी उपसमितीला पंधरा दिवसांचा कालावधीही देण्यात आला आहे. दरम्यान, माथाडी, व्यापारी आणि अडत्यांच्या विरोधामुळे राज्य सरकारला हा निर्णय घेण्यासाठी विलंब होत आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यानुसार राज्यात शेतमाल समित्यांच्या आवारात विक्री करावा लागतो. परिणामी शेतकरी स्वतःचा शेतमाल थेटपणे विक्री करू शकत नाहीत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातील काही राज्यांमध्ये भाजीपाला आणि फळे बाजार समित्यांच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी थेटपणे ग्राहकांना शेतमाल विक्री करू शकतो. राज्यातही गेले काही दिवस राज्य सरकार या निर्णयाची चाचपणी करीत आहे. मात्र, या नियमनमुक्तीच्या निर्णयाला बाजार समित्यांमधील माथाडी, व्यापारी आणि अडते आदी घटकांचा विरोध आहे. नियमनमुक्तीमध्ये या घटकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याने या घटकांचा सरकारच्या निर्णयाला विरोध होत आहे. दरम्यान, व्यावहारिक दृष्टिकोनातून नियमनमुक्ती करण्याचे संकेत राज्य सरकारने यापूर्वीच दिले होते. राज्य सरकारकडून गेला आठवडाभर वेगवेगळ्या पातळ्यांवर या निर्णयाच्या परिणामांचा अंदाज घेण्यात येत होता. तसेच त्यासाठी राज्य सरकारने कसून तयारीसुद्धा केली होती. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या वर्षानुवर्षांच्या जोखडातून शेतकरी मुक्त होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक पार पडली. बैठकीमध्ये भाजीपाला, फळे नियमनमुक्तीचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, नियमनमुक्तीवर शिक्कामोर्तब करण्याऐवजी राज्य सरकारने पुन्हा एकदा हा निर्णय लांबणीवर टाकण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसून येते. राज्य सरकारने नियमनमुक्तीचा अभ्यास करण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात आली आहे. सहकार आणि पणनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीला यासंदर्भातला निर्णय घेण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. समिती जो निर्णय घेईल, त्याची अंमलबजावणी राज्यात केली जाईल. त्यासाठी पुन्हा राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेण्याची गरज नसल्याचेही सांगण्यात आले आहे. अशी असेल मंत्रिमंडळ उपसमिती सहकार, पणनमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्ष आणि सदस्य म्हणून मंत्री सुधीर मुनगंटीवार, सुभाष देसाई, पंकजा मुंडे, राज्यमंत्री विजय शिवतारे, राम शिंदे, प्रवीण पोटे हे नियमनमुक्तीचा अभ्यास करणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाने नियमनमुक्तीचा निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठ ते पंधरा दिवसांत याबाबतच्या सर्व गोष्टी तपासून निर्णय घेतला जाईल. समिती घेईल तो निर्णय अंतिम राहील आणि त्याची अंमलबजावणी राज्यात केली जाईल. त्यासाठी पुन्हा राज्य सरकारच्या मान्यतेची आवश्यकता भासणार नाही. -चंद्रकांत पाटील, सहकार आणि पणनमंत्रीउत्तम लेख आणि प्रतिक्रिया
गो ताय २० फुटांपाई स्वप्न
In reply to उत्तम लेख आणि प्रतिक्रिया by पैसा
प्रत्येकाने वाचावे असे.
In reply to उत्तम लेख आणि प्रतिक्रिया by पैसा
मला वाटते
चौराकाका, आपला फोकस हटतोय,
In reply to मला वाटते by चौकटराजा
थेट ग्राहकाला विकणे
In reply to चौराकाका, आपला फोकस हटतोय, by संदीप डांगे
शेतकरी भोळे/गरीब असतात वगैरे
पाणी अडवा पाणी जीरवा चा अजुन
उत्तम चर्चा आहे, सहकारी
कोणी मिपाकर
करा यशस्वीपणे "ऍग्रीकल्चर एक्स्पोर्ट'
- Thursday, June 23, 2016 AT 05:45 AM (IST) Tags: pune, maharashtra, agro शनिवारपासून सातदिवसांचा सर्टिफिकेट कोर्स पुणे - भारतीय द्राक्षांनी मागील काही वर्षांचे रेकॉर्ड मोडत निर्यातीचा उच्चांक गाठला. त्यामुळे सौदी अरेबिया, युरोपबरोबरच आता कॅनडाची दारेही द्राक्षांना खुली झाली आहेत. द्राक्षाबरोबरच भारतीय डाळिंब आणि आंबा परदेशी बाजारपेठेत स्थान निर्माण करत आहे. भाजीपाल्यातही दूधी भोपळा, कारली, मिरची, भेंडी इ. तर गुलाबासारख्या फुलांची देशातून मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. संधी अमाप असूनही त्यामानाने निर्यातदार खूपच कमी असल्याचे चित्र आहे. वाढत्या डॉलरमुळे अधिक दर मिळाल्याने कृषी निर्यातीत अधिकाधिक संधी निर्माण होत आहेत. या संधींची व निर्यात व्यवस्थापनाची इत्यंभूत माहिती करून देणारे सातदिवसीय प्रगत प्रमाणपत्र प्रशिक्षण "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'च्या वतीने 25 जूनपासून आयोजिले आहे. यात यशस्वी शेतीमाल निर्यातदार कसे व्हायचे, निर्यातीत असलेल्या संधी, कोणत्या देशांत कुठल्या शेतीमालाला मागणी आहे, निर्यात कशी करावी, करारशेती, निर्यात सर्टिफिकेशन, इंटरनॅशनल पेमेंट टर्म, इन्कोटर्म, आयातदार कसे शोधावे, बॅंक ट्रान्झॅक्शन, निर्यात विमा, निर्यातीत येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण, बॅंक फायनान्स, एक्सपोर्ट बिझनेस प्लॅन स्वतः कसा बनवावा, प्रोजेक्टची तयारी, यशस्वी निर्यातदार कसे व्हावे इ. विषयी मार्गदर्शन होईल. तसेच निर्यात कंपनीला भेटीचे आयोजन आहे. प्रशिक्षण सशुल्क आहे. आगाऊ नावनोंदणी आवश्यक आहे. संपर्क - 8605699007 या विषयांवर होणार मार्गदर्शन - - ग्लोबल गॅप, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र कसे मिळवावे - देशनिहाय निर्यातीचे निकष - निर्यात सर्टिफिकेशन - क्वालिटी पॅरामीटर्स, क्वारंटाइन, - किमान कीडनाशक अंशमर्यादा (एमआरएल) - रेसिड्यू मॉनिटरिंग सिस्टिमफारच स्तुत्य माहिती आहे नाखु!
शेतमालाची थेट विक्री करीत नाशिकच्या शेतकऱ्यांचे ‘बंद’ला प्रत्युत