एवढीशी गोष्ट
आज शेजारच्या घरातून सकाळी सकाळी जोर जोरात भांडी वाजल्याचा आवाज आला. आमच्या शेजारी एक सुखवस्तू आणि गोड कुटुंब रहाते. सासू मुलगा सून आणि त्यांची दोन लहान मुले. एकूण च एक मेकांना धरून आणि सांभाळून असतात. म्हणून च मला जर आश्चर्य वाटले. आमची ही आणि ती सून दोघी एकाच ऑफिस मध्ये आहेत - साहजिकच मला संध्याकाळी सगळा रिपोर्ट मिळाला.
सुनेची बाजू - "अहो मी अक्खे घर ह्यांच्या ताब्यात दिले आहे. एकही गोष्टी मध्ये मी लुडबुड करत नाही कि हक्क गाजवत नाही. रोजची भाजी काय करायची हे देखील त्याच ठरवतात. त्यांची मदत तर मला खूप च होते आणि मी ते प्रत्येक वेळेस सर्वांना सांगत असतेच अभिमानाने. पण माझ्या दोन च साध्या अपेक्षा आहेत कि माझ्या हि आवडीच्या भाज्या केल्या जाव्या. महत्वाचे म्हणजे पहाटे चे जे १-२ तास असतात त्यात घरात शांतता असावी कारण मला शांत झोप फार प्रिय आहे. पण नेमके सकाळी ५:३० झाले रे झाले कि ह्यांचे किचेन मध्ये खुडबुड चालू होते आणि स्पष्ट च सांगायचे तर आदाळ आपाट चालू. मुद्दाम करतात म्हणावे तर तसा त्यांचा स्वभाव नाही. एक दोन वेळा सांगून पण बघितले कि सकाळी नको किचेन मध्ये आवाज पण काही फरक नाही. सात ला स्वयपाक वाली बाई येते ती करेल सगळे. पण एक नाही आणि दोन नाही. म्हणून आज जर माझे जरा डोके सटकले. नवर्याला सांगितले आहे कि मला इअर प्लग आणून दे नाहीतर मी वेडी होईन हो. दिवस भर ऑफिस मध्ये काम करायचे आणि रात्री जरा शांत झोप लागावी तर आवाज चालू. मला नाही हे सहन होत. साधा उपमा करायला घेतात आणि चमचा किव्वा झारा एक २० वेळा तरी कढाई वर आपटतात. सकाळ च्या वेळेस ह्याचा फार त्रास होतो. ओवन चे दार पण धण धण आपाटतात. मग माझा अक्खा दिवस खराब जातो हो. कामा वर पण परिणाम होतो."
वीकेंड ला आमची ही आणि त्या सासूबाई गीता वाचनाला भेटतात म्हणून त्यांची पण बाजू कळली
सासू ची बाजू - "एकही गोष्टी ची मदत म्हणून नाही. मी आहे म्हणून ह्यांचे घर चालते आहे. मग ठरवली मी रोज ची भाजी तर काय हरकत आहे. मला आज काल लवकर जाग येते. पूर्वी स्वयपाक मी करायची पण हिने बाई लावून टाकली का तर आवाज येतो पहाटे पहाटे फार. मग आता मी त्या बाई साठी कणिक काढून ठेवते, ह्यांना नाश्ता बनवते तर आवाज होणार च न. मला मान्य आहे कि तिला ऑफिस आहे आणि मला दुपारी एक डुलकी काढता येते घरी असल्या मुळे. पण मग सकाळी उठल्यावर काय नुसती हाताची घडी घालून बसून राहायचे?
हे सगळे ऐकून प्रथम तर मला हुश्श झाले कि काही मेजर भांडण नाही आहे. मग मी विचार करू लागलो. एक माजी जेलर असल्यामुळे मला माहिती आहे कि माणसाला झोप किती महत्वाची आहे. कैद्यांकडून कबुली घ्यायची असल्यास सोपी पद्धत म्हणजे त्याला झोपून च द्यायचे नाही. पूर्ण पणे मान्य केले जातात गुन्हे लगेच. आणि हि तर साधी सरळ सामान्य बाई.
मग माझ्या बायको ने एकदा गीता वाचन करताना एक कल्पना काढली कि आपण सगळ्यांनी सकाळचा हास्य क्लब चालू करू या. सासू बाई त्या निमित्ताने सकाळी सकाळी खाली जावू लागल्या आणि सुने ला तिचा महत्वाचा एक तास झोप मिळू लागली.
आणि थोडे च दिवसात ते घर पुन्हा हसू खेळू लागले.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपाकर ह्या संधीचे सोने करतील
संवादाचा अभाव. आणि काही
छान लिहिंलं आहे.
शेवट सोडून सगळा लेख पटला !
तुमचापण पैलाच लेख आहे असं
छान लिहिले आहे
लेख छानच.
एक माजी जेलर असल्यामुळे----- तुमचे जेलर पदावरील अनुभव वाचायला आवडतील .हेच म्हणायचे आहे.वाटते तेवढे सौपे नाही, सासू
हास्य क्लब हा तात्पुरता इलाज
इयर प्लग येतायत की... (
हे सारे उपाय वरवरची मलमपट्टी
हेच म्हणायचे होते..
परस्पर संवादाने कितीहि जटिल
दवणीय साहित्यिक प्रतिसादाचे
नाही. व्यक्तिमत्व मानसशास्त्र
कहाणी घर घर की. पुढील
छान लिहिलंय।
बेक्कार मानसिक त्रास.
खरंय आजच्या सासवा
पुर्वी दुरदर्शनवर
:)
सुनेची भूमिका निशिगंधा वाडने केली होती.
चारठाव आयते खायला मिळते आहे,
ही बहुधा
दोन्ही
हम्म!