✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एवढीशी गोष्ट

A
abhajoshi14 यांनी
Fri, 05/20/2016 - 16:36  ·  लेख
लेख
आज शेजारच्या घरातून सकाळी सकाळी जोर जोरात भांडी वाजल्याचा आवाज आला. आमच्या शेजारी एक सुखवस्तू आणि गोड कुटुंब रहाते. सासू मुलगा सून आणि त्यांची दोन लहान मुले. एकूण च एक मेकांना धरून आणि सांभाळून असतात. म्हणून च मला जर आश्चर्य वाटले. आमची ही आणि ती सून दोघी एकाच ऑफिस मध्ये आहेत - साहजिकच मला संध्याकाळी सगळा रिपोर्ट मिळाला. सुनेची बाजू - "अहो मी अक्खे घर ह्यांच्या ताब्यात दिले आहे. एकही गोष्टी मध्ये मी लुडबुड करत नाही कि हक्क गाजवत नाही. रोजची भाजी काय करायची हे देखील त्याच ठरवतात. त्यांची मदत तर मला खूप च होते आणि मी ते प्रत्येक वेळेस सर्वांना सांगत असतेच अभिमानाने. पण माझ्या दोन च साध्या अपेक्षा आहेत कि माझ्या हि आवडीच्या भाज्या केल्या जाव्या. महत्वाचे म्हणजे पहाटे चे जे १-२ तास असतात त्यात घरात शांतता असावी कारण मला शांत झोप फार प्रिय आहे. पण नेमके सकाळी ५:३० झाले रे झाले कि ह्यांचे किचेन मध्ये खुडबुड चालू होते आणि स्पष्ट च सांगायचे तर आदाळ आपाट चालू. मुद्दाम करतात म्हणावे तर तसा त्यांचा स्वभाव नाही. एक दोन वेळा सांगून पण बघितले कि सकाळी नको किचेन मध्ये आवाज पण काही फरक नाही. सात ला स्वयपाक वाली बाई येते ती करेल सगळे. पण एक नाही आणि दोन नाही. म्हणून आज जर माझे जरा डोके सटकले. नवर्याला सांगितले आहे कि मला इअर प्लग आणून दे नाहीतर मी वेडी होईन हो. दिवस भर ऑफिस मध्ये काम करायचे आणि रात्री जरा शांत झोप लागावी तर आवाज चालू. मला नाही हे सहन होत. साधा उपमा करायला घेतात आणि चमचा किव्वा झारा एक २० वेळा तरी कढाई वर आपटतात. सकाळ च्या वेळेस ह्याचा फार त्रास होतो. ओवन चे दार पण धण धण आपाटतात. मग माझा अक्खा दिवस खराब जातो हो. कामा वर पण परिणाम होतो." वीकेंड ला आमची ही आणि त्या सासूबाई गीता वाचनाला भेटतात म्हणून त्यांची पण बाजू कळली सासू ची बाजू - "एकही गोष्टी ची मदत म्हणून नाही. मी आहे म्हणून ह्यांचे घर चालते आहे. मग ठरवली मी रोज ची भाजी तर काय हरकत आहे. मला आज काल लवकर जाग येते. पूर्वी स्वयपाक मी करायची पण हिने बाई लावून टाकली का तर आवाज येतो पहाटे पहाटे फार. मग आता मी त्या बाई साठी कणिक काढून ठेवते, ह्यांना नाश्ता बनवते तर आवाज होणार च न. मला मान्य आहे कि तिला ऑफिस आहे आणि मला दुपारी एक डुलकी काढता येते घरी असल्या मुळे. पण मग सकाळी उठल्यावर काय नुसती हाताची घडी घालून बसून राहायचे? हे सगळे ऐकून प्रथम तर मला हुश्श झाले कि काही मेजर भांडण नाही आहे. मग मी विचार करू लागलो. एक माजी जेलर असल्यामुळे मला माहिती आहे कि माणसाला झोप किती महत्वाची आहे. कैद्यांकडून कबुली घ्यायची असल्यास सोपी पद्धत म्हणजे त्याला झोपून च द्यायचे नाही. पूर्ण पणे मान्य केले जातात गुन्हे लगेच. आणि हि तर साधी सरळ सामान्य बाई. मग माझ्या बायको ने एकदा गीता वाचन करताना एक कल्पना काढली कि आपण सगळ्यांनी सकाळचा हास्य क्लब चालू करू या. सासू बाई त्या निमित्ताने सकाळी सकाळी खाली जावू लागल्या आणि सुने ला तिचा महत्वाचा एक तास झोप मिळू लागली. आणि थोडे च दिवसात ते घर पुन्हा हसू खेळू लागले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
kathaa
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
6001 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

मिपाकर ह्या संधीचे सोने करतील

चिनार
Fri, 05/20/2016 - 16:56 नवीन
मिपाकर ह्या संधीचे सोने करतील ही अपेक्षा !!
  • Log in or register to post comments

संवादाचा अभाव. आणि काही

वेल्लाभट
Fri, 05/20/2016 - 17:22 नवीन
संवादाचा अभाव. आणि काही प्रमाणात अढी, ईगो, ताठा.
  • Log in or register to post comments

छान लिहिंलं आहे.

मराठी कथालेखक
Fri, 05/20/2016 - 17:39 नवीन
छान लिहिंलं आहे.
  • Log in or register to post comments

शेवट सोडून सगळा लेख पटला !

जव्हेरगंज
Fri, 05/20/2016 - 18:32 नवीन
शेवट सोडून सगळा लेख पटला ! कितीही गोग्गोड शेवट वाटला तरीही तो असाच झाला असेल असे वाटत नाही ! बादवे, मला त्या सासुबैचा राग आलाय !
  • Log in or register to post comments

तुमचापण पैलाच लेख आहे असं

जव्हेरगंज
Fri, 05/20/2016 - 18:35 नवीन
तुमचापण पैलाच लेख आहे असं दिसतंय ! ढिगभर लिहण्यापेक्षा मोजकं लिहणारे लेखक मला फार आवडतात ! शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

छान लिहिले आहे

सिरुसेरि
Fri, 05/20/2016 - 19:11 नवीन
छान लिहिले आहे . -----एक माजी जेलर असल्यामुळे----- तुमचे जेलर पदावरील अनुभव वाचायला आवडतील .
  • Log in or register to post comments

लेख छानच.

पद्मावति
Fri, 05/20/2016 - 21:23 नवीन
एक माजी जेलर असल्यामुळे----- तुमचे जेलर पदावरील अनुभव वाचायला आवडतील .हेच म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

वाटते तेवढे सौपे नाही, सासू

विवेकपटाईत
Fri, 05/20/2016 - 20:37 नवीन
वाटते तेवढे सौपे नाही, सासू सुनाचे वाद , पण मस्त गोष्ट
  • Log in or register to post comments

हास्य क्लब हा तात्पुरता इलाज

सतिश गावडे
Fri, 05/20/2016 - 21:36 नवीन
हास्य क्लब हा तात्पुरता इलाज आहे. नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर जर हास्य क्लब बंद झाला तर?
  • Log in or register to post comments

इयर प्लग येतायत की... (

संजय पाटिल
Sat, 05/21/2016 - 10:46 नवीन
इयर प्लग येतायत की... ( येतायत ना?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

हे सारे उपाय वरवरची मलमपट्टी

सतिश गावडे
Sat, 05/21/2016 - 11:05 नवीन
हे सारे उपाय वरवरची मलमपट्टी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

हेच म्हणायचे होते..

संजय पाटिल
Sat, 05/21/2016 - 13:47 नवीन
हेच म्हणायचे होते.. परस्पर संवादाने कितीहि जटिल समस्या सुटतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

परस्पर संवादाने कितीहि जटिल

सतिश गावडे
Sat, 05/21/2016 - 17:33 नवीन
परस्पर संवादाने कितीहि जटिल समस्या सुटतात..
होय. मात्र समोरच्या व्यक्तीच्या मनाची कवाडे संवादासाठी खुली असतीलच असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

दवणीय साहित्यिक प्रतिसादाचे

रमेश भिडे
Sat, 05/21/2016 - 17:35 नवीन
दवणीय साहित्यिक प्रतिसादाचे उदाहरण म्हणावे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

नाही. व्यक्तिमत्व मानसशास्त्र

सतिश गावडे
Sat, 05/21/2016 - 17:43 नवीन
नाही. व्यक्तिमत्व मानसशास्त्र समजून घेतलेला असल्याने दिलेला प्रतिसाद आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश भिडे

कहाणी घर घर की. पुढील

रातराणी
Fri, 05/20/2016 - 23:22 नवीन
कहाणी घर घर की. पुढील भागाच्या प्रतीक्षेत :)
  • Log in or register to post comments

छान लिहिलंय।

महामाया
Sat, 05/21/2016 - 06:29 नवीन
छान लिहिलंय।
  • Log in or register to post comments

बेक्कार मानसिक त्रास.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/21/2016 - 14:26 नवीन
अनुभव चांगला. आणि पर्यायही छानच पण, पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरुच होणार. खरंय आजच्या सासवा पूर्वीप्रमाणे त्रास देत नाही, छळ करीत नाही, खुप भांडनही करत नाहीत, पण, हा छळाचा नवा प्रकार नव्वदच्या दशकात आला असं वाटतं. सुनेला ऑफीसला जायचं असतं आणि या किचनमधे खुडबुड खुडबुड करतात. खरकटी भांडी गॅसच्या ओट्यावर ठेवतात, गॅसचा ओटा खराब करुन ठेवतात. चहाचे कप, इडल्या वगैरेचे भांडे सुद्धा उचलून ठेवत नाहीत. सासर्‍यांना चहा करुन देत नाहीत, स्वतःच सकाळी सकाळी भरपेट ताव मारतात. स्वतःपूरतेच करतात. नातवांवर तर अजिबात प्रेम नाही. स्वतःच्या मुली आल्या की सुनबै ऑफीसला गेल्या की काय काय करुन भरवतात विचारु नका. महिनाभरातलं सर्व सामानाची वाट आठ पंधरा दिवसात लागून जाते. बरं, मुलाला सांगांवं तर तू त्यांना समजून घेत जा. कधी चिडून बोलले तर डोळे मोठे करुन बोलतात, आपला दिवस खराब त्याचा दिवस खराब, ऑफीस मधून घरी आलो की दारात हे उदास चेहरे स्वागताला हजर, पुन्हा गॅसच्या ओट्यावर भांडी खरखटी पडलेली. घरात जायला नको वाटतं. कंटाळा आला या संसाराचा. अशा कथा हल्ली खुप ऐकायला मिळत आहेत. उपाय सांगूच शकत नै आपण. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खरंय आजच्या सासवा

कानडाऊ योगेशु
Sat, 05/21/2016 - 16:56 नवीन
खरंय आजच्या सासवा पूर्वीप्रमाणे त्रास देत नाही,.... ... कंटाळा आला या संसाराचा.
नक्की हे श्री.बिरुटेंनी लिहिले आहे कि सौ.बिरूटेंनी लिहुन घेतले आहे.! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुर्वी दुरदर्शनवर

सिरुसेरि
Sat, 05/21/2016 - 15:10 नवीन
पुर्वी दुरदर्शनवर 'मिट्टी के रंग' (?) सिरीअलमध्ये बघितलेली अशीच एक कथा आठवली - एक प्रथितयश लेखक पुढील लिखाणासाठी एका गावातील घरी जाउन राहतो . त्याला शेजारच्या घरातुन सासुचा सुनेवर सतत चालणारा आरडा ओरडा ऐकु येत असतो. तो लेखक त्या गरीब ,अभागी सुनेवर , तिच्या छळावर आपली पुढील कथा लिहितो. त्या गावातुन निघण्यापुर्वी तो सहज अंगणात जाउन शेजारील घराकडे बघतो , तेव्हा त्याला सासुच्या सुनेवर सतत रागावण्याचा उलगडा होतो . कारण ती सुन सतत सासुला वेडावुन दाखवत असते .त्यामुळे चिडुन सासु तिच्यावर सारखी ओरडत असते .
  • Log in or register to post comments

:)

पद्मावति
Sat, 05/21/2016 - 17:41 नवीन
मस्तं होती ती गोष्ट. मला वाटतं सुनेची भूमिका निशिगंधा वाडने केली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

सुनेची भूमिका निशिगंधा वाडने केली होती.

सिरुसेरि
Sat, 05/21/2016 - 21:02 नवीन
हो . आणी आलोकनाथ लेखक होता .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति

चारठाव आयते खायला मिळते आहे,

मृत्युन्जय
Sat, 05/21/2016 - 15:26 नवीन
चारठाव आयते खायला मिळते आहे, निवांत लोळत बसता येते आहे, चहा नाष्टा दुसरेच कोणी करते शिवाय स्वयंपाकाला बाई. एवढी ऐष असुनही एवढ्या फालतू कारणांसाठी तोंड वाकडे असणार्‍या लोकांचा (बायकांचाच असे नाही. एकुणच सगळ्यांचा) खुप त्रास होतो. बॅडरुममच्येच गॅस ठेवला आहे का सकाळी सकाळी त्या बाईला इतका त्रास होतो ते. बिचारी सासू नाष्ट करते लव्कर उठुन आणि यांना आयता गिळायला मिळते आहे तर त्यातही रडतात लोक च्यायला.
  • Log in or register to post comments

ही बहुधा

नाखु
Sat, 05/21/2016 - 16:50 नवीन
डबल ढोलकी असा प्रकार (बहुतेक वेळा) असतो (काही स्न्माननीय अपवाद असतीलही) सा.बा.१: स्वयंपाक घरात येऊ दिले नाही की सगळीकडे तक्रार मला अजिबात स्वयंपाक्घरात मनासार्खे (राज्य) नाही सा.बा.शेजारीण तीही सा.बा.च: मला मेलीला स्वतःचा चहा, यांचा चहा स्वतः करून घ्यायला लागतो (खरी मेख अशी की कसाही केला तरी सुनेने केलाय म्हणून सतत नाव ठेवत असल्याने तिनेच साम्गीतलेले असे अस्ते किंवा यांनीच कधी तोर्यात माझा मी करून घेते असे म्हटलेले असते.) परिणाम दोन्ही सा.बा. दु:खी. सुर्दैवाने पुरुष संसार निव्रुत्तीनंतर वाचन-फिरणे (पक्षी चकाट्या),गेला बाजार बँक बाजार हाट यात मन रमवतात असलीच ईच्छा/ऐपत तर व्य्ख्यानमाला/कारेक्रमांना जातात, आणि त्यावेळेला घरी साबांच्या मैतरेणी येवून आप्लया घर्ची धुणी धूत असतात.त्याने कुणाचेच कपडे कधीही साफ रहात नाहीत हेच खरे. उमेदीच्या काळात आवडीने आणि सव्डीने एखादा छंद्/कला लावून घेत्ल्या स्त्रीयांना संसार निव्रुत्ती फार क्लेशदायक होत नाही. हे अनुमान नव्हे आणि फक्त मत आहे आणि लगेच भांडायला येऊ नये. सन्मानीय अप्वादींनी हलके घेणे. वाचक नाखु
  • Log in or register to post comments

दोन्ही

इरसाल
Sat, 05/21/2016 - 17:23 नवीन
पार्ट्या आपापल्या जागी योग्य आहेत.पण........... पुर्वापार चालत आलेले हे सख्य असेच चालु रहावे व यांच्यात नेहमी कडाक्याचे प्रेमळ बोलचाल होत रहावी हीच इच्छा (तप्पु पण)
  • Log in or register to post comments

हम्म!

अजया
Sat, 05/21/2016 - 17:30 नवीन
आयतं खायला मिळालं तर मी सगळे आवाज कानाआड करायला तयार आहे.इकडे या हो साबा ;)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा