संघाने मला काय दिले?
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली.
त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली.
यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !"
बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !"
ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली.
आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?"
हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की !
एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली,
"हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा
सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी संघात असताना एकदा ब्राह्मण
चंमु साहेब, खूप सरसकटीकरण
डॉक्टर माझा अनुभव लिहिणे ही
सर तुम्हाला
त्या ब्राह्मण कुटुंबाची
..
पाठ्यपुस्तके वाचुन पोरे
त्यांना काय म्हणायचं नसतं ,
.
कृपया कोणती संघ गाणी सांगू
चंद्रनील साहेब,
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
+१
+१
+१०००
नेपाळ भूकंपाच्या वेळी सुद्धा
साहेब, धाग्याची विषय वस्तू
मी १००%
...
आपत्तीच्या काळात अनेक व्यक्ती
+१
सहमत खरेजी,
डाॅक्टरांचा प्रतिसाद वाचून
मुलाने तुमच बौध्दिक वगैरे तर घेतल नाही ?
गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली.प्रकरण फार गंभीर झालेल दिसतय गोळवलकर गुरुजींची पुस्तके तर नाहीत ना त्या यादीत ? मनुस्मृती वगैरे विषय इ.इ.मनुस्मृती गोळवलकर गुरुजींनी
अप्पा मी जे काही बोललो तुम्ही
मला तुमच्याशी काही एक
टिंगल टवाळी किंवा मस्करीयुक्त
मीदेखील तुमचा पंखा होतो आहे,
साहेब, धाग्याची विषय वस्तू
तुम्हाला वाईट अनुभव आले की ते
बदला आता जरा प्रतिसाद.
+१
बेसिक फरक आहे
संघावर टीका करणे ही फ्याशन
भूकंप , त्सुनामी यासार्ख्या
ग्लोरिफिकेशन ???? खिक्क !
ग्लोरिफिकेशन! संघाला गरज
गरज नाहीच .. पण भक्तांना चैन
संघावर टीका करणे ही फ्याशन
संघावर टीका करणे ही फ्याशन
संघ नि:स्वार्थी सघटना आहे आणि
+1
डॉ. खरे साहेबांशी १००% सहमत
कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष
हे "विद्यार्थी लभते विद्या
Appraisal
कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष
हे सारे बदल किती दिवस टिकतील
संघात जात थेट विचारली जात