Skip to main content

संघाने मला काय दिले?

लेखक रमेश भिडे यांनी गुरुवार, 12/05/2016 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली. त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली. यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !" बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !" ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?" हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली, "हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.

वाचने 34072
प्रतिक्रिया 221

प्रतिक्रिया

गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. प्रकरण फार गंभीर झालेल दिसतय गोळवलकर गुरुजींची पुस्तके तर नाहीत ना त्या यादीत ? मनुस्मृती वगैरे विषय इ.इ.

अप्पा मी जे काही बोललो तुम्ही त्याच धाटणी वर बोलताय असे दिसते, जर आपणांस काही प्रॉब्लम असता/आहे तर आपण थेट मला विचारलेले श्रेयस्कर कसे? उगाच पेड़गाव ट्रिप कश्याला , ओके म्हणून नंतर ते प्रतिसाद वापरणे बरे दिसत नाही. असो. तुमचे तुमच्यापाशी, मी थेट बोलतो म्हणून विचारतो आहे हे असले प्रकार जमत नाहीत मला तरी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मला तुमच्याशी काही एक प्रोब्लेम नाही. किंबहुना 'अकादमी' आणि 'एका ढिशक्यांवची कहाणी' वाचल्यापासून मी तुमचा निस्सीम 'पंखा' आहे आणि राहणार. ओके म्हणून नंतर ते प्रतिसाद वापरणे बरे दिसत नाही. धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे हे माझ्याकडून दुर्लक्षित झाले. तुम्ही ते लक्षात आणुन दिले त्याबद्दल आभारी आहे. आणि म्हणूनच 'ओके' लिहिले. बाकी इथे टिंगल टवाळी, तिरके प्रतिसाद असे प्रकार चालतातच. मी तुमचा 'पंखा' आहे म्हणून तुम्ही लिहाल ते सगळेच गोड मानून घेणे किंवा +१ करणे मला जमणार नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

टिंगल टवाळी किंवा मस्करीयुक्त तिरके कळतात मला . असो बाकी माझे पंखे व्हा किंवा माझ्या म्हणण्याला +१ करा अश्या अक्षता मी कधीच कोणाला वाटलेल्या नाहीत, गैरसमज नसावा. जे आहे ते समोरासमोर , विचार पटत नसले अन तसे तोंडावर सांगितलेले चालते, नथीतुन तीर मारणे होत ही नाही अन रुचत पण नाही . आभारी आहे _/\_

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मीदेखील तुमचा पंखा होतो आहे, मंजुरी द्या. असा अर्ज खरडला नाही. अर्थातच तुमचा 'पंखा' होणे/न होणे हे तुमच्या इच्छेवर अवलंबून नाही. असो.मंडळ आभारी आहे.

साहेब, धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे त्यामुळे 'वैयक्तिक अनुभव' या नावाखाली काहीही ठोकून द्यावे असा प्रकार आहे. हे धागा लेखकाला सुद्धा लागु असेल का असा प्रश्न पडला आहे! की विरोधी काही बोलले की "वैयक्तिक अनुभव" अवतरणात टाकून गोग्गोड तितके वैलिड मानायचे हा एजेंडा आहे ते कळेना झालंय बरंका अप्पा

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

तुम्हाला वाईट अनुभव आले की ते लोक संघाचे नसतातच मुळी. चांगले अनुभव आले तर ते लोक संघाचेच असतात. हा फॉर्मुला आहे बापुसाहेब. तुम्ही संघात जाउन तुम्हाला कळला नाही असे म्हणत असाल तर तुम्ही संघात कधी गेलेच नाही असा दावा मी धारिष्ट्याने करेन.

In reply to by तर्राट जोकर

बाकी संघ आणि भाजप म्हटल्यावर तुम्ही कसे नसणार तिथे? पण आता जरा नवीन मुद्दे आणा हो. तेच तेच मुद्दे आणि तेच प्रतिवाद वाचून कंटाळा आला. प्रत्येक सर्कशीत जोकरने त्याच कोलांट्या उड्या मारल्या तर हसू येईनासं होतं. नवीन आयटेम दाखवा.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

मूळ लेखकाने संघाच्या शिबिरात त्यांच्या मुलाला संघाबद्दल आलेला अनुभव, त्यामुळे लेखकाला स्वतःला मुलात दिसलेला फरक लिहिलाय. तर चंमुंनी त्यांना स्वतःला कोणा एका व्यक्तीचा आलेला अनुभव लिहिलाय. आणि चंमुंच्या म्हणण्याप्रमाणे ती दुसरी व्यक्ती ब्राम्हण असून त्यांच्या गेल्या ३ पिढ्या संघाशी संबंधीत होत्या. याचा काही पुरावा आहे का? आता सिद्धच करायचं म्हणलं तर संघाच्या विरोधकांना एखाद्या शिबिरात जाउन शहानिशा करता येईल. चंमुंनी त्या "संघिष्ठ ब्राह्मणाच्या" वागण्याचा पुरावा द्यावा. विषय मिटेल.

संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. ता क - मी संघाचा सदस्य नाही तरिहि मी वरील बाबींशी १००% सहमत आहे.

In reply to by शान्तिप्रिय

भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते.
असे संघकार्याचे ग्लोरिफिकेशन करण्याचीपण 'फ्याशन' आहे असे दिसते.

संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. ता क - मी संघाचा सदस्य नाही तरिहि मी वरील बाबींशी १००% सहमत आहे.

संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. >> आजकाल कुणावरही टिका करणे हीच फ्याशन झाली आहे संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. >> अगदी अगदी. दुसरं कोणंच नाही जगात. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. >> अगदी अगदी. दुसरं कोणंच नाही जगात. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. >> महात्मा गांधी??? सिरियसली??? कट्टर संघभक्त आणि कट्टर गांधीद्वेष्टे असे दोन्ही एकाच वेळेस असलेले एक मिपासदस्य आहेत, सदर वाक्याची त्यांचे कडून पावती घ्यायला लागेल. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. >> मग कशासाठी चाललंय तर?

In reply to by तर्राट जोकर

संघ नि:स्वार्थी सघटना आहे आणि त्यांची स्वयंसेवा उल्लेखनीय आहे असे म्हणताना इतर कोणीही तसे नाही असे कुठे लिहिलेले मला दिसत नाही. हे म्हणजे अक्षय कुमार अतिशय उत्तम कलाकार आहे असे म्हटल्यावर त्याचा अर्थ इतर कुणीही उत्तम कलाकार नाही असा होत नाही. की तुम्हाला संघ आवडत नाही म्हणुन इतर कुणी त्यांच्या चांगल्या कामाची स्तुती करुच नये? की असा काही नियम आहे की एकाची स्तुती करताना त्या क्याटेगरीतल्या इतर सगळ्यांची स्तुती कंपल्सरी केलीच पाहिजे अन्यथा तो फाउल असतो. उगा कशाला त्रागा करुन घेताय?

कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष संबंधित राहिला तर त्याच्या विचारात निश्चित परिवर्तन होते. संघात जाणार कधीच बेरोजगार राहत नाही. दुकानदार असेल तर त्याचे दुकान चांगले चालेले. आमच्या गल्लीत एक पटरीवर भाजी लाव्नार्याचे घर आहे. तो रोज शाखेत जातो. जिथे त्याच्या सोबतीचे भाजीवाले दिवसाला ४००-५०० कमवत असेल त्याची कमाई त्यांच्या पेक्षा दुप्पट आहे. (कारण चांगले बोलणे, व्यवहार इत्यादी बाबी न कळत शिकल्या जातात). बाकी कोणी असत्य आरोप लावणारे असतील तर त्याला काहीच करता येत नाही.

कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष संबंधित राहिला तर त्याच्या विचारात निश्चित परिवर्तन होते. संघात जाणार कधीच बेरोजगार राहत नाही. दुकानदार असेल तर त्याचे दुकान चांगले चालेले. आमच्या गल्लीत एक पटरीवर भाजी लाव्नार्याचे घर आहे. तो रोज शाखेत जातो. जिथे त्याच्या सोबतीचे भाजीवाले दिवसाला ४००-५०० कमवत असेल त्याची कमाई त्यांच्या पेक्षा दुप्पट आहे. (कारण चांगले बोलणे, व्यवहार इत्यादी बाबी न कळत शिकल्या जातात). बाकी कोणी असत्य आरोप लावणारे असतील तर त्याला काहीच करता येत नाही.

हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! हे उद्गार एका प्रामाणिक बापाचे आहेत असे जाणवले. बाकी संघावर केवळ टीका करणाऱ्याच्या उद्देशाने लिहिणाऱ्या लोकांचे मन बदलणे त्यांना स्वतःलाच शक्य आहे इतर कोणालाही नाही. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा कृ सोमण यांचे उद्गार आजही आठवतात. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही पण "दुराग्रहा"चा जरूर होतो असो.

संघात जात थेट विचारली जात नाही हे खरं आहे. आता तर फार विषय देखील निघत नाही. पूर्वी संघिष्ट म्हणजे ब्राह्मणी तोंडवळा असलेली संघटना असा विषय असताना संघ स्वयंसेवकांच्या घराचे जुने सदस्य जे थोडे कर्मठ होते ते त्यांच्या मानसिकतेनुसार असले प्रश्न विचारायचे. मात्र काही काळानंतर ती पिढी इन जनरल च संपल्यानंतर असे अनुभव दिसत नाहीत. यात संघाच्या हिंदू संघटन आणि संवर्धन या विचाराचा मोठा सहभाग असावा असं वाटतंय.

संघाच्याच एका कार्यक्रमात जेवनावळ घातली गेली,त्या जेवनावळीत दलीतांसाठी वेगळी पंगत होती.दस्तुरखुद्द उमा भारती यांना त्या चर्मकार समाजाच्या आहेत म्हणुन दलितांच्या पंगतीत बसवण्यात आले ,हे एका इंटर्व्युमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकले आहे.इतक्या मोठ्या नेत्याला जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सापत्न वागणुक मिळत असेल तर मला आलेल्या अनुभवावर बोट ठेऊन मला खोटं पाडणार्यांची किव करावीशीही वाटत नाही.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

मुल्हेरकर साहेब, तुम्ही म्हणताय तसा काही कार्यक्रम जरी झालेला असला तरी तो संघाचा असेल असं मला अजिबात वाटत नाही. असो. आपण माझ्या वरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. मला सांगा आपण संघावर जातीयतेचा आरोप करत आहात, तर मग आपण ज्या फुले-आंबेडकरांचा वारसा सांगणार्या सर्वसमावेशक संस्था संघटनेचे समर्थन करता त्यातलं कोणीच जातीयवाद पाळत नाहीत का?

In reply to by हकु

त्यातलं कोणीच जातियवाद पाळत नाही,हे मी अनुभवाने सांगत आहे.मी गेली विस वर्ष परिवर्तनवादी संघटनेत आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

आणि अजूनही ब्राम्हण-ब्राम्हणेतर भेद पाळता? वीस वर्षे वाया गेली हो!

In reply to by विकास

टंकनचुकी दुरुस्त करून घ्या त्यांची वीस वर्षे ऐवजी

विर्से

असे वाचा आणि पुढच्या हेरकथेला हात घाला. तुम्हाला इथ गुंतवून ठेऊन आम्हाला मालिकेच्या भागास विलंब करण्याचा अंतस्थ हेतु आम्हा वाचकांनीच ओळखला पाहिजे हा जनमताचा रेटा आहे असे समजलयास आमची त्या समजण्यास हरकत नाही असा आम्ही निर्वाळा देतो. वरील ठळक शब्द आणि काल मनोबाशी झालेली भेट हे निव्वळ योगायोग आहे (शब्द श्रेय मनोबा)

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

संघाच्याच एका कार्यक्रमात जेवनावळ घातली गेली,त्या जेवनावळीत दलीतांसाठी वेगळी पंगत होती.दस्तुरखुद्द उमा भारती यांना त्या चर्मकार समाजाच्या आहेत म्हणुन दलितांच्या पंगतीत बसवण्यात आले ,हे एका इंटर्व्युमध्ये त्यांच्याच तोंडून ऐकले आहे.इतक्या मोठ्या नेत्याला जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सापत्न वागणुक मिळत असेल तर मला आलेल्या अनुभवावर बोट ठेऊन मला खोटं पाडणार्यांची किव करावीशीही वाटत नाही.
उमा भारती लोध या जातीच्या आहेत. लोध म्हणजे चर्मकार नाहीत. वरील प्रतिसाद वाचून एका महान सदस्याने लिहिलेला "गोंदवल्याला जेवायला बसताना पुरूषांना उघडे बसायला सांगतात कारण त्यांना कोण जानवेधारी आहे व कोण नाही हे बघायचे असते. नंतर तिथे आंदोलन करून हा प्रकार बंद पाडण्यात आला." या धडधडीत खोट्या व जातीयवादी प्रतिसादाची आठवण झाली. या प्रतिसादातून सदस्याचाही अंदाज आला. आजवर 'नाना'रूपे घेऊन वावरलेल्या या सदस्याला स्वतःला लपविणे अशक्य आहे.

In reply to by श्रीगुरुजी

या प्रतिसादातून सदस्याचाही अंदाज आला. आजवर 'नाना'रूपे घेऊन वावरलेल्या या सदस्याला स्वतःला लपविणे अशक्य आहे.
तर... श्रीगुरुजी, जसे हॉलीवूडपटात घोस्टहंटर, विचहंटर किंवा भेडियाला शोधून मारणारे असतात (पहा: van helsing )... अगदी तसेच, आपण मिपावरचे नानाहंटर आहात. मिपावरील नाना प्रकारचे नाना शोधून त्यांचा उचात्तन करणे हाच आपल्या अवतार कार्याचा उद्देश आहे, असे समजतो... आणि समस्त मिपा वासियांना विंनती करतो कि, श्रीगुरुजी यांना नानाहंटर उपाधी देवून सन्मानित करण्यात यावे. एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद जय महालास्ट...

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

चंद्र्निल साहेब आपलं चक्क खोटे बोलत आहत. अपन कधीच संघाच्या पंगतीत जेवायला बसले नसल. बाकी उमा भारती लोध राजपूत आहेत. केंव्हा ही देशात कुठे ही संघाच्या पंगतीत जेवायला बसा. सत्य आपसूक उमगेल.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

तुमची काहीही मते असोत संघाबद्दल, आदरच आहे त्याचा. पण तुम्ही हे जे सांगत आहात ते १०००००००% खोट आणि फक्त खोटच आहे. जर उमा भारती तसे म्हणल्या असतील तर आजच्या मीडिया युगात ते नक्कीच खोदुन काढता येईल. आपण जरूर लिंक द्यावी, मी (तुम्ही खोटे बोलत आहात हे) माझे मत बदलेन. तुम्हाला संघ आवडत नाही, त्याला नावे ठेवाविशी वाटतात, मान्य. तुमचे काही कडवट अनुभवहि असु शकतील त्यामुळे तुमचं मत तसं बनले असावे. पण हे तर तुम्ही पहिले मत बनवुन कडवट अनुभव शोधत (रचत) आहात !!! अगदीच दयनीय धडपड आहे ही !! तुम्ही टीका करा, नावे जरुर ठेवा. पण जेव्हा खोट्या कुबड्यांचा आसरा लागतो तेव्हा ही धडपड फारच हास्यास्पद वाटते बे.त. तळटीप - मी स्वतः संघाशी कुठल्याहि प्रकारे संलग्न नाही, मला संघाचे फार प्रेमहि नाही. पण म्हणुन मी संघ किंवा संघी लोकांचा (गोष्टी रचुन) द्वेश करत (आणि पसरवतहि) नाही

In reply to by बेकार तरुण

तुमची काहीही मते असोत संघाबद्दल, आदरच आहे त्याचा. पण तुम्ही हे जे सांगत आहात ते १०००००००% खोट आणि फक्त खोटच आहे. जर उमा भारती तसे म्हणल्या असतील तर आजच्या मीडिया युगात ते नक्कीच खोदुन काढता येईल. आपण जरूर लिंक द्यावी, मी (तुम्ही खोटे बोलत आहात हे) माझे मत बदलेन.
अहो खोटंच आहे ते. हे चंद्रनील मुल्हेरकर म्हणजे पूर्वाश्रमीचे ग्रेटथिन्कर, ग्रेटथिंकर, टॉपगिअर्ड फिलोसोफर, सचीन, माईसाहेब फुसकुलीकर, नानासाहेब नेफळे, काकासाहेब केंजळे .... अशा अनेक डु आयड्यांचे धनी आहेत. ते ब्रिगेडी विचारांचे असून सुरवातीपासूनच ब्राह्मणद्वेषी व संघद्वेषी आहेत. संघ व ब्राह्मणांवर धडधडीत खोटे आरोप करणे हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. यापूर्वी अनेकवेळा त्यांनी ब्राह्मण व संघावर खोटे आरोप केले आहेत (अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे एका धाग्यात त्यांनी गोंदवले या देवस्थानाबद्दल गरळ ओकली होती). सध्या ते चंद्रनील मुल्हेरकर व पिंपळगावचा पिराजी हे दोन आयडी घेऊन मिपावर वावरतात. माईसाहेब या आयडीने ते स्त्रीरूपातही वावरतात. त्यांचे अनेक निद्रिस्त आयडी असतात. जसे अतिरेक्यांचे स्लीपर सेल्स असतात तसेच यांनी अनेक निद्रिस्त आयडी निर्माण करून ठेवले आहेत. एक आयडी डिलीट झाला की यांचा एखादा निद्रिस्त आयडी जागा होतो.

१-मुस्लिम २-ख्रिश्चन ३-कम्युनिस्ट्स गोळवलकर गुरुजी इतक्या स्पष्टतेने हे तीन धोके कसे आहेत ते सांगतात त्यावर उपाययोजना सुचवितात. तरीही संघ कम्युनल नाही हे ठामपणे संघ समर्थक म्हणतात तेव्हा त्यांनी बंच ऑफ थॉट्स वाचलेले नसते की वाचुन न वाचल्यासारखे ते करतात ?

In reply to by मारवा

संघ कम्युनल असण्याचा किंवा नसण्याचा वरच्या लेखाशी काय संबंध येतो हे समजले नाही. बाकी लेख संस्कारांबाबत आहे. संघ शब्द काढून एखादा उन्हाळी संस्कार वर्ग, शिबीर चालू शकलं असतं असं यांचं मत -माई

In reply to by मारवा

पण कम्युनिस्ट हे देशाला धोका आहेत याच्याशी हजार टक्के सहमत. आणि गोळवलकर गुरुजींनंतर बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. आपलं स्वतःचं लहानपणी जे मत असतं त्याबद्दल आता विचारलं तर चालेल का?

एक, संघाच्या विचारसरणीला तात्विक विरोध करणारे, आणि दोन, संघ ही संकल्पनाही सहन न होणारे. पहिल्या प्रकारच्या लोकांशी बातचीत शक्य आहे. त्यांचं 'संघ जातीयवादी, धर्मवादी असल्यामुळे संघाला विरोध' असं मत असतं आणि ते असण्याचा त्यांना अधिकार आहे. संघातल्या काही लोकांचा या लोकांना जातीयवादी आणि उद्वेगजनक अनुभव आलेला असू शकतो. मी त्यांना सांगू इच्छितो की संघ एक संघटना म्हणून अजिबात जातीयवादी नाही. एका पोलिस हवालदाराने तुमच्याकडून पैसे खाल्ले म्हणून संपूर्ण पोलिसखातं भ्रष्ट आहे हे म्हणणं जितकं सरसकट आहे, तितकंच हेही आहे. अशा लोकांचा जातीयवाद हा इतका त्यांच्या मनात भिनलेला आहे की संघही तो काढून टाकू शकलेला नाही असं म्हणू शकतो. आणि तसे लोक प्रत्येक पक्षात असतात. संभाजी ब्रिगेडला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा आहे पण राष्ट्रवादीला जातीयवादी म्हटलेलं पाहिलेलं नाही कुठेही. मग संघाला वेगळ्या फूटपट्ट्या का लावल्या जातात? असो. संघ आपल्या कामाचं glorification करतो असं काहींचं म्हणणं आहे. त्यात वाईट काय आहे? सर्व संघटना आपल्या कामाची प्रसिद्धी करतातच. त्यामध्ये वाईट काय आहे? जर तुमचा सामाजिक संघटनांनी in general स्वतःच्या कामाची प्रसिद्धी करण्याला विरोध असेल तर हेही समजू शकतो, पण जेव्हा हा विरोध फक्त संघाला दाखवला जातो तेव्हा तो पक्षपात आहे. उदाहरणार्थ वरती मुल्हेरकरांच्या प्रतिसादात संघटनेचा दाखवायचा हेतू एक आणि अंत:स्थ हेतू वेगळा असं म्हटलेलं आहे. हे जगातल्या प्रत्येक संघटनेला लागू पडतं. कुटुंब, कंपन्या, राजकीय पक्ष, अगदी मिसळपाव.काॅम सुद्धा. मग फक्त संघाला का बोलावं? पहिल्या प्रकारच्या लोकांशी बातचीत शक्य असते त्याचं अजून एक कारण म्हणजे ते असे मुद्दे मान्य करतात/करु शकतात आणि त्यावर चर्चा करतात आणि पराकोटीचे राजकीय मतभेद असले तरी त्याचा परिणाम इतर relations वर होऊ देत नाहीत. दुस-या प्रकारच्या लोकांशी चर्चा संभवतच नाही. त्यामुळे त्याबद्दल लिहिण्यात अर्थ नाही.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा उघड मुस्लिमविरोधी आहे हे नागडं सत्य आहे.त्यामुळे या संघटनेला " राष्ट्रीय" म्हणावं का ईथपासुनच सुरवात आहे.मुस्लिम ,ख्रिश्चन ,बौद्ध व दलित हिंदू यांना राष्ट्रीयत्वाच्या व्याख्येतून वगळणे ज्यांना मान्य आहे अश्या संघाला जनाधार का लाभला नाही हे उघड गुपीत आहे. हिंदूतल्या मागास जातींना मंडल आयोगातून आरक्षण मिळाले व काही प्रमाणात का होईना ते निर्णय प्रक्रीयेत आले .हे मागास हिंदू आंबेडकर फुल्यांच्या समतावादाच्या भुमिकेशी प्रामाणिक आहेत त्यामुळे ते " हिंदुत्वाकडे " कधीच वळणार नाहीत हे संघाला ठाउक आहे या ईतर मागस समाजाचे आरक्षण काढून त्यांना परत गुलामगीरीत ढकलणे घटनात्मदृष्ट्या अशक्य आहे .मग संघाने यांच्या आरक्षणातच घुसघोरी करण्याचा डाव आखला आहे .महाराष्ट्रात मराठा समाजाचे ओबिसीकरण करण्याचा जो घाट घातला जात आहे तो याचसाठी संभाजि ब्रिगेडला रसद नागपुरातून येते हे आता काही गुपित राहिलेले नाही.उत्तरेतही पटेल, जाट ,गुजर या उच्चवर्णीय जातींना ओबिसीत ढकलण्याचे प्रयत्न संघाकडून चालू आहेत.यातून त्यांना आंबेडकरवाद संपवायचा आहे व परत उच्च हिंदू जातीची संघाला अपेक्षीत " हिंदुत्वाची " पुनर्मांडणी करायची आहे.या पुनर्मांडणीत मुस्लिम,ख्रिश्चन,हिंदू दलित यांना कोणतेच स्थान नसेल हे उघड आहे.

In reply to by बोका-ए-आझम

जनाधार नाही तो व्यापक अर्थाने ,म्हणजे दलित हिंदू ,इतर मागस हिंदू यांच्यात.बाकी आपल्याला अपेक्षीत समाजरचनेची निर्मिती करण्यासाठी साम दाम दंड भेद वापरण्याएवढे उपद्रवमुल्य संघात आहे हे निश्चीत. महाराष्ट्रात आज भाजपची सत्ता असतानाही संभाजि ब्रिगेडवर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही,उलट देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचा ओबिसी मध्ये समावेश करणार यावर ठाम आहेत पण मुस्लिमांना आरक्षण देणार नाही असे सांगतात.यातून यांचा अश्या संघटनांशी असलेला नेक्सस कळुन येतो.मराठा आरक्षण ,जाट आरक्षण हे विषय संघाच्या डोक्यातून आलेले आहेत.या उपद्रवी लोकांना संघाची फुस आहे. संघाचा मोटो एकच आहे, दलित ,मागासवर्गीय,मुस्लिम यांना निर्णय प्रक्रीयेतून बाद करणे.त्यांचे खच्चीकरण करुण पुन्हा उच्चजातवर्गाची सत्ता स्थापण करणे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

१. भाजपची सत्ता असतानाही संभाजी ब्रिगेडवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.>>> काय केलंय ब्रिगेडने कारवाई करण्यासारखं? २.देवेंद्र फडणवीस मराठा समाजाचा आरक्षणात समावेश करणार यावर ठाम आहेत. पण मुस्लिमांना नाही >>> कारण आपल्या राज्यघटनेत धर्माधारित आरक्षणाची तरतूद नाही. अखंड आंध्रप्रदेशात हा प्रयत्न झाला होता. तिथल्या हायकोर्टाने तो रद्दबादल केला. अगदी याच कारणावरून. ३.मराठा आणि जाट आरक्षण हे विषय संघाच्याच डोक्यातून आलेले आहेत >>> मराठा आरक्षणाला तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री नारायण राणे या तिघांनी पाठिंबा दिला होता. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यांनी हा ठराव घाईघाईने विधानसभेत पास करून घेतला होता. हे तिघं संघाचे कार्यकर्ते आहेत हे माहित नव्हतं. हरियाणामध्ये जाटांनी आरक्षण हवं म्हणून आंदोलन केलं तेव्हा मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप सरकारविरुद्ध आंदोलन केलं. त्यात झालेल्या नुकसानीत माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि त्यांचे पुत्र दीपिंदर हुडा यांच्या मालमत्तेला काहीही झालं नाही. हुडा काँग्रेसचे आणि जाट. कट्टर भाजपचे आणि बिगरजाट. शिवाय संघकार्यकर्ते. या लोकांना संघाची फुस आहे >>> कशी काय? पुरावे आहेत का? उद्या तुम्ही त्यांना काँग्रेसची फूस आहे असं म्हणालात तरी पुरावे द्यावेच लागतील. दलित, मागासवर्गीय, मुस्लिम यांना निर्णयप्रक्रियेतून बाहेर काढणं हा संघाचा हेतू आहे >>> म्हणूनच त्यांनी घांची या अत्यंत उच्चवर्णीय जातीत जन्माला आलेल्या नरेंद्र मोदींना पंतप्रधानपद आणि वंजारी या तितक्याच उच्चवर्णीय जातीत जन्मलेल्या गोपीनाथ मुंड्यांना महाराष्ट्रात उपमुख्यमंत्रिपद दिलं. यापेक्षा मोठं खच्चीकरण असूच शकत नाही. बरोबर. माझे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by बोका-ए-आझम

बोकोबा असं पुरावे मागत राहिला तर बिचाऱ्या ब्रीगेडींनी जायचं कुठे ? यांचा धंदा फक्त ३ रुपयाची पिवळी पुस्तके वाटणे/ वाचणे . कुठलाही आधार आणि सोयर सुतक नसलेले आरोप करणे/ सातत्याने करत राहणे. ज्या लोकांचा आदार वाटावा अश्या लोकांची नावे घेऊन हे लोक बरळत असतात, त्यांची शिकवण कण भर हि यांच्या डोक्यात गेलेली नसते. असती तर असले पांचट आरोप करत बसले नसते. बरं, यांचा मुद्दा पुरावे देऊन खोडून काढला कि वैयक्तिक होऊन तिथेही आपली घाणेरडी वैचारिक पातळी दाखवून द्यायची संधी सोडत नाहीत हे लोक. आजकाल या लोकांचा राग यायच्या जागी किळस वाटते.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

संघाचं कै है कै माहिती नाही, पण मी उघडपणे जातीयवादी आहे. आणि हो, मुसलमानांना पण हाकलून द्यावं अशा मताचा मी आहे. लईच टिवटिव लावल्ये. काय उपडणार आहेस काय बे?

In reply to by बोका-ए-आझम

सध्या भारतात बीजेपीचे सरकार आहे हे त्यांना बहुधा ठाऊक नाही. किंवा जनाधार म्हणजेच निवडणूक हे माहीत नसावे.

In reply to by अप्पा जोगळेकर

तुमचे दोन्ही मुद्दे चुकीचे आहेत.
सध्या भारतात बीजेपीचे सरकार आहे हे त्यांना बहुधा ठाऊक नाही.
त्यांचा मुद्दा "संघाला जनाधार का नाही" हा आहे. बीजेपीच्या जनाधाराचा मुद्दा नाही.
किंवा जनाधार म्हणजेच निवडणूक हे माहीत नसावे.
निवडणूक म्हणजे जनाधार नव्हे. ती जनाधार आजमावण्याची पद्धत आहे.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

या ईतर मागस समाजाचे आरक्षण काढून त्यांना परत गुलामगीरीत ढकलणे घटनात्मदृष्ट्या अशक्य आहे .मग संघाने यांच्या आरक्षणातच घुसघोरी करण्याचा डाव आखला आहे .महाराष्ट्रात मराठा समाजाचे ओबिसीकरण करण्याचा जो घाट घातला जात आहे तो याचसाठी संभाजि ब्रिगेडला रसद नागपुरातून येते हे आता काही गुपित राहिलेले नाही.उत्तरेतही पटेल, जाट ,गुजर या उच्चवर्णीय जातींना ओबिसीत ढकलण्याचे प्रयत्न संघाकडून चालू आहेत.यातून त्यांना आंबेडकरवाद संपवायचा आहे व परत उच्च हिंदू जातीची संघाला अपेक्षीत " हिंदुत्वाची " पुनर्मांडणी करायची आहे.या पुनर्मांडणीत मुस्लिम,ख्रिश्चन,हिंदू दलित यांना कोणतेच स्थान नसेल हे उघड आहे.
आता तर खात्रीच झाली.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

संभाजि ब्रिगेडला रसद नागपुरातून येते हे आता काही गुपित राहिलेले नाही
आँsss !!!!!

In reply to by आनन्दा

सर्व चर्चा आणि पाककृती संघ घडवून आणतो.. दैनीक डॉन पाकिस्तान. देशात घडणार्या प्रत्येक नैसर्गीक आपत्तीमध्ये संघाचा हात असतो. दैनिक चंद्रनील टाइम्स. संघाला दुसर्या संघटनेचे काम पाहवत नाही म्हणून ते आपत्तीकार्यात झोकून काम करतात आणि शिस्त्बद्द शिबिर भरवितात त्यामुळे इतरांनाही विधायक काम करण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि म्हणून्च संघाला सरसकट वाईट ठरविलेच पाहिजे.त्या करिता शोधून शोधून वैयक्तीक खुस्पटे आम्हाला कळवावित. बुधला गोडेतेल्वाला संकलक नाखु

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

या सगळ्यात काहि तथ्य नाहि. संभाजी ब्रीगेडला बारामतीमधुन रसद मिळते. दलित आणि ओबीसी शक्तीची जाण संघाएव्हढी कोणाला नसेल. पुढील काहि वर्षात फुले-आंबेडकर भिंतीवरील फोटोंमधुन आशिर्वाद देतील व या समाजाचं संघीकरण झालेलं असेल. येत्या ५ दशकात जगाचं अर्थकारण इतकं बदलेलं असेल कि सद्यःस्थितीतील आरक्षण वगैरे मुद्दे अगदी निकामी झाले असतील. हे बदल समजुन घेणारी व त्यानुसार आराखडे बनवणार्‍यात संघ नक्कीच असेल. मुस्लीम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट हि समस्या एका वेगळ्या रुपात जगाला वेठीस धरेल, इन्क्लुडींग मुस्लीम अ‍ॅण्ड ख्रिश्चन जनता. तो निराळा विषय आहे.

शतकी धाग्याबद्दल रमेश भिडे यान०चे अभिनन्दन!