रात्रीचा १२ चा शो आणि भागवतटॉकीज ची फरशीबी दिसणार नाही एवढी गर्दी, पार्कींगचे पाचही थेटरचे लॉट फुल्ल भरलेले. हाउसफुल्लच्या काउंटरवरची हुज्जत. सगळी गर्दी १८ ते ३० मधलीच. जणगणमनला उभारलेल्या पब्लिकने काळ्या स्क्रीनवर रंगीबेरंगी सैराट अक्षरांनाच दिलेल्या शिट्ट्या. त्या काळ्या स्क्रीनवरच्या पाट्यातल्या नागराज पोपटराव मंजुळे नावाला झालेला डब्बल जल्लोष. लका आपला माणूस. पाट्या पडतानाच मागे टेनिसबॉलची क्रिकेटमॅचची गावठी कॉमेन्ट्री सुरु झालेली. कॉमेन्ट्रीला सोता नागराज बसलेला गच्चीवरच्या पॅवेलिनला. एकच फाइट वातावरण टाइटचे फ्लेक्स, तीनचाकी सायकलच्या बक्षीसाची अनाउंसमेन्ट, लोकल बिली बाउंडिंगला मॅचमधूनच घरी हाकलत नेणारी आजी, प्रिन्स लिहिलेली नंबरप्लेट, पितळी पिस्तुलाची चावी आणी पुढं तलवारीची नंबरप्लेट असलेली बुलेट वाजवित युवानेते आगमन केले आणि आमच्या हितलीच स्टोरी असल्याची खात्री पटली.
म्याचमध्ये गरज असताना आपला हिरो पाणी हापसत हिरवीनीसमोर नजर लावून बसलेला. दिसायला देखणंय लका. पिक्चरपुरती बॉडी कमी केलीय म्हणा पण तब्येत केली तर हाय मटेरिअल हिरोचे. शेवटच्या ओव्हरीत मॅच जिकून देतय आणि बक्षीस घेतय गावचे भाग्यविधाते आणि सर्वेसर्वा पाटलांकडून. हापसताना जिच्यावर नजर लावली ती हेचीच पोरगी. अजून तर झलक नाही आली. पण स्कॉर्पिओतून उतरताना दिसलीच. मजबूत लका काम पण डोळे काय म्हणतोस. अगागागागा. पाटलाची लैच लाडकी लेक आर्ची बुलेट घेऊन कॉलेजात येतीय. हिरीत पवायलेल्या पोरांना नीट बाहेर हाकलून स्वतः पोरीना घेऊन उतरायचा थाट अंगात. तिच्याबी मनात हे कोळ्याचं परश्या भरतंय.
परश्याच्या डोक्यात तर आर्ची सोडून काहीच नाही, नुसतं नाव ऐकलं तिचं तरी गडी सैराट सुटतोया. परश्याचे जिगर दोस्त म्हनावं तर दोनच. लंगडा प्रदीप आन गॅरेजवाला सल्ल्या. त्येंनी भरीस पाडून चिट्ठ्या बिठ्या प्रकरण होतंय. आता दोन्ही साइडनी ओके असतयच तवा लीड आटोम्याटीक आर्चीकडंच. शेतातल्या, फोनवरच्या गप्पातून जातीय फुलत ही स्टोरी.
आर्चीच्या भावाच्या म्हणजे प्रिन्स च्या बड्डे पार्टीला हे तिघं जातेत झिंगाट नाचायला. काय राव थेटरातला जल्लोष. पोलीसानी दांडके मारुन पब्लिक पडद्यासमोरुन हाकललं तवा कुठं थांबलेला पिक्चर सुरु झाला.
आर्चीच्या घरामागं एका बेसावध क्षणी दोघांना आर्चीचा बाप बघतो. कुत्र्यासारखा मार खाउन तिघे परत येतेत. प्रशांतरावांची उचलाबांगडी नीट करमाळ्याला. हिकडं रितीरिवाजापरमाणं आर्चीला बघायला पाव्हणे आलेलेच. परिस्थितीचा अंदाज घेऊन आर्ची करमाळ्याला परश्याला भेटायला येती. तिथे काय सपोर्ट मिळत नसल्याने पळ काढतेत. पाटलाची माणसं जीव खाउन मागं असतेतच. परंड्याला पोलिसांकच्या तावडीत सापडून परत आणले जातेत. पोलीस स्टेशनात परश्या आणि त्याचा मित्रांवर रेप आणि किडनॅपचा चार्ज बसतोय हे कळाताच आर्चीला बापाचा मनसुबा कळतो. स्टेटमेंट फाडून बाहेर पडताच इकडे पाटलाकडून परश्याला जबरी मारहाण होत असती. जिगरीची आर्ची तेथून परश्याला घेऊन पळ काढती.
खिशात पैसे नाही. कोन ओळखीचे नाही आशा अवस्थेत हैदराबादला पोचलेल्या दोघांवर यायची ती संकटे येतेतच. एकमेकाच्या साथीने निस्तरत एका भल्या बाईची पडती गाठ. फाटका का हुईना पण आसरा मिळतो. आक्खं आयुष्य थाटात काढलेल्या आर्चीला हे असलं गरीबीचं जगणं पेलवणं तर अवघड होतय पण ती मागं हटत नाही. कष्टात वाढलेल्या परश्याला ही असली जिंदगी सवयीची असली तरी आर्चीसारखा निखारा पेलवत नाही. बिनलग्नाचा सुरु झालेला संसार भांड्याला भांडे वाजवतोच. बारक्या सारक्यावरुन वाढलेल्या भांडणात आर्ची बापाच्या घराकडे परत यायला निघती. प्रवासात जाणवती ती संसारातल्या साथीची आन विश्वासाची किंमत. हिकडे गळ्याला फास लावून घ्यायला निघालेला परश्या थांबतो आन आर्ची परत येती.
एकेक दिवस सरतो आन दोघांचे दिवसबी पालटतेत. डोश्याच्या गाडीपासून चांगली नोकरी मिळवणार्या परश्यासोबत आर्ची पण नोकरीत प्रमोशन मिळवीत जाते. कायदेशीर लग्न बिग्न केलेल्या ह्या दोघांत पिल्लू आकाशचे बी आगमन होते. हैद्राबादेत थाटात आक्टीव्हावर नवर्याला आणि मुलाला घेउन फिरणारी आर्ची सगळ्यात जास्त शिट्ट्या खाउन जातीया राव.
.
आता म्हणताल आक्खी स्टोरीच टाकली का देवा, तर पिक्चरमध्ये भावला हाच प्रामाणिकपणा. कुठंबी आडमाप नाही की काय हातचं राखलेलं नाही. स्टोरी टेलींग म्हणत्यात नाही का या कलेला. अगदी १०० मार्काने बोर्ड फाडून पास ओ आमचा नागराज. अशी रियल्ल स्टोरी की भिडलीच पाह्यजे. आता कायजणांना नाय झेपली. नसंना का. अस्मितेचे, प्रतिष्ठेचे आन संपत्तीचे गॉगल लावून बसल्यावर काय दिसतं त्येच दिसणार त्येना. जिंदगीच्या उन्हातान्हात फिरणार्यांना आपली सावळी का हुईना पण जीव लावणारी आर्ची आठवती. आता नसना का ती शिरेलीतली गोग्गोड पण जिगर बघा की भौ. भाषा म्हणताल लै गावठी पण आसच बोलतो ओ आम्ही. आसच बोलतो आन राहतो पण. झिंगाटवर थिरकले पाय तर बिघडलं काय? पिच्चर संपताना थेटरमध्ये एक तर पावलाचा आवाज येतो का? मग...
आन स्टोरी सांगताना जगावी तरी कीती ह्या माणसांनी? ती आर्ची, लका वर्गात परश्याला बघाया पळत येता येता थांबती तव्हा बघायचा चेहरा. काय असती हूरहूर, काय ती नजर. लाख रिटेक मारावे बॉलीवूडने पन अशी नजर आणावी. च्यालेंज है भौ. सजणाची स्वारी आली म्हणताना आलेली लाज, परत फिरती परश्याकडं तवा आलेली समज सगळं कसं आपल्या डोळ्यानं बोलती राव आर्ची. परश्या बी तसलच. कुठंच हिरोगिरी न दाखवता भिडतय मनाला. डोश्याच्या गाडीवर सराइतपणे वर हात टेकून डोसे मारणं असू दे की निर्दयी मार खाउन आलेला बावरलेपणा. सगळा कसा अस्सल.
परशाच्या जानी दोस्त प्रदीप. लंगडं हाय पण दिमाग का दिमाग. आर्चीनंतर सगळ्यात जास्तीच्या शिट्ट्या घेतल्या की गड्याने. सल्ल्या बी परफेक्ट. गावागावात सापडतेत असले दिलदार जिगरयार.
होतेत...... अगदी असल्या स्टोर्या प्रत्येक गावात होतेत. वय असतं ते. मार खाउन कुणी गप्प बसतं नायतर गाव सोडतं, कुणी जीवलगाचा हात धरुन पैलतीरी लागतं. प्रत्येक आर्ची परश्याच्या नशीबात येणारी स्टोरी हाय ओ. याड लागलेल्यांची स्टोरी सांगीतली मन लावून तवा तर कुठं समद्याना याड लागलं. ते म्हणतेत ना. जेवढं पर्सनल होतय तेवढं युनिव्हर्सल होत जातय. आता ही सैराट स्टोरी कशी होतीया दिसतीच हाय ना.
वाचने
59761
प्रतिक्रिया
219
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
In reply to अत्यंत घीसापीट्या ह्या स्टोरी by मानसी१
खरंच आहे डॉक, आवडण्यासारखं
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा खरा परतिसाद! :)
In reply to अत्यंत घीसापीट्या ह्या स्टोरी by मानसी१
अभ्या तुझे लिखाण वाचून
सहमत
In reply to अभ्या तुझे लिखाण वाचून by बॅटमॅन
जातीयता की पुरुषप्रधानता ?
शेवटी एकदाचा सैराट पाहिला.
+१
In reply to शेवटी एकदाचा सैराट पाहिला. by रातराणी
+१०००००......................
In reply to शेवटी एकदाचा सैराट पाहिला. by रातराणी
जबरदस्त
In reply to शेवटी एकदाचा सैराट पाहिला. by रातराणी
जबरा प्रतिसाद, अगदी
In reply to शेवटी एकदाचा सैराट पाहिला. by रातराणी
क्या बात है,
In reply to शेवटी एकदाचा सैराट पाहिला. by रातराणी
धन्यवाद मंडळी. प्रतिसाद
In reply to क्या बात है, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवडले
In reply to शेवटी एकदाचा सैराट पाहिला. by रातराणी
आज पाहिला चित्रपट
शेवट.
In reply to आज पाहिला चित्रपट by अर्धवटराव
ते कांड प्रिन्स स्वतःहुन करत नाहि
In reply to शेवट. by ब़जरबट्टू
"सिग्रेट पिना शेहेत के लिये
In reply to आज पाहिला चित्रपट by अर्धवटराव
"सिग्रेट पिना शेहेत के लिये
In reply to आज पाहिला चित्रपट by अर्धवटराव
कुणी काहीही म्हणोत आपल्याला
अभ्या भावा एक नंबर लिवलस.
म्हून थेटरात पिच्चर पायला पन
In reply to अभ्या भावा एक नंबर लिवलस. by पाषाणभेद
काय देवा असे.
In reply to म्हून थेटरात पिच्चर पायला पन by पक्षी
खरंय. दुसर्यांदा पहाताना शेवट
In reply to काय देवा असे. by अभ्या..
सर्व वाचकांना धन्यवाद.
अगदी खरं बोललात!
In reply to सर्व वाचकांना धन्यवाद. by अभ्या..
प्रतिसाद आवडला.
In reply to सर्व वाचकांना धन्यवाद. by अभ्या..
ज्यांचे प्रतिसाद वाचून मी
In reply to प्रतिसाद आवडला. by अप्पा जोगळेकर
१००% सहमत
In reply to सर्व वाचकांना धन्यवाद. by अभ्या..
अभ्या सीर्यसलि प्रतिसाद
In reply to सर्व वाचकांना धन्यवाद. by अभ्या..
तजो लंबे रेस का घोडा है....
साहेब, तुम्ही ज्यांच्या विषयी
In reply to तजो लंबे रेस का घोडा है.... by ईश्वरसर्वसाक्षी
खी खी,,,,:-)असोच.
In reply to साहेब, तुम्ही ज्यांच्या विषयी by तर्राट जोकर
श्रीयुत ईश्वरसर्वसाक्षी,
In reply to तजो लंबे रेस का घोडा है.... by ईश्वरसर्वसाक्षी
अच्च जालं तल
In reply to श्रीयुत ईश्वरसर्वसाक्षी, by संदीप डांगे
हे सौंशयबिंशय घेत बसायला,
In reply to अच्च जालं तल by खालीमुंडी पाताळधुंडी
एकाच पद्धतीचे विचार असण्याचा
In reply to हे सौंशयबिंशय घेत बसायला, by तर्राट जोकर
झिंग असं 17 वेळा आणि मग
In reply to एकाच पद्धतीचे विचार असण्याचा by खालीमुंडी पाताळधुंडी
=)) =)) भल्याभल्यांचे डुआयडी!
In reply to एकाच पद्धतीचे विचार असण्याचा by खालीमुंडी पाताळधुंडी
आमिन...सुम्मामिन
ए जिगर. सैराट १५० झाले की राव
=))
In reply to ए जिगर. सैराट १५० झाले की राव by अभ्या..
=))
In reply to ए जिगर. सैराट १५० झाले की राव by अभ्या..
वा वा .. मस्त लिहिले आहे
मुद्दा आहे की मंजुळेला
अभ्या भैताड, ह्यो धागा दोनशे
रेडिफवर आलेला रिव्हू
मस्त अप्रतिम चित्रपट......
http://m.lokmat.com/storypage
हा नागराज बाप माणूस आहे !
बादवे, बीबीसीवाल्यांनी पण
यावेळच्या
जबरदस्त परीक्षण!!!
लै च पिरमात पडलेला दिसताय
In reply to जबरदस्त परीक्षण!!! by समीरसूर
भिडे अण्णा (जल्ला मेला चुकीचा
In reply to लै च पिरमात पडलेला दिसताय by रमेश भिडे
बघितला की!
In reply to भिडे अण्णा (जल्ला मेला चुकीचा by माझीही शॅम्पेन
'एवढं' काय आवडण्यासारखं आहे
In reply to बघितला की! by रमेश भिडे
तुम्ही उगाच सचिन चं द्विशतक
In reply to 'एवढं' काय आवडण्यासारखं आहे by माझीही शॅम्पेन
मला एकट्यालाच नव्हे
In reply to लै च पिरमात पडलेला दिसताय by रमेश भिडे
मला पण खुप आवड्ला हा पिक्च
काय गोड कामं करतात ओ हल्लीची
काय गोड कामं करतात ओ हल्लीची
कडू प्यार्याची बत्तीशी वठली
दादूस
In reply to कडू प्यार्याची बत्तीशी वठली by अभ्या..
धाग्याच्या
आयोव.
In reply to धाग्याच्या by नाखु
@,एक ताव आर्ट पेपर ›››
In reply to आयोव. by अभ्या..
यमकांचे स्वामी =))
In reply to @,एक ताव आर्ट पेपर ››› by अत्रुप्त आत्मा
लेणीबाज =))
In reply to यमकांचे स्वामी =)) by प्रचेतस
(No subject)
In reply to लेणीबाज =)) by टवाळ कार्टा