Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by जव्हेरगंज on Wed, 04/27/2016 - 22:09
उनाचं नुसतं मजी नुसतं तापत हुतं घंघाळभर पाण्यानं भागंना आता हिरीतंच खुपशी घालावी म्हूण खळ्यावर आलू बांधावर फिरताना जवा सोग्यानं त्वांड पुसलं तवा म्होरल्या वावरात मला ऊसाचं कांडं रवताना उफाड्याचं सामान दिसलं आभाळाची पाखरं भिरीभिरी हाणत पायताणं तिकडं वळावली मग दगडं घेऊन गोफणीत जवारीवरं भिरकावली तसं म्होरलं वाफं सोडून सामान मधल्या आळ्याकडं आलं कंबरचा काष्टा काढून निऱ्या सावरत ताठ उभं झालं तोबरा भरुन म्या पानाचा इडा तिच्याम्होरं धरला "खाणार का इडा बिगर सुपारी, रंगणार मातुर नंबरी " काताचा खडा तोंडात टाकत म्या तंबाकूची चिमूट दाढत सोडली आन पिचकारी मारत म्हणलो "ऊस पाण्याला म्हाग " तसं सामान बांधावर आलं कमरंवर हात ठिवून लाल व्हटानं म्हणलं "पाटील, येरवाळीच काय काढलंय ही, येवढ्या उनाचं वाड्यात पडावं, गपगार झोपावं " "मग हिकडचा वाफसा कुणी काढावा गड्या, जीव नांगरटीला आलाय " शेवटच्या पानावर चुना माखत आम्ही पटका काढला. तसं सामान फडात शिरलं हिकडंतिकडं बघून आमीबी सरसावलो येवढ्या उनाची नांगरट काढायची मजी खायचं काम न्हाय "म्होरल्या बाजारला कमरबंद करायचं" आसं सामान जवा म्हणलं तवा मला ते लै म्हंजे लैच आवाडलं

Submitted by विजय पुरोहित on Wed, 04/27/2016 - 22:17

Permalink

जव्हेरभौ... लैच तब्येतीत पान

जव्हेरभौ... लैच तब्येतीत पान रंगलं की वो... असो... भन्नाट काव्य...
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Wed, 04/27/2016 - 22:22

In reply to जव्हेरभौ... लैच तब्येतीत पान by विजय पुरोहित

Permalink

बाकी काळ्या मातीत रंगणारं आणि

बाकी काळ्या मातीत रंगणारं आणि फुलणारं तुमचं काव्य आणि साहित्य जबर आवडतं... झिंग झिंग झिंगाटची आठवण झाली हो...
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Wed, 04/27/2016 - 22:22

Permalink

येवढ्या उनाची नांगरट काढायची

येवढ्या उनाची नांगरट काढायची मजी खायचं काम न्हाय
अगागागागागा. जव्हेरभौ, एकदम पल्टीफाळानंच काढली नांगरट. बारका कुबोटो घ्या आता. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Wed, 04/27/2016 - 22:24

Permalink

=))

=))
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 04/27/2016 - 22:26

Permalink

खतर नाक!

खतर नाक!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 04/27/2016 - 22:41

Permalink

सैराटच की =))

सैराटच की =))
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Wed, 04/27/2016 - 22:53

Permalink

_/\_ जादू करता राव!

_/\_ जादू करता राव!
  • Log in or register to post comments

Submitted by भीमाईचा पिपळ्या. on Wed, 04/27/2016 - 23:29

Permalink

उभ्या उसाच्या फडात नांगरणी.

उभ्या उसाच्या फडात नांगरणी. अगागागा मूळीला गुतला तर फाळच मोडायचा =))
  • Log in or register to post comments

Submitted by सायकलस्वार on गुरुवार, 04/28/2016 - 01:00

Permalink

मग हिकडचा वाफसा कुणी काढावा

मग हिकडचा वाफसा कुणी काढावा गड्या पाटलाची आवड भलतीच दिसतेय!
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 04/29/2016 - 19:15

In reply to मग हिकडचा वाफसा कुणी काढावा by सायकलस्वार

Permalink

ओ रायडर..!

पाटलानी स्वतः साठी वापरलाय तो शब्द. तुमीबी ना...
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 04/28/2016 - 01:22

Permalink

समदे पाटील अशेच चावट अस्त्यात

समदे पाटील अशेच चावट अस्त्यात. 'बाई वाड्यावर या'च्या ऎवजी 'बाईsss फडावर या!' ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on गुरुवार, 04/28/2016 - 09:33

In reply to समदे पाटील अशेच चावट अस्त्यात by किसन शिंदे

Permalink

अगदी खरेय किसनरावजी शिंदे

अगदी खरेय किसनरावजी शिंदे पाटील.
  • Log in or register to post comments

Submitted by संजय पाटिल on गुरुवार, 04/28/2016 - 11:00

In reply to अगदी खरेय किसनरावजी शिंदे by प्रचेतस

Permalink

काहो पाटलांवर ऊठलाय?

काहो पाटलांवर ऊठलाय? बाकी कविता फर्मासच
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on गुरुवार, 04/28/2016 - 10:24

Permalink

फर्मास फार्मकाव्य!!

काळी माती हिरवा ऊस दिसली बाई, फडात घुस ओ पाटील...हीच काय तुमची विचारपूस? =)) =)) फर्मास फार्मकाव्य!! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 04/29/2016 - 19:17

In reply to फर्मास फार्मकाव्य!! by चांदणे संदीप

Permalink

खिक्क

शिघ्रकाव्य लै भारी !
  • Log in or register to post comments

Submitted by DEADPOOL on गुरुवार, 04/28/2016 - 11:41

Permalink

बैजाट, झिंगाट, सैराट,अफाट!!!!

बैजाट, झिंगाट, सैराट,अफाट!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by पथिक on गुरुवार, 04/28/2016 - 17:47

Permalink

नंबरी!!

नंबरी!!
  • Log in or register to post comments

Submitted by अनुप ढेरे on Fri, 04/29/2016 - 11:42

Permalink

छान!

छान!
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 04/29/2016 - 12:58

Permalink

छ्या

मी या धाग्यावर आलोच नव्हतो आणि हा धागा वाचलाच नाही ! ===== कांडका नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 04/29/2016 - 19:23

In reply to छ्या by नाखु

Permalink

नाखुस तुम्ही नाखुश झालाय का ?

नाखुस तुम्ही नाखुश झालाय का ? चलायचंच, आजकालची जवान पोरं कायबी लिव्हत्यात. उगा म्हाताऱ्याला तरास. (ह.घ्या. हो, नस्ता विकेट काढायचा माझी ) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Fri, 04/29/2016 - 13:45

Permalink

आंबट

शौकीन पाटील...
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 04/29/2016 - 19:25

In reply to आंबट by वपाडाव

Permalink

बरं मग?

बरं मग?
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Fri, 04/29/2016 - 13:53

Permalink

लई भारी

विडंबन चांगले जमले आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Fri, 04/29/2016 - 14:26

Permalink

आरे द्येवा माझ्या, _/\_

आरे द्येवा माझ्या, _/\_ --------- अवा<तरः फेसबुकावर चाललेलं रणकंदन बगुन हे आटवलं, नेमकं उलटं असतं तर लोक खवळतात.
  • Log in or register to post comments

Submitted by वैभव जाधव on Fri, 04/29/2016 - 14:55

Permalink

भारीच की! मजा केलासा म्हणा की

भारीच की! मजा केलासा म्हणा की. कामापायी काम आणि...
  • Log in or register to post comments

Submitted by सच्चिदानंद on Fri, 04/29/2016 - 15:27

Permalink

येवढ्या उनाची नांगरट काढायची

येवढ्या उनाची नांगरट काढायची मजी खायचं काम न्हाय
कोरड्या रानात नांगुर अडकतो भावा. मग जीवाला घोर. जरा वल आसली म्हंजे मग उनात पण नांगरट सर्राट होतीय बघा. ;) तसं तुमाला सांगायचं म्हंजे माशाला पवायला शिकवल्या सारखंच म्हणा.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 04/29/2016 - 19:29

In reply to येवढ्या उनाची नांगरट काढायची by सच्चिदानंद

Permalink

खिक्क

पोचलेले दिसताय ..
  • Log in or register to post comments

Submitted by सच्चिदानंद on Fri, 04/29/2016 - 20:05

In reply to खिक्क by जव्हेरगंज

Permalink

हा हा हा.. तुमच्यापुढे कमीच

हा हा हा.. तुमच्यापुढे कमीच हो. ;) बायदवे,
लेखनविषय:: वावर मौजमजा
यातला श्लेष कोणी नोटिस केलाय का.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Fri, 04/29/2016 - 19:38

Permalink

कमरबंद तर झाला.

आता पुढची मागणी काय आणि पाटील त्याची कशी वसूली करतील याची उत्सुकता लागलीया !
  • Log in or register to post comments

Submitted by कानडाऊ योगेशु on Sat, 05/21/2016 - 13:08

Permalink

लै म्हंजी लैच आवडले.

लै म्हंजी लैच आवडले. चहा पिता पिता वाचत होतो आणि शेवटच्या ओळीत
तवा मला ते लै म्हंजे लैच आवाडलं
ठसका लागला! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sat, 05/21/2016 - 19:48

In reply to लै म्हंजी लैच आवडले. by कानडाऊ योगेशु

Permalink

तुमचाच धुमाकूळ पाहून आपसुकच

तुमचाच धुमाकूळ पाहून आपसुकच आलंय ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मन्याटण्या on Sat, 05/21/2016 - 14:06

Permalink

एकदम भारी

तुमासनी येवढ शब्द कस आठवत्याती काय म्हायत.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नज on Sat, 05/21/2016 - 14:33

Permalink

मस्त

जव्हेरभौ, लय भारी... नुसतीच नांगरट की मग काही पेरणारपण आहात?? घेवडा पेरा..
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sat, 05/21/2016 - 19:49

In reply to मस्त by स्वप्नज

Permalink

घेवडाच का तेवडा पेरायचा

घेवडाच का तेवडा पेरायचा इस्काटताकाय?
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नज on Sat, 05/21/2016 - 21:57

In reply to घेवडाच का तेवडा पेरायचा by जव्हेरगंज

Permalink

तसं कसं,तसं कसं...

ईस्काटलं तर गोंधूळ हूईल ओ... नगं इस्काटायला.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sat, 05/21/2016 - 22:09

In reply to तसं कसं,तसं कसं... by स्वप्नज

Permalink

खिक्क!

'घेवडा'चं यमक पेरायचंय का? मग लै झ्याक ;)
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 15301 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com