जीव नांगरटीला आलाय
उनाचं नुसतं मजी नुसतं तापत हुतं
घंघाळभर पाण्यानं भागंना
आता हिरीतंच खुपशी घालावी म्हूण
खळ्यावर आलू
बांधावर फिरताना जवा
सोग्यानं त्वांड पुसलं
तवा म्होरल्या वावरात मला
ऊसाचं कांडं रवताना
उफाड्याचं सामान दिसलं
आभाळाची पाखरं भिरीभिरी हाणत
पायताणं तिकडं वळावली
मग दगडं घेऊन गोफणीत
जवारीवरं भिरकावली
तसं म्होरलं वाफं सोडून
सामान मधल्या आळ्याकडं आलं
कंबरचा काष्टा काढून
निऱ्या सावरत ताठ उभं झालं
तोबरा भरुन म्या
पानाचा इडा तिच्याम्होरं धरला
"खाणार का इडा बिगर सुपारी,
रंगणार मातुर नंबरी "
काताचा खडा तोंडात टाकत
म्या तंबाकूची चिमूट दाढत सोडली
आन पिचकारी मारत म्हणलो
"ऊस पाण्याला म्हाग "
तसं सामान बांधावर आलं
कमरंवर हात ठिवून लाल व्हटानं म्हणलं
"पाटील, येरवाळीच काय काढलंय ही,
येवढ्या उनाचं वाड्यात पडावं, गपगार झोपावं "
"मग हिकडचा वाफसा कुणी काढावा गड्या, जीव नांगरटीला आलाय " शेवटच्या पानावर चुना माखत आम्ही पटका काढला.
तसं सामान फडात शिरलं
हिकडंतिकडं बघून आमीबी सरसावलो
येवढ्या उनाची नांगरट काढायची मजी खायचं काम न्हाय
"म्होरल्या बाजारला कमरबंद करायचं" आसं सामान जवा म्हणलं
तवा मला ते लै म्हंजे लैच आवाडलं
जव्हेरभौ... लैच तब्येतीत पान
बाकी काळ्या मातीत रंगणारं आणि
येवढ्या उनाची नांगरट काढायची
=))
खतर नाक!
सैराटच की =))
_/\_ जादू करता राव!
उभ्या उसाच्या फडात नांगरणी.
मग हिकडचा वाफसा कुणी काढावा
ओ रायडर..!
समदे पाटील अशेच चावट अस्त्यात
अगदी खरेय किसनरावजी शिंदे
काहो पाटलांवर ऊठलाय?
फर्मास फार्मकाव्य!!
खिक्क
बैजाट, झिंगाट, सैराट,अफाट!!!!
नंबरी!!
छान!
छ्या
नाखुस तुम्ही नाखुश झालाय का ?
आंबट
बरं मग?
लई भारी
आरे द्येवा माझ्या, _/\_
भारीच की! मजा केलासा म्हणा की
येवढ्या उनाची नांगरट काढायची
खिक्क
हा हा हा.. तुमच्यापुढे कमीच
कमरबंद तर झाला.
लै म्हंजी लैच आवडले.
तुमचाच धुमाकूळ पाहून आपसुकच
एकदम भारी
मस्त
घेवडाच का तेवडा पेरायचा
तसं कसं,तसं कसं...
खिक्क!