Skip to main content

करमणूक मांजराची

लेखक राजकुमार१२३४५६ यांनी गुरुवार, 28/04/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
करमणूक मांजराची हा मुक्तपीठ वरील लेख वाचून खूप हसलो. २०१४ मध्ये ई-सकाळ च्या मुक्तपीठ वर आलेला हा लेख अजूनही गाजतोय. अजून हि प्रतिक्रियांचा पाउस पडतोय. लेखा पेक्षा प्रतिक्रिया वाचायला मजा आली. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा हसलो असेल. वीस हजार लाइक आणि तेवढेच दिस लाइक मिळवणारा हा पहिलाच लेख असेल बहुतेक. आपण पण हा लेख एकदा तरी वाचाच. प्रतिक्रिया सुद्धा वाचायला मजा येते. लेखाची लिंक खाली देत आहे. करमणूक मांजराची

वाचने 13560
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

वाचलाय अनेकव्वेळा... आता इथे मुक्तपीठीय प्रतिक्रियांचा पाऊस चाणाक्ष मिपाकरं पाडणार... बाल्कनीत जागा पकडावी म्हणतो...

In reply to by विजय पुरोहित

वाचलाय अनेकव्वेळा...
आपण पण मांजराचे "फ़ैन" झाला वाटत. म्हणून प्रतिक्रिया वाचायला सारखे तिकडे जातात वाटत. :) त्यातली एक प्रतिक्रिया मला खूप आवडली ती येथे देत आहे. काही प्रश्न - १. कुलकर्णी आजोबा पार्किंगच्या बाहेर उन्हातच का बसले होते? २. वरदळा काहीतरी असावं म्हणून त्यानं लक्ष दिलं नाही, अहो पण काहीतरी असतं म्हणून तर लक्ष द्यायला पाहिजे ना, तुमच्यात काही नसताना लक्ष देतात का? ३. स्कूटरला आवाज येत होता तर पद्मश्री वरद सुझुकी शोरूममध्ये का गेला? ४. पिल्लू एकाचवेळी कार आणि स्कूटर मध्ये कसं होतं? ५. वरदच वय काय? ६. नगरच्या मोठ्या घराच्या मोठ्या टेरेसमध्ये छोटी मांजरी का होती, मोठी का नव्हती? ७. कोचक प्रतिक्रिया वाचायची तुमची मानसिक तयारी आहे का? आणि ८. तुम्ही हा लेख का लिहिलात आणि आमचा छळ का मांडलात?

In reply to by राजकुमार१२३४५६

अहो हे मांजर सप्तर्षी बाईंनी सप्तचिरंजीवींपैकी एक केलेले आहे. तुम्हां आम्हांला लोक विसरुन जातील पण जो पर्यंत मराठी आंतरजाल आहे तोवर या मांजराला चिरंजिवित्व आहे. त्यामुळे त्याचे फ्याण आहोतच.

इथं आपल्या मिपावर रोज नवेकोरे १०-१२ तरी लेख येतात आणि तुम्ही २ वर्षापूर्वीच्या मुपीवरच्या छपरी लेखाची लिंक इथे देताय. हे काय बरोबर नाही बघा.

In reply to by बोका-ए-आझम

फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!! फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस फिस!!

अवघ्या त्रिखंडात प्रसिद्ध असणारे हे सप्तषी बाईंचे मांजर मिपावरच्या शहाण्यांना माहीत नसेल असे वाटलेच कसे तुम्हाला?

In reply to by राजकुमार१२३४५६

स्वाती ठकार, पोतदार पावसकर मॅडम, ज्यु. ब्रह्मे या आयडींचे प्रतिसाद अगदी आवर्जून वाचा. स्वाती ठकार तर कहर प्रतिसाद देत.

In reply to by नुस्त्या उचापती

सप्तर्षी ताईंचा मांजराचा लेख जर म्हणत असाल तर २०६०७ डिस्लाईक्स आहेत... रेकॉर्ड आहे.

अतिशय छान लेखाची लिंक दिली. महालोल. कहर म्हणजे काही लोकांनी चक्क "कुलकर्णी आजोबा/प्राचीचा नवरा/मांजर/ मांजरीचा भाचा" अश्या आयडी ने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

In reply to by पक्षी

कुलकर्णी आजोबा - मंगळवार, 4 मार्च 2014 - 01:44 PM IST अरे माझ नाव कशाला यात. नशीब मी उघडा बंब बसलो होतो ऊन खात ते नाही लिहिले या बाईंनी.

मला वाटतं पूर्वीही मिपावर याबद्दल चर्चा झाली होती, नक्की आठवत नाही. या लेखिकेशी ओळख, मैत्री आहे. दोघेही पतीपत्नी अतिषय चांगल्या स्वभावाचे आहेत पण कर्ण दोष, वाचादोष असल्याने आपण जे पटकन अमूक ऐकले, तमूक बोलले असे म्हणतो ते यांना अपूर्वाईचे वाटते. आपण यावर चर्चा न कराल तर बरे असे सुचवते. या धाग्यावर विनोद करणार्‍यांना दोष देत नाहीये कारण सत्य परिस्थिती माहित असण्याची शक्यता जवळ जवळ नाहीये. तरी आपण ठरवावे. धन्यवाद.

मुपीत अनेक चांगले प्रतीक्रियाकार पुर्वी होते त्याचबरोबर अत्यंत फालतू, गलिच्छ आणि क्रुर प्रतिक्रियासुद्धा असत. काही काही अत्यंत चांगल्या लेखांवरसुद्धा तद्द्न फालतू प्रतिक्रिया येत असत. ज्युनियर ब्रह्मेंसारखे विखारी नसणार्या पण हसून हसून पुरेवाट करणारे प्रतिक्रियाकार विरळ होते.

काल सहज गप्पांमध्ये या मांजराची आठवण निघाली होती. लेख वाचायची इच्छा झाली. वरती दिलेली लिंक डाउन झालेली आहे. कोणाकडे आहे का तो लेख?