Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by वेल्लाभट on Fri, 04/15/2016 - 16:39
लेखनविषय (Tags)
कथा
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
ब्लॉग दुवा हा नेहमीचीच गर्दीची वेळ होती.८:५२ ची बदलापूर यायला काही क्षण बाकी होते. महेश ब्रिजवरून धावत धावत येत होता, आपल्या नेहमीच्या डब्याशी पोचण्यासाठी गर्दीतून वाट काढत होता. तो नेहमीच्या जागी जाऊन पोचला आणि उभा राहिला. आज गर्दी जरा जास्तच होती. महेशने मोबाईल बघितला आणि खिशात टाकला. पाकिट, चावी चेक केलं आणि बॅग पुढे घेऊन तयार झाला. ८:५२ ची लोकल आली. चढण्यासाठी एकच झुंबड उडाली. ’अंदर जाओ’, ’अरे काय करतोयस यार माझा पाय आहे’, ’उतरू द्या उतरू द्या!’ सगळा कल्लोळ झाला. महेशला कुणीतरी धक्का देऊन मागे लोटलं. चढणं भयानक कठीण होतं, लटकायलाही जागा नव्हती. बरीच खटपट करून शेवटी पुढच्या गाडीने जाऊ म्हणत तो मागे झाला. इतक्यात गाडी सुटली. लोकं चढतच होती, लटकत होती. तेवढ्यात ’अरे माझं घड्याळ!!’ असं कुणीतरी ओरडलं. महेशने गाडीकडे बघितलं. डब्याबाहेर लटकलेल्या एका मुलाचं घड्याळ खाली पडलं होतं. तो मुलगा हात करत होता, पण गाडीने वेग घेतला होता. काही क्षणातच गाडी आणि तो मुलगाही नजरेच्या टप्प्याबाहेर गेला. एकदा त्या घड्याळाकडे, एकदा आजूबाजूच्या लोकांकडे काही क्षण बघत महेशने विचार केला. ’कशाला एवढी घाई करायची मी म्हणतो’, बाजूचे एक काका म्हणाले. ’आं? हो. हो ना! काय आता बोलणार...’, असं म्हणून त्याने अजून जरा विचार केला आणि घड्याळ आपल्या बॅगमधे ठेवलं. महेशला त्या डब्यात लटकणा-या मुलाबद्दल खूप वाईट वाटायला लागलं. रात्री घरी गेल्यावर त्याने बॅगेतून ते घड्याळ काढलं. काळा पट्टा, सोनेरी बक्कल, घड्याळ सुरेख होतं. त्याचं लक्ष डायलकडे गेलं. पांढ-या डायलवर बदाम काढून त्यात महेश सुषमा अशी नावं लिहिलेली होती. महेश हसला. ’बघितलंस का? किती रोमॅंटिक गिफ़्ट्स देतात बायका प्रियकरांना किंवा नव-यांना?’, महेश त्याच्या बायकोला, मनिषाला म्हणाला. त्याने तिला आत जाऊन घड्याळ दाखवलं आणि तिला चिडवत म्हणाला, ’बघ! या महेशवर किती प्रेम असेल त्याच्या बायकोचं’. ’ए गप रे! पण खरंच, तिने मोठ्या प्रेमाने दिलं असेल ना हे घड्याळ?’, ’काय करणारयस तू आता याचं?’, ’बघतो पुन्हा दिसला तर तिथे उद्या. देईन त्याला परत.’ ’देच देच. त्याला पण वाईट वाटत असेल अत्ता खूप ना?’ ... दोघे बोलत होते. दुस-या दिवशी त्याच वेळेच्या सुमारास महेश प्लॅटफ़ॉर्मवर पोचला. इकडे तिकडे बघत तो ’त्या’ महेशला शोधू लागला. चालत्या गाडीत, तेही लांबवरून बघितलेला चेहराही त्याला फार धूसर आठवत होता. काय करावं अशा विवंचनेत जात त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारायला सुरुवात केली. ’हे घड्याळ तुमचं आहे?’ ’काल गाडीतून पडलं होतं’ ’भाईसाब, घडी आपका है?’ ’यहां महेश कौन है महेश?, उसका घडी मेरेपास है’. ८:५२ आली. तोच डबा, तशीच गर्दी. महेशने डब्यातही ओरडून विचारून बघितलं, ’अरे इथे महेश आहे का कुणी? त्याचं घड्याळ माझ्याकडे आहे’ इतक्या गर्दीत कुणाला काही ऐकूही येत नव्हतं, आणि त्या महेशला शोधण्यात रसही नव्हता. गाडी तशीच धडधडत नजरेआड गेली. महेशने कालसारखंच ते घड्याळ बॅगमधे टाकलं. आणि नेहमीप्रमाणे घरी गेला. रात्री जेवताना पेपर वाचता वाचता एका बातमीकडे महेशचं लक्ष गेलं. ’ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू’ महेशने बातमी वाचायला सुरुवात केली. तरूणाचं नाव होतं ’महेश मुकादम’. महेशचा घास हातातच थांबला. पटकन हात धुवत त्याने बॅगेतून ते घड्याळ काढलं. बदाम, महेश, सुषमा, घड्याळातली वेळ; ९. बातमीत पुढे लिहिलेली अपघाताची वेळही तीच; रात्री ९. घड्याळ बंद पडलं होतं. त्या रात्री दोनही वेळा थांबल्या, त्या एक घड्याळातली, आणि एक महेश मुकादमची. सगळ्या गोष्टींचा ताळमेळ लागला आणि महेश अतिशय सुन्न झाला. त्याने मनिषालाही ही गोष्ट सांगितली, तिलाही कसंनुसं झालं. ’त्याला लोकांनी आत जायला जागा दिली असती तर वाचला असता यार!’, महेश. ’अरे कशाला जिवाशी खेळायचं पण? एवढं काही होतं का चार मिनिटांनी’, मनिषा म्हणाली. महेश काहीच म्हणाला नाही, बराच वेळ तो हात करणारा मुलगा आणि ते घड्याळ त्याच्या डोळ्यासमोरून जात नव्हतं. a असाच एक दिवस महेश गाडीची वाट बघत उभा होता. ८:५२ आली. तोबा गर्दी. आज महेशला लवकर घरी जायचं होतं. मुलीचा वाढदिवस होता. तिला केक न्यायचा होता, कारने फिरायला न्यायचं होतं. महेश बॅग पुढे घेत गाडीच्या दिशेने सरसावला. आत शिरायला जागाच नव्हती. बरीच खटपट करून शेवटी महेश मागे सरला. गाडी निघून गेली. महेशने घड्याळाकडे बघितलं. इतक्यात त्याला बाजूला उभ्या असलेल्या एका प्रवाशाने विचारलं, ’भाऊ, एक विचारू का? नाही म्हणजे सहज विचारतो, ते तुम्ही हातावर दोन दोन घड्याळं का घातलीयत?’ महेश दोन सेकंद थांबला. आणि मग म्हणाला, ’हे जे चालू घड्याळ आहे ते मला सांगतं, ’धाव’, आणि हे जे बंद पडलेलं घड्याळ आहे ते मला सांगतं, ’थांब’. दोनही घड्याळात त्या वेळी एकच वेळ होती, ९:००. - अपूर्व ओक
  • Log in or register to post comments
  • 5283 views

प्रतिक्रिया

Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Fri, 04/15/2016 - 16:53

Permalink

चांगली आहे कथा.

चांगली आहे कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Fri, 04/15/2016 - 16:56

Permalink

थांबायला सांगणार घड्याळ घ्यायला हव प्रत्येकाने

थांबायला सांगणार घड्याळ घ्यायला हव प्रत्येकाने, असं वाटून गेलं. Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by तर्राट जोकर on Fri, 04/15/2016 - 17:02

Permalink

खरंय राव. :(

खरंय राव. :(
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Fri, 04/15/2016 - 17:09

Permalink

... दुर्दैव...

... दुर्दैव... गोष्ट फारच सुंदर सांगितलीत! धन्यवाद!!
  • Log in or register to post comments

Submitted by विजय पुरोहित on Fri, 04/15/2016 - 18:34

In reply to ... दुर्दैव... by असंका

Permalink

+111

+111
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 04/15/2016 - 17:25

Permalink

ध्वायचं

सगळे सांगतात थांबायचं का ते कथेतून सांगीतलं ते बरं झाल. वक्तशीर पण (हक्नाक)जीव धोक्यात न घालणारा नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Fri, 04/15/2016 - 18:22

Permalink

मस्त आहे !

मस्त आहे !
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Fri, 04/15/2016 - 18:28

Permalink

वाईट वाटतं. :(

वाईट वाटतं. :(
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 04/15/2016 - 18:45

Permalink

वा ! छान कथा...

वा ! छान कथा...
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 04/15/2016 - 18:49

Permalink

कथा आवडली

कथा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Fri, 04/15/2016 - 19:28

Permalink

कथा आवडेश.

कथा आवडेश.
  • Log in or register to post comments

Submitted by विवेकपटाईत on Fri, 04/15/2016 - 19:31

Permalink

????विचार करायला लावणारी कथा.

????विचार करायला लावणारी कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Fri, 04/15/2016 - 22:18

Permalink

कथा आवडली.

कथा आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by mugdhagode on Fri, 04/15/2016 - 22:39

Permalink

..

छान
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Fri, 04/15/2016 - 22:44

Permalink

कथा आवडली. फार छान सांगितलंय.

कथा आवडली. फार छान सांगितलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on Fri, 04/15/2016 - 23:18

Permalink

छान आहे कथा.

आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on Sat, 04/16/2016 - 13:36

Permalink

बाकि ओके

दोनही घड्याळात त्या वेळी एकच वेळ होती, ९:००.
यामधुन तुम्हल काय सुचवायच आहे? हे समजल नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Sat, 04/16/2016 - 14:17

In reply to बाकि ओके by जव्हेरगंज

Permalink

मला वाटते...

धोक्याचीच वेळ होती.... आणि टळली. रूपकर्थाने विचार केला तर थांबलेल्या घड्याळाकडे अशाच धोक्याच्या प्रसंगी बघता ते थांबायलाच सांगेल. तेव्हा त्याचे ऐकणे न ऐकणे तुमच्या हातात असेल. Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by सुधांशुनूलकर on Sat, 04/16/2016 - 14:22

Permalink

....

’हे जे चालू घड्याळ आहे ते मला सांगतं, ’धाव’, आणि हे जे बंद पडलेलं घड्याळ आहे ते मला सांगतं, ’थांब’. हे वाक्य म्हणजे कथेचं सार आहे. चांदणे संदीप यांचा प्रतिसाद आवडला, सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रे on Sat, 04/16/2016 - 14:38

Permalink

गोष्ट आवडली! +१

गोष्ट आवडली! +१
  • Log in or register to post comments

Submitted by पद्मावति on Sat, 04/16/2016 - 15:29

Permalink

गोष्ट आवडली.

गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 04/16/2016 - 16:12

Permalink

कथा आवडली.असंच डोंबिवली

कथा आवडली.असंच डोंबिवली स्थानकावरचं एक दृश्य डोळ्यासमोर आलं.पर्स पडली म्हणून गाडी सुरु झाल्यावर बाहेर यायला बघणारी स्त्री.तिला अक्षरशः धरुन मागे ओढली होती इतर जणींनी.
  • Log in or register to post comments

Submitted by नूतन on Sat, 04/16/2016 - 23:37

Permalink

छान!कथा आवडली

छान!कथा आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on Mon, 04/18/2016 - 13:37

Permalink

सकारात्मक शेवट...

सकारात्मक शेवट... म्हणून जरा जास्त आवडली....
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Mon, 04/18/2016 - 13:52

Permalink

आवडली

जाहिरात http://www.misalpav.com/node/22394 ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सविता००१ on Mon, 04/18/2016 - 16:38

Permalink

छान

कथा. मुंबईच वास्तव. ख्ररंच कधीकधी वाटतं एखाद्या मिनिटाने काय होतंय थांबलं तर........... :(
  • Log in or register to post comments

Submitted by राघवेंद्र on Mon, 04/18/2016 - 19:54

Permalink

कथा आवडली

कथा आवडली
  • Log in or register to post comments

Submitted by वेल्लाभट on Mon, 05/02/2016 - 12:55

Permalink

कौतुकाबद्दल सगळ्यांचे अनेक

कौतुकाबद्दल सगळ्यांचे अनेक आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Mon, 05/02/2016 - 13:11

Permalink

जवळजवळ याच प्रकारे लोकलखाली

जवळजवळ याच प्रकारे लोकलखाली सापडलेला माझा एक मामा आठवला... परिणामकारक कथा.
  • Log in or register to post comments

Submitted by चाणक्य on Fri, 05/06/2016 - 19:46

Permalink

छान कथा

आवडली. मी काॅलेजला असताना असं लोकलच्या दारात लटकून वगैरे जायचो. आता मूर्खपणा वाटतो तो सगळा. पण तेव्हा फार मर्दानगी वाटायची.
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Sat, 05/07/2016 - 00:22

Permalink

सुरेख लिहिलय

सुरेख लिहिलय
  • Log in or register to post comments

Submitted by हेमंत लाटकर on Sat, 05/07/2016 - 16:33

Permalink

आपल्या कडील लोकलला गाडी चालू

आपल्या कडील लोकलला गाडी चालू झाली की बंद व थांबली उघडणारे दरवाजे पाहिजेत. थांबण्याचा वेळ किंचित वाढवला तर अपघात कमी होतील. सर्व रेल्वे स्टेशनवर सरकते जिने केले पाहिजेत. बुलेट ट्रेन पेक्षा या सुविधा झाल्या पाहिजेत. याआधी मुंबईत नौकरी-धंद्या निमित्त्याने येणार्या लोकांवर चाप बसविला पाहिजे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com