Skip to main content

झब्बूशाहची पोरगी - खलिल जिब्रान

लेखक तर्राट जोकर यांनी गुरुवार, 07/04/2016 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
झब्बूशाहची पोरगी - खलील जिब्रान सिंहासनावर झोपलेल्या म्हातार्‍या राणीच्या आजूबाजूस चार गुलाम पंखा हलवत होते. ती घोरत होती आणि तिच्या कुशीत बसलेली मनिमाऊं म्यांव म्यांव करत अर्धोन्मिलित डोळ्यांतून गुलामांकडे टक लावून बघत बसलेली. पहिला गुलाम बोलला, "झोपलेली असते तेव्हा ही म्हातारी किती किळसवाणी वाटते, हिचा लटकलेला जबडा बघा; आणि श्वास तर असा घेते आहे जणू सैतानाने हिचा गळा दाबून धरला आहे." मनिमाउं म्यांव करत म्हणाली, "उघड्या डोळ्याने हिची गुलामी करतांना जितके कुरूप तुम्ही दिसता, झोपलेली असतांना ही त्याच्या अर्धीपण भयंकर दिसत नाही." दुसरा गुलाम म्हणाला, "झोपेत हिच्या सुरकुत्या दाट होण्याऐवजी सपाट होऊन जातात. नक्कीच कसल्यातरी कटकारस्थानाचं स्वप्न बघत असेल." मनिमाऊंने म्यांव केल, "तुम्ही पण अशीच झोप काढली पाहिजे आणि स्वातंत्र्याचे स्वप्न बघितले पाहिजे." तीसरा गुलाम म्हणाला, "हिने मारलेले लोक झुंडी झुंडीने हिच्या स्वप्नात येत असतील." आणी मनिमाउंने म्यांव केलं, "ए, ही फक्त तुमच्या पुर्वजांच्याच झुंडी नाही तर तुमच्या येणार्‍या पिढ्यांच्याही झुंडी बघत आहे." चौथ्या गुलामाने म्हटल, "ह्याबाबतीत गप्पा मारायला छान वाटतं, पण त्यामुळे इथं उभं राहून पंखा हलवत जो थकलोय त्यावर काय फरक नाही पडणार." मनिमाउंने म्यांव केलं, "तुमच्यासारख्या लोकांनी अनंतकाळापर्यंत पंखा हलवत राहिले पाहिजे, फक्त पृथ्वीवरच नाही, स्वर्गातही." राणीची मान एकाएकी खाली कलंडली आणि तिचा मुकूट जमीनीवर पडला. गुलामांपैकी एक उद्गारला, " हा तर अपशकुन आहे." मनिमाऊं म्हणाली, "एकाचा अपशकुन दुसर्‍याचा शकुन असतो." दुसरा गुलाम म्हणाला, "उठल्यावर जर हिला आपल्या डोक्यावर मुकूट दिसला नाही तर आपलं डोकं उडवेल." मनिमाउंने म्हटले, "तुम्हाला माहीती नाही की जेव्हापासून तुमचा जन्म झालाय, ही रोज तुमचे डोके उडवते आहे." तिसर्‍या गुलामाने म्हटले, "बरोबर आहे तुझे, देवांना बळी देण्याच्या नावाखाली ही आमचा खून करुन टाकेन." मनिमाउंने म्हटले, "देवांना फक्त दुर्बळांचा बळी दिला जातो." तेव्हाच चौथ्या गुलामाने सर्वांना गप्प राहण्याची खूण केली. त्याने मुकूट उचलला आणि अशा सफाईने राणीच्या डोक्यावर बसवला की तीची झोपमोड होऊ नये. मनिमाउंने म्हटले, "एक गुलामच खाली पडलेल्या मुकूटाला उचलून परत राजाच्या डोक्यावर ठेवतो." काही क्षणच गेले असतील की म्हातारी राणी उठली. इकडे तिकडे बघत तिने जांभई दिली आणि म्हणाली, "मला वाटतं मी स्वप्न पाहिलं - मी पाहिलं की एक विंचू चार किड्यांना एका खुप जुन्या ओकवृक्षाच्या खोडाभोवती पळवत आहे. हे स्वप्न मला आवडले नाही." एवढंच बोलून तिने डोळे मिटले आणि परत झोपून गेली. घोरणं परत सुरु झालं आणि चारी गुलाम परत पंखा हलवू लागले. आणि मनिमाऊं गुरगुरली, "हलवत राहा, मुर्खांनो फक्त हलवतच राहा. तुम्हाला ठावूक नाही की तुम्ही त्या आगीला हवा घालताय जी तुम्हाला जाळून तुमची राख करते." मूळ कथा: The Lion's Daughter मूळ लेखक: Khalil Jibran पुस्तकाचे नाव:The Forerunner प्रथम प्रकाशन: 1920

वाचने 10181
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

गोष्ट आवडली! . . ------जाहिरात मोड ऑन------ स्वातंत्र्य आणि बंधन ह्या संकल्पनांबद्दल मी इलुसं, दोन-चार परिच्छेदांचं काहीतरी लिहिलय.ते हे -- स्वातंत्र्यदिन(एक लघुकथा) भयमुक्त -बंधानुरक्त (एक छोटीशी गोष्ट) ------जाहिरात मोड ऑफ------

"एक गुलामच खाली पडलेल्या मुकूटाला उचलून परत राजाच्या डोक्यावर ठेवतो." हे विशेष !

"रुमीच्या नीतीकथा" याही अशाच उपरोधीक आहेत .

एकच नंबर!!! खलील जिब्रान!! काय माणुस आहे राव!!. असेच एक आवडते व्यक्तिमत्व म्हणजे जलालुद्दीन मोहम्मद रूमी ! आपापले कोष, कम्फर्ट झोन तोडून प्रगती करा ह्या आशयाचा रुमीचा खालील कोट लैच आवडतो

“Run from what's comfortable. Forget safety. Live where you fear to live. Destroy your reputation. Be notorious. I have tried prudent planning long enough. From now on I'll be mad."


In reply to by नाना स्कॉच

“Run from what's comfortable. Forget safety. Live where you fear to live. Destroy your reputation. Be notorious. I have tried prudent planning long enough. From now on I'll be mad."
हे अतिशय आवडले आहे. पण खेदाने म्हणावेसे वाटतेय की नॉर्मल लोकांना शक्य नाही.

In reply to by उगा काहितरीच

त्यात खेद अ‍ॅज सच काहि नाहि. बरेच लोक्स सामान्य आहेत म्हणुन काहिंना असं नटॉरिअस वगैरे जगायची इच्छा करण्याची चैन परवडते. शिवाय, आपल्याकडे जे नाहि त्याकडे मनाचा कल असतो. जीवन चांगलं चाललय ना, मग घाला त्यात काड्या. ता.क. : हे तुम्हाला पर्सनली उद्देशुन नाहि हो.

खलिल जिब्रानचा अख्खा ठोकळा वाचलाय. मला अतिशय आवडलेलं पुस्तक. यासारख्या अनेक सुंदर कथा आहेत. असो. आवडले भाषांतर

खलील जिब्रान रॉक्स सो ॲज तजो! अजून येऊ द्या! Sandy

उत्तम भावानुवाद!

In reply to by अर्धवटराव

हो भाषांतरच आहे. कथा चांगली वाटली ती इथवर पोचवण्यासाठी भाषांतर. आम्ही जयंत कुलकर्णी ह्यांच्या लेवलवर नाही जाउ शकत. आमची गरिबाची शब्द टू शब्द भाषांतरीत कथा गोड मानून घ्या गडेहो. :)

च्यायला हे खलील जिब्रानच्या कथा वाचायच्यात राव सगळ्या. चांगले भाषांतर सुच्वा नायतर करा यार कुणीतरी. आमचं इन्ग्लिश लैच नॉटोन्लीबटाल्सो हाय. :(

In reply to by अभ्या..


एक राहिलंच. ही सगळी कृपा त्या खलील रायाची आमची भूमिका पालखीच्या भोयाची. धन्स! :-)

अनुवाद छान! कथेत किती अर्थ दडलाये! खलील जिब्रानचे मराठीत 'द प्रोफेट' व्यतिरिक्त अजून काही अनुवादित झालेय का?

तजो, क्या बात है. कथा जबरदस्त आहे. रूपक नेहमीचंच आहे पण वेगळ्या रूपात भेटलंय. :-) गुलाम = इंद्रिये थेरडी = वासना मांजर = बुद्धी स्वप्न = वासनेचा सद्वासनेत परिवर्तित व्हायचा प्रयत्न स्वप्नार्थ = उपरोक्त प्रयत्नांतील अपयश प्रत्येक पात्र जडस्थ (=status quo) बदलायची क्षमता दुसऱ्यांत आहे असं धरून चाललंय. यातून काय बोध घ्यायचा ते उघड आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by lakhu risbud

छान रूपक कथा. गा पैंनी जो आयाम दिला तो जास्ती रोचक आणि साक्षात्कारी वाटला... सुटसुटीत तरी बंदा रुपया अनुभव. त.जो. धन्य्वाद, धुराळा/धुराडे/धगी/धुमाकुळ धागे धडक्मुक्त धाडला ! दूर देशी, देणे दु:खाइतांचे ,दाखवा दैव अन दैन्य दुरीतांचे !

कथा आवडली. अनुवादही आवडला. खलिल जिब्रान आवडतोच.

जमलेय. पण मूळ कथेचे नाव, पुस्तकाचे नाव दिले असते तर उत्तम! भाषांतर करताना तो उल्लेख जरूर असावा!

कथा आवडली. असच काहीतरी हलकफुलक टाकत जा. ही विनंती आहे साहेब, धमकी नाही!

खूप आवडली कथा

माननीय साहित्य संपादक, खाली माहिती मूळ लेखात जोडावी ही विनंती. मूळ कथा: The Lion's Daughter मूळ लेखक : Khalil Jibran पुस्तकाचे नाव:The Forerunner प्रथम प्रकाशन: 1920