पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?
हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे'
"क्या हुआ म्याडम?"
"मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?"
"आं? चेष्टा करताय काय म्याडम?"
"नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?"
"ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही'
"ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?"
"याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते."
"ती म्हणजे कोण?"
"ही फोटोतली बाई"
"हो, पण ती आहे कोण?"
"अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा."
"कशावरून?"
आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला.
"सांगाना कशावरून ती अडाणी आहे?"
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
"वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले.
"ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला.
"काय दिसतंय या फोटोत?"
"त्या मोडेलचे कपडे वैगेरे."
"तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."
"का भांडताय?"
"कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे."
"मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. "
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.In reply to कमीतकमी शिकलेली स्त्री जाहिरातीत कशी दाखवणार? by विवेक ठाकूर
In reply to काका.. मनातला अर्थ कुठुन आला? by पिलीयन रायडर
In reply to Even She can use it ! by विवेक ठाकूर
याचा अर्थ कमीतकमी शिकलेली सुद्धा ते कार्ड वापरू शकते इतकाच मर्यादित आहे. पण लेखिकेनं साडी नेसलेली म्हणजे अडाणी असा उलट अर्थ काढलायं, तो मनाचा आहे . शिवाय अशी कमेंट पंजाबी ड्रेसवालीला का नाही ? असा अनाठायी मुद्दा काढलायं ते वाचलं का ?पण प्रश्न तसाच आहे; ती "कमीतकमी" शिकलेली आहे, हे कश्यावरून?
In reply to याचा अर्थ कमीतकमी शिकलेली by अमृता_जोशी
In reply to तुम्ही तुमचाच मुद्दा खोडतांय ! by विवेक ठाकूर
`कमीतकमी टेक्नो सॅवी स्त्री सुद्धा ते कार्ड वापरू शकते' इतका मर्यादित अर्थ जाहिरातदाराला अपेक्षित आहे. \
जे ब्बात ! In reply to + १ by ब़जरबट्टू
In reply to एकंदरीत काय तर हा असा पोशाख by अमृता_जोशी
In reply to माझा एक प्रश्न. by बोका-ए-आझम
In reply to इवन शी कॅन युज ह्यावर आक्षेप by तर्राट जोकर
In reply to त्या वाक्याला माझाही आक्षेप आहे. by बोका-ए-आझम
In reply to त्या वाक्याला माझाही आक्षेप आहे. by बोका-ए-आझम
In reply to माझा एक प्रश्न. by बोका-ए-आझम
कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?अजिबात नाही, पण ती नेहमी मराठीच असली पाहिजे का? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे.
In reply to कामवाली बाई हा कमी दर्जाचा by सूड
In reply to माझा एक प्रश्न. by बोका-ए-आझम
कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?हो..
जर सगळे व्यवसाय महत्वाचे आहेत असं आपण म्हणत असू तर एखाद्या बाईचा पेहराव कामवाल्या बाईसारखा दाखवलाय असं पाहिल्यावर राग का यायला पाहिजे?सगळे व्यवसाय समान दर्जाचे/प्रतिष्ठेचे आहेत हे मी मानत नाही; महत्वाचे आहेत एवढे मान्य. कितीही समान आहे म्हटले तरी मोलकरीण आणि पंतप्रधान यांच्यात किंचितसा फरक असतोच..
In reply to कामवाली बाई हा कमी दर्जाचा by अमृता_जोशी
सगळे व्यवसाय समान दर्जाचे/प्रतिष्ठेचे आहेत हे मी मानत नाही; महत्वाचे आहेत एवढे मान्य. कितीही समान आहे म्हटले तरी मोलकरीण आणि पंतप्रधान यांच्यात किंचितसा फरक असतोच..काय फरक आहे? देशाला दोन्हीची गरज आहे. तुम्ही मिळणाऱ्या पगारावरून म्हणत असाल तर पंतप्रधान काही देशातले highest paid person नाहीत. मग दर्जा कमी असं जे तुम्ही म्हणत असाल तर ते कशावरून? कामाचा दर्जा ठरवण्याचे तुमचे निकष काय आहेत?
In reply to सगळे व्यवसाय समान दर्जाचे by बोका-ए-आझम
In reply to त्या कामातून मिळणारी सामाजिक by अमृता_जोशी
In reply to माझा एक प्रश्न. by बोका-ए-आझम
कामवाली बाई हा कमी दर्जाचा व्यवसाय आहे का?
हो, भारतात तर आहेच आहे. पण जाहिरातीत दाखवलेली बाई कामवाली आहे, हे कसे ठरवले ?In reply to उत्तर .. by ब़जरबट्टू
In reply to उत्तर .. by ब़जरबट्टू
In reply to कमी दर्जाचा व्यवसाय असला तरी by साहना
In reply to दोन्ही जाहिराती एकाच कंपनीच्या असल्या तरी वेगवेगळा मेसेज देतात by विवेक ठाकूर
In reply to दोन्ही जाहिराती एकाच कंपनीच्या असल्या तरी वेगवेगळा मेसेज देतात by विवेक ठाकूर
In reply to कपड्यावरून पात्रता ठरवता येत by बाळ सप्रे
असं म्हणायला लागलात तर सर्व चित्रपट , मालिकांना आरोपी करता येइलपण मालिकेत फक्त अडाणी बायकाच साडी परिधान करतात असे दाखवले तरंच तसे म्हणता येईल.
असं म्हणायला लागलात तर सर्व चित्रपट , मालिकांना आरोपी करता येइल.चित्रपट/मालिकांमध्ये आणि छापील जाहिरातींमध्ये फरक असतो.
In reply to कपडे सोडून इतर इखादी जरी by अमृता_जोशी
In reply to जाहीरातीतले ते एक पात्र मराठी by बाळ सप्रे
In reply to जाहीरातीतले ते एक पात्र मराठी by बाळ सप्रे
जाहीरातीतले ते एक पात्र मराठी अडाणी बाइ आहेपण ती बाई अडाणी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी पोशाख सोडला तर इतर काहीच वापरलं नाही. फक्त तसे कपडे घातले की ती अडाणी झाली का?
आणी याचा निषेध त्या स्टोअर मॅनेजरवर आरडाओरडा करून करणे म्हणजे तर कहर आहे.मी आरडा ओरडा केला म्हणून त्या जाहिराती त्याने काढून टाकल्या.
In reply to एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून by अमृता_जोशी
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे." "ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.इथे तर तो नुसतं म्हणतोय. काढून कुठे टाकल्या आहेत जाहिराती?
In reply to एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून by अमृता_जोशी
एकाच गोष्ट कितीवेळा बोंबलून सांगायची?बोंबलण्यापेक्षा मुद्देसूद बोला :-)
पण ती बाई अडाणी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी पोशाख सोडला तर इतर काहीच वापरलं नाही. फक्त तसे कपडे घातले की ती अडाणी झाली का?प्रत्येक वेळा सगळं उघडं करुन सांगायची गरज नसते. "even she can understand " यात ती अडाणी आहे हे आधी ठरलय ..ती अडाणी दाखवण्यासाठी हे कोर्टात सिद्ध करण्याइतके पुरावे देण्याची काहिही गरज वाटत नाही. आणि याचा अर्थ " तशा कपड्यातल्या सगळ्या बायका अडाणी" असा तुम्ही घेताय, जाहिरातदार नाही.
मी आरडा ओरडा केला म्हणून त्या जाहिराती त्याने काढून टाकल्या.याचा अर्थही तुमचे म्हणणे पटले म्हणून तुम्ही घेत असाल, पण त्याने कामाच्या वेळी कुठे तुमच्याशी निरर्थक वाद घालत बसणार अशा कारणाने केले असण्याची शक्यता जास्त आहे.. :-)
In reply to अमृता,हाच आक्षेप मी आमच्या by नूतन सावंत
In reply to मॅनेजर वा इनचार्ज काय म्हणाला by मराठी कथालेखक
आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि नाही हे महत्वाचं नाही, तिनं तो रोल केलाय अडाणी असण्याचाआणि अडाणी असण्याच्या रोलसाठी फक्त साडी घातली आणि काही महाराष्ट्रीयन दागिने, बांगड्या घातल्या की झालं; इतर काही करायची गरज नाही.
१) एकही बाई अडाणी नसतेच असं म्हणायच का ?(म्हणजे मुळात बाईला अडाणी का दाखवलं म्हणून वाद आहे का ?)अजिबात नाही.
की अडाणी बाई साडी नेसत नाही असं म्हणायचं आहे (साडी नेसणारी प्रत्येक बाई अडाणी नसेल, प्रत्येक अडाणी बाई साडी नेसत नसेल, पण म्हणून साडी नेसणारी अडाणी बाई अस्तित्वाच असू शकत नाही असं म्हणायचं का ?) आणि जर हे दोन्ही मुद्दे नसतील तर हा धागा अगदीच निरुद्देश होत नाही का ?शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी बाई अस्तित्वात असेल काय?
In reply to आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि by अमृता_जोशी
In reply to आणि मुळात मॉडेल अडाणी आहे कि by अमृता_जोशी
आणि अडाणी असण्याच्या रोलसाठी फक्त साडी घातली आणि काही महाराष्ट्रीयन दागिने, बांगड्या घातल्या की झालं; इतर काही करायची गरज नाही.इतर काय करणार अजून ?आणि साडी , महाराष्ट्रीयन दागिने घातलेली स्त्री अडाणी असूच शकत नाही असे नाही ना ? मग दाखवली अशी एखादी स्त्री तर काय चुकलं ?
शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी बाई अस्तित्वात असेल काय?असेल की, न असायला काय झालं ? पुढे कुणी तशीही स्त्री (शोर्ट स्कर्ट घालणारी अडाणी) दाखवेल एखाद्या जाहिरातीत वा कलाकृतीत. हरकत नाही.
In reply to "पारंपारीक पोषाख केलेली बाई by 'पिंक' पॅंथर्न
In reply to चुडीदार आणि साडी हे दोन्ही by मराठी कथालेखक
In reply to "महाराष्ट्रीय पारंपारीक पोषाख by 'पिंक' पॅंथर्न
In reply to "महाराष्ट्रीय पारंपारीक पोषाख by 'पिंक' पॅंथर्न
In reply to मुळात (माझ्या २ by मराठी कथालेखक
In reply to 'So easy even she can use it' by मार्मिक गोडसे
आलिया भट ह्या जाहीरातीसाठी फिट होतीपण आलिया भट्ट साडीमध्ये खूप गोड दिसते (२ States मध्ये) म्हणून तिला साडी नेसवूनच जाहिरात केली तर पुन्हा पंचाईत होईल :)
तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही.
ग्रामीण किंवा अडाणी ? सगळे ग्रामीण अडाणी असतात हे किती सहज लिहून जातात. In reply to मोलकरीण बाई by ससन्दीप
In reply to मोलकरीण बाई by ससन्दीप
In reply to मोलकरीण बाई by ससन्दीप
In reply to मोलकरीण बाई by ससन्दीप
पण जेव्हा चित्रपटाचा/ जाहिरातींचा प्लाॅट हा महाराष्ट्राबाहेरचा दाखविण्यात येतो तेव्हाही मोलकरीण ही मराठीच दाखवायला हवी का? अगदी दिल्लीसारख्या ठिकाणी?असहमत..उदाहरण द्या. अनेकदा हिंदी चित्रपट/मालिकांचा प्लॉट मुंबईचा असतो (निदान पुर्वी तरी असायचा).
In reply to ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने by संदीप डांगे
In reply to ह्या प्रकरणाच्या अनुषंगाने by संदीप डांगे
या बघा मंगळावर यान पाठवणार्या इस्रोच्या शास्त्रज्ञ. अजून काही सांगायला पाहिजे का?
In reply to इस्रो मधल्या शास्त्रज्ञ by पैसा
In reply to सौ सुनार की और एक पैसाताईकी by तर्राट जोकर
सौ सुनार की और एक पैसाताईकी+१+१..
In reply to इस्रो मधल्या शास्त्रज्ञ by पैसा
In reply to क्षमा करा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to मुद्दा by माहितगार
In reply to मान्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण दुर्दैवाने पोषाखावरुन बर्याच गोष्टी ठरवल्या जातात ही गोष्टही मान्य केली पाहिजे.अंशतःच सहमत आहे. कस्टमर रिलेशन मध्ये तुम्ही बोलायला चालू करता तो पर्यंतच तुमचे व्यक्तीमत्व आणि पोषाख म्हणजे पहिल्या प्रभावा पर्यंतच मर्यादीत असते, त्यानंतरचे तुम्ही काय बोलता त्यावर अवलंबून असते, तसेच अभिनयात दृष्य रुप अभिनयाची संधी मिळे पर्यंतच पहिला प्रभाव म्हणून उपयूक्त असू शकते, नंतरचे करीअरमध्ये प्रत्यक्ष अभिनय जमतो की नाही याचा संबंध राहतो एकदा कलाकार अभिनयासाठी तुम्ही स्विकारला की त्याचे दिसणे आणि त्याने घातलेला पोषाख दुय्यम ठरतो. एखादा गर्भ श्रीमंत भिकार्याचा वेष घालून जरी फिरला तरी लोक त्याला मुजराच करतील की नाही. ज्याच्याकडे गर्भ श्रीमंती नसते त्याला त्याचे प्रदर्शन करावे वाटते म्हणून लोक दिसणे आणि पोषाखादी वरच्या गोष्टीच्या मागे लागतात. गर्भ श्रीमंतीत वाढलेली व्यक्ती कदाचित तेवढी प्रदर्शनोत्सुक राहणार नाही माझे मत.
In reply to केवळ पहिला प्रभाव - माझे मत by माहितगार
In reply to पहिल्याच प्रभावाबाबत पोषाखाचा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्याचा पहिला प्रभाव पेहराव ठरवेल, जो पर्यंत त्याची माझ्याशी नीट ओळ्ख होत नाही.असे बरेच लोक करतात मी तसे करणे आवर्जून टाळतो, मी समोरच्या व्यक्तीला पूर्ण संधी देतो आणि मगच निर्णय करतो.
In reply to क्षमा करा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काही गोष्टी जाहिरात by सस्नेह
In reply to अहो, मुळात अमुक एक कार्ड by गवि
In reply to अहो, मुळात अमुक एक कार्ड by गवि
In reply to अनुषंगिक अवांतर by माहितगार
In reply to अहो, मुळात अमुक एक कार्ड by गवि
In reply to गविसर, by संदीप डांगे
एखादं कार्ड हे कशाच्या तुलनेत सोपं आहे ह्याचा आपला थोडा गैरसमज झालाय. हे कार्ड इतर कोणत्या कार्डाच्या तुलनेत सोपं आहे असे जाहिरातदाराने म्हटलेले नाही.तसं थेट म्हटलेलं नाही, पण शब्दरचना पहा. "कार्ड सो ईझी दॅट इव्हन शी कॅन यूज इट" हा मजकूर वरच्या पोस्टरपेक्षा वेगळा आहे. इथे वापरायला सोपं असणं हाच मुद्दा आहे. आणि हे कार्ड इतकं सोपं आहे की तीही वापरु शकेल, याचा अर्थच मुळी इतर काही कार्ड्स ही वापरु शकली नसती, पण ईझीकार्ड मात्र सोपेपणामुळे तिलाही वापरता येईल. अन्यथा या स्पेसिफिक कार्डला काही खास गुण नसल्यासारखंच होईल की. बाकी मुद्दे मी खाली एका प्रतिसादात दिलेच आहेत. मुळात तुम्ही म्हणताय तसं ब्रिफमधे चुकलंय. जे मुद्दे पुढे आणायला हवेत ते न आणता भलत्याच मुद्द्याला हायलाईट केलंय. इथे जाहिरात बनवणारा गंडलाय. प्रीपेड कार्डमधे रिस्क कमी असते. जितके पैसे लोड केलेत तितकीच मॅक्झिमम रिस्क असते. ते लोड करताना त्रासच होतो. शिवाय एकाच दुकानाचं बंधन येतं, पण अगेन्स्ट ऑल धिस, तुम्ही कामवालीला ते कार्ड देऊन (कॅशऐवजी) तिला पाठवू शकता, कारण अगदी पिन असल्यास आणि तो शेअर केल्यासही, प्रीपेड कार्ड फक्त स्टारबझारमधून सामान खरेदी करण्यापुरतंच व्हॅलिड असल्याने आणि तुमचा बँक अकाउंट याच्याशी निगडीत नसल्याने त्याची प्रायव्हसी जपली जाते. दुरुपयोगाची शक्यता एका दुकानातल्या सामानापुरती आणि टॉप अप केलेल्या रकमेइतकी मर्यादित राहते. हा रिस्कचा / सेफ्टीचा मुद्दा हायलाईट करण्याऐवजी नॉन एक्झिस्टिंग सोपेपणाचा मुद्दा हायलाईट केलाय. तुम्ही तर क्षेत्रातले तज्ञ आहात. तुम्हीच सांगा, सोपेपणा ही पर्टिक्युलर कन्सेप्ट कधीतरी तरी इतर तत्सम प्रॉडक्ट्सशी तुलना केल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकेल का? "आमच्या डिटर्जंट पावडरने कपडे स्वच्छ होतात" हे विधान इतकं ट्रिव्हियल आहे की त्याला शून्य जाहिरातमूल्य आहे. यात निश्चितच इतरांपेक्षा जास्त शुभ्र होतात, किंवा इतके टक्के मळ जास्त निघतो असाच भाव असतो.
In reply to तुम्ही माझाच मुद्दा सपोर्ट by गवि
तुम्ही तर क्षेत्रातले तज्ञ आहात. तुम्हीच सांगा, सोपेपणा ही पर्टिक्युलर कन्सेप्ट कधीतरी तरी इतर तत्सम प्रॉडक्ट्सशी तुलना केल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकेल का?येऊ शकते. एक प्रोडक्ट दुसर्यापेक्षा 'सोपेपणात अधिक चांगले' असे होऊ शकते. पण 'ह्याच्यापेक्षा ते सोपं' हे तत्व 'तत्सम' प्रोडक्टबद्दल डिफरंशीएट करणारा घटक असू शकत नाही. कारण मग ते प्रोडक्ट 'तत्सम' राहणार नाही, त्यापेक्षा अॅडव्हान्स होईल. त्याची कॅटेगीरी बदलेल. एकामेकांशी स्पर्धा करणारे प्रॉडक्ट्स ते करत असलेलं काम दुसर्यापेक्षा अधिक चांगलं कसं करु शकतात हे सांगू शकतात. पण पद्धत वेगळी असेल तर स्पर्धा संपते. जसे दिल्लीहून बेंगलोरला बस, ट्रेन, विमान ह्या प्रकारे जाता येते. म्हटलं तर आपल्याला ह्यात स्पर्धा दिसेल. पण तसे नाही ह्या कॅटेगीरी आहेत. ह्यात कोणीही कोणाशी स्पर्धा करत नाही. (कधीतरी कोणत्यातरी दोहोंचे रेट्स एकाच पातळीवर आल्यावर होऊ शकते. मागे कुणा विमानसेवेचे दर कमी झाल्यावर त्यांनी ट्रेनच्या पैशात विमानाने लवकर पोचा अशी जाहिरात केल्याचे स्मरते.) ह्यात बससेवावाले एकमेकांशी दर, आरामदायक प्रवास, वेळेची शिस्त पाळणे इत्यादी बाबतीत स्पर्धा करतील. पण विमानवाले बसवाल्यांशी त्याच बाबतीत स्पर्धा करत नाहीत. तुम्ही दिलेले डिटर्जंटचेच उदाहरण घेऊया. डिटर्जंट यायच्या आधी लोक पाण्याने, लवण वापरुन कपडे धुवत होते. त्यात कष्ट होते, डिटर्जंट आल्यावर कपडे धुणे 'सोपे' झाले. आता अनेक डिटर्जंट बाजारात आल्यावर ते सोपेपणात स्पर्धा करणार नाहीत तर त्या सोपेपणाला मदत करणारे घटक अधिक चांगले कसे आमच्याच पावडरीत आहेत असे सांगतात. लाँड्री-ड्रायक्लिनरवाला डिटर्जंटशी स्पर्धा करणार नाही. भले तो सांगेन घरी कपडे धुण्याची कटकट करण्यापेक्षा माझ्याकडे द्या, धुवुन इस्त्री करुन देइल. म्हणजे तो सोपेपणाची पुढची पायरी घेतोय. ह्यात अनेक लाँड्रीवाले आमच्याकडे कसे जास्त चांगले कपडे धुतल्या जातात याची जाहिरात करतील. केस धुण्याचे शाम्पू व केस धुण्याचा इतिहास-भविष्य बघितले तर हेच उदाहरण अजून गमतीदार होईल. शाम्पूत विटामीन टाकणारे महाभाग केस धुण्याच्या रिठे-शिकेकाई वापरण्याच्या तुलनेत सोपी असलेल्या क्रियेत इतर तत्सम प्रॉडक्टच्या तुलनेत फक्त घटक (तेही कल्पनेतले) वाढवल्याने आपलं शाम्पू इतरांपेक्षा जास्त चांगलं आहे असं सांगत आहेत. माझ्यामते माझा काही गोंधळ होत नाही आहे. पण तुम्हाला काही खटकले तर नक्की सांगा. त्यावर विचार करेन.
In reply to तुम्ही म्हणताय तो मुद्दाही by संदीप डांगे
In reply to तुम्ही म्हणताय तो मुद्दाही by संदीप डांगे
In reply to प्रतिसाद आवडला by श्रीरंग_जोशी
In reply to नाही पंत. by बोका-ए-आझम
In reply to काही गोष्टी जाहिरात by सस्नेह
In reply to दुरुस्ती आणि सत्य. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to हो . by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काका.. मनातला अर्थ कुठुन आला?