पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?
आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या
हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे'
"क्या हुआ म्याडम?"
"मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?"
"आं? चेष्टा करताय काय म्याडम?"
"नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?"
"ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही'
"ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?"
"याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते."
"ती म्हणजे कोण?"
"ही फोटोतली बाई"
"हो, पण ती आहे कोण?"
"अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा."
"कशावरून?"
आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला.
"सांगाना कशावरून ती अडाणी आहे?"
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
"वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले.
"ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला.
"काय दिसतंय या फोटोत?"
"त्या मोडेलचे कपडे वैगेरे."
"तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."
"का भांडताय?"
"कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे."
"मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. "
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.
हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे'
"क्या हुआ म्याडम?"
"मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?"
"आं? चेष्टा करताय काय म्याडम?"
"नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?"
"ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही'
"ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?"
"याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते."
"ती म्हणजे कोण?"
"ही फोटोतली बाई"
"हो, पण ती आहे कोण?"
"अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा."
"कशावरून?"
आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला.
"सांगाना कशावरून ती अडाणी आहे?"
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात."
"वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले.
"ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला.
"काय दिसतंय या फोटोत?"
"त्या मोडेलचे कपडे वैगेरे."
"तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत."
"का भांडताय?"
"कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे."
"मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. "
"ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे."
"ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला.
घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.वर्गीकरण
प्रतिक्रिया
मुद्दा पटला... +१११११११११
केवळ वेशभूषेवर सर्व गृहीतकं न
खटकला असता
मुद्दा पटला..
ते सत्यच आहे. वस्तुस्थितीच
१००% सहमत
पटलं..
आजचं समाजमन... हम्म्म.
अभ्या, ब्रीफ चुकतंय दादा.
येप्प. इझी टू यूज हाच यूएसपी.
आणि शॉपिंगबाबत म्हणाल तर
ग्लॕड टु सी यु संदीपभाऊ !
अरे वा!
+१
(No subject)
चिगोशी सहमत आहे.
लेख आवडला. आशयाशी सहमत!
लेख पटला!! विशेष म्हणजे,
मिपाची आजकाल सवयच झाली आहे
मिपाची आजकाल सवयच झाली आहे
आदिम मानसिकतेतून हिंदूंनि
तर्कदोषांचे घरटे !!
@ गरीब चिमणा जिन्स आणि टि
अनुषंगिक अवांतर
हो स्टनफोर्ड बद्दल वाचला होता
मुद्दा पटला.
लेख पटला.
हम्म..
मुलाखत आणि लग्न दोन्ही स्पेशल
प्रातिनिधिक उदाहरण ?
अगदी...
+१
मला वाटते समाजात जवळ्पास
माहितगारजी, आपण इथे
पण...
माझा दृष्टीकोण
दोन्ही जाहिराती एकाच कंपनीच्या असल्या तरी वेगवेगळा मेसेज देतात
एकंदरीत काय तर हा असा पोशाख
कमीत कमी शिकलेली आहे हे
कमीतकमी शिकलेली स्त्री जाहिरातीत कशी दाखवणार?
काका.. मनातला अर्थ कुठुन आला?
Even She can use it !
याचा अर्थ कमीतकमी शिकलेली
तुम्ही तुमचाच मुद्दा खोडतांय !
+ १
`कमीतकमी टेक्नो सॅवी स्त्री सुद्धा ते कार्ड वापरू शकते' इतका मर्यादित अर्थ जाहिरातदाराला अपेक्षित आहे.\ जे ब्बात !तसं नाय वो
माझा एक प्रश्न.
इवन शी कॅन युज ह्यावर आक्षेप
त्या वाक्याला माझाही आक्षेप आहे.
हा ही मुद्दा चांगला आहे.