Skip to main content

पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?

लेखक अमृता_जोशी यांनी सोमवार, 04/04/2016 02:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या ad ad हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे' "क्या हुआ म्याडम?" "मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?" "आं? चेष्टा करताय काय म्याडम?" "नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?" "ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही' "ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?" "याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते." "ती म्हणजे कोण?" "ही फोटोतली बाई" "हो, पण ती आहे कोण?" "अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा." "कशावरून?" आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला. "सांगाना कशावरून ती अडाणी आहे?" "काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात." "वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले. "ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला. "काय दिसतंय या फोटोत?" "त्या मोडेलचे कपडे वैगेरे." "तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत." "का भांडताय?" "कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे." "मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. " "ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे." "ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला. घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 40404
प्रतिक्रिया 200

प्रतिक्रिया

त्यात एवढं चिडायला काय झालं,साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात य मताचा मी आहे.पंजाबी सलवार कुर्तावाल्या जरा आणखी स्मार्ट व जीन्स टॉपवाल्या एकदम फक्कड( अकलेने)

In reply to by गरिब चिमणा

तुमच्या घरातील स्त्रीयांनाही तुम्ही हाच नियम लावता का ? कीती तो काडया टाकण्याचा प्रयत्न !!

In reply to by मितान

गरीब बिचारा चिमणा साहेब, काड्या कमी पडल्या वाटतं घरट्यासाठी

In reply to by अजया

ओ...कपडे घट्ट झाले की डोक्यातली अक्कल वाढते असे म्हणायचे आहे त्यांना...मस्तय ना...खानावळीचे पिच्चर बघताना उघडेबंब बसायचे...डोक्याची विचार करायची क्षमताच नाहिशी होणार...मग खानावळीच्या पिच्चर मध्ये लॉजिक नाही शोधत बस्णार =))

In reply to by नूतन सावंत

चिमणु म्हणु नका ओ. गरिब किंवा दरिद्री चिमण्या म्हणा. चिमणु म्हणलं की मला हाक मारल्यासारखं वाटतं (काही मिपाकर मित्रं फोनवर चिमणु म्हणतात म्हणुन)

In reply to by गरिब चिमणा

त्यात एवढं चिडायला काय झालं, साडीवाल्या बायका जनरली डोक्याने मठ्ठ असतात या मताचा मी आहे.
तुम्ही मठ्ठ धोतरवाले आहात की हुश्शार जिन्सवाले.

पहिल्या जाहिरातीमधे पण प्रॉब्लेम आहे. "सदगृहस्थाची" व्याख्या सेक्सिस्ट आहे. नेहमी बिल "सदगृहस्थाने" द्यावे असे छुपे गृहितक त्यात आहे.

मुद्दा पटला. तुमचा आक्षेप योग्य आहे. सद्गृहस्थ वाली जाहिरात तर येडपटपणाचा कळस आहे. कशाचा कशाला पत्ता नाही. इंग्रजी भ्रष्ट रुपांतर. लॉस्ट इन ट्रान्सलेशन.

अर्र स्वाक्षरी टाकायची राहिली... प्यारीस,लंटन, फ्रँकफुर्ट आणि हाँगकाँगातही पारंपारीक पंजाबी सलवार कुडता घालून रस्त्यावर पोळीचटणीचा रोल खात हिंडणारी अडाणी गावंढळ मितान ;)

In reply to by इशा१२३

पण आपण कसे आहात हे सिद्ध करण्याची ही अहमीका कशासाठी ? कोण मिपाकर कसे आहेत हे आम्ही ओळखत नाय का ? (भोगा आता फळं) -दिलीप बिरुटे

In reply to by इशा१२३

तुम्ही स्व:ता प्यारीस, जर्मनी मध्ये असे कपडे घातले म्हणून स्वत:ला गावठी म्हणता, वर कपड्यावरून लायकी काढु नये म्हणता. आय डोंट केअर हा मुद्दा असेल तर ठिक आहे, पण विदेशात पंजाबी ड्रेस घातला म्हणून जर तुम्हाला गावठी दिसतो असे अंश्ताजरी वाटत असेल तर वर दिलेली जाहिरात बरोबर आहे.

In reply to by ब़जरबट्टू

पण विदेशात पंजाबी ड्रेस घातला म्हणून जर तुम्हाला गावठी दिसतो असे अंशतः जरी वाटत असेल तर वर दिलेली जाहिरात बरोबर आहे. मस्त मुद्दा पकडलायं !

In reply to by विवेक ठाकूर

मुद्दा १००% बरोबर. -दिलीप बिरुटे

In reply to by अजया

चिमण्याने पंजाबी सुट घालणा-यांना स्मार्ट म्हंट्लय..भारतात .. :) तुम्ही तोच ड्रेस विदेशात घातल्यास आपल्याला गावठी समजतिल हे पहिलेच गृहीत धरलेय. किंवा आता चिमण्यासारखेच तुम्ही विदेशात पंजाबी ड्रेस घालणा-यांना (स्वत:सकट) गावठी समजता असा अर्थ आम्ही का घेऊ नये ?

मुद्दा अगदी रास्त आहे. जाहिरात हटवली पाहिजे हे लक्षात आणून दिलंत ते बरं झालं. मागे एकदा एक मोठी पोस्टर अॅड एका मॉलमधे होती. ब्यूटी ट्रीटमेंट न घेतलेली म्हणून एक साधी केशरचनावाली विनामेकप मुलगी दाखवून तिचं वर्णन खास मराठी फॉन्टमधे "काकूबाई" असं छापलेलं आणि तिथेच बाजूला पाश्चात्य मेकअप आणि केशरचना करुन तिथे रोमन लिपीत Beautiful smart की आणि काहीतरी वर्णन. कुठेतरी खटकलं होतं तेव्हाही.

In reply to by अमृता_जोशी

वर आठवणीनुसार मोघम तपशील लिहीला होता. त्यात शब्द चुकलेत. नेमके शब्द आत्ता आठवले ते खाली देतोय. साधी वेषभूषा आणि केशरचना असा मुलीचा फोटो. त्याचं शीर्षक : "अगंबाई" look मेकअप आणि केशभूषावाली दुसरी मुलगी. शीर्षकः Hi-Fi look. एकवेळ काकूबाई चालला असता (प्रौढ लुक असल्यास) पण अगंबाई हे अगदी आवर्जून हेटाळणीयुक्त लिहिणं आणि इंग्लिश लिपीतली बाकी संपूर्ण जाहिरात असताना तो एक शब्द देवनागरी फाँटात लिहिणं हे आवडलं नाही. मराठीचा कट्टर पुरस्कर्ता किंवा अस्मिताधारक नसूनही.

किमान स्त्रीयांनी तरी जोरदार आक्षेप घ्यायला हवा अश्या जाहीरातींना. किमान अश्या साठी की फक्त पुरुषांनी तक्रार केली तर हेटाळणीच जास्त केली जाते.आणि आजू बाजूच्या स्त्रीयाही तटस्थ राहिल्यास जास्त पंचाईत होते अलिकडेच आर टी ओ त स्वतंत्र रांग स्त्रीयांसाठी आहे हे सांगण्याच्या प्रयत्नात इतरांकडून अपमान्जनक टीपण्णी अनुभवलेला नाखु

तुम्ही केलेली तक्रार अगदी योग्य आहे. पोषाखावरून पात्रता नक्कीच ठरत नाही, पण समाज मात्र ठरवत असतो. नेहमीच्या सार्वजनीक ठिकाणांवर मला स्वतःला पोषाखावरून मिळणारी वेगवेगळी वागणून अनुभवली आहे. 'सो-कॉल्ड' अडाणी बाईकरता असलेली जाहिरात इंग्रजीत कशाला बरं लावली असावी हा प्रश्न आहेच. तसेच दोन्ही जाहिराती डिस्क्रिमिनेशन दाखवणार्‍याच आहेत. त्यातून हेच दिसतं की स्त्रिला ना आर्थिक स्वातंत्र्य आहे ना शिक्षण! बाकी उरले ते मराठीतले भाषांतर!! त्याबद्दल तर काय बोलावे? आताच एका मोठ्या रस्त्यावरच्या भल्यामोठ्या बोर्डवर एका दुचाकीची जाहिरात वाचून आलेय, 'इंडियाची नवी उम्मीद'

In reply to by स्मिता.

मराठीची मोडतोड हा एक मुद्दा आहेच. सर्वदूर मूर्खपणा सुरुच असतो. रेडिओ, व्रुत्तपत्रे वाहिन्या, सर्वत्र मराठी सक्तीने सुधारायची चळवळ उभी रहायला हवी. लेखाचा मूळ मुद्दाही महत्वाचा आहे. आमच्याच उद्योग समूहाचे हे दुकान दिसते.त्यामुळे यावर नाराजी पोहोचवत आहे, बघूया कसा प्रतिसाद मिळतो ते..!

उपरोक्त जाहीरात छायाचित्रात दाखवल्या प्रमाणे https://www.starbazaarindia.com ही स्टार बझारची वेबसाईट असावी. A TATA & TESCO ENTERPRISE असे वेबसाईट्च्या तळाशी लिहिले आहे, टाटाग्रूपचा हा कोड ऑफ कंडक्ट बहुधा यांना लागू पडावयास हवा. कंपनीचे नाव Trent Hypermarket Limited असावे, कस्टमर फिडबॅक दुवा (बहुधा उघडत नाही). कॉंटॅक्ट अस दुवा (अर्थात तेथील पत्ता इमेल पत्ता वरीष्ठांपर्यंत संदेश पोहचवण्यास पुरेसा असेल असे वाटत नाही). Jamshed S. Daboo हे मॅनेजींग डायरेक्टर अथवा सिईओ असावेत आणि या इन्व्हेस्टर रिलेशन पानावर कॉर्पोरेट ऑफीसचे फोनक्रमांक उपलब्ध असू शकण्याची शक्यता वाटते. अशा तक्रारीच्या बाबतीत टाटा सारख्या मोठ्या ग्रुप मध्ये स्टोअर मॅनेजरच्या लेव्हलवरून पानही हलण्याची शक्यता कमीत कमी असेल. मोठ्या कार्पोरेट्स मध्ये तुमची तक्रार लेखी मॅनेजींग डायरेक्टरच्या नावाने असेल आणि सिईओच्या सेक्रेटरीशी तुम्ही बोलत नाही तो पर्यंत हलचालीची खूपही अपेक्षा ठेवू नये. तुम्ही जो पर्यंत अशा लेव्हल पर्यत पोहोचत नाही तो पर्यंत अशी एखादी जाहीरात पुन्हा येणार नाही हे सांगणे कठीण असावे. असो. जाहीरातींवरील आक्षेप नोंदवण्याची एक स्वतंत्र व्यवस्था आहे त्यांची अधून मधून जाहीरात दिसते. त्यांच्याकडे सुद्धा तक्रार नोंदवली पाहीजे.

In reply to by माहितगार

बरेच वेळा जाहिराती ह्या गंडलेल्या असतात. त्यातला संदेश आपल्याला स्वतःच समजून घ्यावा लागतो. ज्या जाहिरातीमधे प्रतिभेसोबत समंजसपणा आणि संवेदनशीलता असते ती जाहिरात जास्त प्रभावी असते. अन्यथा अनेक उथळ जाहिराती आपण नेहमीच बघतो. आजच एक गंडलेली जाहिरात पाहिली, मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत जनजागरण करण्याच्या उत्तम विचाराचे समर्थन करणारी दैनिक भास्करची जाहिरात. त्यात दाखवलेय की एका सरकारी शाळेतून एक माणूस त्याच्या लहानश्या मुलीला ओढून घरी घेवून जात असतो तेव्हा त्या मुलीच्या वर्गातील इतर लहान मुले तिला धरून पुन्हा शाळेकडे खेचतात. त्या चिमुरडीची एकीकडून वडील आणि दुसरीकडून वर्गमित्र-मैत्रिणी अशी बराच वेळ ओढाताण झाल्यावर वडिलांना साक्षात्कार होतो आणि ते मुलीचा हात सोडतात. सगळी मुले खाली पडतात पण विजयी मुद्रेने उठत कपडे झटकतात. संदेश काहिसा असा, 'बुरी जिद के आगे अच्छी जिद जरूरी है' या जाहिरातीत संदेश कितीही चांगला असला तरी (माझ्या) लक्षात राहिली ती त्या चिमुरडीच्या हाताला धरून केलेली ओढाताण! अश्याप्रकारे खरंच ओढलं तर एवढ्या कोवळ्या जीवाचा हात खांद्यातून नक्कीच सरकेल.

In reply to by स्मिता.

सुयोग्यतेचे निकष आणि अप्रत्यक्ष प्रबोधन म्हणून आपण करतो अशा चर्चांचे मुल्य आहे, त्याच वेळी प्रत्यक्ष जाहीरात एजन्सी आणि त्यांचे स्पॉन्सर्स पर्यंत तुमचे म्हणणे पोहोचत नाही तो पर्यंत परिवर्तनासाठी लागणारी शृंखला पूर्ण होण्याची शक्यता कमी असेल असे माझे मत

In reply to by माहितगार

तुमचं मत अगदी बरोबर आहे. योग्य ठिकाणी तक्रार केल्याशिवाय परिणाम दिसण्याची शक्यता नाहीच!

In reply to by माहितगार

याला उत्तर आहे अमितेश कुमार--अम्रुता जोशी यांच्या लेखावरुन असे समजते की हि घटणा औरंगाबाद मधील प्रोज़ोन mall ची आहे.. औरंगाबाद चे cp ((police commissioner))पोलिस आयुक्त अमितेश कुमार. हे अशा विषायांच्या पुर्णपणे विरोधात आहेत..खास करुन स्त्रिंयावरील अत्याचार आणि हेटाळणी((मग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असेना)) त्याना फक्त ही बाब कळायला उशिर.. पण तक्रार योग्य हवी या विषयावर त्याना लेखि पत्र किंवा तोंडी सांगितले तरी भरपुर झाले..पुढील कर्यवाही ते स्वता: करतात हे सर्व औरंगाबाद कराना माहितीच आहे

केवळ वेशभूषेवर सर्व गृहीतकं न ठेवता या ठिकाणी फक्त थोडासा बदल करुन ही जाहिरात तितकी आक्षेपार्ह ठरली नसती असं वाटतं. या जाहिरातीच्या सीरीजमधल्या सर्व फोटोंच्या बाजूला दोन काल्पनिक बायोडेटासारख्या वर्णनात्मक ओळी टाईप केलेल्या दाखवायच्या: उदा. पहिल्या चित्रात, मिसेस अमुक तमुक, वयः ३५,शिक्षणः एम कॉम, व्यवसायः अकाउंटंट, मिशनः रीटेल थेरपी इत्यादि. दुसर्‍या चित्रात उदा: सौ. अमुकबाई, वय तमुक,शिक्षणः पाचवी, व्यवसायः हाऊसमेड, मिशनः महिन्याचं किराणासामान यादीप्रमाणे आणणं असं हलकंफुलकं करता आलं असतं. आक्षेपाची तीव्रता तरी कदाचित कमी झाली असती. आणखी एक उत्सुकता. इथे जर धोतर पांढरा सदरा किंवा मुंडासं फेटावाला खेडेगावातला दिसणारा पुरुष दाखवला असता आणि यालाही कार्ड वापरता येतं असा उल्लेख असता तर तितकाच खटकला असता का? जस्ट क्युरिऑसिटी.

मुद्दा पटला.. आपला आक्षेपही योग्यच आहे. मात्र समाजात जवळपास नेहमीच कपड्यांवरुन लायकी (पात्रता) ठरव्ली जाते, हीदेखील सत्य आहे. म्हणूनच तर ब्रँडेड कपड्यांची दुकाने चालतात ना..

In reply to by चिगो

ते सत्यच आहे. वस्तुस्थितीच आहे. फक्त काहीशी दुरित किंवा पूर्वग्रहदूषित नजर ही वस्तुस्थिती असेल तरी तिचा उपयोग जाहिरातीत अशा प्रकारे प्रमोशनसाठी करणं हे आक्षेपार्ह आहे. उदाहरणार्थ, लंगड्या माणसाला अनेक जण हसतात, वेडंवाकडं, मंदगतीने चालण्यावरुन टर उडवतात किंवा चिडवतात हे खरं असेल, म्हणून जाहिरातीत "लंगडा भी भागता है" असं म्हणून एनर्जी ड्रिंकची जाहिरात करणं अयोग्य वाटेल. बेकायदेशीर नसलं तरी.

In reply to by गवि

तुमचं म्हणणं पटलं, गवि.. मला एवढंच म्हणायचं आहे, कि ती जाहीरात हे आजच्या समाजमनाचं प्रतिबिंब आहे.. चुकीचं आहे, but it also shows how deeply entrenched these prejudices are..

In reply to by चिगो

आजचं समाजमन... हम्म्म. असो. आजच्या मिपामनाचा जरा कानोसा घेऊयात. "अडाणी स्त्री/पुरुष सुध्दा हे कार्ड वापरु शकतात" ह्या हेडलाइनला सूट होणारे काय बरे घेता येईल? बाकी कॅशलेस वगैरे डिट्टेल दिलेतच खाली. सो.. चित्र काय अथवा कशाचे घेता येईल?

In reply to by अभ्या..

अभ्या, ब्रीफ चुकतंय दादा. 'अडाणी स्त्री/पुरुष सुद्धा हे कार्ड वापरु शकतात' असं ब्रीफ असेल म्हणजे हे कार्ड जे वापरतात ते अडाणी असतात, असू शकतात असा अर्थ निघेल. माझ्यामते मुळ ब्रीफ असं नसावं. एजंसीला मिळालेलं ब्रीफ असे असेल की 'हे कार्ड वापरायला खूप सोपे आहे. फार डोकं लावायची गरज नाही. इझी टू युज, नथिंग कॉम्प्लीकेटेड.' एजंसीतल्या अतिशाहाण्यांनी त्याचं 'अडाणी' हे इंटरप्रीटेशन करुन आपले पुर्वग्रह दाखवून दिलेत.

In reply to by अभ्या..

आणि शॉपिंगबाबत म्हणाल तर कोणतंही कार्ड इतरांपेक्षा वापरायला जास्त "सोपं" किंवा जास्त "अवघड" असू शकणं हीच मोठी निरर्थक कल्पना आहे. ते एक असोच.

In reply to by बोका-ए-आझम

संदीपभौ, येत राहा हो अधून मधून..

In reply to by चिगो

>>>>>>मात्र समाजात जवळपास नेहमीच कपड्यांवरुन लायकी (पात्रता) ठरव्ली जाते, हीदेखील सत्य आहे. अगदी बरोबर. कपडे हे तुमचं व्यक्तिमत्व अधोरेखित करतं. बऱ्याचदा तसं नसतं पण त्याचा प्रभाव पडतो आणि संबधित माणूस कसा असावा याचा एक मनातल्या मनात आडाखा बांधल्या जातो. एखाद्या स्वागत कक्षात साधी साडी घालून चेहरा न रंगवता अगदी सहज गावाकडील स्त्री जशी साधारण दिसते आणि असते अशा स्त्रीचा अभ्यंगतावर फारसा प्रभाव पडणार नाही, पण तिथेच टाय कोट शॉर्ट अशी असलेल्या स्त्रीला खूप फाफट पसारा न लावता थोडक्यात आणि शिस्तीत काही विचारायचं असल्यास माणूस विचारतो. हा प्रभाव पोशाखाचा आहे. माझ्याच महाविद्यालयातला एक प्राध्यापक व्यक्तिमत्व इतकं जबरा आहे की विचारू नका. कपडे ही भारी असतात. एखाद्या शासकीय कार्यालयात गेलो की प्रतिसाद खूप चांगला मिळतो. फक्त तो बोलला की बिघडल काम. आम्ही न होणा-या कामासाठी त्याला घेऊन जातो अट ठेवतो प्लिज बोलू नको. सारांश पोशाखावरून माणूस ओळखण्यास बरीच मदत होते, प्रभावही पडतो ही गोष्ट सत्य आहेआणि नाकारता येत नाही. पण प्रत्येक वेळी पोशाखाबरोबर व्यक्तित्वही तसंच असेल असं समजण्याचं काही कारण नाही. अवांतर : न पटलेल्या प्रतिसादा वरून कोणा सदस्याचा बायकोच्या उल्लेख करणं हे निषेधार्य आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

लेख पटला!! विशेष म्हणजे, वरच्या काही प्रतिक्रियांप्रमाणे तुम्ही पॉलिटिकली करेक्ट राहण्याच्या प्रयत्नात निव्वळ आंतरजालावर हळहळ व्यक्त न करता, प्रत्यक्ष काहीतरी केलंत.

मिपाची आजकाल सवयच झाली आहे वैयक्तीक बोलायची,माझी बायको काय पेहराव करते यावर इथली मंडळी घसरली हे पाहून आश्चर्य वाटले नाही.माझी बायको बायोकेमिस्ट आहे,तीचा पेहराव हा जीन्स टॉप असतो नेहमी ,लग्नाआधीही तसाच पेहराव होता. साडीचा अपमान करायचा नाही पण ते लांब पातळ कापड अंगाला गुंडाळने मला मध्ययुगीन व बुरसटलेल्या विचारांचे वाटते ,तसच धोतर व बंडी घालणारे पुरुष ही त्याच कॅटॅगरीतले. साडी हे स्त्रीच्या गुलामगिरीचे लक्षण आहे,आदिम मानसिकतेतून हिंदूंनि लादलेली गुलामगिरी ,बर्याच बायका साडीचे समर्थन करताना दिसतात इथे याचा अर्थ आपल्याला बुद्धी व स्वातंत्र्य नकोच हेच त्यांनी मान्य केलेले दिसते. ( जीन्स टॉप घालणार्या टवकीचा टवका नवरोबा अर्थात गरिब चिमणा).

In reply to by गरिब चिमणा

मिपाची आजकाल सवयच झाली आहे वैयक्तीक बोलायची,माझी बायको काय पेहराव करते यावर इथली मंडळी घसरली हे पाहून आश्चर्य वाटले नाही.
असे व्हायला नको होते...याबाबत माझा तुम्हाला पाठिंबा...मिपाकर दूदूदू आहेत