Skip to main content

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 24/03/2016 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

वाचने 62702
प्रतिक्रिया 482

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

म्हणजे तुम्हाला समजा कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>> यावर आपले उत्तर ऐकण्यास आवडेल!

In reply to by उगा काहितरीच

मान्य आहे, पण माझा रोख याकडे होता की आपल्या (as in our) भाषेत आपण हिंसेचा वापर किती सहजतेने करतो. असा भारत पाहिजे की लेखक, चित्रकार, विद्यार्थी यांना चप्पल काय, चापट सुद्धा मारण्याचा विचार मनात नाही आला पाहिजे. आपला standard सौदी अरेबिया वरुन का म्हणून ठरवायचा?

In reply to by अत्रे

असा भारत पाहिजे की लेखक, चित्रकार, विद्यार्थी यांना चप्पल काय, चापट सुद्धा मारण्याचा विचार मनात नाही आला पाहिजे.>>>>>>> आणि त्यात कलाकारांनी आपल्या धर्माचाच मान न ठेवता दुसऱ्या धर्माचासुद्धा मान ठेवला पाहिजे. आणि मान ठेवता येत नसेल तर अपमान तरी करू नये!

In reply to by DEADPOOL

नाही बाकी तुमची खात्री वगैरे बद्दल आदर आहेच, फ़क्त कुठलाही धर्म लॉजिकल नसतो हे मी म्हणतो, अन सिद्ध ही करू शकतो, पण बघा असहिष्णुता कायम होती हे मी मांडले स्वतः, आता मान आपला, तुम्ही तुमचा तर्क मांडा (ज्याच्यामुळे तुम्हाला हिंदूधर्म लॉजिकल वाटतो), मी त्याला खंडन म्हणून माझ्या तर्काची उदाहरणे देतो, lets enjoy the good art of debating ! जर आपली इच्छा असेल तर बॉटम लाइन :- 1 मी जेव्हा कुठलाच धर्म लॉजिकल नसतो असे म्हणतो तेव्हा मला कुठल्याच एका धर्माचा अधिक्षेपही करायचा नसतो अन कुठल्या एकाच्या नावं उदोउदो सुद्धा नाही 2 धर्म लॉजिकल नाहीत हे मी काळ सुसंगत उदाहरणे देऊन सिद्ध करू शकतो 3 धर्मं लॉजिकल नसतात असे विधान केल्यामुळे अहमहमिका लावुन माझ्यावर शिक्के मारले जाऊ नयेत , माझे आव्हान खुल्या वादाचे आहे अन मी माझ्याकडून सभाशास्त्राचे नियम पाळले जाण्याची ग्वाही देतो , बाकी प्रत्येकाचा अभ्यास वकुब वगैरे

In reply to by नाना स्कॉच

नाही हो आहे मी! हिंदू धर्मात काही इल्लोजीकल गोष्टी होत्या, पण काळानुसार त्यांवर त्यांनी मात केली उदा सती प्रथा, केशवपन ई. आणि मुख्य म्हणजे धर्माने धर्मसुधारकांचे विचार मान्य केले, लगेच शरियत शरियत करून डोके नाही उडविले! आजची ताजी बातमी सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयांचा आदर करून शनि शिंगनापुर देवस्थानाच्या विश्वासतांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणार नाही असे सांगितले!

In reply to by DEADPOOL

हिंदू धर्मात काही इल्लोजीकल गोष्टी होत्या, पण काळानुसार त्यांवर त्यांनी मात केली उदा सती प्रथा, केशवपन ई. आणि मुख्य म्हणजे धर्माने धर्मसुधारकांचे विचार मान्य केले, लगेच शरियत शरियत करून डोके नाही उडविले! +११११ हिंदू धर्मातील सुधारणावादी दृष्टीकोनाचा झालेला विकास लक्षात न घेता केवळ इल्लॉजिकल इळ्लॉजिकल असा आरोप करणे चुकीचे आहे.

In reply to by DEADPOOL

सतीची प्रथा इंग्रजानी कायदा करुन बंद पाडली. फुल्यानी शेणगोळे झेलले , पुण्यातील कर्मठानी त्यांच्यावर मारेकरीही धाडले होते.

In reply to by lgodbole

सतीची प्रथा इंग्रजानी कायदा करुन बंद पाडली. अर्थात त्या मागे राजा राममोहन रॉय आणि देशभरातील सुधारक विचाराच्या व्यक्तिंचे भक्कम पाठबळ होते हे लक्षात घ्यावे... फुल्यानी शेणगोळे झेलले , पुण्यातील कर्मठानी त्यांच्यावर मारेकरीही धाडले होते. समाज अशा प्रकारच्या मानसिकतेतून उत्क्रांत होत गेलेला आहे. पश्चिमेत सुद्धा धार्मिक, सामाजिक गैअरसमजुती होत्याच.

In reply to by विजय पुरोहित

पश्चिमेत सुद्धा धार्मिक, सामाजिक गैअरसमजुती होत्याच. ह्या तुलनेची सतत गरज पडणे म्हणजे कुठेतरी आपली बाजु लुळी आहे असे होत नाही का?

In reply to by नाना स्कॉच

पण फुले,रॉय आणि इंग्रज गेले आणि या सुधारणा बंद झाल्या असे घडले नाही! याचा अर्थ समाजाने व धर्माने त्या सुधारणा स्वीकारल्या! नाहीतर शरियत शरियत म्हणून आजही सुधारणा करणाऱ्याचे डोके उडविले जाते आणि आहे त्या सुधारणा इस्लामिक स्टेट च्या नावाखाली बंद केल्या जातात!

In reply to by नाना स्कॉच

बरं तुमच्या मताप्रमाणे... सुधारणा झाल्याच कारण नव्या परिवेशाप्रमाणे सुधारणा होण्याचे झाल्यास त्या सर्व जगात झाल्या असता पण त्या झाल्याचे दिसत नाही. विदा देऊ?

In reply to by DEADPOOL

शरिया कुठून मधेच उपटला साहेब? माझे विधान अन बोलणे त्या विषयावर नाहीच मी स्पष्ट म्हणले आहे "हिंदु धर्म पुर्णपणे लोजिकल नाही", किंवा "सुधारणा झाल्या असे वाटले तरी त्या झाल्यात का ? की मॉडिफाई झाल्यात हे पाहणे रोचक ठरेल" ह्याच्यात शरियाचा संबंध कसा अन कुठून आला? आपण स्वतंत्रपणे "हिंदु धर्मात 100% तर्क आहे किंवा 100% सुधारणा झाल्यात (टक्केवारी तुमच्या अभ्यासानुसार ठेवा)" हे सांगा माहीती असल्यास, तार्किक असल्यास मी माझे मत बदलण्याची ग्वाही देतो लिखित इथे हिंदु धर्म मुळीच तार्किक वगैरे काहीच नाहीये हे मी म्हणतो आहे त्याचे खंडन करा की मुद्देसुद, आता ह्याच्या तुलनेत मधेच शरिया मग टेन कमांडमेंट्स घुसडून ठेवणे म्हणजे थोडक्यात

"पलिकडल्या अळीतला बबन्या नागडा फिरतो मग आमचे नागड़ेपण न चालायला काय आहे असे म्हणून थ्री पीस उतरवुन दिगंबरावस्था धारण करणे होय!"


In reply to by नाना स्कॉच

नेमक्या सुधारणा झाल्या की त्या नव्या परिवेषाप्रमाणे मॉडिफाई झाल्या हे पाहणे रोचक ठरेल!>>>>>>> हा आधीचा प्रतिसाद! त्यावर उत्तर दिल्यानंतर, " सुधारणा झाल्या असे वाटले तरी त्या झाल्यात का ? की मॉडिफाई झाल्यात हे पाहणे रोचक ठरेल " हा नवा प्रतिसाद! मस्त शब्दछल चाललाय! आता हिंदू धर्मातील इल्लोजीकल गोष्टी व कालानूरूप त्यांवर झालेल्या सुधारणा यांवर उत्तर दिले आणि बाकीच्या धर्मातील शरियत सारख्या इल्लोजीकल गोष्टीही सांगितल्या. हिंदु धर्म मुळीच तार्किक वगैरे काहीच नाहीये हे मी म्हणतो>>>>>>> काही अतार्कीक गोष्टींचा समावेश होता पण सुधारणा करून त्याला तार्किक आधारित धर्म असे रूप प्राप्त झाले! आता या स्पष्टीकरनानंतर मी असे म्हणावे अशी आपली इच्छा असल्यास माझा नाईलाज आहे "अगर मेरे जवाब से आप संतुष्ट नही होगे तो अपना सर कलम करके हम आपके चरणों में छोड़ देंगे |" अवांतर कोणी कितीही नागडे फिरले तरी ज्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो तो कधीही नागडा होत नाही!! (याचा अर्थ आम्ही बीचवर कुर्ता पायजामा घालून वरून मफलर बांधून फिरत नाही व आमची मंडळी नववारी घालून कोपऱ्यात बसून आमचे कौतुक बघत बसत नाही)

In reply to by DEADPOOL

मस्त शब्दछल चाललाय! काय शब्दच्छल झाला सांगाच् दादा आता, तुम्ही म्हणाले सगळ्या अतार्किक रीतीभाती गाडल्या आहेत अन धर्म तर्कअधिष्ठित झाला आहे, त्यावर मी म्हणतो आहे की काही चाली गाडल्या गेल्या असल्या तरी खुपश्या अजुनही बाकी आहेत , मी तुम्हाला धर्म किती टक्के तार्किक झाला आहे हे ही विचारले त्यावर उत्तर न देता आपण मात्र मलाच शब्दच्छल करताय वगैरे म्हणता आहात ! माझा सिंपल प्रश्न

"हिंदु धर्मातला किती टक्के भाग तार्किक झाला आहे पुर्णपणे?"

मुद्द्याला बगल नको! मी अजुनही माझा अतिशय साधा प्रश्न विचारतो आहे .

In reply to by DEADPOOL

10% झाले आहे व् 90% बाकी आहे हे आमचे म्हणणे आहे! :) तुमची इच्छा असल्यास ते सिद्ध करता येईल, पण मला नाही वाटत की आपले एकमत होऊ शकेल त्यामुळे आपण इथेच पुर्ण विराम देऊया. प्रूव करायला काही हरकत नाही, हे परत एकदा अधोरेखित करतो मात्र.

In reply to by DEADPOOL

ओके , एक विनंती आहे 90% सुधारणा झाल्याचे विधान आपण केले आहे , ज्याला मी हरकत घेतली आहे, जर आपण कुठले 90% प्रॉब्लम लॉजिकल एंड ला पोचुन त्यांचे समाधान झाले आहे हे सांगितले तर मला प्रत्येक मुद्द्याचा नीट प्रतिवाद करता येईल, खंडन करता येईल, किंवा जे जेन्युइन असेल ते एक्सेप्ट करता येईल, तरीही आपण 1 90% सुधार कुठल्या मुद्द्यांत/प्रॉब्लम मधे झालाय ? हे मांडावे 2 विदा नसला तरी चालेल फ़क्त मुद्द्यांची एक लिस्ट द्या म्हणजे 90% वाटावे अश्या कुठल्या मुर्ख प्रथा बंद झाल्या आहेत ते लिस्ट रुपात सांगता आले तर बरे होईल तसेही जर आपण अत्यंत आत्मविश्वासाने 90% म्हणता आहात सुधारणा तर अशी एखाद लिस्ट टाइप फ़क्त आपल्याला टाइप करावे लागेल कारण आपले बेसिक पक्के असल्या कारणे आपण चटकन निष्कर्ष (एप्लाइड एन्ड) गाठू शकला आहात मांडायला मी ही मुद्दे मांडू शकतो पण त्याने गोंधळ वाढेल अन हाती काहीच लागणार नाहीत कारण मुळात माझ्या डोक्यातले पॉइंट मॅच होतीलच तुमच्या पॉइंट्स सोबत असे खात्रीने सांगता येत नाही (मलातरी) तसेही संख्यात्मक आकडे प्रथम आपण मांडले आहेत तर त्या आकड्यात अंतर्भूत असलेले सुधारणा झालेले मुद्दे आपण मांडावेत म्हणजे चर्चा नीट पुढे होऊन आपण एकमेकांच्या ज्ञानात भर घालू शकु , कसे??

In reply to by DEADPOOL

दावा आपल्याला करायचा आहे ! मला नाही (ज्याची सुरुवात आपण ठामेठोक 90% हा आकड़ा लिहून केली आहे) तरीही एकदा प्रतिसाद नीट वाचाल ही विनंती अन मुद्दा मांडाल ही अपेक्षा, वादविवादाच्या नियमा नुसार ज्याने पहिला दावा केला आहे/असतो त्याने प्रथम त्याच्या समर्थनार्थ बोलायचे असते (नीट पुरावे देऊन) त्याला फॉर पार्टी असे म्हणतात त्याचे पुरावे विवेचन पुर्ण झाले की दूसरा पक्ष त्याचा प्रतिवाद करत असतो त्याला म्हणतात अगेंस्ट पार्टी तेव्हा लिस्ट देऊन सुरुवात करा गई विनंती बाकी मी आहेच इथे :)

In reply to by नाना स्कॉच

१. सती प्रथा २. केशवपन ३. अस्पृश्यता ४. बालविवाह बंद ५. विधवा पुनर्विवाह ६. गावबंदी ७. देशबंदी ८. नदी ओलांडून जाण्यास बंदी ९. धर्मात परत यायाला बंदी १०. स्त्रीशिक्षनास मान्यता ११. नसबंदीस मान्यता अजून बरेच आहेत आठवेल तसे लिहिल! ९० % लक्षात ठेवा!

In reply to by नाना स्कॉच

तुम्ही जेव्हा जेव्हा हिन्दू धर्मातील सुधारणेचि गोष्ट काढाल तेव्हा शरियाची चर्चा होणारच. हिन्दू धर्मात बहुपत्निक पद्धतिला कायद्याने बंदी आहे तेव्हा काही महाभाग मुस्लिम धर्म स्विकारुन दूसरे लग्न करतात. अशा लोकांना एकाही इस्लामी धर्मगुरुने वा मौलविने हे चुकीचे आहे म्हणुन नाकारले नाही आहे. असा माणूस केवळ स्वार्थासाठी इस्लाम कबुल करत आहे, असा माणूस इस्लामी तत्त्वे कशी पाळणार? अगदी अलिकडचे दूसरे उदाहरण घेतले तर आरक्षणावरुन उठलेल्या वादळात हार्दिक पटेल व् जाट समुदायाने धमकी दिली आहे की जर आमच्या मनासारखे झाले नाही तर आम्ही इस्लाम स्वीकारु. या वेळी पण एकाही इस्लामी जानकाराने आम्ही अशा अवसरवादी लोकांना आमच्या धर्मात स्थान देणार नाही हे नमूद केले नाही आहे. तर मग अशा फ़क्त आणि फ़क्त मेंढराच्या कळपात भर करणाऱ्या धर्माविषयी टिका झाली तर वाईट वाटून घेण्याचे कारण काय?

In reply to by भंकस बाबा

दूसरे उदाहरण घेतले तर आरक्षणावरुन उठलेल्या वादळात हार्दिक पटेल व् जाट समुदायाने धमकी दिली आहे की जर आमच्या मनासारखे झाले नाही तर आम्ही इस्लाम स्वीकारु. मला ह्या संबंधी माहीती नाही, जमल्यास विदा द्या अभ्यासाला बरे पडेल ! क्लेम सेंसेशनलिस्ट आहे इतके तुर्तास नोंदवतो

In reply to by नाना स्कॉच

नाना, ह्यांचं घोडं झापड लावून शरियाभोवती फिरते आणि फुरफुरते. खाली काय जळतं त्याची काय खबर नाही आणि बारा मैलावर धूर कशाचा निघतो ह्याची फक्त चिंता. नका वेळ घालवू.

In reply to by तर्राट जोकर

आज घालवायला वेळ आहे तर्राट जी बराच! असो! सद्धया गाडी शब्दच्छल पर्यंत पोचली आहे! आयडी पर्यंत पोचायला अजुन वेळ आहे आम्ही शेवटल्या जंक्शन चे पाशींजर असतोय! संयमाची दीक्षा घेऊन बसलो आहे!

In reply to by DEADPOOL

सांगायचे राहिलेच. इंग्रजांच्या आधीही अकबर दि ग्रेट व शहेनशाह आलमगीर औरंगजेब यानीही सतीबंदीचे प्रयत्न केले होते , असे ऐकुन आहे.

In reply to by lgodbole

या अकबर , औरंगजेब यांच्या बापजाद्यानी केलेल्या आत्याचारांमुळेच स्त्रियांना सती जाण्याची प्रथा सुरु केली हे विसरलात काय .महंमद गोरी पासून रझाकारा पर्यंत कित्येक हिंदू स्त्रियांवर अत्याचार ,बलात्कार झाले .स्वतः हजारो बायकांचे जनानखाने सांभाळणारे ,देशोदेशिंच्या सुंदर स्त्रिया पळवून आणून त्यांचा उपभोग घेणारे हे इस्लामी राज्यकर्ते काय सतीची प्रथा बंद पाडणार.इस्लामी आक्रमकांपासून स्वतची अब्रू वाचवण्यासाठी स्त्रिया आत्महत्ये सारखा विधि करत त्याच पुढे हिंदू धर्मातील कही कर्मठ लोकांकडुन सतीची प्रथा चालू झाली असावी .आणी हिंदू धर्माची लाज काढण्याची काही गरज नाही त्याआधी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करा इस्लामी शासन भारतात येण्याआधी भारतात काय परिस्थिती होती तेही अभ्यासा .

In reply to by viraj thale

हो ते कळले. पण इतरही चालिरीतींसाठी मुस्लिम, इंग्रज इत्यादीं हिंदूबाह्य राज्यकर्त्यांना दोषी ठरवलेलं बघितलंय म्हनून म्हटलं.

In reply to by viraj thale

पण तुमच्या प्रतिसादामुळे एक जहरी बोचनारा प्रश्न पडतो पण त्याने त्रास होईल म्हनून सोडतो. जाउ दे. गोडबोले बोलतीलच नेहमी च्या पद्धतीने ;-)

In reply to by viraj thale

महाभारतात माद्री सती गेली. रामायणात बहुतेक इंद्रजीताची बायको सती गेली. रमाबाई माधवराव बल्लाळ पुण्यात सती गेल्या . सगळ्या औंरंगजेबाच्या अन अकबराच्या भीतीने सती गेल्या ! ज्ञानात भर पडली ! ...

In reply to by lgodbole

पहील्या दोघी स्वतःच्या मर्जीने सती गेल्या होत्या सती ला विरोध केला असतानाही पतीवर असण्यार्या प्रेमपायी आता हे झाले 000.1 % बाकी उरलेल्या 99.9% स्त्रिया सती का नाही गेल्या तेही सांगा .उदा दशरथ पत्नी ,रामायण ,महाभारत व इतर युध्दात युध्दात मेलेल्य लाखो सॆनिकांबरोबर त्यांच्या त्यांच्या पत्नीही ?सांगा आता .

In reply to by viraj thale

सतीची प्रथा इंग्रज मोघलांच्या आधीपासुन आहे . हे सिद्ध होते..

In reply to by viraj thale

नायपन आता तुमचा मुद्दा फसतोय ना विराज? आधी तुम्ही मुस्लिम शासकांचे कारण दिले सतीसाठी. आता मोगाने त्याच्याआधीपासून होती तर म्हणता ऐच्छिक होती. म्हनजे ऐच्छिक असो वा नसो होती हे तर तुम्ही मान्य करता मग आधीच्या प्रतिसादात मुस्लिम आक्रमनाआधीचा हिंदू धर्म काय होता हे अभ्यासायला सांगत आहात. नक्की एक काय ते सांगा राव. नवरा मेल्यावर सती जाणे आणि जौहार करणे ह्यात तुम्ही गल्लत तर नाही ना केलीत? दोन्ही दुवे मुळातून वाचण्यासारखे आहेत. सतीप्रथेसाठी मुस्लिम शासकांना दोषी ठरवणे चुकीचे आहे. आपल्या धर्माच्या सर्व चूका दुसर्‍यांमुळे झाल्यात हा डिनायल मोड आहे.

In reply to by तर्राट जोकर

माझे म्हणणं आहे की इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते नंतर ते व्हायला लागले .ऐच्छिक आणि बळजबरी यात तुम्हाला फरक वाटत नाही .शील वाचवण्यासाठी जौहार करण्याचा सती परम्परेवर प्रभाव पडला आणि त्यातून सतीसाठी बळजबरी करण्याची पद्धत सुरु झाली आणि अत्याचार वाढायला लागले .बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच .

In reply to by viraj thale

किती कोलांट्याउड्या खाल हो? माझे म्हणणं आहे की इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते नंतर ते व्हायला लागले ह्याला विदा-पुरावा, संशोधन आहे का? कुठे वाचले तुम्ही? कोणत्या पुस्तकात? ऐच्छिक आणि बळजबरी यात तुम्हाला फरक वाटत नाही . बळजबरी कोण करत होतं? मुस्लिम शासक? इतकाच मुस्लिमा शासकांचा जाच होता तर ते काय नवरा मरायची वाट बघायचे काय? काहीतरी बोलायचं आपलं. मी दिलेला दुवा तुम्ही बिल्कूल वाचलेला दिसत नाही. आपलंच घोडं दामटायचं का? शील वाचवण्यासाठी जौहार करण्याचा सती परम्परेवर प्रभाव पडला आणि त्यातून सतीसाठी बळजबरी करण्याची पद्धत सुरु झाली आणि अत्याचार वाढायला लागले . देवा! जरा अभ्यास वाढवा. हिंदूंच्या प्रत्येक वाईट चालिरीतींसाठी मुस्लिमांना जबाबदार धरणं सोडा. बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच . म्हणूनच म्हणतो अभ्यास वाढवा. आपल्या प्रतिसादातला अभ्यासहिन निरागसपणा आवडला असे होते ते. तुम्ही खरेच समजलात काय? बाकी, लैच उजवीकडे जायला लागलंय. तेव्हा इथेच थांबतो. अभ्यास करुन या मग भाग दोन मधे भेटू. टाटा बाय बाय.

In reply to by तर्राट जोकर

इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते -नव्हतेच मुळी एक तरी नाव सांगा प्रतिसाद नीट वाचत जा मी कधी म्हटले की मुस्लिम शासक सती जाण्यासाठी बळजबरी करतात म्हणून . तुम्ही जेव्हा जौहर चे उदाहरण दिले त्यासाठी मी ते शेवटचे विधान केले "बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच" .तेव्हा शांतपणे वाचा . तुम्ही दिलेल्या दुव्यामध्ये सती परंपरेचा काळ मुस्लिम आक्रमणाशी मिळता जुळता आहे त्याआधीचा तर कुठला काळ आढळत नाही . शेवटचे स्वतला अतिशहाण समजण थांबवा .

In reply to by viraj thale

बरं, तुम्ही आहात अतिशाहाणे तेवढं पुरे आहे. सती परंपरेचा मुस्लिम आक्रमणाशी संबंध कसा हे तुम्ही अजून सिद्ध केले नाही. जर मुस्लिम शासक एवढे जाच करणारे होते तर त्यांना नवरा मरायची वाट पाहण्याची काय गरज ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे?

In reply to by DEADPOOL

इंग्रजानी केलेले ते कायदे आजही आस्तित्वात आहेत. दहा हजार वर्षे सुरु असलेल्या अन्यायाविरुद्ध मुसलमान व इंग्रज यानी कायदे केले हे दहा हजार वर्षच्या धर्माला किती लाजिरवाणे आहे ना ?

In reply to by lgodbole

होय ते पाळावे लागतात नाहीतर तुरुंगात जावे लागते. इथे तर कायदा पाळावा असे बंधन नाही, तर दबाव आणून तो बदलन्यास भाग पाडले जाते. शाहबानो खटला. साहेब कायदा बनला त्यानंतर, धार्मिक स्वातंत्र्य देशाच्या कायदयापेक्षा मोठे आहे तर!

In reply to by DEADPOOL

सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयांचा आदर करून शनि शिंगनापुर देवस्थानाच्या विश्वासतांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणार नाही असे सांगितले!
DEADPOOL सेठ हिंदू धर्मीय सुधारणांच्या बाबतीत दुरुस्त येतात ह्याचे क्रेडीट द्यायला पाहीजे हे खरेच पण त्याच वेळी देरही बरीच करतात, मुख्य म्हणजे धर्माची तत्वे उदात्त आहेत पण मनमोकळेपणाने मनाचा मोठेपणा दाखवण्याची वेळ असते तेव्हा नेमके संकोचून जातात ;) . तुमचा धर्म उदात्त आणि शक्ती स्वरुपातही इश्वराची उपासना करतो ना ! मग एवढी न्यायालयाची लढाई लढण्याची वेळ यावी हे स्पृहणीय राहते किंवा कसे अशी शंका वाटते.

In reply to by माहितगार

बरं देर करतात पण करतच नाही असे थोडेच आहे? आणि आम्ही शक्ति स्वरूपात स्त्रीची उपासना करतो यातच आमच्या धर्मात स्त्रियांना किती मान दिला जातो हेच ध्योतक आहे!

In reply to by प्रतापराव

टी वी वर सगळं खरंच सांगतात का? आणि विरोध झाला मान्य आहे पण कोणीही विश्वस्ताने आम्ही न्यायालयाचा निर्णय मानणार नाही अशी भूमिका घेतली का? बरं विरोध कोणाकडून झाला तर त्र्यंबकला आणि शनि शिंग्नापुर ला महिलाच विरोध करायला पुढे होत्या! आणि प्रत्येक गावची एक परम्परा असते आणि ती जपण्याकरिता गावाकडुन प्रयत्न होने साहजीक आहे! मात्र कोणत्याही महिलेला धर्मविरोध केला म्हणून दगड मारले अथवा चाबकाचे फटके दिले असे ऐकले नाही! आणि हो प्रतापराव मी याच धाग्यावर सांगितले की हिंदू धर्म महान आहे कारण हा धर्म सुधारणा मोकळ्या मनाने स्विकारतो. आणि हीच या धर्मातील सहिष्णुता!!!! खूप पल्ला गाठला आहे आणि अजूनही गाठायचा आहे!!!!!!! :)