✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझा "वाचक" मित्र आणि मी!!

न
निमिष सोनार यांनी
Tue, 03/29/2016 - 15:41  ·  लेख
लेख
"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले. मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?" आम्ही पुण्यातल्या एका उपाहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता. मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला, "कारण रोज मी पाहतो, सोशल मीडीयावर विशेष करून फेसबुक आणि व्हाटसएप वर किंवा इतर मराठी वेबसाइटवर तू सतत ज्ञान पाजळत असतोस. आपण हे करायला हवे, आपण ते करायला हवे असे सांगत असतोस. मोठमोठे लेख लिहितोस. इतर मेसेज जास्त फॉरवर्ड न करता बहुतेक वेळा स्वत:च लिहीत असतोस. एव्हढा मोठा तत्त्वज्ञानी झालास काय गेल्या दहा वर्षात? एवढं सगळं सुचतं तरी कसं तुला?" मी स्मितहास्य करून म्हणालो, "हे बघ , मी लिहिताना असे थोडेच म्हणतो की मी तत्त्वज्ञानी आहे! "लेखक- निमिष सोनार - एक तत्त्वज्ञानी" असे मी थोडेच टाकतो लेखासमोर?" "तसे टाकत नाही म्हणून काय झाले, पण लेखातून तर तू तत्त्वज्ञान शिकवत असतोस सर्वांना!" "नाही! मुळीच नाही. लोकांना तत्त्वज्ञान शिकवण्या इतका मी कुणीच नाही मित्रा! मी जे लिहितो ते अनुभवातून आलेले असते, माझ्या किंवा दुसऱ्याच्या! तुला किंवा वाचणाऱ्या व्यक्तींना ते तत्त्वज्ञान वाटतंय तर मग ते तत्त्वज्ञान असेलही!" मी डोळे मिचकावत म्हणालो. "शब्द उलट सुलट करून मला गोंधळात टाकू नको!" थोडा शांत होत तो म्हणाला. "शब्द हे शब्दच असतात. ते सुलटच असतात. घेणारा फक्त सुलट शब्दांचा उलट अर्थ घेऊ शकतो. बाकी काही नाही!" मी म्हणालो. हे पटल्यासारखे वाटून तो पुढे म्हणाला, "पण मला एक सांग, की तू लिहितो ते सगळ्यांना सांगतोस पण स्वत: ते करतोस का? पाळतोस का? की फक्त लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि ..." मी म्हणालो,"मित्रा, तूच वर म्हणाला त्यानुसार "आपण" हे करायला हवे, "आपण" ते करायला हवे असे मी लिहितो. लोकांनी असे करावे, तुम्ही असे करावे असे मी लिहीत नाही. आपण म्हणजे त्यात मी सुद्धा आलोच की रे!" "होय. तेही खरंच आहे. आणि तुझा मेसेज आला की तो मला वाचावासा वाटतोच! एक प्रखर आग असते बरेचदा तुझ्या लेखनात!" "हे तर अधिक चांगले झाले. माझ्या लेखामुळे किंवा त्यातल्या प्रखरतेमुळे शंभर वाचकांपैकी एकाला जरी वैचारिक फायदा किंवा बदल झाला किंवा शंभरात एकाला जरी वाचून चीड आली तरी माझ्या लेखनाचा उद्देश सफल होतो ना मित्रा! एका लेखकाला अजून काय पाहिजे? वाचकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांच्यात थोडा का होईना वैचारिक बदल! एवढेच!" मित्राला अजूनही काही शंका होत्याच... तो म्हणाला," पण, एक सांग तू जे लिहितो, ते तुझ्याबाबत घडलं असलं पाहिजे, त्याशिवाय ते इतकं प्रखर तू कसं लिहू शकतोस?" मी पुन्हा म्हणालो, "नाही. मुळीच नाही. असं जरुरी नाही की मी जे लिहितो ते सगळं माझ्या बाबतीत घडलेलं आहे. जर एखादा लेखक फक्त आपल्या बाबत घडलेलेच खूप ताकदीने लिहू शकत असेल तर काय फायदा अशा लेखनाचा? मला संवेदनाशीलतेमुळे एक अंत:स्फूर्ती, ऊर्मी आणि प्रेरणा मिळते तेव्हाच मी नीट लिहू शकतो." "म्हणजे, मला समजले नाही?" "हे बघ. मी थोडासा इतरांपेक्षा जास्त संवेदनशील आहे. एखादा टीपकागद असतो ना तसा! मला वाटते प्रत्येक लेखक हा संवेदनशील असतोच. लेखकच नाही तर चित्रकार, कवी आणि कोणताही कलाकार, अभिनेता हे संवेदनशील असतात, किंबहुना ते असावेत. त्याशिवाय एखादा अभिनेता कुणा एका पात्राची भूमिका कशी वठवू शकेल बरे? त्या पात्राच्या सुख दु:खाशी समरस झाल्याशिवाय! आणि समरस तेव्हाच होवू शकतो जेव्हा तो कलाकार संवेदनशील असतो. तसेच लेखकाचे सुद्धा असते. आणि मी सुद्धा आहे! आजूबाजूच्या वातावरणातील, जगातील सूक्ष्म बदल माझे मन टिपते. अवतीभवती जे लोक असतात त्यांच्या मनात काय चालले असेल, ते सध्या कोणत्या परिस्थितीत आहेत मग ती चांगली असो अथवा वाईट हे मला एखादे वेळेस त्यांनी न सांगताच काही वेळा कळते. काही वेळा ते सांगतात तेव्हा कळते. त्यांच्या सुख दु:खाला मी लेखनातून जगासमोर मांडतो. ते ही तेवढ्याच ताकदीचे लिखाण असते जसे की ते माझ्यासोबतच घडले आहे!" एक आवंढा गिळून तो म्हणाला "बापरे! एवढं सगळं असतं का आणि असावं लागतं का लेखकांमध्ये क.. क.. कमाल आहे तुझी बरं का निमिष!" "माझी कमाल वगैरे काही नाही. संवेदनाशीलता आणि लेखनाची अंत:स्फूर्ती आणि प्रेरणा ही मला मिळालेली दैवी देणगी आहे. त्यात माझा काही रोल नाही. मी फक्त माध्यम आहे रे! दैवी देणगीचा उपयोग केलाच पाहिजे!" "वा! हे म्हणजे अगदी असं झालं की..." "अरे जाऊदे! राहू दे! अजून एक गोष्ट आहे बरं का लेखनाच्या बाबतीत! कल्पनाशक्ती! जे कधीच आणि कुणाबाबतच घडले नाही तरी ते प्रत्यक्ष घडले असे लिहिता आले पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्या काल्पनिक कादंबऱ्या! कदाचित तसे कधी घडणारच नाही. किंवा पुढेमागे घडेल सुद्धा! कुणी सांगावं?" "हो! तुझी जलजीवा कादंबरी मी वाचली. खूप अद्भुत कल्पनाशक्ती वापरलीय त्यात तू! म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की लेखकाकडे कल्पनाशक्ती सुद्धा आवश्यक असते संवेदनशीलते सोबत?" "हो. अर्थातच! " मी डोळे मिचकावत त्याला म्हणालो, "आता हेच बघ ना ! आपण कधी पुण्यात असे भेटलो नाही, चहा पिला नाही आणि आपल्यात असा काही संवाद सुद्धा झाला नाही, तरीपण मी हा वरील संवाद लिहिलाच ना!" "धन्य आहे बाबा तुझी!", असे म्हणायला ना तो मित्र तिथे होता ना मी! कारण हा संवादच मुळात काल्पनिक आहे!! "पण खरा असता तर तो नक्की असे म्हटला असता!!" डोळे मिचकावत मी माझ्या मनाशी म्हटले!!!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया
समीक्षा
अनुभव
वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9102 वाचन

💬 प्रतिसाद (36)

प्रतिक्रिया

ऑ अच्च जाल्ल्ल

स्पा
Tue, 03/29/2016 - 15:56 नवीन
ऑ अच्च जाल्ल्ल
  • Log in or register to post comments

हा शुध्ध हलकटपणा आहे स्पाने

टवाळ कार्टा
Tue, 03/29/2016 - 16:00 नवीन
हा शुध्ध हलकटपणा आहे स्पाने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

:)

अजया
Tue, 03/29/2016 - 18:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

@स्पा - Tue, 29/03/2016 - 16

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/29/2016 - 16:22 नवीन
@स्पा - Tue, 29/03/2016 - 16:26 ऑ अच्च जाल्ल्ल >> Image removed. पांडुनी दिला दांडू! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

:)

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 16:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मुंगेरीलाल के हसीन सपने!!

राजेंद्र मेहेंदळे
Tue, 03/29/2016 - 16:01 नवीन
अशी एक मालिका यायची टि.व्ही. वर...... ती आठवली.
  • Log in or register to post comments

एक प्रखर आग असते बरेचदा

सतिश गावडे
Tue, 03/29/2016 - 16:24 नवीन
एक प्रखर आग असते बरेचदा तुझ्या लेखनात
अशीच आग ओकत रहा. कधीतरी वणवा पेटेलच.
  • Log in or register to post comments

ख्या ख्या ख्या..

अमृता_जोशी
Tue, 03/29/2016 - 21:43 नवीन
ख्या ख्या ख्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

कुंथुन कुंथुन पाडीन मी

अत्रुप्त आत्मा
Tue, 03/29/2016 - 16:26 नवीन
कुंथुन कुंथुन पाडीन मी जिल्बी जरी वाचकांनी केले एल.बी. तांब्या अस्सा मी सोडणार नाही मधेच जिल्बी मोडणार नाही जरी तिला धरला नै पाक तरी मी म्हणेन मी टाकतो तू तळायला वाक! .......Image removed.
  • Log in or register to post comments

:)

प्रचेतस
Tue, 03/29/2016 - 16:56 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला

अमृता_जोशी
Tue, 03/29/2016 - 16:53 नवीन
मित्र चहाचा घुरका घेत म्हणाला
घुरका म्हणजे काय? अवांतर: हे नक्की वाचा: https://en.wikipedia.org/wiki/Dunning%E2%80%93Kruger_effect
  • Log in or register to post comments

घुटका आणि भुरका ह्यामधली

अभ्या..
Tue, 03/29/2016 - 18:26 नवीन
घुटका आणि भुरका ह्यामधली स्टेज आहे ती. घुरका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

काल्पनिक शब्द आहे.

आदूबाळ
Tue, 03/29/2016 - 20:09 नवीन
काल्पनिक शब्द आहे.
"आता हेच बघ ना ! आपण कधी पुण्यात असे भेटलो नाही, चहा पिला नाही आणि आपल्यात असा काही संवाद सुद्धा झाला नाही, तरीपण मी हा वरील संवाद लिहिलाच ना!" "धन्य आहे बाबा तुझी!", असे म्हणायला ना तो मित्र तिथे होता ना मी! कारण हा संवादच मुळात काल्पनिक आहे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

अवांतर

सामान्य वाचक
Tue, 03/29/2016 - 20:54 नवीन
वाचले तुम्ही कित्ती बाई नेमके वर्म शोधलेत धगकरत्यानी वाचले का पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

पसार झाले वाटते ते..

अमृता_जोशी
Tue, 03/29/2016 - 21:41 नवीन
पसार झाले वाटते ते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

'Dunning Kruger Effect' वरती

निशांत_खाडे
Tue, 03/29/2016 - 21:30 नवीन
'Dunning Kruger Effect' वरती एक शेपरेट, विस्तृत धागा काढायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृता_जोशी

सुचनेबद्दल धन्यवाद! लगेच

अमृता_जोशी
Tue, 03/29/2016 - 21:38 नवीन
सुचनेबद्दल धन्यवाद! लगेच कामाला लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे

सुचनेबद्दल धन्यवाद! लगेच

अमृता_जोशी
Tue, 03/29/2016 - 21:38 नवीन
सुचनेबद्दल धन्यवाद! लगेच कामाला लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशांत_खाडे

हंसी के फुंवारे ........

मोहनराव
Tue, 03/29/2016 - 17:14 नवीन
हंसी के फुंवारे ........
  • Log in or register to post comments

ऑह ऑह

भाऊंचे भाऊ
Tue, 03/29/2016 - 17:37 नवीन
ऑह माय गॉड...! वाट् द फीश ?
  • Log in or register to post comments

लेख आवडला!

चांदणे संदीप
Tue, 03/29/2016 - 17:39 नवीन
लेख आवडला! :) Sandy
  • Log in or register to post comments

"धन्य आहे बाबा तुझी!" _/\_

जव्हेरगंज
Tue, 03/29/2016 - 18:33 नवीन
"धन्य आहे बाबा तुझी!" _/\_
  • Log in or register to post comments

पुण्यातल्या पुणेकराच्या

कंजूस
Tue, 03/29/2016 - 19:30 नवीन
पुण्यातल्या पुणेकराच्या पैशाने अमृततुल्य पीत ( घुरकेघुरे घेत ) स्वत:ची वाखाणणी करून घेणे अवघड आहे असा समज करून का घेता?
  • Log in or register to post comments

अवघड नाही , अशक्य आहे!लेख

किचेन
Wed, 03/30/2016 - 09:37 नवीन
अवघड नाही , अशक्य आहे!लेख काल्पनिक आहे याची खात्री पटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

णिसो जोमात अन "वाचक" मित्र

होबासराव
Tue, 03/29/2016 - 20:59 नवीन
णिसो जोमात अन "वाचक" मित्र कोमात :(
  • Log in or register to post comments

हाय तेरा जलवा।

मी-सौरभ
Tue, 03/29/2016 - 22:57 नवीन
राजकारणी धाग्यांच्या चिखलात असे बेडुक रूपी धागे बघून काहीच फ़रक पड़लापड़ला नाही
  • Log in or register to post comments

निसो साहीत्य म्हणजे काय?

नाखु
Wed, 03/30/2016 - 09:06 नवीन
म्हणजे धगधगती आग आहे ! ती न झोपलेल्याची जाग आहे ! म्हणजे एक मोतीचूर लाडू आहे ! (त्यात कुणी मोती शोधते का ? न चूर होता सांगा") म्हणजे एक काल्पनीक भास आहे काळी मावशीने हात मिळ्वणी केलेल्या दिनु कथेतल्या भुताशी ! अखिल मिपा वाचक चळ आणि वळ संघाचा सभासद नाखु
  • Log in or register to post comments

ती न झोपलेल्याची जाग आहे !

सतिश गावडे
Wed, 03/30/2016 - 09:28 नवीन
ती न झोपलेल्याची जाग आहे !
या ओळीसाठी माझ्याकडून तुम्हाला सीसीडीची एक पाणचट कॉफी लागू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

हा हा हा

निमिष सोनार
Wed, 03/30/2016 - 11:30 नवीन
हसतोय!
  • Log in or register to post comments

लवकरच उपचार करुन घ्या

मोहनराव
Wed, 03/30/2016 - 13:41 नवीन
लवकरच उपचार करुन घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

=))

निशांत_खाडे
Wed, 03/30/2016 - 13:46 नवीन
रोफललो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

कशाचे उपचार?

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 03/31/2016 - 14:56 नवीन
कशाचे उपचार? डिनायल मोड मध्ये आहेत ते.. त्यामुळे तुम्हालाच सल्ला देतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

:)

पैसा
Wed, 03/30/2016 - 12:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments

844 वाचने अउर परतिसाद सिर्फ

होबासराव
Wed, 03/30/2016 - 22:17 नवीन
844 वाचने अउर परतिसाद सिर्फ ३२ बहुत नाईंसाफि है.
  • Log in or register to post comments

आता नाबास(ना)राव !

निमिष सोनार
Fri, 04/01/2016 - 17:04 नवीन
हो(आता)बासराव!! बास झाले! :-)
  • Log in or register to post comments

माझ्या लेखामुळे किंवा

होबासराव
Fri, 04/01/2016 - 17:58 नवीन
माझ्या लेखामुळे किंवा त्यातल्या प्रखरतेमुळे शंभर वाचकांपैकी एकाला जरी वैचारिक फायदा किंवा बदल झाला किंवा शंभरात एकाला जरी वाचून चीड आली तरी माझ्या लेखनाचा उद्देश सफल होतो ना मित्रा! बास का काका तुम्हिच तर लिहिलेय ! झाला कि तुमचा उद्देश्य सफल :) और सुनो णिसो जानि जैसा तुम लिखोगे प्रतिक्रिया भि वैसेहि आयेंगि. जैसा तुम्हे अपनि बचकानी बाते रखने का अधिकार है वैसेहि हमे अपने बेतुके प्रतिक्रिया देने का भि. ये बात रौशन रहे...जानी.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा