Skip to main content

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

लेखक DEADPOOL यांनी गुरुवार, 24/03/2016 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

वाचने 62702
प्रतिक्रिया 482

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

फक्त कट्टर हिंदूंचा विरोध केला आणि पुरोगामित्वाचे, विचारवंत असल्याचे व निधर्मी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इतर धर्मियातल्या कट्टरांचे लांगूलचालन केले >> असे केले तर नक्की काय फायदा होतो प्रमाणपत्राचा आणी लांगुलचालनाचा?
असं काय करता? फायदेच फायदे आहेत. इतर धर्मियातील कट्टरवाद्यांचे लांगूलचालन केले की निवडणुकीत फायदा होतो. मते मिळतात. सत्ता मिळते. कट्टरवाद्यांच्या माध्यमातून व्होट बँक जोपासता येते. उदारमतवादी, विचारवंत, निधर्मी, पुरोगामी, मानवतावादी असे प्रमाणपत्र मिळाले की माध्यमातून प्रतिष्ठा मिळते. जातीयवादी असा शिक्का मारून वाळीत टाकले जात नाही. हातून चुकीची गोष्ट घडून चव्हाट्यावर आली की हा जातीयवाद्यांचा, मनुवाद्यांचा कट आहे असा कांगावा करता येतो. कट्टर, धर्मांध, पुराणमतवादी, मनुवादी, अल्पसंख्याकविरोधी असे शिक्के मारून तुच्छतेने बघितले जात नाही. आचारविचारातील ढोंगावर पुरोगामित्वाचा लेप चढून ढोंग झाकले जाते.

In reply to by भंकस बाबा

कोणी काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त ती व्यक्ती असं का बोलत असेल असा विचार करत होतो. आणि माझं असंही म्हणणं नाही कि हा फक्त "भंकस बाबा" चा issue आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या पैकी बऱ्याच लोकांची अशीच reaction असते . राग आला की समोरच्या व्यक्तीला मारायचं . ही हिंसा आपण कुठुन शिकतो? कदाचित शाळेतलं वातावरण असेल, अजून काही असॆल . तुम्ही तुकाराम महराजांचं उदाहरण दिलं. त्यांच्या विषयी पूर्ण आदर ठेऊन मी असं म्हणेन की त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे . आज न्यायव्यवस्था शाबूत आहे . कोणालाही इतर कोणाला मारण्याचा (except स्वसंरक्षण ) अधिकार नाही ! मग तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्हाला तो अधिकार मिळत नाही. (anyway आपल्याला राग आला असल्यास माफी मागतो.)

In reply to by अत्रे

आचार्य आपण दुसऱ्याचे संस्कार काढताना त्या व्यक्तिवर व त्याच्या कुटुम्ब वर वैयक्तिक हल्ला करता आहात!

माझ्या सामान्य आकलनानुसार मला दोन मुद्दे मांडावे वाटत आहेत 1 जर कोणी बीजेपी सरकार आल्यावरच असहिष्णुता आली असे म्हणत असेल तर ते चुक आहे. 2 भारतात असहिष्णुता कायम होती/आहे/राहील अन हो ती धर्मं पंथ क्षेत्र निरपेक्ष आहे! (irony indeed) . आर्थिक उदारीकरण झाल्यावर ह्यात वर्गाधारीत असहिष्णुता सुद्धा आली असावी असा अंदाज आहे (ह्या बाबतीत अभ्यास तितकासा नाही!)

बॉटम लाइन

भारतात असहिष्णुता कायम होती अन ती नाकारण्यात अर्थ नाही. तसे पाहता जगातल्या प्रत्येक देश संस्कृती मधे असहिष्णुता आहेच

In reply to by नाना स्कॉच

1 जर कोणी बीजेपी सरकार आल्यावरच असहिष्णुता आली असे म्हणत असेल तर ते चुक आहे.>>>>>>>>+११११११११ 2 भारतात असहिष्णुता कायम होती/आहे/ राहील अन हो ती धर्मं पंथ क्षेत्र निरपेक्ष आहे! >>>>>>>> स्पष्ट कराल का?

In reply to by DEADPOOL

माझे विधान भारतात सहिष्णुता कायम होती/आहे/ राहील त्याच्या वानगीदाखल उदाहरणे (आठवतील तितक्या सगळ्या धर्मांतली उदाहरणे देतोय) अ. ऐतिहासिक 1 तुकोबांची गाथा बुडवली गेली , ती असहिष्णुता नव्हती का? 2 पौराणिक दाखला म्हणल्यास द्रोण ह्यांनी एकलव्याला जी वागणूक दिली ती असहिष्णुता नव्हती? 3 बोधीवृक्षाला विषारी काटा टोचला गेला होता तो करुवाकी ने टोचला होता, ती अशोकाची पत्नी होती, का केले तिने असे ह्याचा शोध घेता अजुन एक करकरीत उदाहरण मिळेल असहिष्णुतेचे 4 औरंगजेबाने लादलेला जिजिया कर ही असहिष्णुता नव्हती का? 5 वेद ऐकले तर कानात शीसे वाली शिक्षा असहिष्णुता नव्हती? 6 विठ्ठलपंत कुळकर्णी ह्यांच्या अश्राप मुलांना ज्यांनी धर्माबाहेर काढले ते असहिष्णु नव्हते?? आता काही समकालीन उदाहरणे 1 श्रीरामसेने चे गुंड जेव्हा पब मधे गेल्या म्हणून स्त्रियांना झोड़पतात ती असहिष्णुता नाही?? 2 मदरश्यातल्या मुलांना जन गण मन म्हणायला सांगितले म्हणून मारझोड़ अन दाढ़ी वाढवायचा आदेश देणारे असहिष्णु नसतात?? 3 एखाद्या व्यक्तीला मांसाहार आवडतो किंवा त्याच्या बंद दाराच्या आड़ मांसाहार केला जातो म्हणून त्याला रहिवासी संकुलात घर/सदनिका न देणारे (मांसाहारी व्यक्तीची संपत्तिक स्थिती उत्तम असूनही) असहिष्णु नसतात??? 4 गावातल्या लोकांबद्दल एक मत तयार करुन "हे फुकटखाऊ टॅक्स भरत नाहीत,आळशीपणा करतात अन आत्महत्या करतात" म्हणणारे किंवा शहरातल्या लोकांबद्दल "त्यांना काय संस्कार आहेत , फ्लॅटच्या दारा आड़ बंदिस्त असतात असंवेदनशील असतात" हे म्हणणारे गावकरी दोन्ही बाजु असहिष्णु नसतात? आता थोड़े असहिष्णुता ह्या संकल्पने बद्दल मुळात असहिष्णुता ही फ़क्त एक धर्माचा विचार दुसऱ्याला मान्य नसणे इतके सोपे सुटसुटीत नसते नसावे असे मला वाटते!! ही एक खुप मोठी कांसेप्ट आहे, जीवनातला कुठलाच हिस्सा ह्याच्यापासून वेगळा नाहीये, अगदी विज्ञान सुद्धा ! खोटे वाटते?? आजचे आधुनिक अभियांत्रिकी ते सिग्नल प्रोसेसिंग मधे उपयुक्त असे fourier transform मांडणाऱ्या joseph fourier ला ती थ्योरी मांडताना काय त्रास झाला होता तो पहावा, ती पण असहिष्णुताच होती!. असो थोड़ा भरकटलो त्याबद्दल क्षमस्व. थोडक्यात काय ? असहिष्णुता कायम होती भारतात अन ती एका धर्माकडूनच होती असेही नाही, ती सगळ्यांकडून होतीच, त्यामुळे कोणीच विक्टिम कार्ड खेळणे चुक आहेच, ही विक्टिमकार्ड्स खेळणे म्हणजे "गुड ओल्ड डेज़" मधे रमणाऱ्या पारशी बुढ्या सारखे असणे वाटते मला वैयक्तिक दृष्ट्या!, बरं ह्यावर बोलायची सोय नसते! बोललो तर वेगळे फाटे फूटत असतात! असो!

In reply to by नाना स्कॉच

म्हणजे असहिष्णुता पूर्वापार चालत आली आहे! मग उजवे सरकार आल्यावरच असहिष्णुता शब्द का ऐकू यायला लागला? हीदेखील असहिष्णुताच नाही का?

In reply to by DEADPOOL

मग उजवे सरकार आल्यावरच असहिष्णुता शब्द का ऐकू यायला लागला? हीदेखील असहिष्णुताच नाही का?
अहो ह्या आणि अशा बर्याच गोष्टींवर काहीजणांची दुकाने चालतात.शिवाय हा संक्रमणाचा काळ असल्याने नवनवीन विचारवंत जन्मास येण्यास अगदी अनुकूल वातावरण आहे.

In reply to by DEADPOOL

असं म्हणता येईल, जर कोणी म्हणाला की असहिष्णुता मुळात "सुरूच" बीजेपी आल्यावर झाली तर ते चुक आहे, पण जर कोणी म्हणाला की असहिष्णुता बीजेपी आल्यावर "वाढीला" लागली तर त्यावर विचार करता येईल, वैयक्तिक दृष्ट्या मला वाटते की बीजेपी अन काँग्रेस कुठलीही पार्टी असो देश चालवायचा म्हणला की ठराविक सेट ऑफ़ प्रिंसिपल्स वरच चालवतात agree or deny but its a hard fact. बीजेपी जेव्हा विरोधीपक्षात होती तेव्हा त्यांच्यालेखी हिंदुंविरुद्ध असहिष्णुता वाढीला लागली होती and vice versa for all isms and political parties in India including congress lefts socialists and all अन हो निरपेक्ष दृष्ट्या पाहता ती ही असहिष्णुता होती अन ही देखील असहिष्णुता आहेच! त्यात राजकीय असहिष्णुता लैच बेक्कार विषय आहे देवा त्यात भल्या भल्यांची फे फे होईल

In reply to by नाना स्कॉच

बिल्कुल नाही कॉँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा bjp ने किंवा कुणीही हा शब्द वापरला नाही!

In reply to by DEADPOOL

मी शब्दप्रमाणिक अर्थाने म्हणालो ही नाहीये! :) शब्द न उच्चारता सुद्धा असहिष्णुता हा मुद्दा (प्रसंगी) तापवला जाऊ शकतो! असो.

In reply to by DEADPOOL

कॉँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा bjp ने किंवा कुणीही हा शब्द वापरला नाही!
का नाही वापरला ? हे म्हणजे पुणेकर दुकानदारांनी आमची कोठेही शाखा नाही सांगण्यासारखे नाही का ;) उदाहरणार्थ हैदराबाद विद्यापीठातील रोहीत वेमुलाच्या आधी झालेल्या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वेळीच काँग्रेस किंवा केंद्रात आंध्रात जी काही सरकारे होती त्यांच्या विरोधात दलित मुलांच्या बाजूने तेव्हाच आवाज भाजपाने केला असता तर दलितांना त्यांच्या बाजूला वळवणेही झाले असते आणि नंतर आता चालू असलेले राजकारण करण्याची काँग्रेस आणि कम्युनीस्टांची संधी कमी झाली नसती का ? पण अशा सकारात्मक कृतीत भाजपा आणि त्यांच्या सहयोगी संस्थांचे कार्यकर्ते मागे पडतात किंवा कसे. आजही युपी बंगाल बिहार मध्ये दलितांच्या नावाने केवळ तोंड देखले काम करणार्‍या सरकारांची भरती आहे. दलितांच्या बाजूने अभ्यासपूर्ण बाजू घेऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपा कमी का पडतो. हा असहिष्णूपणा नाही कामात कमी पडणे आहे.

In reply to by माहितगार

अहो , शब्दप्रमाणिक न राहता बीजेपी ने असहिष्णुतेचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे हो! आत्ता काँग्रेस तेच करते आहे फ़क्त शब्द वापरुन हे माझे वैयक्तिक मत आहे

In reply to by नाना स्कॉच

सहमत, हिंदुबहुल भारतात हिंदूंचा संकोच होतोय अशी बोंब मारत धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न करणे हे दुसरे काय आहे? मुद्दे अंगावर उलटायला लागले की शब्दांचे खेळ खेळणे टिपिकल आहे.

५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
एकांगी भूमिकांकडे निर्देश करण्यात वावगे नसावे तेव्हाच, कोणत्याही एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही हेही लक्षात घ्यावयास हवे. सामाजिक सौहार्द आणि सहिष्णू वातावरणासाठी वस्तुतः Truth and reconciliation commission सारखी व्यवस्थेची गरज मी माझ्या मागच्या एका धागा लेखातून मांडली आहे तीचा पुर्नौल्लेख करतो.

४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
सकारात्मक कृती अफर्मेटीव्ह अ‍ॅक्शनचा भाग म्हणून आरक्षणाचे तर्कसुसंगत समर्थ जिथपर्यंत होते तिथपर्यंत ठिकच अन्यथा हे काँग्रेसी लांगूलचालन ठरते पण मुख्य म्हणजे या मुद्द्याचा असहीष्णूतेच्या मुद्द्याशी खूप सरळ संबंध नाही. एखादी गोष्ट तर्कसुसंगत नाही म्हणून केली नाही अथवा थांबवली तरी त्यानेही कुणी असहीष्णू आहे असे ठरत नसावे. आणि लांगूलचालन अथवा लोकानुनय करणारे अधिक सहिष्णू असतात असेही नसावे.

बिच्चार्या मुस्लिम लोकांवर खूपच अन्याय होतो. दुसर्या महायुद्धात जू लोकांवर झाला नसेल इतका अन्याय गरीब, सहिष्णू, सज्जन,सचोटीने वागणाऱ्या मुस्लीमानावर अन्याय झाला आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे कि गरीब बिचारे कुठलाच प्रतिकार करत नाही. आज मुस्लिम विरुद्ध rest of the world अशी परिस्थिती आहे. अगदी सर्व स्थरातून आणि देशातून ह्यांच्यावर अन्याय होतो. खूपच दया येते ह्यांच्या पापभिरू आणि शांत स्वभावाची.....

२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
इथे तुम्ही हिंदूंच्या स्थितप्रज्ञतेच्या आदर्शांचा उल्लेख केलात तर सहिष्णूतेचे क्रेडीट तुम्हाला नक्कीच मिळते पण या दोन्ही वाक्यांचा निट तपासले तर संबंधीत तोंडसूखांना मुद्देवार अभ्यासपूर्ण खोडणे यातून पुढे येत नाही आम्हाला राग आलेला आहे पण आम्ही तो गिळून शांत आहोत अशी वाली भूमिका आहे. मुद्देसूद पणे खोडले की झाले मनात राग ठेऊन काय साध्य होते ? किमान पक्षी स्थितप्रज्ञतेच्या भूमिकेला धक्का पोहोचतो. मुख्य म्हणजे मानव हा स्खलनशील आहे, तुमचा-किंवा कोणताही धर्म कितीही केव्हा ग्रेट असो त्यातील एखादी व्यक्ती पथभ्रष्ट होणारच नाही उद्या अनंतमुर्ती अथवा ओवेसीवर राग आला म्हणून काही बाही करणारच नाही याची गॅरंटी देणेही अवघड होते पण एखादी व्यक्ती पथभ्रष्ट झाली तरीही सर्व हिंदू धर्मीय असहीष्णू आहेत असा निष्कर्ष कुणी काढणेही घाईचे असावे.

१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
अपवादावरुन नियम सिद्ध करण्याचे अट्टाहास नसतीलतर, तौलनिक दृष्ट्या ढोबळ मानाने हिंदू धर्मीय तत्वज्ञान आणि हिंदू धर्मीय अधिक सहिष्णू आहेत हे मान्यच. अर्थात त्याच वेळी एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होते असेही नसावे.

In reply to by माहितगार

आमचा खापरपणजोबा हिंदू राजे व सरदार याना ट्याक्स देत होता... त्यामोबदल्यात आमचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्ञामुळे मुस्लिम / इंग्रजांच्याबद्दल जाब हिंदु राजे व सरदाराना विचारायला हवा , असे आमचे मत आहे. आम्ही मोघलाना इंग्रजाना याबाबतीत पूर्ण निर्दोष मानतो.

In reply to by hmangeshrao

;) आपल्या उपहासाची दखल घेत मुद्दा अंशतः आणि केवळ अंशतः मान्य करतो. राजा कोणताही असो कनिष्ठ अथवा वरीष्ठ तो जनहीतास बांधील असतो. टॅक्स कुणाच्या हातात दिला त्याने मुख्य शासनकर्त्याची जबाबदारी संपत नसावी असेच तुम्हालाही मनातून वाटत असावे. आपला मुद्दा अंशतः स्विकारला गेल्याने मनात आनंदाची उकळी फुटली असेल तर अवश्य फुटू द्या चर्चेतून कधी कधी आनंद मिळणे चांगली गोष्ट असते. आपल्या स्मित हस्यासाठी शुभेच्छा :)

हबीनण्डन

काय गंमत पहा,शेवटी चर्चेमध्ये मोदी आलेच.

आमचा खापरपणजोबा हिंदू राजे व सरदार याना ट्याक्स देत होता... त्यामोबदल्यात आमचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्ञामुळे मुस्लिम / इंग्रजांच्याबद्दल जाब हिंदु राजे व सरदाराना विचारायला हवा , असे आमचे मत आहे.आम्ही मोघलाना इंग्रजाना याबाबतीत पूर्ण निर्दोष मानतो. जर आमचे रक्षण याना करायचे नव्हते तर त्या पदाव बसुन आमच्या खापरपणजोबाकडुन मुजरे का घेत होते ?

In reply to by hmangeshrao

;) आपल्या उपहासाची दखल घेत मुद्दा अंशतः आणि केवळ अंशतः मान्य करतो. राजा कोणताही असो कनिष्ठ अथवा वरीष्ठ तो जनहीतास बांधील असतो. टॅक्स कुणाच्या हातात दिला त्याने मुख्य शासनकर्त्याची जबाबदारी संपत नसावी असेच तुम्हालाही मनातून वाटत असावे. आपला मुद्दा अंशतः स्विकारला गेल्याने मनात आनंदाची उकळी फुटली असेल तर अवश्य फुटू द्या चर्चेतून कधी कधी आनंद मिळणे चांगली गोष्ट असते. आपल्या स्मित हस्यासाठी शुभेच्छा :)

In reply to by माहितगार

हिंदु राजानी ट्याक्स घेतला. तरीही ते बघत राहिले / युद्ध करुनही हरले. मग इतरानी राज्यविस्तार करुन राज्यकारभार ताब्यात घेउन आमच्या खापरपणजोबाकडुन त्यानीही पैकं घेतलं . खापर कुणावर फोडायचं ? फक्त परदेशी लोकांवर ?

In reply to by hmangeshrao

आपणच अत्यंत ठळक अक्षरात सांगितले आहे की ते टेक्स् भरत होते. आधी पावती दाखवा. समजा नसला ट्याक्स देत , तरीही राजाचे / सरदारांचे देशरक्षण हे कर्तव्य ठरतेच ना ?>>>>>>>> ते भारताचे नागरिक होते याचा विदा अथवा पुरावा द्या! अवांतर : माझ्याकडे आमच्या सहा पिढ्या भारताच्या नागरिक होत्या याचे पुरावे आहेत. + सारा भरल्याच्या कागदपत्रसहित!

In reply to by DEADPOOL

अ आणि ब याना क हे पोर झाले ... जर अ आणि ब हे भारताचे नागरिक असतील तर क हा आपोआपच नागरिक ठरतो. ... आता हेच तत्व उलट फिरवा. क हा भारताचा नागरिक असेल तर त्याचा किमान एक पालक भारतीय असतोच. ..... मी भारताचा नागरिक आहे. .... युक्तिवाद समाप्त!

In reply to by DEADPOOL

ट्याक्सचा संबंधच नाय हो ! देशाचे रक्षण हे राजा / सरदार यांचे कर्तव्यच होते ना ? मनुस्मृतीच्या भाषेत , क्षत्रियांचे कर्तव्य !

In reply to by hmangeshrao

टॅक्स चा विषय कोणी काढला? जर पुरावा देता येत नसेल तर आपले बेजबाबदार विधान मागे घ्या! मनुस्मृतीच्या भाषेत , क्षत्रियांचे कर्तव्य ! >>>>>>>> याचाच अर्थ आपण मनुस्म्रुती मानता हा घ्यायचा का? देशाचे रक्षण हे राजा / सरदार यांचे कर्तव्यच होते ना ?>>>>>>> पण आपण जर त्या देशाचे नागरिक असाल तरच हा मुद्दा लागू होतो. अ आणि ब च्या पुराव्यांचा प्रतिक्षेत!

In reply to by hmangeshrao

मी तर समजत होतो तुम्ही इराण,इराक,सऊदी चे नागरिक आहात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, सुखी होंणे शक्य नाही.उगाच्च खुसपट काढत रहाने हां तुमचा स्थायीभाव झालेला आहे. असो, पण एक इशारा,इथे करता तसे इस्लामिक देशात जाऊन करु नका, म्हणजे अल्पसंख्यक लोकांची तळी उचलणे, लय मारतात हो तिथे! आणि काहीतरी ईशनिंदा कायदा अस् गोंडस नाव पण देतात. बाकी मार खाल्यावर मलम लावायला इथेच याल हो तुम्ही!

पिज्जा हट मधे जसं प्रत्येक पिज्जापुढे १ लाल मिरची, २ लाल मिरच्या, ३ लाल मिरच्यांचे चित्र काढलेले असते जेणेकरुन कोणता जास्त तिखट (मराठीत -स्पायसी)त्यानुसार मागणी करता येते. तर ईथे येणार्‍या धाग्याच्या कंटेंटनुसार तिथे अश्या लाल मिरच्यांचे चित्र लेखाच्या नावा आधी लावावे. लोकांना लेखाचे पोटेंशियल समजण्यास मदत होईल.

In reply to by मितभाषी

धाग्याला दृष्ट लागलीच होती. ४ तासात एकही प्रतिक्रिया आली नव्हती . ते तर माझा पायगुण चांगला आहे मी प्रतिक्रिया दिली आणी सेंचुरी झाली बघा.

In reply to by DEADPOOL

बुध्दीभेद करून एकमेकात भांडणं लावून परस्पर दोघांनाही संपवणारे वायले. आम्ही कोणावर कोणाला सोडत नाही, स्वत: भिडतो.

In reply to by मितभाषी

शांत गदाधारी भीम शांत! उपरोध होता तो! आणि भिडायला तर आम्हीही सदैव तयार असतो.फक्त पुढचा तयारीचा हवा! नाहीतर बेण एका फटक्यात वर जायचं! (हाही विनोदनिर्मितीचा प्रयत्न समाजावा)

In reply to by इरसाल

कोणाच्या नाकाला किती मिरच्या झोंबतील हे आधीच कसं ठरवणार?

दुसरीकडे दिल्लीतील विकासपुरीत झालेल्या डॉ. नारंग ह्यांच्या अमानुष आणि निंदनीय हत्येचा काही फेसबुक संप्रदाय घातक पद्धतीने प्रचार करत आहेत. नारंग कुटुंबियांसाठी हा मोठा आघात असला तरी प्रस्तुत हत्येला कोणताही धार्मिक रंग नव्हता. पोलिसांनी पकडलेल्या मारेकर्‍यांमधे काही मुले हिंदूही आहेत. साध्याशा भांडणातून हत्या करण्याचा हा प्रकार होता. तरी ज्याप्रकारे फेसबुकवर ह्याला धार्मिक रंग देऊन भडकवणे सुरु आहे ते जास्त चिंताजनक आहे. खुद्द नारंग कुटूंबियांनी ह्या प्रेतावरचे लोणी खाण्याच्या पद्धतीबद्दल आक्षेप नोंदवला असला तरी संबंधित लोक शुद्धीवर यायला तयार नाहीत.

बरं आहे हेच अखलाक च्या बाबतीत झालेलं होत तेव्हा कोणता संप्रदाय होता बीफ होत म्हणून हत्या झाली म्हणायला।अखिलेश सरकार ने अखलाक ला बीफ वरून नाही तर वैयक्तिक भांडणावरून मारले असा रिपोर्ट सेंट्रल गवर्मेंट ला दिला होता।तेव्हा तर झाडून सारे फेकुलर शिमगा करीत होते मोदींच्या नावाने।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

सत्य बेमालूम कसे दाबावे ह्याचा हा प्रतिसाद हा पुरावा. जरा टाइमलाइन सांगता का अखलाक मर्डर केसची. दुधकादुध होउन जाइल.

In reply to by DEADPOOL

आणि उद्या ट्रम्प निवडून आला आणि त्याच सुमारास एखाद्या मुस्लिमांची भारतात हत्या झाली तरीही तुम्ही तीच टाइमलाइन जोडाल!

In reply to by DEADPOOL

हा हा हा. अखलाक मर्डर केसची टाइमलाईन जालावर सर्वत्र उपलब्ध आहे. काय झाले कसे झाले सगळे साग्रसंगित उपलब्ध आहे. मी कशाला काय बोलू. हे प्रमुख म्हणतायत बीफवरुन नाही मारले त्याला. वैयक्तिक भांडणाचा बदला धार्मिक षडयंत्र रचून केला गेला, मंदिराच्या भोंग्यावरुन अनाउन्समेंट करुन लोक बोलावल्या गेले, इतर अनेक तप्शील मिळतील तुम्हाला. गोमांसाचे कारण देऊन खून केला. बरेच अ‍ॅन्गल आहेत. पण बीफवरुन मारले नाही हे खोटे आहे. यु कॅन चेक फॉर योर्सेल्फ. खोटं असेल तर सांगा इथे. म्हणून म्हटलं तुम्हीच टाइमलाईन द्या.

इथेही तोच प्रतिसाद देतो "काही लोकं लंगडी बाजूसुद्धा किती हिरारीने मांडत आहेत,हे पाहुन अंमळ गंमत वाटली." हिंदू हा मुसलमानांपेक्षा सहिष्णु आहे,आणि यात शंका असण्याचं कारणच नाही,आणि हे मुसलमानांची बाजू मांडणार्यांनादेखील माहित आहे.

एक साधा प्रश्न-- असहिष्णुता वाढली आहे वगैरे बोंब गेले अनेक महिने मारली जात आहे. दिल्लीचे युगपुरूष मुख्यमंत्री पंतप्रधानांना सायकोपाथ वगैरे म्हणून मुख्यमंत्री या महत्वाच्या पदाची गरिमा कमी करतात हे सगळे चालते. मोदी सरकार आल्यानंतर जर का खरोखरच असहिष्णुता अचानक वाढली असती तर या पध्दतीने सतत बोंब मारायची परवानगी असती का? आणि असहिष्णुता वाढली आहे अशी बोंब मारणारे डावे लोक मात्र त्यांच्या विचारसरणीच्या सत्तेत पक्षाविरूध्द काही बोलणे म्हणजे एकतर गोळी खाणे नाहीतर गुलागमध्ये पाठविणे असेच परिणाम असायचे त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. खरी असहिष्णुता बघायची असेल तर गुलागमध्ये जाऊन बघा. अर्थातच भारतीय समाज सहिष्णु वगैरे भ्रमात मी अजिबात नाही. आपण जितका दावा करतो तितके सहिष्णु अजिबात नाही.पण ही असहिष्णुता गेली कित्येक शतकांपासून आहे. पण हे मध्याच्या डावीकडचे आणि केजरूके गुलाम असे चित्र उभे करत आहेत की पूर्वी सर्वकाही आलबेल होते आणि १६ मे २०१४ पासून असहिष्णुता एकाएकी वाढली आहे. या ढोंगी प्रचाराला मात्र प्रखर विरोध आहे.