✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह

र
रणजित चितळे यांनी
Tue, 03/15/2016 - 13:00  ·  लेख
लेख
फेब्रुवारीच्या ९ तारखेला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली. ह्या कार्यक्रमाच्या वेळेस कन्हैय्याने राष्ट्राविरुद्ध घोषणा केल्या की नाहीत ह्यावर काहूर माजवले गेले आहे. एका क्षणासाठी असे समजू की कन्हैय्याने घोषणा केल्याही नसतील व जमलेल्या गर्दीतून कोणी तरी घोषणा केल्या असतील पण त्याने कन्हैय्याचा देशद्रोह कमी होत नाही. अफझल गुरुच्या स्मरणार्थ आयोजलेल्या कार्यक्रमाला त्याचा पाठिंबा असणे एवढेच देश द्रोहाचे कलम लावण्यासाठी पुरेसे आहे. त्याचा त्या कार्यक्रमात नुसता सहभाग हे ठरवतो की त्याने राष्ट्रद्रोही कार्यात हिस्सा घेतला होता व त्याचा देशद्रोह्यांना पाठिंबा होता. हे झाल्यावर कन्हैय्याला देशद्रोहासाठी अटक होते, दुस-या दिवशी काँग्रेसी व वामपंथी जेएनयू मध्ये जमतात व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कन्हैय्याला पाठिंबा जाहीर करतात. न्यायालया कडून जामीन मिळवून, तुरुंगातून बाहेर आल्यावर जेएनयू मध्ये कन्हैय्या दमदार भाषण ठोकतो. अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे. तसेच अफझल गुरुला पाठिंबा देणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असे पण कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे आमचे असे मानणे आहे की देशद्रोहाच्या आधीच्या केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कन्हैय्याने मोदी व संघाविरुद्ध वक्तव्य दिली. बातम्या देणा-या काही वाहिन्यांनी कन्हैय्याच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राजकारण्यांसाठी तो एका रात्रीत एक हीरो म्हणून शाबीत झाला आहे. बातम्या देणा-या वाहिन्या, त्याने काय केले व काय बोलतो ह्याकडे दुर्लक्षून त्याचे भाषण लोकांना ऐकवून, टीआरपी वाढवण्यात गुंग आहेत. वामपंथी व काँग्रेसला ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. केरळ व प बंगाल वामपंथी लोकांचे गढ आहेत व काँग्रेस जिवंत राहण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच वामपंथी व काँग्रेस ने कन्हैय्याचा उपयोग येणा-या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा प्रयत्न सरू केला आहे. जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली हे सगळे आपल्याच देशात घडू शकते. बातम्या देणा-या वाहिन्यांना टीआरपी कसे वाढेल ह्याचीच काळजी लागली आहे. खरेखोटे व देशाला लाभकारक काय व हानिकारक काय ह्याचे भान ते विसरले आहेत. काँग्रेस व वामपंथ्यांना निवडणूकीच्या काळात लोकांना आकृष्ट करण्यासाठी तयार विषय व माणूस मिळाला आहे त्यामुळे ते पक्ष त्याचा भरपूर उपयोग करून घेत आहेत. ह्या सगळ्या गडबड गोंधळात कन्हैय्याला जर वाटत असेल की दिलेल्या दमदार भाषणाने व वाहिन्यांनी केलेल्या भरपूर कौतुकाने त्याने केलेले राष्ट्रद्रोह न्यायालय किंवा लोकं विसरतील तर त्याचा तो गैरसमज आहे. आम्ही त्याने केलेला राष्ट्रद्रोह कधीही विसरणार नाही. राहुल गांधीने अशा लोकांना समर्थन दिले हे आम्ही कधी विसरणार नाही. आम्ही कधी विसरणार नाही की केवळ राष्ट्रद्रोहाचे पाप पुसण्यासाठी मोदी विरुद्ध व संघा विरुद्ध कन्हैय्याने मोहीम उघडली आहे की जेणे करून लोकांना काय खरे व काय खोटे ह्याचा पत्ता लागू नये. आम्ही विसरणार नाही, निवडणुकांसाठी काँग्रेस व वामपंथी कन्हैय्याचा उपयोग करत आहेत. इंग्रजी बातम्या देणा-या वाहिन्या टीआरपी वाढवण्यासाठी त्याचे कौतुक करत आहेत हे ही आमच्याकडून विसरले जाणार नाही. थोडक्यात - झालेल्या अवमाननेची दखल घेऊन न्यायालयानेच कन्हैय्याला व रशिदला शिक्षा ठोठावायला पाहिजे. देशाविरुद्ध काम करणा-यांना जे पाठिंबा देतात ते सगळे राष्ट्रद्रोही. ह्या मध्ये कसलाही गोंधळ नाही. कन्हैय्याचे भाषण रंगतदार होते का नाही. कन्हैय्या होता का रशीद. हे सगळे प्रश्न गौण आहेत. कोर्टाच्या चपराकींनी किंवा लोकांच्या रोषामुळे, बदललेल्या व्यक्तव्यांनी आमच्या मनात उत्पन्न झालेल्या शंका दूर होणार नाहीत. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर. तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
21295 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

+१

साहेब..
Wed, 03/16/2016 - 10:31 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

.

प्रदीप साळुंखे
Tue, 03/15/2016 - 20:56 नवीन
हा कन्हैयाकुमार अव्वल दर्जाचा नालायक आहे.
  • Log in or register to post comments

साळुंखे साहेब

होबासराव
Tue, 03/15/2016 - 20:59 नवीन
अहो वरचे काहि प्रतिसाद बघा ! आता चक्कि बंद होत आलिये आणि तुम्हि आता दळण आणता होय ;)
  • Log in or register to post comments

हा शेवटचाच प्रतिसाद,

प्रदीप साळुंखे
Tue, 03/15/2016 - 21:05 नवीन
हा शेवटचाच प्रतिसाद, काही नै जाता जाता थोडा सत्कार करून जावे म्हणलं:'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

"राष्ट्रवाद है इसलिए राष्ट्र

नाना स्कॉच
Tue, 03/15/2016 - 21:56 नवीन

"राष्ट्रवाद है इसलिए राष्ट्र नहीं बल्कि राष्ट्र है इसीलिए राष्ट्रवाद है"

-मेजर सिद्धांत चौधरी (राहुल बोस), शौर्य

उगाच आठवले! असो!
  • Log in or register to post comments

अतिशय टुकार कॉपी चित्रपट

इष्टुर फाकडा
Wed, 03/16/2016 - 00:31 नवीन
अतिशय टुकार कॉपी चित्रपट (फ्यु गुड मेन- व्हर्जिनल). राहुल बोसचं पात्र तर लयीच 'चड्डी'. असो. उगाच आठवले ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

इष्टुर बुआ

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 05:01 नवीन
सहमत! फ़क्त ड्वायलॉक आठवला त्यों लिहिला! फ्यू गुड मेन इज फ्यू गुड मेन!! :) (उगाच नाही मुद्दाम लिहितोय) :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इष्टुर फाकडा

राष्ट्र आहे म्हणून का होईना

निनाद मुक्काम …
Wed, 03/16/2016 - 00:51 नवीन
राष्ट्र आहे म्हणून का होईना तुम्हाला राष्ट्रवाद आहे हे तरी मान्य आहे मग राष्ट्राचे तुकडे पडण्याच्या घोषणा दिल्यावर त्या जो प्रत्यक्ष पडत नाही तो पर्यत राष्ट्रदोहाचा आरोप करू नका असे कसे म्हणता येईल भाजपच्या रणनीतीला सलाम सुरवातील सगळे विचार्जंत व जे एन यु मधील लोक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गप्पा मारत उमरची पाठराखण करत होते त्यात कनैह्या सुद्धा होता प कनैह्या ला आत टाकल्यावर राजकीय पक्ष व प्रसरा माध्यमांनी कनैह्या एके कनैह्या सुरु केले उमर त्यांची संघटना ह्यांना वार्यावर सोडले सगळ्यात गंमत म्हणजे अध्यापक गिलानी ह्यांना त्याच्या शिक्षक संघटनेने जे एन यु प्रशासनाने प्रसार माध्यमांनी वाळीत टाकले थोडक्यात भारतविरोधी घटक आपसूकच अडगळीत टाकण्यात आले कनैह्या ला मोदींच्या विरोधात उभे करण्याच्या नादात जनतेसमोर ह्या लोकांनी आपण फक्त राजकारण करत आहोत हे डावे पक्ष व त्यांचे धार्जिणे प्रसार माध्यमे ह्यांना साक्षात्कार झाला. लोकसत्ता ने सुद्धा जसे कोन्ग्रेज धर्म निरपेक्षतेचे कार्ड वापरायची तसे भाजप राष्ट्रवादाचे कार्ड वापरत आहे अशी कोल्हेकुई केली मात्र भाजपने कार्ड वापरल्यावर ज्या तत्परतेने त्यांनी बोंबाबोंब केली ती कोन्ग्रेज च्या वेळी केली नाही. भारतीय जनतेला तुम्ही कोणतेही कार्ड वापरा काहीही फरक पडत नाही त्यांना रोटी कपडा मकान हवे असते ते मिळाल्यावर माफक चंगळवाद संस्कृती उपभोगू सहकु एवढा पैसा गाठीशी असला कि आपण बरे आपले डेली सोपस आणि रिया लेटी शोज बरे तोंडी लावायला आय पी एल क्रिकेट आणि बॉलीवूड बाकी काहीही नको आंदोलनाचे दिवस सरले महाराजा उशाकाल होता होता ह्या गाण्यातील एक वाक्यावर भारतीय जनतेचा ठाम विश्वास बसला आहे जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी म्हणूनच जे आहे तेच खरे वास्तव मानून भारतीय समाज प्रत्येक दिवशी जास्तीजास्त भांडवलशाहीचा पाईक होत आहे असे प्रांजळ साल सलाम लाल माकडे अजून काही वर्ष करतील मग ते इतिहासाचा भाग बनतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

भारतीय जनतेला तुम्ही कोणतेही

तर्राट जोकर
Wed, 03/16/2016 - 01:14 नवीन
भारतीय जनतेला तुम्ही कोणतेही कार्ड वापरा----- क्रिकेट आणि बॉलीवूड बाकी काहीही नको >> भारतीय जनतेबद्दलचा फारच गोग्गोड, मेट्रोपोलिटन व्यू आहे. भारतीय जनतेवर इतका विश्वास आहे तरी दोन-चार माथेफिरूंच्या चार-दोन फुटकळ घोषणांनी ह्या अवाढव्य राष्ट्राचे पिझ्झासारखे तुकडे पडतील अशी भीती का वाटली असावे बरे? मिडीयाने कन्हयाला एवढीशी हवा दिल्यावर धरणीकंप होईल एवढा का थयथयाट झाला असावा बरे? त्या थयथयाटाची थरथर अजूनही कमी झाल्यासारखी वाटत नाहीये. असे प्रांजळ साल सलाम लाल माकडे अजून काही वर्ष करतील मग ते इतिहासाचा भाग बनतील >> असे वारंवार बोलत राहिल्याने बोलणार्‍याला थ्री इडियट्सवाली 'ऑल इ़ज वेल ऑल इज वेल' टैप शांतता मिळत असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

जर्मन काका

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 05:09 नवीन
तुम्ही बुआ समोरच्याला लैच गृहीत धरता ! राष्ट्र प्रत्येकालाच मान्य आहे हो (किमान जालीय एक्सेस असणाऱ्या प्रत्येक सुखवस्तुला तर नक्कीच) फ़क्त त्याची परिभाषा काय? ते मुद्दल क्लियर झाले की ओमर खालिद सारख्या वाय झेड लोकांस शिव्या देणे सोईचे पड़ते, बीजेपी च्या रणनीती ला सलाम करणे म्हणजे राष्ट्र अन राष्ट्रवाद आहे होय हो दादा??? असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

खरे आहे

रणजित चितळे
Wed, 03/16/2016 - 10:58 नवीन
एकदम पटले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

आपल्याकडे फुकट सल्ले द्यायला

अत्रे
Tue, 03/15/2016 - 22:02 नवीन
आपल्याकडे फुकट सल्ले द्यायला फार आवडतं लोकांना। कोणी काय शिकावं, काय शिव्या द्याव्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, नाही का?
  • Log in or register to post comments

अत्रे

ट्रेड मार्क
Wed, 03/16/2016 - 01:26 नवीन
हा पण एक फुकट सल्लाच आहे असे निरीक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रे

हाहा। पण सल्ला कुठे दिला मी

अत्रे
Wed, 03/16/2016 - 08:38 नवीन
हाहा। पण सल्ला कुठे दिला मी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

नव-युग्पुरुष आणि भारतिय नागरीकांचे आशास्थान

होबासराव
Tue, 03/22/2016 - 21:13 नवीन
नव-युगपुरुष कन्हैय्या आणि भारतिय नागरीकांचे आशास्थान रा.रा. राहुल गांधि ह्यांचि आज भारताला सध्या भेडसावणार्‍या समस्या ह्या बद्दल गहन चर्चा झालि. कुछ तो करना हि पडेगा न्युज मे बने रहने के लिये :)
  • Log in or register to post comments

भारतिय नागरीकांचे आशास्थान रा

काळा पहाड
Wed, 03/23/2016 - 00:22 नवीन
भारतिय नागरीकांचे आशास्थान रा.रा. राहुल गांधि
तरूण आशास्थान न म्हटल्याबद्दल निषेध!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

कृतघ्न कन्हैया

रमेश आठवले
Wed, 03/23/2016 - 07:32 नवीन
कन्हैया गेले काही वर्षे ८००० दरमहा शिष्यवृत्ती उपभोगत आहे. त्याला अत्यल्प दराने वसतिगृहात रहाणे व भोजन यांची सोय आहे. आपल्या भाषणात त्याच्या आई वडलांच्या गरिबी बद्दल बोलतो आणि त्यांना मासिक फक्त ३००० रुपये मिळतात असे सांगतो. पण तो त्याना आर्टिक मदत करत असल्याची माहिती कुठेही आलेली नाही
  • Log in or register to post comments

...

hmangeshrao
गुरुवार, 03/24/2016 - 10:55 नवीन
मोदीजी सौभाग्य्वती मोदीना किती पोटगी देतात , हे कसे समजेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

बादरायण सम्बन्ध

रमेश आठवले
गुरुवार, 03/24/2016 - 20:06 नवीन
आपण मोदींची आणि कन्हैया ची तुलना कशी करू शकता ? कन्हैया तोंड उघडले की त्याचे आई वडील कसे गरीब आहेत आणि त्या साठी समाजव्यवस्था कशी दोषी आहे हे सांगत फिरत असतो.८-९ वर्षे टिवल्या बावल्या करत शिष्यवृत्तीवर मजा करत आहे, आई वडिलांच्या गरीबीचे भांडवल करत आहे आणि शिष्यवृत्ती ८००० वरून १२००० करावी या साठी चळवळ करीत आहे . पोटगी कायद्याने घटस्फोट झाला तरच मागू शकतात हे आपणास माहीत नाही का ? क्न्हैयाची तुलना मोदींशी करण्यात त्याचे महत्व वाढवणे हा तुमचा हेतू नाही असे मी मानतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

तूमचे ज्ञान वाढवा !

hmangeshrao
Fri, 03/25/2016 - 21:00 नवीन
पोटगी कायद्याने घटस्फोट झाला तरच मागू शकतात हे आपणास माहीत नाही का ? मोदी सर्कारने कायदा बदलला की काय ? !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

कायद्यात हाय तरतूद आहे ?

रमेश आठवले
Sat, 03/26/2016 - 01:53 नवीन
कायद्यात काय तरतूद आहे ते लिहून माझे अज्ञान दूर केल्यास मी आभारी राहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

..

hmangeshrao
Sat, 03/26/2016 - 06:05 नवीन
गुगल वाइफ , मेंटेनन्स , डायवोर्स. Obligation of a husband to maintain his wife arises out of the status of the marriage. Right to maintenance forms a part of the personal law. Under the Code of Criminal Procedure, 1973 (2 of 1974), right of maintenance extends not only to the wife and dependent children, but also to indigent parents and divorced wives. http://www.legalserviceindia.com/articles/hmcp.htm
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

तूमचे ज्ञान वाढवा !

hmangeshrao
Fri, 03/25/2016 - 21:46 नवीन
पोटगी कायद्याने घटस्फोट झाला तरच मागू शकतात हे आपणास माहीत नाही का ? मोदी सर्कारने कायदा बदलला की काय ? !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

नव-युगपुरुष कन्हैय्या

होबासराव
Wed, 03/23/2016 - 14:05 नवीन
आज हैद्राबाद युनिव्हर्सिटी ला भेट देतायत.
  • Log in or register to post comments

कन्हैयाला प्रवेशबंदी

रमेश आठवले
Wed, 03/23/2016 - 19:59 नवीन
कन्हैयाला हैदराबाद युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश करू दिला नाही अशी आत्ताची बातमी आहे. कदाचित काल डाव्या मताच्या २० विद्यार्थ्यांनी उप कुलगुरुंच्या ऑफिस वर हल्ला करून त्याना ६ तास डांबून ठवले त्याचा हा परिणाम असेल. आता पुण्याच्या संस्थे सारखे इथेही मुठभर विद्यार्थी उप कुलगुरू कोण असावेत हे ठरवू पहात आहेत. http://timesofindia.indiatimes.com/india/Kanhaiya-stopped-at-the-gate-of-Hyderabad-university/articleshow/51530159.cms
  • Log in or register to post comments

आपला काहीही संबंध नसताना

श्रीगुरुजी
गुरुवार, 03/24/2016 - 15:42 नवीन
आपला काहीही संबंध नसताना आव्हाड फर्ग्युसनमध्ये गेला होता. तिथे त्याला धक्काबुक्की झाली. आता काल त्याने ट्वीट करून तारे तोडले आहेत. "फर्ग्युसनची स्थापना शाहू महाराजांनी स्वतंत्रलढ्याच्या प्रेरणेतून केली त्याच कॉलेजच्या प्राचार्यांनी शाहू महाराजांच्या विचारांची होळी केली" हा नावामागे डॉक्टर लावतो. बहुतेक बारामती विद्यापीठाने त्याला डॉक्टरेट दिली असावी. फर्ग्युसन कॅालेजची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, व महादेव बल्लाळ नामजोशी यांनी केली होती हे सुद्धा याला माहिती नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

कन्हैय्या ~= हार्दिक पटेल

Jack_Bauer
Wed, 03/23/2016 - 21:29 नवीन
मेडियाच्या दृष्टीने कन्हैय्या ~= हार्दिक पटेल. थोडे दिवस हवा करायची, नवीन मुद्दा मिळाला कि तिकडे धावायचे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा