✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रसिद्धीसाठी राष्ट्रद्रोह

र
रणजित चितळे यांनी
Tue, 03/15/2016 - 13:00  ·  लेख
लेख
फेब्रुवारीच्या ९ तारखेला रशीद जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम अफझल गुरुला फाशी दिल्याच्या निषेधार्थ आयोजित केला होता व अशा तर्‍हेचे पोस्टर्स जेएनयूमध्ये सगळीकडे चिकटवली गेली होती. गेली तीन वर्षे अफजल गूरच्या फाशी दिनी असे कार्यक्रम होत होते अशा बातम्या आहेत. कार्यक्रमाची तयारी जोरात होती. ह्या समारंभाला कन्हैय्या व त्याच्या माववादी (डिएसयू) संघटनेचा पाठिंबा होता. ह्या कार्यक्रमाच्या रूपाने अर्थातच न्यायालयाची अवमानना केली गेली कारण फाशी न्यायालयाने ठोठावली. ह्या कार्यक्रमाच्या वेळेस कन्हैय्याने राष्ट्राविरुद्ध घोषणा केल्या की नाहीत ह्यावर काहूर माजवले गेले आहे. एका क्षणासाठी असे समजू की कन्हैय्याने घोषणा केल्याही नसतील व जमलेल्या गर्दीतून कोणी तरी घोषणा केल्या असतील पण त्याने कन्हैय्याचा देशद्रोह कमी होत नाही. अफझल गुरुच्या स्मरणार्थ आयोजलेल्या कार्यक्रमाला त्याचा पाठिंबा असणे एवढेच देश द्रोहाचे कलम लावण्यासाठी पुरेसे आहे. त्याचा त्या कार्यक्रमात नुसता सहभाग हे ठरवतो की त्याने राष्ट्रद्रोही कार्यात हिस्सा घेतला होता व त्याचा देशद्रोह्यांना पाठिंबा होता. हे झाल्यावर कन्हैय्याला देशद्रोहासाठी अटक होते, दुस-या दिवशी काँग्रेसी व वामपंथी जेएनयू मध्ये जमतात व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कन्हैय्याला पाठिंबा जाहीर करतात. न्यायालया कडून जामीन मिळवून, तुरुंगातून बाहेर आल्यावर जेएनयू मध्ये कन्हैय्या दमदार भाषण ठोकतो. अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे. तसेच अफझल गुरुला पाठिंबा देणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असे पण कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे आमचे असे मानणे आहे की देशद्रोहाच्या आधीच्या केलेल्या पापातून मुक्ती मिळवण्यासाठी कन्हैय्याने मोदी व संघाविरुद्ध वक्तव्य दिली. बातम्या देणा-या काही वाहिन्यांनी कन्हैय्याच्या भाषणाचे कौतुक केले आहे. राजकारण्यांसाठी तो एका रात्रीत एक हीरो म्हणून शाबीत झाला आहे. बातम्या देणा-या वाहिन्या, त्याने काय केले व काय बोलतो ह्याकडे दुर्लक्षून त्याचे भाषण लोकांना ऐकवून, टीआरपी वाढवण्यात गुंग आहेत. वामपंथी व काँग्रेसला ह्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. केरळ व प बंगाल वामपंथी लोकांचे गढ आहेत व काँग्रेस जिवंत राहण्याच्या प्रयत्नात आहे. साहजिकच वामपंथी व काँग्रेस ने कन्हैय्याचा उपयोग येणा-या निवडणुकांमध्ये करून घ्यायचा प्रयत्न सरू केला आहे. जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याखाली हे सगळे आपल्याच देशात घडू शकते. बातम्या देणा-या वाहिन्यांना टीआरपी कसे वाढेल ह्याचीच काळजी लागली आहे. खरेखोटे व देशाला लाभकारक काय व हानिकारक काय ह्याचे भान ते विसरले आहेत. काँग्रेस व वामपंथ्यांना निवडणूकीच्या काळात लोकांना आकृष्ट करण्यासाठी तयार विषय व माणूस मिळाला आहे त्यामुळे ते पक्ष त्याचा भरपूर उपयोग करून घेत आहेत. ह्या सगळ्या गडबड गोंधळात कन्हैय्याला जर वाटत असेल की दिलेल्या दमदार भाषणाने व वाहिन्यांनी केलेल्या भरपूर कौतुकाने त्याने केलेले राष्ट्रद्रोह न्यायालय किंवा लोकं विसरतील तर त्याचा तो गैरसमज आहे. आम्ही त्याने केलेला राष्ट्रद्रोह कधीही विसरणार नाही. राहुल गांधीने अशा लोकांना समर्थन दिले हे आम्ही कधी विसरणार नाही. आम्ही कधी विसरणार नाही की केवळ राष्ट्रद्रोहाचे पाप पुसण्यासाठी मोदी विरुद्ध व संघा विरुद्ध कन्हैय्याने मोहीम उघडली आहे की जेणे करून लोकांना काय खरे व काय खोटे ह्याचा पत्ता लागू नये. आम्ही विसरणार नाही, निवडणुकांसाठी काँग्रेस व वामपंथी कन्हैय्याचा उपयोग करत आहेत. इंग्रजी बातम्या देणा-या वाहिन्या टीआरपी वाढवण्यासाठी त्याचे कौतुक करत आहेत हे ही आमच्याकडून विसरले जाणार नाही. थोडक्यात - झालेल्या अवमाननेची दखल घेऊन न्यायालयानेच कन्हैय्याला व रशिदला शिक्षा ठोठावायला पाहिजे. देशाविरुद्ध काम करणा-यांना जे पाठिंबा देतात ते सगळे राष्ट्रद्रोही. ह्या मध्ये कसलाही गोंधळ नाही. कन्हैय्याचे भाषण रंगतदार होते का नाही. कन्हैय्या होता का रशीद. हे सगळे प्रश्न गौण आहेत. कोर्टाच्या चपराकींनी किंवा लोकांच्या रोषामुळे, बदललेल्या व्यक्तव्यांनी आमच्या मनात उत्पन्न झालेल्या शंका दूर होणार नाहीत. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर. तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या
21295 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

सहमत

सुमीत भातखंडे
Tue, 03/15/2016 - 13:14 नवीन
लेखातल्या भावनांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

उत्तम

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/15/2016 - 13:14 नवीन
बरोबर लिहिले आहेस रे रणजीत. मल्ल्यांचा विजय ७००० कोटी बडवून विलायतेस गेला तेव्हाही समाजात अशी चीड दिसायला पाहिजे होती असे आमचे मत.मनमोहन असताना हे घडले असते तर एव्हाना ४ शतकी धागे येथे निघाले असते असे ह्यांचे मत.
  • Log in or register to post comments

.

प्रदीप साळुंखे
Tue, 03/15/2016 - 13:24 नवीन
चालायचच, असं ना तसं प्रत्येकजण आपआपली तळी उचलतच असतो, शेवटी "अपना अपना स्टाईल होता है"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

+1

भाऊंचे भाऊ
Tue, 03/15/2016 - 13:25 नवीन
जिंकलं तुम्ही माई
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माई, कशा आहात? तुमचे हे काही

सूड
Tue, 03/15/2016 - 14:10 नवीन
माई, कशा आहात? तुमचे हे काही म्हणत नाहीत का हल्ली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

माई

नाखु
Tue, 03/15/2016 - 14:46 नवीन
नक्की आकडा सांगा कारण आम्ही सकाळी वाचले ते वेगळे होते.

विजय मल्ल्यांना भारतात आणा-कॉंग्रेस

- - पीटीआय मंगळवार, 15 मार्च 2016 - 01:45 AM IST Tags: vijay mallya, india, congress, new delhi कॉंग्रेस सदस्यांची राज्यसभेत मागणी; ललित मोदींवर निशाणा नवी दिल्ली - उद्योगपती विजय मल्ल्या यांनी बॅंकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याचा मुद्दा कॉंग्रेसने सोमवारी राज्यसभेत उपस्थित केला. परदेशात पलायन केलेल्या मल्ल्या व "इंडियन प्रीमिअर लीग‘चे माजी प्रमुख ललित मोदी यांना भारतात परत आणावे, अशी मागणी केली. प्रश्‍नोत्तराच्या तासात कॉंग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत येऊन घोषणा दिल्या. "विजय मल्ल्या, मोदी को वापस लाओ‘, अशा घोषणांनी सभागृह दणाणून सोडले. प्रमोद तिवारी यांनी मल्ल्यांबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, कर्जबुडवे उद्योगपती हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेचे सदस्य झाले आहेत. मल्ल्या यांच्याविषयी तिवारी यांनी केलेले वक्‍तव्य अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी स्वीकारलेले नाही, अशी माहिती उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी दिली. ===================== वाचताना चष्मा लावला नव्हता बहुतेक तुम्ही, बाकी तुम्च्या यांच्या पाठीची उसण बरी आहे ना, काळजी वाटते हो (श्रीगुरुजींना)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

विजय मल्ल्या, मोदी को वापस

चेक आणि मेट
Tue, 03/15/2016 - 15:11 नवीन
विजय मल्ल्या, मोदी को वापस लाओ‘, गडबड झाली वाटतं:'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ते ललीत मोदी साठी होतं. फक्त

शलभ
Tue, 03/15/2016 - 16:34 नवीन
ते ललीत मोदी साठी होतं. फक्त मोदी म्हटलं की दुहेरी हेतू साध्य होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट

माई, तुमच्या ह्यांना जरा हा लेख वाचायला सांगा.

बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 16:38 नवीन
म्हणजे बँकांनी काय चूक केली आणि या सगळ्या चुका केव्हा झाल्या ते समजेल. http://googleweblight.com/?lite_url=http://indianexpress.com/article/india/india-news-india/sunday-story-once-upon-a-time-there-was-a-king-vijay-mallya/&lc=en-IN&s=1&m=671&host=www.google.co.in&ts=1458039242&sig=APY536wjjBqrO08dmaxHa7Y75AjP5-lfXQ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

लिंक्स बद्दल धन्यवाद....

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 16:47 नवीन
लिंक्स बद्दल धन्यवाद....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 03/15/2016 - 18:07 नवीन
थोडासा वाचला रे लेख बोक्या. मल्ल्यानी "मी परदेशात जाणार आहे' हे घोषित केले होते ना? मग वेळीच कृति केली असती तर ? "कायदा बघावा लागतो' हे अरूण जेटलींचे स्पष्टीकरण अगदी साजेसे. मल्ल्या ह्यानी सर्व प़क्षांना भरघोस देणग्या दिल्या आहेत ही वस्तुस्थिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

दोन गोष्टी आहेत माईसाहेब.

बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 19:14 नवीन
१. पैसे वसूल करणे २. मल्ल्याला शिक्षा करणे. पैसे वसूल करण्यासाठी civil दावा आणि शिक्षेसाठी criminal case. आपल्याकडे हीच चूक, अगदी हर्षद मेहताच्या काळापासून राज्यकर्ते करताहेत. पैसे वसूल करण्याला नेहमी दुय्यम महत्व असतं. अमक्यातमक्या fraudster ला कसा हातकड्या घालून तुरूंगात नेला - ज्याला अमेरिकेत Perp walk असा चपखल शब्द आहे - हे लोकांना दाखवणं कधीही जास्त glamorous असतं. इथेही तेच झालेलं आहे. २ मार्चला मल्ल्या देश सोडून गेला. त्यावेळी त्याच्यावर गुन्हेगारी आरोप नव्हते. त्यामुळे त्याला विमानतळावर अटक होऊ शकली नाही. बँकांनी बहुतेक त्यानंतर गुन्हेगारी स्वरूपाची तक्रार दाखल केली. तोपर्यंत मल्ल्या निघून गेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

अहो आज्जीबै

पैसा
Tue, 03/15/2016 - 21:00 नवीन
अहो आज्जीबै, कर्नलसाहेब तुमचे नातू का? त्यांनाही अरे रणजित म्हणताय म्हणून विचारते. त्यांचं वय मला माहीत आहे. त्या हिशेबाने तुम्ही शंभरी पार केलेली असणार एव्हाना. बाकी याआधी बोस, मोदी, फडणवीस आणि गांधीजीनाही तुम्ही एकेरीत बोललेले आठवते आहे. मनमोहन सिंगानाही तुम्ही याच वाक्यात एकेरीत संबोधले आहे त्यामुळे आश्चर्य वाटले नाही. फक्त लिहिताना जरा तारतम्य वापरत चला एवढी विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

बाकीजाणून घ्यायची गोष्ट ही की

आनन्दा
Tue, 03/15/2016 - 13:48 नवीन
बाकी
जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही.
हा मास्टरपीस.. मी देखील बरेच दिवस याच विषयावर विचार करत आहे. ३१ वर्षांचा कन्हैया अजून महाविद्यालयीन विद्यार्थी आहे, आणि त्याची आई म्हणे मोलमजुरी करून त्याला पोसते. असो. त्याची शिकण्याची हौस अजून फिटली नसावी. (मी हे वाक्य वापरून टीकाकारांना आयते कोलीत मिळवून देत आहे याची मला कल्पना आहे) परंतु त्याच्या वयाचा विचार करता त्याला विचारवंत, अगदी गेला बाजार अभ्यासक वगैरे म्हणावयास कहीच हरकत नसावी. त्याची कॉलेज गोईंग स्टुडंट ची जी प्रतिमा डोळ्यासमोर जाणून बुजून उभी केलेली आहे ती पुसून अ‍ॅक्टिव्हिस्ट अशी प्रतिमा उभी केल्यास बर्‍याच गोष्टींशी रिलेट करणे सोपे जाईल.
  • Log in or register to post comments

चितळेसाहेब

बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 16:19 नवीन
ब-याच दिवसांनी आलात आणि आल्यावरच सिक्सर मारलीत!
  • Log in or register to post comments

एक नंबर लेख....

मुक्त विहारि
Tue, 03/15/2016 - 16:26 नवीन
एकदम बूल्स आय.
  • Log in or register to post comments

डोळे उघडणारा लेख

तिमा
Tue, 03/15/2016 - 16:47 नवीन
ताज्या लोकप्रभामधे, एका विद्यार्थ्याने जे.एन.यु. प्रकरणाचा 'आँखो देखा हाल' लिहिला आहे. तो जरुर वाचावा. http://epaper.lokprabha.com/744982/Lokprabha/18-03-2016#page/16/1
  • Log in or register to post comments

एकदम असहमत,

भंकस बाबा
Tue, 03/15/2016 - 16:55 नवीन
असे काही मधुशालेत गेलेले विद्वान बोलल्याचे आठवते. असो बाकी मांडणी व्यवस्थित केलि आहे पण श्रीगुरुजीनि इतके स्पष्टीकरण या संदर्भात दिले आहे की या धाग्याच्या विरोधात कोणी उभे राहिलसे वाटत नाही. उत्तम लेख रणजीत साहेब
  • Log in or register to post comments

कर्नल साहेब छान आणि योग्य लिहिलयत तुम्हि

होबासराव
Tue, 03/15/2016 - 16:59 नवीन
कर्नल साहेब छान आणि योग्य लिहिलयत तुम्हि.
  • Log in or register to post comments

बरेच दिवसांनी

पैसा
Tue, 03/15/2016 - 18:00 नवीन
चितळेसाहेब, बरेच दिवसांनी लिहिलेत. लेखाशी सहमत आहे. मुळात विद्यार्थ्यानी राजकारण का करावे हेच समजत नाही. शिक्षण संपवून काय हवे ते करावे. सगळे आयुष्य अजून बाकी असते. या लेखामुळे ३१ व्या वर्षी मी दोन मुलांची आई आणि संसाराचा गाडा ओढणारी हमाल होते, तसेच सरकारला माझ्या वाट्याचा इन्कम टॅक्स पण प्रामाणिकपणे भरत होते हे लख्ख आठवले.
  • Log in or register to post comments

मुळात विद्यार्थ्यानी राजकारण

बाळ सप्रे
Wed, 03/16/2016 - 10:35 नवीन
मुळात विद्यार्थ्यानी राजकारण का करावे हेच समजत नाही. शिक्षण संपवून काय हवे ते करावे
शिक्षण हे फक्त शिक्क्यासाठी वापरणारे असतातच की, ज्यांचं करीअर आधीच ठरलेलं असतं.. त्यामुळे विद्यार्थ्यांनी राजकारण करायलाही काही हरकत नाही पण प्रत्येक राजकीय पक्षाची वेगळी विद्यार्थी विंग का? राजकारण करायचचं तर तशाही पायर्‍या असतातच की आधी गाव/ शहर/ जिल्हा मग राज्य वगैरे.. मग विद्यार्थी विंग का आणि सर्वच पक्षाचे विद्यार्थी नेते विद्यार्थी म्हणायच्या पलिकडच्या वयाचेच असतात.. हे कोडं आहे बाकी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

तुझ्या वयाची मुले दहा वर्षा

मार्मिक गोडसे
Tue, 03/15/2016 - 18:27 नवीन
तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे.
आजच्या Business Standard मधील हा लेख वाचा. कन्हैयासारखे आणखी कोणकोण करदात्यांचे पैसे खाऊन देशाविरुद्ध वागतायेत ते कळेल.
  • Log in or register to post comments

लेख वाचला. चांगला आहे.

बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 19:41 नवीन
आय.आय.टी.मधून शिकून बाहेर पडलेला एखादा इंजिनियर जेव्हा आपल्या अभियांत्रिकी ज्ञानाचा वापर देशासाठी करण्याऐवजी वाॅल स्ट्रीटवर ट्रेडिंग करण्यासाठी करतो किंवा स्वस्त डिझेल वापरून कुणीतरी आपली एस.यू.व्ही.ची टाकी भरतो तेव्हा त्यांना कुणी करदाता का प्रश्न विचारत नाही असं यात विचारलेलं आहे. चांगले मुद्दे आहेत. पण याचा प्रतिवाद हा आहे की - १.कन्हैया आणि जे.एन.यू. मधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं चुकीचं वागणं दुस-या कुणाच्या चुका दाखवून कमी होणार नाही. ही whatabouteryच आहे एक प्रकारची. आणि जर एका ठराविक पक्षाच्या पाठीराख्यांच्या म्हणण्यावर whataboutery म्हणून आक्षेप घेतला जाऊ शकतो तर यावरही घ्यायला पाहिजे. नाहीतर सरळ आपण पक्षपात करतो असे मान्य करायला पाहिजे. २. आय.आय.टी.मधून बाहेर पडलेल्या अनेक जणांनी तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कामगि-या केलेल्या आहेत. नारायणमूर्तींसारख्यांंनी कंपन्या उभ्या करुन अनेकांना रोजगार दिलाय. जे.एन.यू. मधून बाहेर पडलेल्यांनी असं काय काम केलंय? ३. आय.आय.टी. मधले किती जण परदेशात आहेत आणि तिथले नागरिक आहेत? परदेशात काम करणारा माणूस स्वदेशात पैसे पाठवत असेल (remittances) हा विचार या लेखाच्या लेखकाने केलेला दिसत नाही. ४. एस.यू.व्ही. आणि स्वस्त डिझेलचा मुद्दा ठीक अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे

एकंदरित बोका ह्यांचा प्रतिसाद आवडलेला आहे,

नाना स्कॉच
Tue, 03/15/2016 - 20:30 नवीन
तरीही 2 पैसे आमचेही १.कन्हैया आणि जे.एन.यू. मधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं चुकीचं वागणं दुस-या कुणाच्या चुका दाखवून कमी होणार नाही. ही whatabouteryच आहे एक प्रकारची. आणि जर एका ठराविक पक्षाच्या पाठीराख्यांच्या म्हणण्यावर whataboutery म्हणून आक्षेप घेतला जाऊ शकतो तर यावरही घ्यायला पाहिजे. नाहीतर सरळ आपण पक्षपात करतो असे मान्य करायला पाहिजे. बऱ्याच अंशी मान्य, पण मुळात व्हॉटअबाउटरी सूरु कोणी केली ? हा प्रश्न एकंदरित आधी कोंबड़ी का अंडे धाटणीचा आहे! ह्यात एकमत होणे शक्य नाही असे वाटते २ आय.आय.टी.मधून बाहेर पडलेल्या अनेक जणांनी तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कामगि-या केलेल्या आहेत. नारायणमूर्तींसारख्यांंनी कंपन्या उभ्या करुन अनेकांना रोजगार दिलाय. जे.एन.यू. मधून बाहेर पडलेल्यांनी असं काय काम केलंय? Are we judging a gold fish by its capability to climb a tree in here?? ३. आय.आय.टी. मधले किती जण परदेशात आहेत आणि तिथले नागरिक आहेत? परदेशात काम करणारा माणूस स्वदेशात पैसे पाठवत असेल (remittances) हा विचार या लेखाच्या लेखकाने केलेला दिसत नाही. भारतीय डायस्पोरा मिळून भारतीय जीडीपीच्या चार टक्के (4%) रेमिटेंस देतो, एकतर चार टक्के काही फार मोठा आकड़ा नाही, दूसरे म्हणजे चार टक्के टोटल डायस्पोरा रेमिटेंस आहे त्यातले आयआयटीयन्स किती? डॉक्टर्स किती?? बिज़नसमन किती हा आकड़ा वेधक असेल, बहुसंख्य रेमिटेंस हे परदेशस्थ बिज़नसमन अन स्मॉल एंटरप्राइज ओनर्स कडून येतो का? हे बघणे रोचक असेल, चार टक्यात इतके वाटेकरी आहेत मग आयआयटीयन्सची मातब्बरी ती अशी काय असणार? 0.25 ते 2.00% किंवा टोटल रेमिटेंसच्या 50% पकडली तरी ती काय मोठी लागून जाईल? ४.एस.यू.व्ही. आणि स्वस्त डिझेलचा मुद्दा ठीक अाहे. ह्यावर मी लेख अन आपल्या प्रतिसाद दोहोंशी सहमत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

१.एकमत होणं शक्य नाही यावर

बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 21:10 नवीन
१.एकमत होणं शक्य नाही यावर एकमत. २.हा मुद्दा मांडण्याचं कारण त्या Business Standard मधल्या लेखात IIT आणि JNU अशी करदात्यांच्या दृष्टिकोनातून तुलना केलेली आहे, आणि लेखकाचा मुद्दा काहीसा असा आहे - जर तुम्ही JNU मधल्या देशाविरोधी निदर्शनं करणारे विद्यार्थी जर माझ्या करांच्या पैशांवर शिकतात असं म्हणतात तर मग IIT चं काय? आणि मग त्यातून पुढे - देशाचा पैसा खर्च करून कसा तो IIT मधला विद्यार्थी अमेरिकेत पैसा कमावतोय आणि कसं करदाते त्याला विचारत नाहीत पण JNU वाल्याला विचारताहेत वगैरे वगैरे. त्यामुळे हा प्रश्न स्वाभाविक आहे की जसं IIT मधून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आपण दाखवू शकतो की त्यांनी देशासाठी काहीतरी भरीव केलेलं आहे. नारायणमूर्तींचं उदाहरण त्याच अनुषंगाने आहे. तसं JNU मधलं कुणी आहे का? ३. इथे मुद्दा वेगळा आहे. IIT मधले लोक परदेशी जाऊन काम करतात आणि त्यांना करदात्यांचा पैसा वाया घालवता असं कोणी म्हणत नाही असं लेखकाचं म्हणणं आहे. So, प्रश्न असा आहे की भारतातील १३ (चूभूद्याघ्या) IITs मधून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यातले परदेशी किती जातात आणि भारतातच किती राहतात? Remittance चा मुद्दा काढायचा हेतूही तोच आहे. जर एखादा माणूस परदेशात जाऊन खूप कमावतोय ही एकच बाजू आपण बघत असू तर तो अन्याय आहे. जर तो माणूस हा पैसा जमवून remittance म्हणून स्वदेशात पाठवत असेल तर? लेखकाने फक्त त्याचं कमावणं बघितलंय. तो हे पैसे घरी पाठवत असेल आणि ते पैसे भारतीय अर्थव्यवस्थेत काही खारीचा वाटा उचलत असतील ही शक्यता विचारात घेतलेली नाही - हे मला म्हणायचंय. ४. आपलं एकमत असल्यामुळे आणि लेखकाशीही सहमत असल्यामुळे लिहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

४% हा छोटा आकडा नाही. भारत

sagarpdy
Wed, 03/16/2016 - 10:15 नवीन
४% हा छोटा आकडा नाही. भारत जीडीपी च्या २.४३ % रक्कम संरक्षणासाठी खर्च करतो. हा अर्थशास्त्रीय भाग सोडला तर परदेशस्थ भारतीय अन्य मार्गेही भारताला मदत करतात. उदा. भारतातील स्टार्टअप्सना कामे मिळवायला मदत व मार्गदर्शन करणे, त्या देशात राजकीय प्रभाव टाकणे (उदा. अमेरिकेचा पाक ला F -१६ विमाने देण्याचा निर्णय - अयशस्वी पण राजकीय प्रभाव टाकण्याचा प्रयत्न नक्की होता) हे खरे त्यांना कि भारतात राहून देशोपयोगी कामे करता येतील पण त्याचा अर्थ ते करत आहेत ते "देशाविरुद्ध" काम करत आहेत असा होत नाही. याखेरीज "देशाविरुद्ध" वागणे आणि "देशासाठी काम न करता फक्त थोडे पैसे पाठवणे" या दोन गोष्टीत फरक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

पटण्यासारखे आहे! :)

नाना स्कॉच
Wed, 03/16/2016 - 10:24 नवीन
पटण्यासारखे आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

काय पटले ?

hmangeshrao
Mon, 03/21/2016 - 18:53 नवीन
मी भारतात नोकरी करुन पैसे आणले तर ते माझ्या वैयक्तिक खात्यावर जातात. परदेशात नोकरी केली तरीही ते पैसे वैअयक्तिक खात्यातच जातात. परकीय चलन आणतो वगैरे तर थापाच ! त्या परकीय चलनाच्यआ आपल्याच खात्यात अखेर गांधीछाप नोटा होउन अखेर आपल्यालाच त्या मिळतात. असले लोक हे बैलगाडीखालुन चालणाअर्‍या कुत्र्यासारखे असतात. गाडीच्या सावलीत कुत्रे चालते. पण ताला गंड असतो की गाडी माझ्याजिवावर चालते. देशातुन मिळालेल्याआ डिग्रीच्या सावलीत हे जन्मभर रहातात. व स्वतःच्याच खात्यावर पैसा भरुन देशाcaच परकेय चलन मिळवुन दिले म्हणुन किंकाळत फिरतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच

बैलगाडीखालुन चालणाअर्‍या

होबासराव
Mon, 03/21/2016 - 19:01 नवीन
बैलगाडीखालुन चालणाअर्‍या कुत्र्यासारखे असतात. गाडीच्या सावलीत कुत्रे चालते. च प ख ल णिसो सरांचि एक भयकथा आठवलि ;) "आणि त्या कुत्र्याचे डोळे हिरवे झाले"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

तुमचं आमचं चक्क जमलं.

hmangeshrao
Mon, 03/21/2016 - 19:20 नवीन
आयडीचे सार्थक झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

तुमचं आमचं चक्क जमलं.

होबासराव
Mon, 03/21/2016 - 19:33 नवीन
तुमचं आमचं चक्क जमलं. hmangeshrao - Mon, 21/03/2016 - 19:20 नवीन आयडीचे सार्थक झाले. तुमचं आमचं चक्क जमलं. मंगेसराव समझ्या नय मेरे कु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

..

hmangeshrao
Mon, 03/21/2016 - 20:11 नवीन
आज आपलं चक्क एकमत झालं .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

अर्थशास्त्र नावाचा एक विषय

काळा पहाड
Wed, 03/23/2016 - 00:15 नवीन
अर्थशास्त्र नावाचा एक विषय आहे. त्यातलं फॉरिन एक्स्चेंजचं प्रकरण जरा वाचा. मग बोलू. उगीच राष्ट्रवादीचे नेते मंडळी बोलतात तसलं (पक्षी: बिनडोक) बोलून नको तिथे आपल्या बल्बचा प्रकाश कशाला पाडायचा, काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

परदेशात नोकरी केली तरीही ते

बोका-ए-आझम
Wed, 03/23/2016 - 01:18 नवीन
परदेशात नोकरी केली तरीही ते पैसे वैअयक्तिक खात्यातच जातात. परकीय चलन आणतो वगैरे तर थापाच ! त्या परकीय चलनाच्यआ आपल्याच खात्यात अखेर गांधीछाप नोटा होउन अखेर आपल्यालाच त्या मिळतात.
खाली आमचे मित्र काळापहाड यांनी अर्थशास्त्र वाचायचा सल्ला दिलाय तो ऐकलात तर बरं होईल. म्हणजे मग तुम्हाला कळेल की अमेरिकेत डाॅलर्स कमावणा-या एखाद्या भारतीय माणसाने NRE Account वर पैसे पाठवले त्याच्या घरच्यांसाठी तर RBI त्याला बाजारभावानुसार रुपये देते (१९९४ पासून. त्याआधी fixed rate असायचा) आणि ते डाॅलर्स RBI कडे जातात. त्यामुळे परकीय चलन आणतो वगैरे थापाच हे चुकीचं आहे. आणि ते देशाला परकीय चलन मिळवून दिले म्हणून किंकाळत फिरतात असं म्हटलंय तेही. माहिती नाही तर सरळ माहिती नाही असं सांगावं. असा चारचौघांत पंचनामा करुन घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

..

hmangeshrao
Wed, 03/23/2016 - 08:22 नवीन
डॉलर्स जमा केल्यावर बँक तितक्याच रकमेचे भारतीय चलन देते.. फुकट नाही घेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

ते जगातली कुठलीच बँक देत नाही हो.

बोका-ए-आझम
Wed, 03/23/2016 - 08:53 नवीन
भारतीय सुद्धा. आणि का द्यावं? मिपा फुकट असल्याचे दुष्परिणाम बघतो आहोतच की आपण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

...

hmangeshrao
Wed, 03/23/2016 - 10:16 नवीन
फ फूकट द्या असे आमचे म्हणणेही नाही. परदेशातील मनुष्य त्याच्या चूल व मूल साठी परकीय चलन मिळवतो. ते पैसे तो जसेच्या तसे इथे खर्चू शकत नाही . म्हणुन ( झक मारत ! ) त्याचे भारतीय चलन करुन जसे इतर लोक वापरतात तसेच तो वापरतो... या एक्स्चेंज प्रक्रियेत सरकार परकीय चलन विकत घेते. त्यामुळे देशाला परकीय चलन मिळवुन देतो वगैरे किंकाळ्या फोडु नयेत. उद्या एखादा शेतकरीही दावा करेल की मी ऊस लावुन देशाला इतक्या रकमेचे ऑक्सिजन मिळवुन देतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

विठाकाकांनंतर आम्ही

sagarpdy
Wed, 03/23/2016 - 08:57 नवीन
विठाकाकांनंतर आम्ही मंगेशरावांचे पंखे होनार असं वाटतय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

हितेस बुवा

सुबोध खरे
Wed, 03/23/2016 - 20:13 नवीन
हितेस बुवा तुमचे गांधी बाबाचे रुपये चालतात का कच्चं तेल घ्यायला/ सौदी किंवा अरब अमिरातीना? तेथे डॉलर च वाजवून द्यावे लागतात. किंवा कुणाही देशाकडून विमाने पाणबुड्या शस्त्रास्त्रे आणायला चालतात का? का आता आमची बैलगाडीच बरी म्हणणार पेट्रोल न लागणारी युरो ८ (चार जोडी पाय) आणि drive by wire ( कासरयाच्या दोर्या) वाली. तुमच्या रुपयाचे मुल्य कशा मुळे येते ते माहिती आहे. का झिम्बाब्वे सारखे एक "निखर्व" डॉलर पेक्षा जास्त ला एक अमेरिकन डॉलर The Zimbabwe dollar was introduced in 1980 to directly replace the Rhodesian dollar at par (1:1) and at a similar value to the US dollar. Hyperinflation in Zimbabwe reduced it to one of the lowest valued currency units in the world. It was redenominated three times (in 2006, 2008 and 2009), with denominations up to a $100 trillion banknote.[3] The final redenomination produced the "fourth dollar" (ZWL), which was worth 10 RAISED TO TWENTY FIVE ZWD (first dollars). https://en.wikipedia.org/wiki/Zimbabwean_dollar उगाच माहित नसलेल्या गोष्टीत नाक खुपसणे सोडून द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

बाकीचे सोडा पण आयआयटी मध्ये

मृत्युन्जय
Wed, 03/23/2016 - 11:13 नवीन
बाकीचे सोडा पण आयआयटी मध्ये हा घाऊक देशद्रोहाचा बाजार तर चालत नाही ना? आणी चालला तर त्त्याला देखील विरोध करु. मालकाचे अन्न खाऊन त्याच्यावरच विनाकारण धाउन जाणार्‍या डुकरांपेक्षा बैलगाडीखालुन चालणारे कुत्रे नक्कीच परवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: hmangeshrao

१.कन्हैया आणि जे.एन.यू.

मार्मिक गोडसे
Wed, 03/16/2016 - 11:50 नवीन
१.कन्हैया आणि जे.एन.यू. मधल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांचं चुकीचं वागणं दुस-या कुणाच्या चुका दाखवून कमी होणार नाही. ही whatabouteryच आहे एक प्रकारची. आणि जर एका ठराविक पक्षाच्या पाठीराख्यांच्या म्हणण्यावर whataboutery म्हणून आक्षेप घेतला जाऊ शकतो तर यावरही घ्यायला पाहिजे. नाहीतर सरळ आपण पक्षपात करतो असे मान्य करायला पाहिजे.
जेव्हा लोकं कराचा आणि देशद्रोहाचा संबंध जोडतात तेव्हा असे युक्तीवाद केले जातात. देशातील नागरिकाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क तो कर भरतो म्हणून मिळालेला नाही. येथे प्रत्येकजण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कर भरत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सहमत-असहमत

गॅरी ट्रुमन
Tue, 03/15/2016 - 20:02 नवीन
बरेचसे मुद्दे मान्य पण...
जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे.
या मुद्द्याशी तितकीशी सहमती नाही. अमेरिकन विद्यापीठांमध्ये अगदी ४०-४५ वर्षांचे पी.एच.डी विद्यार्थीही बघायला मिळू शकतात. अर्थातच ८-१० वर्षांपासून पी.एच.डी चालू असेल तर मात्र नक्कीच प्रॉब्लेम आहे. FTII मध्ये ८-८ वर्षांपासून बॅचलर्स करणारी मंडळी आहेत--पी.एच.डी तर सोडूनच द्या. ती अर्थातच समर्थनीय गोष्ट नाही. पण पी.एच.डी उशीरा सुरू केली असेल तर आणि मुळातच पी.एच.डी ही बॅचलर्स पदवीप्रमाणे ३-४ वर्षात पूर्ण होईलच याची खात्री नसते त्यामुळे ३१ वर्षाचा पी.एच.डी विद्यार्थी असणे ही अगदी अशक्य गोष्ट नाही. रच्याकने: भविष्यात मलाही पी.एच.डी करायची अतोनात इच्छा आहे.आणि मी कुठे पी.एच.डी करायला गेल्यास माझ्याविषयीही मिपावर असे कोणी बोलू नका ही विनंती :)
  • Log in or register to post comments

FTII मध्ये बॅचलर्स?

बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 20:09 नवीन
तिथे पदवीधर ही किमान पात्रता असते ना? म्हणजे तिथे येणारे सगळेजण बॅचलर्स झालेले असणार. शिवाय तसंही FTII पदवी देत नाही, पदविका किंवा diploma देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

हो बरोबर

गॅरी ट्रुमन
Tue, 03/15/2016 - 20:21 नवीन
अरे हो. या संस्थेत पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा दिले जातात.मागे FTII ची वेबसाईट बघितली होती त्यावेळी अनेक कोर्सेस तीन वर्षांचे दिसले. त्यामुळे हे कोर्सेस म्हणजे बॅचलर्स कोर्सेस आहेत असे चुकून वाटले.ही मंडळी ८/८ वर्षे तिथे राहतात तेव्हा नक्की कोणता कोर्स तिथे शिकवला जातो (कारण अगदी प्रिन्सटन किंवा हार्वर्डमध्येही भौतिकशास्त्रासारख्या बेसिक सायन्सेसमधील पी.एच.डी सुध्दा ६-७ वर्षात पूर्ण होते) हे बघायला म्हणून मागे ती वेबसाईट बघितली होती.ते बघताना माझा भर नक्की किती वर्षांचे कोर्सेस तिथे असतात यावर होता. त्यामुळे नक्की कोणते कोर्सेस असतात याकडे तितके लक्ष दिले नव्हते. आता परत एकदा बघून खात्री करून घेतली. सुधारणेबद्दल धन्यवाद. पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा दिले जात असले तरी त्याचे कारणे म्हणजे FTII ही संस्था विद्यापीठ किंवा डिम्ड विद्यापीठ नाही म्हणून त्यांना डिग्री द्यायचा अधिकार नाही हे असावे. सध्या आय.आय.एम सुध्दा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमाच देतात.तरीही त्यांचा कोर्स मास्टर्स डिग्रीला समकक्ष असतो. कदाचित FTII विषयीही असेच असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

वय हा फक्त एकाच मुद्दा नाहीये

ट्रेड मार्क
Tue, 03/15/2016 - 21:08 नवीन
अमेरिकेत जरी ४०-४५ वयाचे लोक्स पी.एच.डी करत असले तरी ते त्याबरोबरीने काम पण करतात. अमेरिकेत बहुतेक मुले मुली वयाच्या १६-१७ व्या वर्षापासून काही ना काही काम मग करत असतात मग ते स्वयंसेवक म्हणून असो किंवा छोटी मोठी नोकरी असो. जरी शिष्यवृत्ती मिळाली असेल तरी स्वताचे बाकीचे खर्च भागवण्यासाठी काम करतात. इथे मात्र शिष्यवृत्ती घेतात वर स्वतःच्या गरीबीचे भांडवल पण करतात आणि त्यापुढे जाऊन देशविरोधी वक्तव्ये पण करतात. कन्हैय्या आणि त्यासारखे बाकी वय झालेले विद्यार्थी बाकी पोटापाण्यासाठी काय करतात यावर कोणीतरी पी.एच.डी करू शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

कन्हयाचा गेम आटपत आलाय आता.

तर्राट जोकर
Tue, 03/15/2016 - 20:38 नवीन
कन्हयाचा गेम आटपत आलाय आता. अजून दहा दिवस वाहिन्या नाही बघितल्या तर कुठेकुठेसुद्धा कन्हयाकुई ऐकु येणार नाही. वृत्तपत्रांनी कधीच सोडुन दिलंय. दोन चार महिन्यांनी कोण कन्हया म्हणून लोक विचारतील. 'कोण अण्णा हजारे' विचारतात तसे. लेखाशी बर्‍याच अंशी सहमत आहे. तरी दोन-चार मुद्दे विचारुन घेतो. आशा आहे लेखक उत्तर देतील. १. अशी बातमी आहे की बरखा दत्त त्याच्या भाषणा पूर्वी त्याला भेटली व भाषणात कोणता विषय बोलायचा हे ठरवले गेले. >> ह्याचा खात्रीलायक पुरावा आहे? मीही अशा सुराच्या पोस्ट्स बघितल्यात, कन्फर्म बातमी नाही. तुमच्याकडे असेल तर द्यावी ही विनंती. २. न्यायालयाच्या दणक्याने घाबरून जाऊन स्वतःला वाचवण्यासाठी कन्हैय्या भाषण देतो व जाहीर करतो की तो देशभक्त आहे व फक्त मोदी व संघविरोधी त्याला मोहीम बांधायची आहे. कन्हैय्याचा अफझल गुरुला पाठिंबा असणे म्हणजे मोदी व संघा विरुद्ध मोर्चा हे गणितच चुकीचे व नपटणारे आहे. >> जेएनयु च्या अध्यक्षिय निवडणुकीची भाषणे आणि बेल नंतरचे भाषण यात काही फरक वाटत नाही. ना भाषेत, ना विचारात, ना कंटेंटमधे, ना आवेशात. न्यायालयाला घाबरुन, देशभक्ती सिद्ध करायला संघविरोधी मोहिम आहे असे म्हणणे वस्तुस्थितीला धरुन नाही. हे गृहितक कोणत्या आधारावर मांडले आहे? ३. जाणून घ्यायची गोष्ट ही की ३१ वर्षाच्या कन्हैय्याची विद्यार्थीदशा अजून संपली नाही. तो जेएनयू मध्ये कसल्याशा विषयावर गेली अनेक वर्षे पीएचडी करत आहे. >> कन्हयाचे वय २८ सुरु आहे. ३१ नाही. साधारणपणे त्याचे पदव्युत्तर शिक्षण २००९-१० संपले असेल तर त्याने पीएचडी साठी २०१०-११ मधे प्रवेश घेतला असेल. पीएचडी मिळायला साधारणपणे ५-६ वर्षे लागतात. त्याप्रमाणे कन्हया जेएनयुत त्याच्या पीएचडीची एक वा दोन वर्ष बाकी असू शकतात. जगात सर्वत्र, अमेरिकेत आणि भारतातही, अनेक दशके पीएचडी करणार्‍यांचे सरासरी वय ३३ आहे. जेएनयुत प्रवेश मिळणे हे सामान्य बुद्धीच्या मुलांसाठी कठिण आहे. कारण स्पर्धा कठीण आहे. इथे प्रवेश मिळवणे जिल्हा परिषदच्या शाळेत प्रवेश मिळण्याइतके सोपे नाही. http://www.jnu.ac.in/Admission/AdmissionPolicy.pdf अनेक जण पीएचडी करतात, काम करता करता शिकतात, जेएनयु वा इतर विद्यापिठांमधेही वयाची ३१-३२ वर्षे होईस्तोवर शिकतात. सोबत त्यांची फेलोशिपची कमाईही सुरु असते. रोहित वेमुलाच्या बाबतीत हेच झाले. तो २५ हजार रुपये महिन्याने फेलोशिप (A fellowship provides financial support to graduate students to pursue graduate studies without associated teaching or research responsibilites (as they are in a teaching or research assistantship). Fellowships are generally merit-based internal or external awards to support a student in a full-time course of study.) वर शिकत-शिकवत होता. त्याला विद्यार्थी म्हणून संबोधले गेले. एखाद्या विषयाची आपल्याला पूर्ण आणि सत्य माहिती नाही तरी आपण असे बेधडक लिहून त्या विशिष्ट वर्गाला गैरजबाबदार ठरवत आहात असे नाही वाटत? ४. ८००० विद्यार्थ्यांच्या मताने जेऐनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्षांनी, सव्वाकोटी लोकांनी निवडून दिलेल्या मोदींवर शिवीगाळ करून देशद्रोहातून राष्ट्रनेता बनण्याची क्लूप्ती शोधून काढली आहे. >> त्याला राष्ट्रनेता बनायचे आहे असे कधी म्हटलेले आढळले नाही. त्याचे भाषण हिट झाले. अनेकांची अशी अनेक भाषणे ह्यापूर्वीही मिडीइयाने लाइव दाखवली आहेत. काहीवेळा लोकांना आवडलीत काही नाही. सव्वाशे कोटीने निवडून दिलंय ना त्यामुळे टिका करु नका, शिव्या देऊ नका हेच जर म्हणायचे असेल तर हेच आपण जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, उद्या न जाणो झालेच तर राह्हुल गांधी ह्यांनाही देऊ नये असे आपले मत असेल काय? कुणी शिवी द्यावी याची काय पात्रता ठरवली आहे? ५. कन्हैय्या, ह्या घोळात पडण्यापेक्षा तू आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कलेस तर बरे होईल. तू एक साधारण बुद्धीचा विद्यार्थी आहेस हे इतकी वर्षे तुझ्या कुवती वरून समजून येते त्यामुळे आम्हाला संबोधन करण्या पेक्षा तुझ्याकडून विद्यार्थ्याच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पुरे कर. >> हेच प्रवचन एबीवीपीतल्या विद्यार्थ्यांना द्याल का? ह्याबद्दल इतर धाग्यांवर मी लिहिले आहे. पुनरावृत्ती नकोय. तुझ्या वयाची मुले दहा वर्षा आधीपासून कमावायला लागतात. तू करदात्यांचे पैसे खाऊन, आपल्याच देशाविरुद्ध वागतोस आणि ह्याची तुला थोडी सुद्धा शरम नाही त्याची देशाला चीड आहे. >> कन्हयाच्या देशद्रोही वागण्याची आपण दिलखुलास निंदा करुया. काहीच समस्या नाही. पण तुझ्या वयाची मुले आणि करदात्यांचे पैसे खाऊन हे दोन वाक्य अजिबात आवश्यक नाहीत. करदात्यांचे पैसे न खाता, दहा वर्षांआधी शिकून चांगले इंजिनियर वैगरे झालेले दहशतवादी कृत्य करणारे आढळले आहेत. तसेच जे असे देशद्रोही कृत्ये करत नाहीत पण २८-३५ पर्यंत शिकतात, करदात्यांच्या पैशानी शिकतात त्यांच्यावर आपण उगाच चिखलफेक करत आहोत. टिपिकल असण्याच्या बाहेर असता तर ह्या लेखाला मी सहर्ष अनुमोदन दिलं असतं. बाकी लेखाच्या मागे असलेला आपला जेन्युइन संताप समजू शकतो. तो व्यक्त करायला घेतलेले काही मुद्दे चुकीचे वाटतात. ज्या पद्धतीने लेख लिहला आहे त्यावर एका विशिष्ट गोटाने तयार केलेल्या बातम्या, उपलब्ध माहितीला सोयिस्कर वाकवून बनवलेल्या गेलेल्या, सोशल गृप्सवर बोकाळलेल्या वन-लायनर्सचा भरपूर प्रभाव दिसतो. सदर गोटाने कन्हयाच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका घेतलेला दिसतो. ती लोकप्रियता अजून वाढू नये व लवकर घटावी म्हणून सदर मोर्चेबांधणी सगळीकडे सुरु आहे. चार दिवसाचं बाळ ते, येईल आणि जाईल. आले किती गेले किती संपले भरारा असे म्हणतात आणि परत तेच तेच दळण दळतात.
  • Log in or register to post comments

चान्गला प्रतिसाद !

इष्टुर फाकडा
Wed, 03/16/2016 - 00:29 नवीन
पटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मी आयआयटी बद्दल काही लिहिले नाही

रणजित चितळे
Tue, 03/15/2016 - 20:54 नवीन
नाही विजय माल्या बद्दल बोललो. कारण मला वाटले हा प्रश्न जास्त चिघळला तर आवरता येणार नाही. बाकीचे आवरले जातीलही
  • Log in or register to post comments

कन्हयाचा गेम आटपत आलाय आता.

होबासराव
Tue, 03/15/2016 - 20:54 नवीन
कन्हयाचा गेम आटपत आलाय आता. अजून दहा दिवस वाहिन्या नाही बघितल्या तर कुठेकुठेसुद्धा कन्हयाकुई ऐकु येणार नाही. वृत्तपत्रांनी कधीच सोडुन दिलंय. दोन चार महिन्यांनी कोण कन्हया म्हणून लोक विचारतील. 'कोण अण्णा हजारे' विचारतात तसे. सौ टके कि बात किये हो तजो भैय्या. माझे मतः- फक्त अण्णा हजारे पे़क्षा कोण तो मागच्या वर्षि गुजरात मध्ये अराजक माजवणारा, त्याचे नाव फिट्ट बसले असते. अण्णा तरि महात्मा गांधि होण्याच्या नादात, प्रसिद्धि साठि हे सगळे करत होते. सुमार केतकरां चे आणि माझे ह्या बाबतितच मतैक्य होत कि "अण्णाना रोज टिव्हि वर दिसण्याचे, सतत बातम्यांमध्ये राहण्याचे जसे व्यसनच लागले होते". अहो कुठल्याहि नेत्याच्या भाषणाला नसतात इतके लाखो लोक "अन्ना" "अन्ना" करत त्यांच्यासोबत जंतर मंतर वर जमायचे, बास ह्यानेच सगळा घोळ झाला कि आणि ह्याचा फायदा ज्या धुर्त लोकांना उठवता आला तो त्यांनि उठवला, असो. अण्णा ना मि कधि काळि अकोल्यात प्रत्यक्ष भेटलोय एकदम साधा माणुस आहे हो. पण त्यावेळेस अण्णा रेल्वेने फिरायचे ;)
  • Log in or register to post comments

सहमत

निनाद मुक्काम …
Wed, 03/16/2016 - 00:33 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा