पहिल्या प्रेमी
गुंतत गेलो
सुटणे गुंता
विसरत गेलो
होती काळी
शेजारी ती
पण गोरा मी
मिरवत गेलो
येता जाता
हसतच होती
सुचता थापा
मारत गेलो
जुळले सूतहि
प्रेमहि जमले
प्रेमी तिचिया
डुंबत गेलो
गडबडलो मी
प्रेमात तरी
आनंदाला
उधळत गेलो ..
.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1507
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेवा!
झकासच! आवडली कविता!
प्रत्येक ओळीत दोन शब्द...आवडले! :)
Sandy
काय काय मस्त प्रयोग चाललेत
In reply to अरेवा! by चांदणे संदीप
काय काय मस्त प्रयोग चाललेत काव्य विभागात.
भारीच. आवडले हे वेगळे सांगणे न लगे.
धन्यवाद -
चांदणे संदीप , अभ्या.. -
मनापासून धन्यवाद !