मित्रांनो..संक्रांतिला "तिळगुळ घ्या अन गोड बोला"असे म्हणत आपण आपल्या मित्र मैत्रीणिना तिळ्गुळ जरुर द्या पण वाचा आपल्या पुर्वजांच्या रण धुमाळिचि कहाणी...दोन अश्रु डोळ्यातुन बाहेर पडुन त्यांना आदरांजली देवु यात..व त्यांचे स्मरण करु यात....
आज संक्रांत.
संदर्भ - पानिपत -लेखक श्री. विश्वास पाटिल.
आज संक्रांत. संक्रांतिचा दिवस म्हटला की मला आठवतो तो जानेवारी १७६० चा दिवस. यमुना नदीच्या काठचा बुराडी घाट. याच घाटावर अब्दाली, नजिबखान रोहिला आणि कुतुबशहाने दत्ताजी शिंद्यांवर छापा घातला. घनघोर रणसंग्राम झाला. जंबुर्याच्या गोळ्याने जखमी होवून दत्ताजी शिंदे पडले.
दत्ताऽऽऽ" म्हणून कुतुबशहाने हाक दिली तसे दत्ताजींनी त्याच्यावर डोळे रोखले. जणू काही डोळ्यांतच अंगार फुटावा तसे डोळे भयंकर दिसू लागले. कुतुबशहा खिंकाळत म्हणाला,
" क्यूं पटेल, और लढोगेऽऽऽ?"
आपला थंड पडत चाललेला आणि मंद मंद होत चाललेला आवाज दत्ताजींनी एकवटला आणि ते बाणेदारपणे उद्गारले,
"क्यूं नही ? बचेंगे तो और भी लढेंगेऽऽऽऽ!"
कुतुबशहा व नजिब चिडून दत्ताजींच्या उरावर जावून बसले अन् खंजीराने दत्ताजींची गर्दन चराचर चिरली. नजीब भाल्याच्या टोकाला खोचलेली दत्ताजींची भेसूर मुंडी नाचवत नाचवत अब्दालीकडे गेला.
त्या दिवशी दिवसभर मराठ्यांचा भयंकर पाठलाग सुरू होता. कोंबड्या बकर्यांसारखी माणसं टिपून मारली जात होती. यमुना काठ रक्तानं निथळत होता.
रात्रीच्या भयाण अंधारात मराठ्यांनी दत्ताजींचे लपवलेले धड बाहेर काढले. खिळखिळ्या झालेल्या तोफेचं लाकूड सामानं एकत्र केलं.यमुनाकाठच्या वाळूतच सरण रचलं. रानावनात कफन नाही म्हणून सोबत्यांनी नेसूची धोतरे सोडली. रणवीराचा उघडावाघडा देह झाकला. बटव्यातल्या सुपार्या आणि पाने सरणावर ठेवली. दत्ताजींच्या मानेच्या तुटलेल्या भागाला, अन्ननलिकेलाच तोंड समजून सोबत्यांनी पाणी पाजले. भयाण रात्रीच्या घोंगावत्या वार्यात आणि यमुना नदिच्या खळखळ आवाजात मृतदेह पाणी प्याला. उघड्यावरच आग लावली.
महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ, रेवड्या वाटल्या जात होत्या. सणासुदीची माणसं भरपेट खाऊन उताणी झाली होती. तेव्हा कण्हेरखेडच्या शिंद्यांचा कृष्णाकाठच्या मातीत खेळून पोसलेला देह यमुनाकाठच्या वाळूत बिनशिराचा धडाधडा जळत होता
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2568
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
नतमस्तक
अश्रू आले
In reply to नतमस्तक by भास्कर केन्डे
धर्म आणू नका
In reply to नतमस्तक by भास्कर केन्डे
इतिहास नव्हे
In reply to नतमस्तक by भास्कर केन्डे
समजलं नाही...
In reply to इतिहास नव्हे by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
नाही
In reply to समजलं नाही... by मैत्र
बचेंगे तो