✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लेखकांचे मानधन (लेखाचा दुवा)

ल
लिखाळ यांनी
Fri, 01/09/2009 - 18:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3819 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

स
सुनील Fri, 01/09/2009 - 19:11 नवीन

चांगली बातमी

उत्साहवर्धक बातमी!! मराठीत आजवर केवळ लेखन-कौशल्यावर उपजिवीका करणारे पुल सोडले तर कोणीही नाही. त्यामुळे इंग्लीशसाठीचे भरमसाठ आकडे पाहून बरे वाटले, तरी मराठीच्या वाट्याला किती दमड्या येतील, हा प्रश्नच आहे! लिटररी एजंट म्हणजे लेखक आणि प्रकाशक यांच्यातील दलाल असावा असे वाटते. मराठीसाठीतरी हा प्रकार नवीनच! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Fri, 01/09/2009 - 19:42 नवीन

एक

असाच लेख आठवतो. काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी नियतकालिकाने भारतीय (इंग्रजी) लेखकांना लाखाच्या घरात कसे मानधन मिळते आहे याची स्टोरी केली होती. हे सगळे मराठीत? बापरे!!! लाख सोडा, पाच आकड्यात तरी? अवघडच काम.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Fri, 01/09/2009 - 19:48 नवीन

बापरे!!! लाख

बापरे!!! लाख सोडा, पाच आकड्यात तरी? अवघडच काम. पाच आकड्यांत :) हा हा. लेखात त्यांनी शेवटी एका शिक्षकाचे उदाहरण देऊन आठ लाख वगैरे आकडे दिले आहेत. रामदास भटकळांचे काही प्रयत्न सुद्धा लिहिले आहेत. परवा एका बातमीत असे होते की लोक हल्ली मोठ्या प्रमाणावर पुस्तके विकत घेऊन वाचणे पसंत करतात वगैरे :) पाहु लेखकांना चांगले दिवस येतील अशी आशा. नाहितर मराठी लोकांनी इंग्रजीवर प्रभूत्व मिळवावे आणि पैसा कमवावा :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Fri, 01/09/2009 - 21:33 नवीन

आशा अमर आहे...

कर्णीक यांचा लेख पूर्ण वाचला आहे. मराठीसंदर्भात केवळ भाबडेपणा यापलीकडे त्याला काहीही अर्थ नाही. या मुद्याचे अर्थशास्त्रीय, व्यावसायीक विश्लेषण आवश्यक आहे. पॉप्युलरचे आयुर्मान, गेल्या वर्षीचा दिल्लीतला अनुभव वगैरे व्यवसाय म्हणून विचार करावयाचा झाला तर अंगभूतच विरोधाभासी आहे. इतकी वर्षे मराठी पुस्तक व्यवसाय सुरू आहे आणि आज इंग्रजीतून मराठी पुस्तकांचा परिचय करून देण्याच्या 'कल्पकते'त जातोय आपण. हसावे की रडावे? हजाराच्या आवृत्तीपलीकडे मराठीची उडी गेल्याचे दाखले सांगा. मोजून-काजून चार-दोन लेखक आणि विरळा लेखकांच्या अपवादात्मक साहित्यकृतीच्या पलीकडे जातात ते दाखले? इकॉनॉमीज ऑफ स्केल, उत्पादन वाढले की खर्चात कपात वगैरे मुद्दे न आणलेलेच बरे. वर्षानुवर्षे पुस्तकांचा व्यवसाय परवडत नाही हा ओरडाच विरोधाभासी आहे हे ध्यानी घ्यावे लागेल. व्यावसायिक मंडळी केवळ नफाच फुगवण्याचा सत्यावादीपणा करीत नसतात, तर तोटाही फुगवत असतातच. आणि तरीही वर्षानुवर्षे व्यवसाय करीतच असतात, हेच एक अर्थशास्त्रीय व्यावसायीक सत्य. व्यवसाय करण्याची रीतच अशी असेल तर बाकी काय बोलावे? आणि मग मानधनाचे आकडे वगैरे हाहाहाहाहाहा असेच राहतात. लेकीन आशा अमर आहे, नाही तर वाघिणीचे दूध प्यावे माणसाने हे बरे!!! (हा सगळा प्रतिसाद वैयक्तिक रोख ठेवून लिहिलेला नाही. या प्रश्नाच्या बाजू मांडण्यासाठी लिहिला आहे. केवळ तुमच्या प्रतिसादावरचा प्रतिसाद असा तो मानू नये ही विनंती).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Fri, 01/09/2009 - 21:40 नवीन

प्रतिसादा

प्रतिसादाबद्दल आभार. या व्यवसाया बद्दल मला काहिच माहिती नाही. तुमच्या प्रतिसादाटतुन आणि कर्णिकांच्या लेखातून थोडे फार कळाले. विरंगुळा - तो लेख वाचल्यावर गेल्या चार तासात बरेच स्वप्नरंजन केले. मघाशी तर मर्सिडीज सुद्धा खरेदी केली. आता विकून टाकावी म्हणतो :) वाघिणीचे दूधच प्यावे. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
श
श्रावण मोडक Fri, 01/09/2009 - 21:50 नवीन

आहाहा

स्वप्नरंजन बाकी फर्मास आवडले. ती मर्सिडीज विकू नका. स्वप्नात मी तुम्हाला भेटतो, दोघे मिळून थोडे फिरून येऊ त्या गाडीतून. लाखाचा आकडा माझ्याही डोळ्यासमोर चमकतो आहेच. थोडी मौज करता येईल. शँपेन पिऊन खूप दिवस झालेत. आधी शँपेन आणि मग थोडे इतर काही (ते ग्लेन मोरांजी वगैरे). आपल्या लाखमोलाच्या मानधनाचा आनंद (स्वप्नात का होईना) साजरा करूया की? कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
ल
लिखाळ Sun, 01/11/2009 - 20:12 नवीन

जरूर ! --

जरूर ! :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
व
विकास Sun, 01/11/2009 - 20:18 नवीन

चुकून...

>>>आधी शँपेन आणि मग थोडे इतर काही (ते ग्लेन मोरांजी वगैरे) मी चुकून मोरांजी ऐवजी मोरारजी वाचले आणि थोडासा गोंधळून गेलो... :?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक
ल
लिखाळ Sun, 01/11/2009 - 20:24 नवीन

हा हा हा.. --

हा हा हा.. :) -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
श
श्रावण मोडक Sun, 01/11/2009 - 22:22 नवीन

भलत्या...

ठिकाणी भलतेच आठवणे ही 'मोरारजी'ची कृपा!!! मोरांजी असती तर असे झाले नसते... (आता हे ह.घ्या.सां.ला.न.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Fri, 01/09/2009 - 22:08 नवीन

छानच बातमी!

बातमी नक्कीच उत्साहवर्धक आहे. पुस्तकाची, विशेष करून अमेरिकेतील अभ्यासाच्या पुस्तकांची किंमत हा एक वेगळा चर्चेचा विषय होऊ शकेल. प्रचंड महाग (विशेष करून विद्यार्थीदशेत). त्यावरून आमच्या विद्यापिठातील पुस्तकाच्या दुकानात वैतागलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहीतीपत्रक लावल्याचे आठवते. त्याप्रमाणे प्रकाशकाला जवळपास ५०% पैसे मिळतात तर लेखकाला साधार ५-६% असे काहीसे भाव होते... बाकी मला आधी लेखाचे शिर्षक वाचून वाटले, तात्याच मिपावरील लेखकाला मानधन देणार आहेत म्हणून ;)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 01/10/2009 - 00:06 नवीन

त्यांना ही

त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे. हा हा हा! नुसता उत्साह येऊन उपयोग काय? आमच्या लेखनाकरता जळ्ळं कोण दमड्या मोजणार आहे? :) पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? हो, नक्कीच होईल.. त्या आनंदाची वाट बघतो..! काय रे लिखाळा, लेका तू अशी स्वप्न केव्हापासून बघायला लागलास? माझं ऐक. ही स्वप्न आहेत छान पण ती बघणं सोडून दे आणि वास्तवात ये बाबा! अजून तरूण आहेस, अनुभवाने लहान आहेस म्हणून हा सल्ला! :) स्वगत : छ्या ..! म्हणे लाख्खो रुपये मिळणार! लागले लगेच धावायला..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
र
रेझर रेमॉन Sat, 01/10/2009 - 00:45 नवीन

मर हट्टी माणसा लिहिता लिहिता!

मराठी लेखनाला ला़खात मानधन मिळतं. वि.पा..निपतकारांना विचारून पहा. मर्स नको... फेरारी तून फेर्‍या मारूया. निदान एका मराठी माणसाकडे ती आहे. हजार प्रतिंची एडीशन काढून एकंदर छान चाललंय. जे.के.रॉलिंग होईल का कोणी? - रेझर
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Sun, 01/11/2009 - 20:14 नवीन

प्रतिक्रि

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे आभार मानतो. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 22:27 नवीन

मराठीमध्य

मराठीमध्ये वाचणारी सधन लोक किती आहेत?? जवळपास शहरात राहणारी ९०% मडंळी आपली मुले इंग्रजी पुस्तके वाचावीत म्हणुन प्रयत्न करतात. फास्टर फेणे, भारा भागवत, चिवी जोशी, समर्थ याच्या सारखी चांगले साहीत्य इग्रजीत जात नाही. साहीत्य हे जास्त करुन माउअथ पब्लीसीटीवर चालते, जर मराठीतील चांगले साहीत्य इतर भांषात अनुवादीत झाले तर नक्की मोबदला वाढु शकेल. ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Tue, 01/13/2009 - 16:15 नवीन

ग्राहकांछ

ग्राहकांछी संख्या आणि क्रयशक्ती लक्षांत घेता इंग्रजी पुस्तकांचा खप जास्त असणार हे स्वाभाविक आहे. पण मराठीत उत्तम साहित्य निर्माण होते आणि लोक ते वाचत राहतील असे मला वाटते. पुस्तकांच्या किंमती आणि खपवण्याची तर्‍हा यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील. प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. -- लिखाळ. माझी अनुदिनी 'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
श
श्रावण मोडक Tue, 01/13/2009 - 19:45 नवीन

एवढे

एकच वाक्य हा विषय गुंडाळायला पुरेसे आहे - पुस्तकांच्या किंमती आणि खपवण्याची तर्‍हा यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील. खुलासा एकच, अनेक नव्हेत तर सार्‍याच. कारण तशी मातीही विकता येतेच की!!!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा