Skip to main content

बाबु बजरंगी : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक तर्राट जोकर यांनी शुक्रवार, 11/03/2016 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते. ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे: http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-chang… http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-… (हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )

वाचने 16071
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

हे नरेंद्र भाई कोण ? सध्या ते कुठे असतात आणि काय करतात ?

In reply to by विवेक ठाकूर

कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू मारतांनाचा फोटो बघितला होता. तेच असतील ते. पण तो फोटोही फेक होता म्हणे त्यांच्यासारखाच.

In reply to by दुर्गविहारी

असे आहे होय. पण ह्या धाग्याचा भाजपाशी काय संबंध? समर्थकांशीतरी काय संबंध? कोणीतरी मला निष्पाप बळी गेलेल्यांबद्दल जाण ठेवा असा उपदेश करत होतं. त्या उपदेशास्मरनार्थ हा धागा आहे.

तजो, एव्हढा सबळ पुरावा (कॉम्पेलिंग एव्हिडन्स) आहे तर न्यायालयाने मोदींवर आरोपपत्र का दाखल होऊ दिलं नाही? खटला तर तिस्ता सेटलवाडच्या इच्छेप्रमाणे गुजरातेच्या बाहेर चालवला गेलेला ना? आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

त्यातील नरेंद्र भाईंचा उल्लेख मला मोदींबद्दल वाटला.... म्हणून मी विचारले.... हा स्टिंग व्हिडिओ आहे का? कारण स्टिंग ची कायद्यासमोरची वैधता हा वेगळा विषय आहे.

In reply to by Anand More

शेकडो निष्पाप लोकांचे बळी गेले याची जाण न ठेवता केवळ पुरावे मिळाले नाही म्हणून दोषमुक्त केल्या गेलेल्या आरोपीचे मी समर्थन करतो असा माझ्यावर ठप्पा ठेवला गेला. या निमित्ताने गुजरात दंगली बाबत केवळ पुरावा मिळाला नाही म्हणून कुठलेही आरोपपत्र दाखल होऊ न शकलेल्यांबद्दल काय भूमिका घ्यावी असा मला प्रश्न पडला, म्हणून मी हा धागा काढला.

In reply to by तर्राट जोकर

दुस-या पक्षाकडे मुद्देच नाहीयेत. एका पक्षाला राज्य करण्याचा आणि दुस-या पक्षाला विरोधात बसण्याचा फारसा अनुभव नसल्यामुळे असं होणारच.

In reply to by बोका-ए-आझम

इथे राजकिय पक्षाचा संबंध कुठून आला ब्वा. मी तर माझ्या प्रतिसादात राजकिय असं काही लिहिलं नाही. पक्ष म्हणजे बाजू.

In reply to by तर्राट जोकर

कायदा आंधळा असतो.... हे राज्य कर्त्यांना व्यवस्थित कळ...सर्व पक्षीय भक्त स्वतःहून आंधळे होतात आणि त्यात धन्यता मानतात.... त्यासाठी इतिहासाची साक्ष काढतात... कधी वाटतं दुर्देव आपल्या देशाचं, तर कधी वाटतं देश आणि समाज म्हणून आपण अजून किशोरावस्थेतच आहोत...

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही जो विडियो दिलाय ना,त्यामध्ये compelling evidence proves -narendra modi ordered gujarat roits 2002 असं लिवलयं तुम्ही मोदींचं नाव घेतलं नसेल पण तो विडियो कुणाबद्दल काय सांगतो याची किमान माहिती तरी तुम्हाला असेलच. वरून मोदींचं नाव न घेतल्याचा आव आणताय.

In reply to by चेक आणि मेट

विडियो बाबु बजरंगी आणि नरोडापाटिया हत्याकांडाबद्दल त्याने काय बोलले ह्याबद्दल आहे. विडियो टाकणार्‍याने त्या विडियोला काय टायटल दिले याच्याशी काही संबंध नाही. पण माझ्या आव आणण्याविषयी टिप्पणी करुन तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे?

In reply to by तर्राट जोकर

विडियो बाबु बजरंगी आणि नरोडापाटिया हत्याकांडाबद्दल त्याने काय बोलले ह्याबद्दल आहे. विडियो टाकणार्‍याने त्या विडियोला काय टायटल दिले याच्याशी काही संबंध नाही.
ख्याक.... हे तुमचं उत्तर म्हणजे एक मोठा

जोक

आहे,हे मिपावरील कोणीही सुज्ञ मंडळी सांगू शकतील.
पण माझ्या आव आणण्याविषयी टिप्पणी करुन तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे?
मी कशाला काय सिद्ध करू,मिपावरील सूज्ञांना सर्व माहिती आहे. मोदी,संघ,भाजप यांना विरोध अवश्य करा,काहीही दुमत नाही,फक्त खोडसाळपणा सोडा एवढचं,अर्थात हे सांगणारा मी कोण?पण बघा एकंदरीत पटतयं का!!नाहितरी तुम्ही अभ्यासू असूनसुद्धा तुम्हाला कोणी सिरीयस घेणार नाही.

In reply to by चेक आणि मेट

तुमच्यामते, मोदींबद्दल असलं तेव्हाच खोडसाळपणा अन्यथा बाकीच्यांबद्दल सर्व काही क्षम्य असे मिपावरच्या सूज्ञांचे धोरण आहे काय? काय लिहिले आहे ह्यापेक्षा कोण लिहितो ह्याचीच मिसळपाववर दखल घेतली जाते असे तुम्हाला म्हणायचे असेल तर असू देत. मला शष्प काही फरक पडत नाही. मला सिरियस घ्या असेही माझे म्हणणे नाही. मग तुम्हाला का बोवा एवढी काळजी?

In reply to by तर्राट जोकर

अहो तुमचा फोलपणा तुम्हाला मान्य आहे का? "मोदींचं नाव कोणी घेतलं" हा तुमचा प्रतिसाद आणि मग विडियो कोणावर आरोप करतोय? विडियो मोदींवर आरोप करतोय हे लहान मुलगा सुद्धा सांगेल.आणि विडियो तर तुम्हीच इथे डकवलाय,मग त्यात काय आहे हे माहित नसल्याचं सोंग का करताय? "विडियोला टायटल काय दिले याच्याशी काय संबंध" हा तुमचाच प्रतिसाद, मग मला सांगा उगाच झोपेचे सोंग का घेताय आणि वरून गोल गोल प्रतिसाद देवून शब्दांचे खेळ का करताय? हा तुमचा फोलपणा तुम्हाला मान्य आहे का?

In reply to by चेक आणि मेट

विडियो मोदींचा, मोदींबद्दल आहे? बाबु बजरंगी ह्या क्रूरकर्म्याचा आहे. तो काय म्हणतो, त्याने कसे हत्याकांड घडवले ह्याबद्दल आहे. तुम्हाला तो विडियो मोदींवर आरोप का वाटतो? कोण्या पत्रकाराचा रिपोर्ताज नाही आहे. स्टींग आहे.

In reply to by तर्राट जोकर

तुम्हाला तो विडियो मोदींवर आरोप का वाटतो? कोण्या पत्रकाराचा रिपोर्ताज नाही आहे. स्टींग आहे.
आण्णा किती गोलगोल फिरवणार आहात? जागे व्हा ना!! कि मला वेड्यात काढताय? आय होप विडियोचं टायटल अन् त्याखालील माहिती तसेच त्याखालील कमेंट्स तुम्ही वाचल्या असतील.आणि मगच विडियो डकवला असेल. हे स्टिंग आहे हे तुम्हाला माहिती आहे,आणि तिथेच बाकि मोदिंबद्दल काय लिहलयं ते तुम्ही वाचलय कि नाही? अर्थात तुम्हाला माहिती आहे सगळं.त्यासाठी सोंग सोडावं लागतं फोलपणा मान्य करा आणखी एक विसरलोच...... ...... ... तुम्ही कधीच चुकू शकत नाही

In reply to by विवेक ठाकूर

माझा आक्षेप खोडसाळपणावर आहे, एकेकडी मोदींचं नाव घेतलं नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मुख्य अजेंडा तोच राबवायचा हा मोठा विरोधाभास आहे, आणि वरून चूक न मान्य करणे हे एक मोठं व्ययच्छेदक लक्षण आहे. मोदी सदोष आहेत कि निर्दोष याबद्दल बोलणे, किंवा कुठल्याही न्यायालयीन निर्णयावर सयंतपणे चर्चा(घोषणाबाजी नव्हे) करण्याचं स्वातंत्र्य सर्वांना आहे. पण त्यासाठी चर्चाकारांनी चढवलेले मुखवटे उतरवून येणं उचित ठरेल.

In reply to by चेक आणि मेट

जाऊन द्या हो विदुषक म्हणतो माझीच लाल संधर्भासहित स्पष्टीकरण दिले तरी आपली चूक मान्य न करणाऱ्या पैकी असतात काही लोक बहुदा हा विडीयो देतांना त्याचे शीर्षक व त्याखालील प्रतिसाद जाणीवपूर्वक वाचून हा विडीयो पूर्ण शुद्धीत येथे पोस्ट केलेला दिसत आहे,

तजो, >> गुजरात दंगली बाबत केवळ पुरावा मिळाला नाही म्हणून कुठलेही आरोपपत्र दाखल होऊ न शकलेल्यांबद्दल >> काय भूमिका घ्यावी असा मला प्रश्न पडला, स्वातंत्र्यानंतर साधारण २०१० सालापावेतो देशात जे ४६००० दंगे झाले त्यातल्या फक्त गुजरात २००२ चीच चौकशी झालेली आहे. तीत तीन वेगवेगळ्या अन्वेषण पथकांनी शोध घेऊनही मोदींवर ठपका ठेवता येणार नाही असा निष्कर्ष काढला आहे. याउपर तुम्हाला मोदींना दोषी ठरवायची एव्हढी गरज का वाटते आहे? गुजरातेतले १९६९, १९८५, १९९० चे भीषण व (काही) दीर्घकाळ चाललेले दंगे बघितले तर मोदींची केवळ ३ दिवसांत दंगली आटोक्यात आणण्याची कामगिरी दैदिप्यमान आहे. तसेच २००२ नंतर मोदींच्या कार्यकाळाच्या १२ वर्षांत एकही हिंदूमुस्लिम दंगल झाली नाही. तुम्हाला मुस्लीम आणि हिंदू गपपणे बसलेले बघवत नाहीत काय? इथे एक गुजराती मुसलमान रामराज्य हवंय म्हणून खुलेआम सांगतोय. तो बावळट आहे का? https://youtu.be/PEmX5e9bDg8?t=18m35s - कृपया चलचित्र एक मिनिटभर पहावे. पूर्ण कार्यक्रमच पाहण्यासारखा आहे. सांगायचा मुद्दा असा की मोदींना दोषी समजणं सोडून द्या. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात `हे आरोप तुला कबूल आहेत का?' तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो. सरळ शिक्षा सुनावली जाते. मुलाखत देणार्‍याची माहिती पाहा : Babubhai Patel, known by his alias Babu Bajrangi,[1] is a leader of the Gujarat-wing of the Bajrang Dal, a Hindu nationalist organization in India. He was a central figure in the organized pogroms directed at Muslims during the 2002 Gujarat violence.[2] He was sentenced to life term imprisonment by a special court for his role in the Naroda Patiya massacre in which ninety-seven Indian Muslims were murdered.[3] आता पुन्हा विडिओ पाहा! इथे गुन्हेगार स्वतः कबूल करतोयं आणि वर म्हणतोयं पहिल्या जजनं मला चार काय पाच वेळा फाशी द्यायला पाहिजे असं म्हटलं होतं. आणि हाइट बघा, त्याला फक्त जन्मठेप झाली ! इतक्या उघड गोष्टीला अजून काय पुरावा हवा? यावरनं किमान विचार करु जाता खरं तर सगळंच क्लिअर होतं. १) पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही. २) ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल. ३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.

In reply to by विवेक ठाकूर

३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो. हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो.

In reply to by मोदक

हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो
पण इथे लागू होतोय.. हे का मान्य करवत नाहिये?? हो !! १९८४ आणि इतरही दंगल घडवणारे गुन्हेगार आहेतच !!

In reply to by विवेक ठाकूर

तुम्हाला "ते" जसे आहेत असे "वाटतंय" ते खरेखुरे "तसेच" असते तर तुमच्या सारखी "विद्वान" मंडळी मिपावरच काय कोणत्याही सार्वजनिक forum वर या अशा प्रकारची चर्चा करू शकली असती काय ?

In reply to by विवेक ठाकूर

इतर कोणीतरी प्रतिसादाचा प्रतिवाद केल्यावरच तुम्हाला कंठ का फुटतो? म्हणजे तुमच्याकडे लै भारी बंदूक असली तरी गोळ्या दुसर्‍याच्या खिशात असल्याने तुम्हाला बंदुकीचा काहीच उपयोग नाही. छ्या..

In reply to by बाळ सप्रे

इथे लागू होण्याविषयी मी काहीच बोललो नाहीये. फक्त विठांनी नेहमीप्रमाणे अवास्तव वर्णन करताना दिलेले मुद्दे १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला जास्त परिणामकारकरीत्या लागू होतात इतकेच म्हणत आहे. बादवे - "झाड पडल्यावर धरणीकंप होणार" वगैरे समर्थने मोदींनी केली आहेत का?

In reply to by मोदक

साधी सरळ गोष्ट आहे. गुजरात दंगल नृशंस आणि अमानुष होती यात दुमत नाही. पण त्याचा विदा आणि १९८४ च्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या शीखविरोधी दंगलीचा विदा बघितला तर कसं राजकारण खेळलं गेलं आणि माध्यमं आणि एनजीओज यांनी त्यात काय भूमिका घेतली तेही कळेल. २००२ च्या गुजरात दंगलींमध्ये ७९० मुस्लिम आणि २५४ हिंदू मारले गेले. ही माहिती २०१२ मध्ये गृहराज्यमंत्री श्रीप्रकाश जैस्वाल यांनी संसदेत दिली. १९८४ च्या दंगलीत एकट्या दिल्लीत ३००० शीख मारले गेले. एकही हिंदू किंवा मुस्लिम मारला गेला नाही. तरीही या दंगलीचं वर्णन riots असं होतं आणि गुजरात दंगलींबद्दल Pogrom, Ethnic Killing, Genocide असले शब्द वापरले जातात. प्रश्न शब्दांचा नाही, त्याच्यामागच्या हेतूंचा आहे. दंगलीत मारले गेलेले लोक, मग ते कुठल्याही धर्माचे असोत, त्यांना सारखंच महत्व द्यायला पाहिजे. पण तसं होत नाही.

In reply to by विवेक ठाकूर

१.
न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात `हे आरोप तुला कबूल आहेत का?' तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो. सरळ शिक्षा सुनावली जाते.
एक शब्द टाकायला सोयीस्कररीत्या विसरलात - In front of competent judicial authority. ही मुलाखत जर मला नक्की आठवत असेल तर सध्या अाआपमध्ये असलेल्या आणि तेव्हा तहलका मध्ये पत्रकार असलेल्या अाशिष खेतान यांनी घेतली होती. ती २००७ मध्ये अगदी गुजरात विधानसभा निवडणुकींच्या वेळी प्रकाशित झाली होती. हा योगायोग असावा असं आपलं म्हणणं असेल तर मुद्दाच खुंटला. असो. ही मुलाखत मॅजिस्ट्रेट किंवा इतर कोणत्याही न्यायिक अधिकार असलेल्या व्यक्तीपुढे झालेली नसल्यामुळे त्याला सनसनाटी बातमीचं मूल्य जरुर आहे, पण कायदेशीर पुरावा म्हणून त्याची किंमत शून्य. आणि हे मी म्हणत नाही, Indian Evidence Act म्हणतो, जो भाजप सरकारने बनवलेला नाही, ब्रिटिश काळापासून प्रचलित आहे. २.
पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही.
म्हणजे तुम्ही सरळसरळ म्हणताय की न्यायाधीशांनी न्यायदानप्रक्रिया बदलली - manipulate केली. हा अत्यंत गंभीर आरोप आहे. काही पुरावा आहे आपल्याकडे त्याच्या या मुलाखतीशिवाय? जो आरोप करतो त्याने पुरावा द्यायला हवा हा साधा नियम आहे (The burden of proof lies with the accuser) तो तुमचं कायद्याचं अगाध ज्ञान पाहता तुम्हाला माहित असेलच. फाशीची शिक्षा द्यायला सरकारी वकिलांनी बाबू बजरंगीचा गुन्हा rarest of the rare आहे हे सिद्ध करायला हवं होतं. तसं ते सिद्ध करु शकले नाहीत. नरोडा पाटिया हत्याकांडाचा सूत्रधार जरी बाबू बजरंगी असला हे सरकारी वकील सिद्ध करु शकले तरी तिथे घडलेला प्रत्येक गुन्हा हा cold-blooded conspiracy आहे आणि त्यामागे बाबू बजरंगीचा हात आहे हे ते सिद्ध करु शकले नाहीत. परिणामी तो rarest of the rare गुन्हा होऊ शकला नाही. त्यामुळे फाशी जरी नाही तरी जन्मठेपेची शिक्षा बाबू बजरंगी आणि मोदींच्या मंत्रिमंडळातल्या माया कोदनानी यांना झाली.
ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल
स्टिंगमध्ये कोणीही काहीही म्हणू शकतो. त्यात खरं सांगायलाच पाहिजे असं काहीही बंधन नसतं. ही विधानं बाबू बजरंगीने कोर्टासमोर केली का? आपल्याला तो जे बोलला आहे त्याचं अक्षरन् अक्षर खरं वाटतंय. कशावरून? बरं, हे त्याने कोर्टात का नाही सांगितलं? एका अनोळखी पत्रकाराला तो नरेंद्रभाईंबद्दल सांगतोय आणि कोर्टात मात्र त्यांचं नावही घेत नाही हा विरोधाभास वाटत नाही? जर त्याने कोर्टात असं सांगितलं असतं तर मिडियाने मुंबई ते अहमदाबाद हायवेची संपूर्ण लांबी कव्हर करणारी फटाक्यांची माळ लावली असती. पण असं झालं नाही.
अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.
लोकशाहीत सर्वसत्ताधीश हा शब्द चुकीचा आहे. लोकशाहीत सर्वसत्ताधीश लोक असतात. आणि भारतीय जनतेने आपण तसे आहोत हे वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चार निवडणुकांपैकी दोन निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे. काय झालं त्या लोकांचं? संजीव भट्ट यांनी मोदींवर अारोप केले होते, तीस्ता सेटलवाड यांनी तर मोठी आघाडी उघडली होती. यांच्या जिवाला कुठल्याही प्रकारचा धोका असल्याची तक्रार त्यांनी स्वतः केलेली नाही. तुम्ही जर मधू किश्वर यांचं Modi, Media and Muslims हे पुस्तक वाचलंत तर तुम्हाला कळेल की गुजरात दंगलींमध्ये काँग्रेसच्या आमदारांचाही सहभाग होता. त्यातले काहीजण अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीतल्या हत्याकांडात मारले गेलेले काँग्रेसचे आमदार एहसान जाफरी यांचे विरोधक होते. दंगली भडकावण्यात त्यांचाही (या आमदारांपैकी काहींचा) सहभाग होता. पण तीस्ता सेटलवाड यांनी मिडियापुढे फक्त विहिंप, बजरंग दल आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असलेले फोटो सादर केले. हे त्यांच्याच एका कार्यकर्त्याने मधू किश्वर यांना सांगितल्याचा या पुस्तकात उल्लेख आहे. त्याचं नावही पुस्तकात आहे. मला आत्ता आठवत नाहीये. आॅक्टोबर २००१ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री बनेपर्यंत मोदी सक्रीय राजकारणात नव्हते. ते १९९८ मध्ये दिल्लीत गेले. त्यांना गुजरातमधून बाहेर काढणं ही तेव्हा केशुभाई पटेल यांच्याविरूद्ध बंड करुन बाहेर पडलेल्या शंकरसिंह वाघेला यांची मुख्य अट होती. २००१ चा भूकंप हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे केशुभाई पटेलांच्या जागी मोदींची निवड करण्यात आली. त्यांना ६ महिन्यांत निवडणूक लढवून विधानसभेचं सदस्य होणं गरजेचं होतं. त्यांनी ज्या दिवशी त्यांची निवडणूक वडोदरा मतदारसंघातून जिंकली त्याच्या दुस-या दिवशी दंगली सुरु झाल्या. तेव्हा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांत काँग्रेस सरकारने होती. दोघांनाही मोदींनी त्यांच्या राज्यांत असलेल्या सैन्याच्या राखीव तुकड्या पाठवण्याची लिखित विनंती दंगल भडकल्याच्या दुस-या दिवशी पाठवली होती. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी ती नाकारली हेही लिखित स्वरूपात आहे. दंगल नृशंस होती हे कोणीही अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही पण त्यात मोदींचा सहभाग होता किंवा ते जबाबदार होते याचा कुठलाही पुरावा आजतागायत सापडलेला नाही. याउलट सज्जन कुमार, जगदीश टायटलर आणि दिवंगत हरकिशनलाल भगत हे दिल्लीत १९८४ नंतर झालेल्या दंगलींचे सूत्रधार होते याचे अनेक पुरावे उपलब्ध असूनही त्यांच्यावर राजकीय बहिष्काराशिवाय अजून दुसरी कायदेशीर कारवाई झालेली नाही. या विरोधाभासाला काय म्हणावं? असो. आपलेच शब्द उधार घेऊन म्हणतो - तुम्हाला विषय समजलेला नाही. अशी कोणावरही त्याच्या मुलाखती बघून विश्वास ठेवण्याची आणि तोही selective विश्वास ठेवण्याची सवय सोडून द्या.

In reply to by बोका-ए-आझम

मुलाखत डोळ्यासमोर आहे. स्वतः गुन्हेगार कबूल करतोयं. यावर त्यानं न्यायालयासमोर हे विधान केलं तरच आम्ही त्याला गुन्हेगार मानू असं फक्त निर्बुद्ध म्हणू शकतो. प्रतिसाद देण्यापूर्वी किमान इतकी तरी समज हवी की असं विधान त्यानं न्यायालयासमोर केलं असतं तर खटलाच संपला असता. त्याला तिथल्या तिथे फाशी झाली असती. त्यामुळे तो गुन्हेगार आहे हे स्वतःच सांगतोयं आणि नांव घेऊन, केलेल्या गुन्ह्याचं तपशीलवार वर्णन इतक्या बेदिक्कातपणे करतोयं म्हटल्यावर प्रश्नच मिटला. सो, मुद्दा तो नाही. त्याला वाचवणारा किती पाताळयंत्री असला पाहिजे हा आहे. आणि अशा पाताळयंत्री व्यक्तीविरुद्ध गुन्हा तर सोडाच, या नृशंस हत्त्याकांडाची पूर्ण आखणी केली असं सिद्ध होणं हे त्याहीपेक्षा किती महाकठीण आहे याची कल्पना येण्याचा आहे.

In reply to by विवेक ठाकूर

अगदी सुशिक्षित लोकांमध्येसुद्धा कायद्याबद्दल किती अज्ञान आहे हे तुमचा प्रतिसाद बघून समजतं.
त्यानं न्यायालयासमोर हे विधान केलं तरच आम्ही त्याला गुन्हेगार मानू असं फक्त निर्बुद्ध म्हणू शकतो.
सगळ्यांना स्वतःसारखं समजायची वाईट खोड आहे तुम्हाला. शाळेत शिकताना पण असंच करायचात बहुतेक. विषय नाही समजला - शिक्षक निर्बुद्ध! मुळात गुन्हा सिद्ध होईपर्यंत माणसाला निर्दोष मानावं हा न्यायदानपद्धतीचा, निदान लोकशाही देशांत तरी, सर्वमान्य संकेत आहे. आणि गुन्हा सिद्ध करणं आणि त्याच्या तीव्रतेनुसार शिक्षा देणं हे न्यायालयाचं काम आहे. याचाच अर्थ कोणताही माणूस हा गुन्हेगार आहे हे न्यायालयासमोर सिद्ध होणं आवश्यक आहे. जोपर्यंत न्यायालय तसं मानत नाही तोपर्यंत तो माणूस स्वतः तसं म्हणत असला तरीही तो गुन्हेगार नाही कारण ते न्यायालयात सिद्ध झालेलं नाही. तुम्हाला जर हा निर्बुद्धपणा वाटत असला तर निवडणूक लढवा, विधिमंडळात जा, घटनादुरुस्ती करा आणि हा असा बदल घडवा. मग आम्ही सगळे (निदान मी तरी) ते मान्य करु. तोपर्यंत नाही.
प्रतिसाद देण्यापूर्वी किमान इतकी तरी समज हवी की असं विधान त्यानं न्यायालयासमोर केलं असतं तर खटलाच संपला असता. त्याला तिथल्या तिथे फाशी झाली असती.
आजवर ज्यांना फाशी झाली आहे आणि दिली गेली आहे, त्यांच्यापैकी एकानेही आपला गुन्हा न्यायालयासमोर मान्य केला नसेल. बरं, तसं झालं तरीही खटल्याचं किमान कामकाज चालवावंच लागतं. आपल्या देशात अमेरिकेप्रमाणे Plea Bargain हा प्रकारच नाही. तिथे गुन्हा कबूल करुन गुन्हेगार जी शिक्षा न्यायाधीश देतील ती भोगतो किंवा जर त्याने गुन्हा नाकबूल केला तर खटला होतो. आपल्याकडे सर्वच्यासर्व साक्षीपुरावे न्यायालयासमोर आणावेच लागतात. प्रमोद महाजनांच्या हत्येच्या खटल्यात त्यांची हत्या आपण केल्याचं प्रवीण महाजन यांनी पोलिसांसमोर कबूल केलं होतं, बाबू बजरंगीप्रमाणे स्टिंगमध्ये नाही, तरीही खटला झालाच. आपल्या देशात खटले प्रलंबित राहण्याचं एक कारण हेही आहे की Plea Bargain ही संकल्पनाच नसल्यामुळे गुन्हा झाला, चार्जशीट दाखल झाली की कोर्टासमोर प्रकरण येणारच. त्याला तिथल्यातिथे फाशी झाली असती असं म्हणणं सोपं आहे. कसाबच्या गुन्ह्याचे अनेक साक्षीदार होते, त्याला खटला न चालवता फासावर लटकवा असं म्हणणारेही अनेक होते पण सरकारने त्याला वकील दिला, त्या वकिलाचं मानधनही सरकारने दिलं, कोर्टात सर्व पुरावे येऊन गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला फाशी झाली, पण मग त्याने अपील केलं. फाशीची शिक्षा हायकोर्टाने मान्य करावी लागते. सगळी कारवाई झाल्यावर मग त्याचा दयेचा अर्ज फेटाळल्यावर मग त्याला फाशी झाली. आणि म्हणूनच आज कोणीही त्याबद्दल एक चकार शब्द काढला नाही कारण due process of the law in letter and in spirit पाळली गेली. बाबू बजरंगीच्या गुन्ह्यांमध्ये तसं झालं नाही. त्याचा गुन्हा न्यायाधीशांना rarest of the rare वाटला नाही. त्यामुळे त्याला फाशी झाली नाही. आणि मुळात फाशी ही सर्वात कठोर शिक्षा आहे असं अजिबात नाही. कित्येक प्रकरणांत फाशी ही फार साधीसरळ शिक्षा आहे असं म्हणता येईल. गुन्हा इतका भयानक आहे की गुन्हेगारांना फाशी न देता पूर्ण आयुष्य तुरूंगात सडत ठेवणं ही कधीही जास्त परिणामकारक शिक्षा असू शकते. अर्थात तो मुद्दा इथे नाहीये आणि मी फाशीच्या विरोधातही नाहीये.
सो, मुद्दा तो नाही. त्याला वाचवणारा किती पाताळयंत्री असला पाहिजे हा आहे. आणि अशा पाताळयंत्री व्यक्तीविरुद्ध गुन्हा तर सोडाच, या नृशंस हत्त्याकांडाची पूर्ण आखणी केली असं सिद्ध होणं हे त्याहीपेक्षा किती महाकठीण आहे याची कल्पना येण्याचा आहे.
हे तुमचं मत आहे. त्याबद्दल काय बोलणार? मत आणि वस्तुस्थिती यात फरक असतो. कायदा फक्त वस्तुस्थिती जाणतो. न्यायदेवता आंधळी असण्याचा अर्थच तो आहे. बाबू बजरंगी पुराव्याअभावी निर्दोष सुटला असता तर तुमच्या या विधानात तथ्य आहे असं म्हणता आलं असतं. पण त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तुमच्या उदाहरणात जो पाताळयंत्री व्यक्तीचा उल्लेख आहे तो म्हणूनच चुकीचा आहे. बजरंगी निर्दोष सुटला असता तर वेगळी गोष्ट असती.आपली न्यायसंस्था इतकी वाकलेली नाही, निदान असल्या प्रकरणांमध्ये, जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमं २४x७ लक्ष ठेवून आहेत, तिथे तर नाहीच नाही.

In reply to by बोका-ए-आझम

कोणताही माणूस हा गुन्हेगार आहे हे न्यायालयासमोर सिद्ध होणं आवश्यक आहे. पुन्हा तेच ! आपल्याला उघड गोष्ट दिसत नाही ? खरं तर ती इतकी उघड आहे की कबूल करायची लाज वाटते. ....मी फाशीच्या विरोधातही नाहीये. त्यामुळे सगळा प्रतिवादच बाद. बाबू बजरंगी पुराव्याअभावी निर्दोष सुटला असता तर तुमच्या या विधानात तथ्य आहे असं म्हणता आलं असतं. पुन्हा तेच !

In reply to by गामा पैलवान

न्यायालयीन प्रक्रियेत सुरुवातीला गुन्हेगाराला आरोप वाचून दाखवतात आणि विचारतात `हे आरोप तुला कबूल आहेत का?' तो जर `कबूल आहे' म्हणाला तर केस पुढे चालतच नाही, विषयच संपतो. सरळ शिक्षा सुनावली जाते. मुलाखत देणार्‍याची माहिती पाहा : Babubhai Patel, known by his alias Babu Bajrangi,[1] is a leader of the Gujarat-wing of the Bajrang Dal, a Hindu nationalist organization in India. He was a central figure in the organized pogroms directed at Muslims during the 2002 Gujarat violence.[2] He was sentenced to life term imprisonment by a special court for his role in the Naroda Patiya massacre in which ninety-seven Indian Muslims were murdered.[3] आता पुन्हा विडिओ पाहा! इथे गुन्हेगार स्वतः कबूल करतोयं आणि वर म्हणतोयं पहिल्या जजनं मला चार काय पाच वेळा फाशी द्यायला पाहिजे असं म्हटलं होतं. आणि हाइट बघा, त्याला फक्त जन्मठेप झाली ! इतक्या उघड गोष्टीला अजून काय पुरावा हवा? यावरनं किमान विचार करु जाता खरं तर सगळंच क्लिअर होतं. १) पुरावे, साक्षिदार आणि तो म्हणतो तसे डायरेक्ट जजेस बदलून सगळ्या हत्त्याकांडाची एकूणच वाट लावली गेली आहे. सगळी शोध प्रक्रियाच पूर्णपणे डायल्यूट केली आहे. कारण इतक्या नृशंस हत्त्याकांडाला जवाबदार असणार्‍या मुख्य व्यक्तीला फाशीऐवजी जन्मठेप होणं हे सोपं काम नाही. २) ज्या नरेंद्र भाईंचा उल्लेख होतोयं, तो किती पाताळयंत्री माणूस असेल आणि त्याची काय पहुंच असेल याची कल्पना करवत नाही. जो दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडलेल्या हत्त्याकांडातल्या मुख्य गुन्हेगाराला, जिथे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहेत, फाशीपासून वाचवू शकतो, तो स्वतः सुरक्षित राहाण्यासाठी कोणत्या थराला गेला असेल हे सांगण्याची गरज नाही. म्हणजे मुख्य गुन्हेगार, जो स्वतः गुन्हा कबूल करतोयं (भले स्टींगमधे का असेना, त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही) त्याला जो हात लावू देत नाही तो स्वतःपर्यंत कुणीही पोहोचू शकणार नाही याची सर्वशक्तीनिशी काय तयारी ठेवून असेल. ३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो. ४) आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पुराव्या अभावी मुक्तता म्हणजे न्याय नाही. ती न्यायाव्यवस्थेची असहाय्यता आहे. जर उघड आणि समोर दिसणार्‍या पुराव्यावरनं आपण निवाडा करु शकत नसू तर त्याचा अर्थ एकच होतो....आपल्याला निवाडा करायचा नाही. आपण ते साहस करु धजत नाही. आपल्याला ती दाहकता मंजूर करण्यापेक्षा पुरावा नाही म्हणजे काही घडलंच नाही हा मानसिक दिलासा बरा वाटतो.

In reply to by विवेक ठाकूर

या प्रतिसादाची प्रिंट काढून न्यायालयात एखादी याचिका दाखल करावी म्हणतोय!!!! किवा तुम्ही करा ना सर?? नै योग्य बाजू मांडू शकाल म्हणून म्हणतोय.

In reply to by विवेक ठाकूर

एकदा विठानी न्याय केला की पुन्हा न्यायालयाची गरजच काय ? हवं तर त्यांचे प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचायचे अन तरीही नाही समजले तर प्रिंटआउट काढून वाचायचे... विठाजी तुमचच चुकलं बघा खरतर प्रतिसादात तुम्ही सादगी, सूफी, तूफ़ान, इश्क ओशो, सत्य, अध्यात्म, अनुभूति असे शब्द पेरले असते ना तर काय टाप होती मिपाकरांची तुमचे म्हनने अमान्य करायची ? ओँ ?

In reply to by भाऊंचे भाऊ

इतक्या उघड गोष्टीबद्दल तुमचं स्वतःच मत काय आहे? आवांतर करुन तुम्ही अज्ञानप्रदर्शन करतायं असं दिसत नाही का?

In reply to by विवेक ठाकूर

मला वाटतं मुळात गोध्रा हत्याकाण्डच घडायलाच नको होते गुजरात दंगल ही त्यानंतरची बाब आहे ज्या बद्दल ठाम मत व्यक्त करण्या इतपत माझा अभ्यास तोकडा आहे

In reply to by भाऊंचे भाऊ

खरतर प्रतिसादात तुम्ही सादगी, सूफी, तूफ़ान, इश्क ओशो, सत्य, अध्यात्म, अनुभूति असे शब्द पेरले असते ना तर काय टाप होती मिपाकरांची तुमचे म्हनने अमान्य करायची ? ओँ ? याला पकवणे म्हणतात.

In reply to by विवेक ठाकूर

गोध्रामधे हिंदूंचे अभद्र हत्याकांड घडले इतक्या उघड गोष्टीबद्दल तुमचं स्वतःच मत काय आहे? आवांतर करुन तुम्ही अज्ञानप्रदर्शन करतायं असं दिसत नाही का?

In reply to by गामा पैलवान

सांगायचा मुद्दा असा की मोदींना दोषी समजणं सोडून द्या. या एका वाक्याने तुम्ही किती दुकाने एका फटक्यात बंद करत आहात ते लक्षात आले का..? ;)

विवेक ठाकुर, र्तराट जोकर, ह्या नरोडा पाटिया हत्याकांडा बद्दल ईतक घसा फोडुन बोलताय मग जरा गोध्राच्या दोन बोगीना बाहेरुन आग लावुन आतल्या १६० ते २०० लोकाम्ना मारण्यात आले त्या बद्दल किती लोकांना फाशी झाली ? २००२ च्या गुजरात दंगलींचा फ्लॅश पाँईट हा गोध्राच हत्याकांडच आहे, हे सर्व मान्यच आहे, मग त्या हत्याकांडाला झाकुन ठेवायचा अट्टाहास काँग्रेसच्या पक्षाने केलेला तुम्हाला दिसला का ? २०० हिंदुना मारण्याचा अधिकार आहे पण मुसलमानांना हातपण लावायचा नाही ? भर मुंबईच्या मध्यावर असलेल्या भेंडि बाजारमध्ये अगदी शिवसेनेच्या चढ्या काळातही पाकिस्तानच्या विजयावर फटाके फोडले जात असत, मुंबईतले सराईत गुन्हेगार तिथेच जाउन लपत, दंगलीच्या वेळेला तिथे, जोगेश्वरीला, व अश्या मुस्लिम बहुल भागात बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना मारुन टाकलेल आहे, हिंदुबहुल् भागात राहुन रात्रीच्या पहाटेच्या थंडीत स्वतःला उबदार रजाईत गुरफटुन लोकांना उपदेश करणे सोडा, जेंव्हा बाजुच्या मुसलमान वस्तीतुन लोक बेभान होउन येतात तेव्हां काही सुचत नाही. ते बघत नाहीत तुम्ही हिंदु आहात का पारसी ? तुम्ही मुसलमान नसलात मग तोच तुमचा दोष !

In reply to by डँबिस००७

एका अमानुष घटनेमुळे दुसरी अमानुष घटना जस्टीफाय होत नाही. शिवाय अशा अमानुष घटना पुढच्या तशाच घटना घडवायला जवाबदार ठरतात.

२००२ नंतर गुजरात मध्ये मोठी दंगल झाली नाही हेच त्या दंगलीचे च्नागले ऑउत पूट ह्या दंगलीवर अत्यंत परिणामकारक भाष्य सलीम साहेबांनी घेतले आहे.

In reply to by निनाद मुक्काम …

२००२ नंतर गुजरात मध्ये मोठी दंगल झाली नाही
हि चुकीची माहिती आहे. त्यानंतर गुजरात मध्ये १०-१२ दंगली झाल्या. त्यातील बडोदा दंगलीत ६-८ मृत्यू पावले,

In reply to by संपत

तरीदेखील तेथील जनतेने मोदींना निवडून दिले.आताच मुझफराबाद येथे भाजपचा आमदार निवडणून आला. भारताने चंडशोक नाही तर अशोकस्तंभ म्हणून चक्रवर्ती सम्राट ह्यांना राज्यघटनेत स्थान दिले. अवांतर काय गमंत म्हटल्यास विरोधाभास पहा डेविड हेडली च्या साक्षीचा विडीयो पाहून त्याला नाकारणारे आज एक विडीयो घेऊन आले आहेत जर ह्या विडीयो ला तुम्ही अंतिम सत्य मानत असाल तर त्या तर्काने तुमचा पुढचा लेख डेविड हेडली ची प्रांजळ मुलाखत असा यायला हरकत नाही. चिदम्बरम सोनिया ह्यांच्या नावाने खडे फोडायला मी पयला असेन

In reply to by निनाद मुक्काम …

डेविड हेडली च्या साक्षीचा विडीयो पाहून त्याला नाकारणारे>>> हे मी कुठे केले आहे ते सिद्ध करा नाहीतर आपली टकळी बंद करा. वाट्टेल ते ऐकून घेणार नाही जर्मनीकर, ज्याला धड मराठी लिहायला येत नाही त्या सोकॉल्ड अभ्यासू आयडीकडून तर नाहीच नाही.

In reply to by तर्राट जोकर

तुम्ही असे प्रत्यक्ष म्हणाला नसाल पण तीच तुमची धारणा आहे अशी माझी पक्की समजूत आहे , निदान तुमचा प्रतीसातून व लेखातून असेच दिसते आता तुमच्या मला उद्देशून असलेल्या प्रतिसादावरून तुम्हाला असे म्हणायचे आहे का की डेवीड हेडली च्या विडीयो मधील साक्ष तुम्हाला मान्य आहे, आणि त्याप्रमाणे इशरत जहा दहशतवादी आहे का आणि मोदींना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी पुढे कोन्ग्रेज ने सारे कुंभाड रचले असे तुम्हाला वाटते का अवांतर वाट्टेल ते माझ्याकडून ऐकून घेणार नाही ठीक मग कोणाकडून ऐकून घेणार मी शुद्ध लेखन सुधारले तर वाट्टेल ते ऐकून घ्याल का असो

In reply to by निनाद मुक्काम …

डेवीड हेडली च्या विडीयो मधील साक्ष तुम्हाला मान्य आहे, आणि त्याप्रमाणे इशरत जहा दहशतवादी आहे का आणि मोदींना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी पुढे कोन्ग्रेज ने सारे कुंभाड रचले असे तुम्हाला वाटते का >> उत्तर हो असेच द्यावे ह्या पद्धतीने प्रश्न विचारुन तुम्ही तुमची खरी समजूत तर दाखवली आहेच. इशरत जहाप्रकरणाबद्दल न्यायालय काय म्हणेल तेच सत्य असं मी मानाय्चं ठरवलं आहे. मला काय वाटतं ह्याने तुम्हाला काय फरक पडतो? तसेहे तुमच्या शिक्के मारण्याच्या उतावीळपणाबद्दल, घाई बद्दल, आंधळेपणाबद्दल, अजून काय बोलावे. तेव्हा असो. शिक्के मारण्याचा उतावीळपणा दाखवण्यापेक्षा शुद्धलेखन सुधारा, ते जास्त उपयोगी आहे.

In reply to by तर्राट जोकर

इशरत जहाप्रकरणाबद्दल न्यायालय काय म्हणेल तेच सत्य असं मी मानाय्चं ठरवलं आहे. मला काय वाटतं ह्याने तुम्हाला काय फरक पडतो? तुमच्या भाषेत सांगायचे तर इशरत जहा च्या ऐवजी गुजरात दंगल २००२ असा बदल तुम्ही करून पहा वरील विडीयो त्यानुसार फुटकळ लेख काढायची गरज भासणार नाही अवांतर मी शुद्ध लेखन सुधारतो ,तुम्ही तुमची मानसिकता सुधारा जर न्यायालयाचा निकाल अंतिम सत्य मानणार आहात तर बाबूच्या विडीयो ला जी किंमत न्यायालय देणार आहेत तेवढीच तुम्ही सुद्धा द्या

In reply to by निनाद मुक्काम …

मी मोदी किंवा हेंडली बद्दल काहीच म्हटले नाही. फक्त माहिती दुरुस्त केली. तुमचा प्रतिसाद मला उद्देशून नसेल तर ठीक.

माझे स्पष्ट मत आहे १९४७ साली तर इंग्रजांनी पोलिस व लष्करी हस्तक्षेप करणे टाळले अश्यावेळी बहुसंख्य हिंदू जनतेवर व शिखांच्या वर अल्पसंख्यांक मुस्लिम मुस्लिम नेत्यांच्या आदेशावरून दंगल सुरु केली त्यावेळी हिंदूंना आपले संरक्षण करण्याची आझादी असती त्यांना अहिंसे चे हलाहल जबरदस्तीने पाजले नसते तर पाकिस्तान बांगलादेश हे शब्द जगणे ऐकले नसते. अल्पसंख्यांकांनी हिंसेच्या जोरावर जगाच्या समोर उघडणे आपली मनमानी पूर्ण केली त्यावेशी बेगडी अहिंसेच्या मर्यादा त्रुटी दिसून आल्या त्यानंतर उरलेल्या भारतात अल्पसंख्यांक अजूनही दंगली घडवू शकतात मुंबईत पोलिस व पत्रकार ह्यांच्या समोर हे करतात ते निव्वळ लज्जास्पद आहे मला गुजरात मध्ये जे झाले त्याबद्दल अजिबात दुक्ख वाटत नाही , जे झाले ती नियती होती. अटल होती कधी ना कधी तरी हे होणारच होते लज्जास्पद ची लिंक पहा त्यात मुंबईचे कमिशनर दंगल कर्त्यांना सोडून द्या सांगत होते कारण त्यांचा जमाव एवढा होता अटक करायला गेले असते तर परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली असती आणि आम्ही चार वकिलांना अटक झाली नाही म्हणून बोंबा मारतो त्यावेळी प्रस्रामाध्यामे पोलिस सरकार सारेच हतबल व चूप होते

In reply to by निनाद मुक्काम …

ह्या लोकांना बाहेरचा फारसा अनुभव नाहीये. ना ह्यांना खरोखर विचार करायचा आहे. त्यामुळे नक्की सेक्युलारीस्म जिथे त्याचा उगम झालाय तो कसा वापरतात ते पहिलेच नाहीये त्यामुळे कळतच नाही. फक्त सवर्णांना आणि त्यातूने ब्राह्मांना विरोध म्हणजे सेक्युलारीस्म अशी संकल्पना आहे. त्याच्या पलीकडे नक्की काय आणि कसा आहे हे माहितीच नसल्याने आणि जे आहे ते आपल्या संकल्पनेच्या पूर्ण वेगळे असू शकते असेही लक्षात आल्याने झापड बंद करून फक्त २००२ ची दंगल इतकेच लक्षात ठेवले जाते. त्यामुळे तुम्ही वर लिहूनही झोपलेल्याचे सोंग काही उघडणार नाही.