Skip to main content

बाबु बजरंगी : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक तर्राट जोकर यांनी शुक्रवार, 11/03/2016 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते. ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे: http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-chang… http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-… (हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )

वाचने 16071
प्रतिक्रिया 116

प्रतिक्रिया

गांधीजी आणि नेहरूंनी हिंदूंचे प्रचंड नुकसान करून ठेवलंय. अहिंसेचा अतिरेक इतका केला कि हिंदूंची मानसिकता त्यामुळे पूर्ण बदलून गेलीय.

In reply to by आरोह

एवढाच लहान देश पाक नुकताच स्वतंत्र झाला त्यावेळी भारताकडून ५५ कोटी येणे आहे अश्यावेळी अजून देश म्हणून गव्हर्नन्स पासून अनेक गोस्घ्तींचे बस्तान बसायचे आहे , पण त्यांनी उद्दामपणे काश्मीर मध्ये आपली घुसखोर घुसवले त्यावेळी आता स्वतंत्र भारताकडे त्यांचे लष्कर आहे व आपले मुस्लिम बांधव अजूनही भारतात आहेत व पाकिस्तान मध्ये येण्यास निघाले आहेत ह्याची त्यांनी तमा बाळगली नाही . कारण भेकड रोगट अत्यंतिक अहिंसक भारतीय नेतृत्व व संतावर त्यांना पूर्ण विश्वास होता , भारत नुकतच स्वतंत्र झाला आहे दंगलग्रस्त भाग दोन्ही बाजूने शांत झाले नाही आहेत अश्यावेळी काश्मीर मध्ये परिस्थिती चिघळली आहे अश्यावेळी संत आपल्याच सरकारच्या विरुद्ध उपोषण करत आहेत. स्वतः पद घ्यायचे नाही जबाबदारी घ्यायची नाही नेतृत्व करायचे नाही फक्त आश्रमातून सत्तेचा रिमोट कंट्रोल ह्यांना आपल्या हातात हव्या व्यक्तिकेंद्रित राजकारण व्यक्तीपुजेचा उगम इथून सुरु झाला . कारण आपण कितीही नरसंहार केला तरी समोर नैतिकता तत्वे अश्या शेवाळात लिप्त नेतृत्व आपले शष्प बिघडू शकत नाही अशी तत्कालीन पाकिस्तानी सरकारची समजूत होती ती दुर्दैवाने खरी ठरली एवढी हरामखोरी करून अहिंसक नेतृत्वाने हा प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेउन पुढील अनेक दशके हिंसेचे पाट वाहण्याची सोय करून ठेवली

मित्रांनो तुम्ही सगळे हरला आहात,या धाग्यावर चर्चा घडवण्याचा धागाकर्त्याचा हेतू पार पडलेला आहे.तसेच पन्नास च्या वर प्रतिसाद आलेले आहेत.या धाग्याला तुम्ही अनुल्लेखाने मारावयास हवे होत,असे वाटते

In reply to by सुनील

तुम्ही म्हणाल ते. शेवटी कोणत्याही बाजूने बघितले तरी पिवळे दिसायचे तर पिवळेच दिसणार. आणि बाकी काय, घरोघरी मातीच्याच चुली, आणि नावडतीचे मीठ अळणी.

उलट धाग्याचा हेतू सफल झाला असेच मला वाटते. केवळ मोदी द्वेषापायी त्यांनी हा तिसरा धागा काढला असेच दिसते. हे विडंबन नाही किंवा खरोखर चर्चा करावी अशी त्यांची इच्छा नाही तर आपला मुद्दा काहीही करून सिद्ध करावा हा हेतू आहे हेही स्पष्ट आहे. अन्यथा हि खाजवून खरुज काढण्याचे कारण दुसरे काही दिसत नाही. जोकर साहेबांनी काळा चष्मा लावला आहे हे यातून ते स्वतःच सिद्ध करून दाखवत आहेत आणि ठाकूर साहेबांनी पण साम्यवादाचा पिवळा चष्मा घातला आहे त्यामुळे त्यांना सगळे जग लाल क्रांती विरुद्ध "क्रांती" करत आहे असा भास होत आहे. त्यांनी कन्हैय्यचि बकरी पिळायला घेतली पण तो बोकड निघाला याशिवाय दैव दुर्विलास काय असावा. दोघान्चे दुटप्पी वर्तन त्यांनी स्वतःच उघडे पाडले असल्यामुळे आता धाग्यात काही मलई राहिली नाही ज्यांना हवंय त्यांनी ताक फुंकून प्यावे एवढे बोलून मी रजा घेतो.

In reply to by सुबोध खरे

या घटनेला अनेक पैलू आहेत. तुम्ही माया कोदनानी प्रकरण वाचलंय का? त्या बाईंना कोर्टानं हत्त्याकांडाची किंगपीन ठरवलं आहे आणि २८ वर्ष कारवासाची सजा झालीये. त्यांना फाशी होऊ नये म्हणून कायकाय खटपटी केल्या गेल्या याची कल्पना आहे का?

In reply to by सुबोध खरे

या लोकांना समजावून सांगणे फार कठिण आहे. मला देखिल प्रतिसाद द्यायचा नव्हता पण तुमचे नाव बघितले तेव्हा फक्त तुम्हाला उत्तर द्यावेसे वाटले. बाबू बजरंगी सारखेच उत्तर काहीसे राजिव गांधीनी 84च्या दंग्यानंतर दिले होते. काहीतरी मोठे वृक्ष कोसळतात तेव्हा..., ह्याच माणसाला पुढे भारताचा पंतप्रधान केले होते. म्हणजे तुम्ही बलदंड आहात, हे समोरच्याला देखिल माहीत आहे, तरिही ते समोरचे शेम्बडे पोर तुमच्या कानफटात मारते. तुम्ही दुर्लक्ष केले तर तुम्हाला हिणवले जाते की तुम्ही षंढ आहात. जेव्हा तुम्ही आत्मरक्षेसाठी त्या पोराच्या कमरेत लाथ घालता व् त्या पोराला चिथावणाऱ्या काही मूर्खांची टाळकी सड़कता तेव्हा तुम्ही क्रूरकर्मा ठरता. जरा गोधरा दंगलीच्या वेळचे काही मिडिया फुटेज पहा ज्यात खान्ग्रेसी बरळत आहेत. मेलेल्या कारसेवकाबद्दल एकहि शब्द ते बोलत नाही आहेत. वा रे असहिष्णुता! वा रे सेक्युलारिजम! त्या 78 जणांना मारल्याबद्दल जन्मठेप ,फाशी नाही, आणि आमचा ओवेसीभाई याकूब मेमन ला फाशी दिल्यावर विचारतो आता बघुया माया कोडनानी व् बाबू बजरंगिला फाशी होते काय? वरील सेक्युलर प्रतिसाद देणाऱ्यानी एकतर दंगली अनुभवल्या नाहीत. दंगलीच्या वेळी पोलिसांचे हात कसे बांधले जातात हे त्यांनी बघितले नाही म्हणूनच असे फ़ालतू धागे ते काढत बसतात.

In reply to by भंकस बाबा

त्या 78 जणांना मारल्याबद्दल जन्मठेप ,फाशी नाही>> हे कोण ७८ जण?? गोद्राबळी ५९ आहेत ना?? >> गोध्राप्रकरणी कोर्टाचा निर्णयः On February 2011, the trial court convicted 31 people and acquitted 63 others, saying the incident was a “pre-planned conspiracy". The convictions were based on the murder and conspiracy provisions of Sections 302 and 120B of the Indian Penal Code respectively and under Sections 149, 307, 323, 324, 325, 326, 332, 395, 397, and 436 of the Code and some sections of the Railway Act and Police Act.[49] The death penalty was awarded to 11 convicts; those believed to have been present at a meeting held the night before the incident where the conspiracy was formed, and those who,according to the court, had actually entered the coach and poured petrol before setting it afire. Twenty others were sentenced to life imprisonment Maulvi Saeed Umarji, who was believed by the SIT to be the prime conspirator, was acquitted[49] along with 62 other accused for lack of evidence.[59] The convicted filed appeals in the Gujarat High Court. The state government also challenged the trial court's decision to acquit 61 persons in the High Court and sought death sentences for 20 convicts awarded life imprisonment in the case > वरील सेक्युलर प्रतिसाद देणाऱ्यानी एकतर दंगली अनुभवल्या नाहीत. दंगलीच्या वेळी पोलिसांचे हात कसे बांधले जातात हे त्यांनी बघितले नाही म्हणूनच असे फ़ालतू धागे ते काढत बसतात. >> संवेदनशील भागात राहणार्‍या आणि धार्मिक दंगली पाचवीलाच पुजलेल्या असलेल्यांना इथले काही सदस्य 'ह्यांना काही अनुभव नाही' असे म्हणतात तेव्हा हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. काही दारुड्यांची मुलं बापाचं दारू पिणं बघून बघून दारुडी होतात, काही मुलं तेच बघून दारूचा भयंकर तिरस्कार करतात. आपण कोणतं मूल व्हावं हे आपल्यावर असतं.

टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला तर्राट जोकर - Tue, 08/03/2016 - 07:32 टूंडाचा इतिहास जाऊ देत. मला न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत व्हायचं नाही. कारण मला काय वाटतं ह्याने त्याला कोर्ट काय शिक्षा देईल हे ठरत नसतं. न्यायालयाचाचा निर्णय एका परिस्थितीत मान्य, दुसर्‍यात नाही असे करणारेही अफझलची फाशी जुडीशियल किलींग मानणार्‍यांच्या रांगेत बसतात. काहीही फरक नाही. निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.
ईथे तजो साहेबांशी सहमत. बाकी चालुद्या

In reply to by sagarpdy

निदान मी न्यायालयाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अंतिम मानतो. जो असेल तो.
हे बाकि छान आहे

बर्‍याच चष्मे लावलेल्या लोकांना ह्या धाग्याचा प्रांजळ हेतु लक्षात आला नाही किंवा मी घसा कोकलून सांगतोय तर विश्वास ठेवायचा नाही. असो, ज्याचे त्याचे विचार. हा धागा काढण्याचा उद्देश कुणाला मोदींविषयी विखारी द्वेष वाटत असेल तर वाटु देत. मला काहीही फरक पडत नाही. कारण जे मुळात नाही त्यासाठी का वैताग करावा. पण काही लोकांना तो स्वतःहून करुन घ्यायचा असतो. त्यात मी काही करु शकत नाही. लोक उतावीळ पणे मोदींच्या विरोधात असलेली एकही गोष्ट आगीचा बंब घेऊन विझवायला येतात हे इथे सिद्ध झाले. मी आधीच दुसर्‍या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे मोदींनी स्वत: २००२ चा लोड घेणे सोडून दिलेय पण भक्त अजून सोडायला तयार नाहीत हेही सिद्ध झाले. टिका करणारे कसे लायकच नाहीत, महत्त्वाचे नाहीत हे सिद्ध करायची पराकाष्ठाही इथे झाली. मोदींविरूद्ध बोलत राहीलात तर तुम्हाला खास मान-सन्मान, आदर, ओळख मिळणार नाही, तुमच्या इतर विषयातील मतांनाही आम्ही किंमत देणार नाही हेही सांगून झाले. तुम्ही मोदींविरुद्धच्या प्रत्येक गोष्टीचे समर्थन करताच असा अट्टाहास केला गेला आणि तो अट्टाहास अजिबात चुकीचा नाही असेही काही सदस्यांना इथे वाटते. http://www.misalpav.com/comment/814473#comment-814473 इथे जे मी बोललो ते सगळे सत्य करायचा चंग बांधला आणि पुर्णत्वास नेला. या धाग्यावर एकही प्रतिक्रिया आली नसती तर मला जास्त आनंद झाला असता. असो. धाग्याचा उद्देश दुसर्‍याच प्रतिक्रियेत दिला आहे. न्यायालयाचे निर्णय जेव्हा आपल्या बाजूने असतात तेव्हा न्यायालयाने योग्य निर्णय दिला, अखेर न्याय मिळाला असा आनंद व्यक्त करायचा. जेव्हा आपल्या बाजूने निर्णय नसतो तेव्हा पुरावे कमी पडले, पोलिसांना पुरावे गोळा करतांना अडचणी आल्या, वकिल बाजू मांडण्यात कमी पडले, न्यायालयात फक्त निर्णय दिला जातो, न्याय नाही अशा बोंबा मारायच्या. हा दुटप्पीपणा आहे. हा उघडा पाडण्यासाठी हा धागा होता. करिम टूंडा हा निर्दोष सुटला तेव्हा खरेसरांनी त्या न्यायालयीन निर्णयात आलेल्या अडचणींचा पाढा वाचला, निष्पाप लोकांच्या बळी गेलेल्यांची द्वाही दिली. तेच बाबु बजरंगी प्रकरणात झाले तर पुरावा नाही म्हणजे दोषी नाही असा काही सदस्यांनी पवित्रा घेतला. असे अनेक खटले असतात जिथे पुराव्या अभावी गुन्हेगार सुटून जातात, निर्दोष बळी जातात. कन्हया प्रकरणात आपण न्यायालयाचा निर्णय योग्य अशी भूमिका घेतोय, त्यात कसे सुनावले इत्यादीबद्दल पेढे वाटत फिरतो. अफझल प्रकरनात फाशी योग्य ठरवतो. मग करिम टूंडाबद्दल पुरावे नाहीत म्हणून निर्दोष सुट्ला तर वाईट वाटतं. म्हणजे तुमच्या मनाच्या न्यायालयात तुम्ही आधीच निवाडा केलाय. आपल्या आवडीचा निर्णय तेव्हा न्यायालयाला समर्थन, नावडता निर्णय तो न्यायालयीन व्यवस्थेचा कमकुवतपणा. इथे हे झिरोडाऊन होतं. आपला आणी परका. बस एवढंच. बाकी सारं ढोंग आहे. निष्पाप लोकांचे गेलेले जीव इत्यादी. गोध्राची घटना हे ट्रीगर आहे असे मानणार्‍या सदस्यांनी गुजरात दंगल समर्थनीय ठरवली. तिथे निष्पापांचे बळी गेले हे लक्षात घ्यायचे नाही. एक आसुरी आनंद जो बाबु बजरंगीच्या चेहर्‍यावर आहे तोच इथल्या गुजरात दंगलीचे समर्थन करनार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसतो. तात्त्विक दृष्ट्या काही फरक नाही. आपले क्रौर्य, निर्ममता जस्टीफाय करायला गोध्राचे फक्त निमित्त पुढे करत आहात. देशात लॉ अ‍ॅण्ड ऑर्डर, कायद्याचे राज्य, गुन्हे अन्वेषण विभाग, न्यायव्यवस्था ह्या अस्तित्वात नाहीत हे कबूल करत आहात. भारत जणू पुर्वमध्ययुगिन काळात आहे असे इथल्या काही तथाकथित उच्चशिक्षित, चांगल्या पदांवर महत्त्वाचे काम करणार्‍या सुसंस्कृत सदस्यांना वाटते. मुस्लिमांच्या क्रौर्यांच्या कहान्या रंगवून रंगवून सांगणार्‍या बैठकींनी तुम्हाला त्यांच्या समकक्ष केले आहे. आपलाच चेहरा किती भेसूर दिसतो हे ह्या विडियोतल्या बाबु बजरंगीच्या चेहर्‍याशी म्याच करुन पाहा. एकही प्रतिक्रिया अशी नाही जिथे बाबु बजरंगीच्या कृत्याचा स्पष्ट निषेध व्यक्त केला गेला. सरळ आहे, बाबु बज्रंगी तुम्हाला आपला वाटतो. यु रिलेट विथ हिम. तुम्हालाही त्याने जे केले तेच करावे वाटले असते. गर्भवतीच्या पोटातल्या बाळाला सुद्धा कापणारी हिस्त्रता तुमच्याही मनात भरलेली आहे. इथल्या प्रतिसादांवरुन तुम्ही नागडे झाला आहात. निष्पक्ष असण्याचे, निष्पापांबद्दल जाण असण्याचे ढोंग मिरवणे उघडे पडले आहे. आता माझे मत. जे नेहमीच न्यायालयासोबत राहिले आहे. मोदींविरुद्ध पुरावे नाहीत तर नाहीत. त्यांना दोषी मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा माझ्या मानण्या न मानण्याने असा काय फरक पडतो. मला साबरमती एक्सप्रेसमधे बळी गेलेल्या निष्पाप जीवांबद्दलही तेवढीच काळजी आहे, त्यांना मारणार्‍यांबद्दल अतिव संताप आहे. कोर्टाने त्यांना योग्य निर्णय देऊन शिक्षा केली आहे. त्या निर्णयाचे समर्थन आहे. निष्पाप जीव कोणतेही असो, त्यांचे जाणे दुर्दैवी असतेच. ते कोणत्याही जातीधर्माचे, देशाचे असो. माझ्या मनात कणव आहे. काही लोक भेद करतात. मला जमत नाही. काही हिंदू "जबरा शिक्षा मिळाली त्यांना, असेच कापले पाहिजे ह्यांना" असे म्हणून गुजरात दंगलीचे समर्थन करतो तेव्हा मी त्याच्याशी रिलेट करु शकत नाही. मी त्यांच्य भाषेत फुरोगामी, खाण्ग्रेसी, लिब्टार्ड, विदेशी फंडावर जगणारा असा असतो. एवढा सगळे बिल्ले मिरवनारा मी 'हिंदू' मात्र नसतो. त्यांच्या लेखी खरा हिंदू म्हणजे मुस्लिमांविषयी वैरभाव ठेवणारा. असो बापडे. संवेदनशील भागात राहणार्‍या आणि धार्मिक दंगली पाचवीलाच पुजलेल्या असलेल्यांना इथले काही सदस्य 'ह्यांना काही अनुभव नाही' असे म्हणतात तेव्हा हसावे की रडावे असा प्रश्न पडतो. धाग्याचा उद्देश हिंदु विरुद्ध मुस्लिम किंवा मोदी असा नाही त्यामुळे त्याविषयी चर्चा मी करणार नाही. धाग्याचा विषय न्यायालयिन निर्णयांबद्दलचे बायस हा आहे. उपरोक्त प्रतिसाद कोणत्याही सदस्याला वैयक्तिक उद्देशून नाही. अंगावर घेऊ नये.

In reply to by तर्राट जोकर

मोदींविरूद्ध बोलत राहीलात तर तुम्हाला खास मान-सन्मान, आदर, ओळख मिळणार नाही, तुमच्या इतर विषयातील मतांनाही आम्ही किंमत देणार नाही हेही सांगून झाले.
एक नंबरचे खोटारडे आहेत तुम्ही, असे कोणी म्हटले आहे, मोदींना विरोध जरूर करा फक्त खोडसाळपणा करू नका असं म्हटलं आहे, फोलपणा तुम्ही मान्य करत नाही. तुमच्या प्रतिसांदांमध्ये प्रचंड विरोधाभास असतो.
एकही प्रतिक्रिया अशी नाही जिथे बाबु बजरंगीच्या कृत्याचा स्पष्ट निषेध व्यक्त केला गेला.
साहेब तुम्ही तर कुठे माझ्या धाग्यावर देशविरोधी घोषणाबाजीचा निषेध व्यक्त केला होतात?शेवटी मी तीन-चार वेळा विचारून ते तुमच्याकडून वदवून घेतले. . . बाकि प्रवचन छान आहे,
उपरोक्त प्रतिसाद कोणत्याही सदस्याला वैयक्तिक उद्देशून नाही. अंगावर घेऊ नये.
असो बाकि शब्दांचे भावनिक खेळ सारे.

In reply to by तर्राट जोकर

प्रतिसाद आवडला. विशेषतः तुमची भूमिका. आता माझे २ पैसे. १. मुळात हा सगळा विषय सुरू झाला कन्हैया वरून, जिथे विठांनी धागा काढून कन्हैयाचे उदात्तीकरण करण्याअचा प्रयत्न केला. तो देशद्रोही आहे की नाही हा वेगळा विषय आहे, पण ज्या प्रकारे पूर्वी मिपावर एका आयडीने केजरीवालांचे प्रमोशन करण्याचा प्रयत्न केला होता, आणि सगळ्या विरोधकांना शिंगावर घेतले होते, त्याची बर्‍याच मिपाकरांना आठवण झाली, आणि बरेच मिपाकर जुने हिशोब चुकते करायला इथे आले. २. विठांच्या धाग्यात झालेल्या वादंगावरूनच पुढचा अफझल गुरूचा धागा आला. गंमत अशी आहे की दोन्ही धाग्यांवर मोदींबद्दल कारण नसताना भरपूर चर्चा झालेली होती. अगदी भक्त आणि विरोधक दोघांनी भरपूर धुणी धुतलेली होती. आणि त्यानंतर मोदींना कारण नसताना मधे आणणे वगैरे विषय देखील झाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, दोन्ही धागे वेगवेगळे असले, तरी विषय एकच होता, तो म्हणजे अफझल गुरू. कन्हैयाच्या धाग्यावर देखील अफझल गुरूचाच विषय मूळ होता. आता तुम्ही तिसरा धागा काढलात, त्यामध्ये या दोन गोष्टींशी संबंध नसलेली गोधरा दंगल मध्ये आणून मोदींना टारगेट करण्याचा प्रयत्न केलात, तुम्ही भले म्हणाल मी टारगेट केले नाही, पण तो व्हिडिओ आणि काही प्रतिसाद हेच दाखवतात. अश्या परिस्थितीत मोदीसमर्थक गप्प राहतील अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. हे म्हणजे आपण दगड मारायचा आणि समोरचा मारायला आला की तो बघा कसा मारतो म्हणून कांगावा करायचा. याला अर्थ नाही. आता विषय तुम्ही वर आणलेल्या मुद्द्यांचा -
लोक उतावीळ पणे मोदींच्या विरोधात असलेली एकही गोष्ट आगीचा बंब घेऊन विझवायला येतात हे इथे सिद्ध झाले. मी आधीच दुसर्‍या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे मोदींनी स्वत: २००२ चा लोड घेणे सोडून दिलेय पण भक्त अजून सोडायला तयार नाहीत हेही सिद्ध झाले.
मोदींनी सोडले का हे माहीत नाही, पण भक्तांनी हे लोड घेतले आहे कारण विरोधकांनी अजून हे लोड घेणे सोडले नाही. मोदींविरुद्ध बोलायला दुसरा कोणताही समर्पक मुद्दा न मिळणे हे विरोधकांचे देखील अपयशच आहे नाही का? पण अजून विरोधक चांगले मुद्दे उचलायला तयार नाहीत. खरेतर मोदींच्या कार्यकाळात धीम्या गतीने होणार्‍या आर्थिक सुधारणा हा देखील एक महत्वाचा विषय आहे विरोधकांसाठी, किंवा शेतकरी आत्महत्या, जीडीपी वगैरे बरेच मुद्दे आहेत. पण अजूनही विरोधक असहिष्णुता किंवा जातीय तणाव याच मुद्द्यांवरून आरडाओरडा करताना दिसतात. त्यामुळे भक्तांना देखील मधे यावेच लागते. खरेतर बर्‍याच मोदीसमर्थकांमध्ये सरकारच्या कामगिरीबद्दल असमाधान आहे, पण असा आक्रस्ताळेपणा करून विरोधक स्वतःचीच किंमत कमी करून घेत आहेत. खरे तर मोदीसमर्थकांना २००२ च्या दंगलीबद्दल काहीही घेणेदेणे नाही. त्यांचा मुद्दा आहे आर्थिक विकास. मुस्लिम समाजामध्ये बालवयापासून आर्थिक विकासाचे कार्यक्रम राबवल्याशिवाय त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणता येणार नाही याबद्दल बर्‍याच संघीय लोकांमध्ये देखील एकमत आहे. पण मुळात माध्यमे/ पुरोगामी हा विषय अयोग्य तर्हेने हाताळत असल्यामुळे त्यांना देखील विरोधात जाअण्याशिवाय पर्याय उरत नाही.
न्यायालयाचे निर्णय जेव्हा आपल्या बाजूने असतात तेव्हा न्यायालयाने योग्य निर्णय दिला, अखेर न्याय मिळाला असा आनंद व्यक्त करायचा. जेव्हा आपल्या बाजूने निर्णय नसतो तेव्हा पुरावे कमी पडले, पोलिसांना पुरावे गोळा करतांना अडचणी आल्या, वकिल बाजू मांडण्यात कमी पडले, न्यायालयात फक्त निर्णय दिला जातो, न्याय नाही अशा बोंबा मारायच्या.
असे आपण सगळेच करतो, माणूस हा मुळात स्वार्थी आहे, प्रथम स्वतः, मग कुटुंब, मग सगेसोयरे, मग जात, धर्म वगैरे अशी त्याची स्वार्थाची पायरी आहे. याच्या पलिकडे जाऊन जो विचार करतो त्याला संत म्हणतात. खरेतर तुमच्याअ विचारवंताला हे माहीत असायला हवे. हे केवळ भक्तालाच लागू होत नाही, तर विरोधकाला देखील लागू होते. परंतु देश चालवणे किंवा न्याय करणे हे भावनिक पातळीवर होत नाही. आणि जोपर्यंत आपल्या मनासारखे होत नाही तोपर्यंत समोरच्याला आपल्यावर अन्याय होतो आहे असेच वाटत राहते. तसे नसते तर सुप्रीम कोर्टात एव्हढे खटले गेलेच नसते. विषय असा आहे की हा आरोप मोदीभक्तांवर करताना तुम्ही पूर्ण निष्पक्षपाती आहेत असा तुम्हाला विश्वास आहे का? आणि असेल तर मग तो तुमच्या जालीय वावरात का दिसत नाही?
गोध्राची घटना हे ट्रीगर आहे असे मानणार्‍या सदस्यांनी गुजरात दंगल समर्थनीय ठरवली. तिथे निष्पापांचे बळी गेले हे लक्षात घ्यायचे नाही. एक आसुरी आनंद जो बाबु बजरंगीच्या चेहर्‍यावर आहे तोच इथल्या गुजरात दंगलीचे समर्थन करनार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसतो.
याबाबत अंशतः सहमत. गोध्राची घटना हे ट्रीगर आहे, असे माझे देखील मत आहे. अगदी साधे उदाहरण देतो . बहुतांश घरांमध्ये जेव्हा वाद होतात तेव्हा ते अचानक उद्भवलेले नसतात. परंतु त्या सगळ्या वादांना काहीतरी ट्रिगर असतो. इथे देखील हेच झालेले आहे. बर्‍याच दिवसांचा साठून राहिलेला राग जेव्हा असा बाहेर पडतो तेव्हा तो असेच विकृत रूप घेऊन बाहेर पडतो, मग ती कौटुंबिक हिंसा असो किंवा सामजिक. त्यावरचे उपाय हे मूलगामी आणि दूरगामी असावे लागतात. केवळ तू हिंसक आहेस आणि तुमचा समाज्/नेता हिंसक आहे असे आरोप करून हे प्रश्न सुटत नाहीत. तर त्यासाठी दीर्घकाळ चालणारी लढाई लढावी लागते. परंतु "गोध्राची घटना हे ट्रीगर आहे" याचा अर्थ गुजरात दंगलीचे समर्थन केले असा होत नाही. गोधराची घटना ही ट्रिगर होते, आणि मला गुजरात दंगलीबद्दल दु:ख आहे या दोन वेगळ्या धारणा आहेत आणि त्या एकाच वेळेस एक माणूस बाळगू शकतो. परंतु रागाच्या भरात दारूड्या बापाच्या डोक्यात दगड घालणारा मुलगा, आणि पैशासाठी बापाचा खून करणारा मुलगा या दोघांना जशी वेगवेगळ्या हाताळणीची गरज असते, तशीच ती दंगलखोर आणि अतिरेकी यांना हाताळताना देखील दाखवावी लागते. हे आक्रस्ताळेपणाचे काम नव्हे, नाहीतर त्यांच्यात आणि तुमच्यात फरक तो काय?
आता माझे मत. जे नेहमीच न्यायालयासोबत राहिले आहे. मोदींविरुद्ध पुरावे नाहीत तर नाहीत. त्यांना दोषी मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. किंवा माझ्या मानण्या न मानण्याने असा काय फरक पडतो. मला साबरमती एक्सप्रेसमधे बळी गेलेल्या निष्पाप जीवांबद्दलही तेवढीच काळजी आहे, त्यांना मारणार्‍यांबद्दल अतिव संताप आहे. कोर्टाने त्यांना योग्य निर्णय देऊन शिक्षा केली आहे. त्या निर्णयाचे समर्थन आहे. निष्पाप जीव कोणतेही असो, त्यांचे जाणे दुर्दैवी असतेच. ते कोणत्याही जातीधर्माचे, देशाचे असो. माझ्या मनात कणव आहे. काही लोक भेद करतात. मला जमत नाही. काही हिंदू "जबरा शिक्षा मिळाली त्यांना, असेच कापले पाहिजे ह्यांना" असे म्हणून गुजरात दंगलीचे समर्थन करतो तेव्हा मी त्याच्याशी रिलेट करु शकत नाही.
याच्याशी असहमत होण्याचा प्रश्नच येत नाही. पण हीच गोष्ट इतर दंगलींना देखील लागू होते हे पण लक्षात असावे. आणि स्वार्थाच्या क्रमाप्रमाणे माणसाची सहानुभूती आपल्या धर्मबांधवांकडेच असणार. बाकी हे "जबरा शिक्षा मिळाली त्यांना, असेच कापले पाहिजे ह्यांना" मात्र मी देखील ऐकलेले आहेम आणि त्यावेळेस माझी प्रतिक्रिया देखील WTF अशीच होती. याला एक्सप्लनेशन नाही, आणि नाहीच. परंतु त्याच वेळेस हे देखील तेव्हढेच खरे, की गुजरात दंगलीच्या वेळेस भले मोदींची सहानुभूती हिंदूंच्या बाजूने असेल (हे मी समजा वादासाठी मान्य केले) तरी देखील त्यांनी राजधर्म पाळला हे देखील खरे आहे. जाता जाता - तुम्ही ज्यांना भक्त म्हणताय, ते खरे तर फार पूर्वीपासून् भाजपासमर्थक होते/ आहेत. त्यांची संख्या देखील खूप होती. पण माध्यमे हातात नसणे, मध्यमवर्गीय असल्यामुळे पैसे नसणे, पांढरपेशे असल्यामुळे आंदोलने करण्याची कुवत नसणे. या गोष्टींमुळे या वर्गाला अनेक वर्षे आपले कोणीच ऐकत नाहीये असेच वाटत होते. आता त्यांच्या हातात समाजमाध्यमे आली आहेत, प्रस्थापित माध्यमे अजून देखील त्यांचे ऐकत नाहीत. ते आपल्याअपल्यात बोलतात. त्याला आता थांबवणे अशक्य आहे. ती मॅच्युरिटी भारतात काय, जगात कुठेही नाही. अन्यथा ट्रंप महाशय एव्हढे बोलून देखील त्यांना इतका पाठिंबा मिळाला नसता. (कदाचित अमेरिकेतही मिडिया हिलरींच्या बाजूने असेल. पण तो एका वेगळ्या धाग्याचा विषय आहे). तुम्ही त्या भक्तांना विरिध करून त्यांचेच महत्व वाढवताय, हे लक्षात आले तरी माझा हा मेगाबायटी प्रतिसाद संपन्न झाला असे समजेन.

In reply to by आनन्दा

उत्कृष्ट प्रतिसाद मोदी समर्थक व मोदी विरोधक ह्यांना २००२ चे काडीमात्र स्वारस्य नाही आहे. त्यांना १९८४ मध्ये नाही आहे इतकेच कशाला तामिळनाडू ची जनता श्रीलंकन सरकारने केलेल्या नरसंहारावर शुब्ध आहे मात्र उर्वरीत भारतीयांना त्याचे देणे घेणे नाही हे कडवे सत्य आहे कारण भारतीयांनी हिंसा दंगा धर्म जातीवर भांडण हे लहानपणापासून पाहिले आहे. आता त्यांना विकास भांडवलशाही चंगळवाद हवा आहे. ह्या देशात बीफ वरून हत्या हा राजकीय मुद्दा विरोधक बनवतात तेव्हा तामिळनाडू मध्ये नुकतेच उच्चवर्गीय पित्याने दलित जावयाला मारले तेही आधी तुला मारणार हे वारंवार सांगून तेथे भाजपचे अस्तित्त्व शून्य त्यामुळे हे प्रकरण भाजपवर शेकत येत नसल्याने ह्या मुद्याला राजकीय सोडा पण मुख्य पटलावर राजदीप सारखे आणत नाहीत

In reply to by तर्राट जोकर

बाप्रे ! विवेक ठाकूर - Sat, 12/03/2016 - 01:03 हे नरेंद्र भाई कोण ? सध्या ते कुठे असतात आणि काय करतात ? प्रतिसाद द्या कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू तर्राट जोकर - Sat, 12/03/2016 - 01:18 कुठल्यातरी ऑफिसमधे झाडू मारतांनाचा फोटो बघितला होता. तेच असतील ते. पण तो फोटोही फेक होता म्हणे त्यांच्यासारखाच. प्रतिसाद द्या
याचा अर्थ काय? बाबू बजरंगीच्या कृत्याचा निषेध कुणी केला नाही याचा अर्थ सगळ्यांचं त्याच्या कृत्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन आहे हा अर्थ कसा काय काढलात? तुम्ही त्याच्याशी relate करता हा निष्कर्ष कशावरून काढलाय? तुम्हालाही त्याने जे केले तेच करावे असे वाटले - हा निष्कर्ष कशावरून?
मला साबरमती एक्सप्रेसमधे बळी गेलेल्या निष्पाप जीवांबद्दलही तेवढीच काळजी आहे, त्यांना मारणार्‍यांबद्दल अतिव संताप आहे.
याचा उल्लेख एकदाही तुमच्या धाग्यात नाही, या शेवटच्या प्रतिक्रियेशिवाय. म्हणजे तुम्हाला गोध्र्यामध्ये मारल्या गेलेल्या लोकांबद्दल काहीही वाटत नाही - असा निष्कर्ष बाकीच्यांनी काढला पाहिजे - तुमचाच न्याय वापरून.
कोर्टाने त्यांना योग्य निर्णय देऊन शिक्षा केली आहे. त्या निर्णयाचे समर्थन आहे.
असाच विचार लोक बाबू बजरंगीबद्दल करत असतील असं तुम्हाला का वाटत नाही? तुम्ही ते बाबू बजरंगीच्या कृत्यांचं समर्थन करतात असं मानून मोकळे झालात.
आता माझे मत. जे नेहमीच न्यायालयासोबत राहिले आहे.
हे जर खरं असेल तर लोकांनी प्रतिक्रिया न दिल्याचा अर्थ लोक बाबू बजरंगीशी relate करतात आणि त्याच्या कृत्यांना त्याचा पाठिंबा आहे आणि समर्थन आहे असा काढू नका. न्यायालय पूर्वग्रहदूषित दृष्टीने चालत नाही. आपण जर न्यायालयाचा सन्मान करत असू तर आपणही पुराव्यांशिवाय निष्कर्ष काढणं सोडायला हवं.

In reply to by तर्राट जोकर

एकदम सहमत बाकी लेखकहो, लेख लिहून झाल्यावर वा त्याच्या प्रस्तावनेत तुम्हाला नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा अपेक्षित आहे ते लिहित चला (म्हणजे नंतर "भांडे लपवण्याचे" आरोप होत नाहीत)

तजो, मी तुमच्या वरील प्रतिसादाशी फारसा सहमत नाही. पण एक गोष्ट मात्र रोचक वाटली. >> मुस्लिमांच्या क्रौर्यांच्या कहान्या रंगवून रंगवून सांगणार्‍या बैठकींनी तुम्हाला त्यांच्या समकक्ष केले आहे. हे खरोखरंच झालं तर मुस्लिम क्रौर्य वाढेल की कमी होईल? आ.न., -गा.पै.

बर्‍याच अंशी सहमत.. पण जसं कोणत्याही राजकीय पक्षाला क्लीन चीट देउन प्रत्येक वेळा पाठीशी घालता येत नाही तसचं.. न्यायालयांनादेखिल क्लीन चीट देणं कठीण वाटतं कधी कधी.. शेवटी तीदेखिल माणसचं असतात.. कधी कधी निष्पक्ष कधी तर सत्ताधार्‍यांच्या प्रभावाखाली .. पण शेवटी न्यायालयाचा निर्णय अंतिम मानणे सिस्टीम टिकवण्यासाठी अनिवार्य आहे. पण सिस्टीम सुधारण्यासाठी त्यावर देखिल चर्चा आवश्यक आहे. जसं खेळात सामना चालू असताना पंचांचा निर्णय अंतिमच पण नंतर तो कसा जास्त न्याय्य होउ शकेल यासाठी चर्चा हवी.. पण तिथेदेखिल माझ्याविरुद्ध गेलेलेच निर्णय कसे चुकले याऐवजी कींवा माझ्याविरुद्धच कसे जास्त निर्णय गेले याऐवजी एकूण निर्णायात चुका किती याचे निराकरण नि:पक्षपातीपणे होण्यासाठी तारत्म्य हवे.

प्रश्न आपण तजो ह्यांना विचारला आहात तरी मधे बोलल्या बद्दल आगाऊ माफ़ी मागत एक सांगू इच्छितो, आपण विचारलेत की हे खरोखरंच झालं तर मुस्लिम क्रौर्य वाढेल की कमी होईल? तर मुस्लिम क्रौर्य कमी होईल का ते माहीती नाही, हिंदु क्रौर्य म्हणजे काट्याने काटा असेल का ते ही माहीती नाही, हे ही माहीती नाही कारण मी समजशास्त्रज्ञ नाही अन मला त्यात विशेष गती ही नाही तरीही "An eye for an eye makes the whole whole world blind" हे एका महान (आमच्यालेखी) असलेल्या *विभूती चे वचन आठवले.अधिक काय बोलणार *नाव मुद्दाम घेत नाही कारण वाचणारे किमान सुज्ञ आहेतच अन ती विभूती बऱ्याच लोकांस त्याज्य आहे धन्यवाद.

In reply to by नाना स्कॉच

स्कॉचनाना, तुमच्या त्या विभूतीस मुस्लिमांची हिंसा मान्य होती. पण हिंदूंनी जर्रा डोळे वटारले की यांचा थयथयाट सुरू होत असे. अशा विभूतीच्या फडतूस समाधानासाठी हिंदूंनी आपला जीव गमवावा का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

असो! गैरसमज भरपुर आहेत तुमचे, इथे नवा विषय नको, नंतर विषयानुरूप बोलता येईल, आभारी नाना

In reply to by अप्पा जोगळेकर

फार फार मनातुन अनुमोदन!! कंटाळा येत नाही का? सगळीकडे एकच एक विषय बोलुन बोलुन...

In reply to by बोका-ए-आझम

पहिल्या पानावर निम्मे धागे चिखलफेकीचेच असतात, आणी तेच जाणकार आणी तेच मुद्दे आणी त्याच मारामार्‍या ! ह्यासाठी वेगळे दालनच उघडुन दिले तर !

In reply to by बेकार तरुण

बेत, धुळवडीसाठी वेगळं मैदान आखून दिलं जात नाही. लोकांना सार्वजनिक ठिकाणीच ती खेळायला आवडते. आ.न., -गा.पै.

In reply to by पिलीयन रायडर

अगदि सह्मत... आज काल फारच कंटाळा येतो या असल्या useless ani hopeless धाग्यांचा आणि प्रतिसादांचा तेच ते मोदि/कॉंग्रेस/ब्रिगेड/हिंदू/मुस्लिम/ब्राह्मण/.....(दादा/फुजी/नाना/हितेश/तजो). बाकीचे जाऊदे, पण मिपा वर अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट लेख लिहिणारे कशाला अश्या फालतू धाग्यांना footage देतात. असल्या काथ्याकुटातून कुठलच conclusion निघालेलं नाही आणि निघत नाही, पण चर्चा भलतीकडेच भटकते. असले धागे वाचून खुपचं negative वाटत.... ह्म्म्म.........

आगा 100 झाले की, त्यानिमीत्त सर्वांना 'बजरंगी भाईजान' चित्रपटाचे मॅटिनी पास* देऊन सत्कार करण्यात येत आहे.. -शुभच्छुक-जेपी आणी मॅटिनी शो प्रेमी कार्यकर्ते.. *पासच ब्लॅक करु नये..

In reply to by जेपी

खिक... तुम्ही नेमकं सावज टिपून ठेवता कि काय? 49,99 प्रतिसाद कि एकदम झडप घालून सत्कार करून रिकामे होता.:'( . . "वास्तविकतेशी प्रांजळपणाची भेट" पार्ट 4 कधी येणार काथ्याकूटक्यांनो??

In reply to by प्रदीप साळुंखे

"वास्तविकतेशी प्रांजळपणाची भेट" पार्ट 4 कधी येणार काथ्याकूटक्यांनो?? >> आता कोणाचा नंबर? १९८४ बद्दल कोणाचा स्टिंग, मुलाखत आहे का? पार्ट ५ वाल्यांनी आणीबाणी तयार ठेवा. असे करत करत पार्ट ७८३४८९ हा १९ लाख वर्षांआधी रिवत (का रायवत?) इथं झालेल्या होमो सेपियन्सच्या आक्रमणाचाही असू देत. तेवढंच घासकडवी सरांना पुरक लेखमाला होईल आणि हेही कळेलः माणूस कधीच, कशानेच बदलत नाही. भांडणाची कारणे आणि मारामारीची साधने बदलतात. भांडण करण्याची खुमखुमी काही बदलत नाही.

"आनंदा" यांच्या प्रतिसादासाठी हा धागा वाचनखूण केला आहे. बाकी इथले बरेच मिपाकर हे न्यायालयाच्या आणि संसदेच्या, घटनेच्याही,देशहिताच्या बरेच वर आहेत. आणि त्या बद्दल मिपाकरांनी अभिमान बाळगला पाहिजे (अमेरिका,इंग्लड इथेच मार खातात). स्वतंत्र धुळवड विभाग झालाच पाहिजे. नुरा कुस्तीला वैतागलेला नाखु

बरेच लोक राजकिय चर्चांच्या नावाने बोटे मोडतात, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल नाकं मुरडतात. त्यांना ते वाचल्याशिवाय समजत असेल काय? जर वाचण्याची आवड व गरज वाटते तर मग इथे अशा राजकिय चर्चा-प्रतिसादांबद्दल नाकं का मुरडतात? मला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)

ला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)
अगदी अगदी.. मोदींना मध्ये आणून धुरळा उडवायचा आणि नंतर मोदींचा काय संबंध म्हणून आरडओरडा करायचा,असा वाटतो. http://www.misalpav.com/comment/816617#comment-816617

In reply to by चेक आणि मेट

आणि वरून फोलपणा मान्य करायचा नाही ' ' श्री श्री हट्टयोगी बाबा प्रसन्न

हीच पध्दत असेल तर याला दोन बाजु आहेत. १. माजी पंतप्रधान कै. राजिव गांधी शिखांच्या हत्ये संदर्भात काय म्हणाले. २. त्या ह्त्याकांडाचे संशयीत आरोपी ज्यांच्यावर कधीच खटला चालला नाही यांचे काय म्हणणे आहे. ३. ह्या संदर्भात आणखी काही