Skip to main content

कंटाळा आल्यावर काय करावे ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 11/03/2016 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
कंटाळा आल्यावर काय करावे ? ऑफीसात बसुन कंटाळा आल्यावर काय करावे हा एक गहन प्रश्न आहे. ऑफिसात इतर साईट उघडणे धोकादायक ठरु शकते . ( मिसळपाव आजवर कसे बॅन झाले नाही हेच आश्चर्य आहे. ) शिवाय सारखे सारखे काँपुटर पाहुन डोळ्यांना त्रास होतो. मग क्यॅन्टीन मधे गेलो तरी तिथे ही डोळ्यांना त्रास होतो शिवाय विनाकारण चहा कॉफी पिली जाते , तातुन एक्स्ट्रा सुगर कन्झुम केली जाते त्याने त्रास होतो तो निराळाच. क्यॅरम खेळत बसलो कि ज्युनियर वर राँग इम्प्रेशन पडते . मेन लॉबीत पेपर वाचत बसलो तर समोरची रिशेस्पशनिस्ट 'काय काम नाही का आज' ह्या अविर्भावात बघत रहाते. बरं ऑफीसातुन बाहेर पडुन चहा सिगरेट मारावी तर बाहेर उन्हाळा सुरु झाल्याने परत त्याचा त्रास होतो. अशावेळी ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ? ---- अवांतरः जास्त लिव्हवत नाही , लिहायचा कंटाळा आला .

वाचने 19912
प्रतिक्रिया 81

प्रतिक्रिया

In reply to by जव्हेरगंज

बेक्कार हस्लो या आयडियांना! "प्रतेक्ष अन्भव हीच खातरी" या धर्तीवर ऑफिसात गेल्या गेल्या हे क्रून पाहिल्या जाईल! =)) Sandy

अत्यंत स्लो प्रोसेस आहे ही पण वेळ मस्त जाईल. स्वतः च्या आत डोकावून पहा ... अहंकारावर विजय मिळवा.

देवाला बोर झालं म्हणून त्याने माणुस बनिवला अन त्यों अन माणूस पुन्हा बोर होउ लागले तवा त्याने इस्त्री बनीवली पण हायला ते तिघेबी ब्वारच होउ र्हाय्ले अन बाइमान्साने मुलं जन्माला घातली तर तिबी ब्वार होउन आख्खा संसार जन्माला आला तुमि आम्ही जन्मलो अन तेव्हांपासुन तुम्ही आम्ही अन देव अजुनही ब्वार होतच आहोत यावर कोणताही उपाय नाय :(:(

खूप मिपाकर हिंजवडीतले (म्हणजे हिंजवडीतील कार्यालयांत काम्/टीपी करणारे) दिसतात. एक धावता हिंजवडी कट्टा होवू शकतो...काय म्हणता ?

प्रश्न :-ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ? उत्तर:- सोप्पये, टाईम पास करावा.

ज्या ज्या गोष्टींचा कंटाळा आला आहे त्या त्या गोष्टींचे पहिल्या १० सेकंदांचे काम करावे. म्हणजे पेपर वाचायचा कंटाळा आला असेल तर १० सेकंद पेपर वाचावा.