✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कंटाळा आल्यावर काय करावे ?

प
प्रसाद गोडबोले यांनी
Fri, 03/11/2016 - 14:31  ·  लेख
लेख
कंटाळा आल्यावर काय करावे ? ऑफीसात बसुन कंटाळा आल्यावर काय करावे हा एक गहन प्रश्न आहे. ऑफिसात इतर साईट उघडणे धोकादायक ठरु शकते . ( मिसळपाव आजवर कसे बॅन झाले नाही हेच आश्चर्य आहे. ) शिवाय सारखे सारखे काँपुटर पाहुन डोळ्यांना त्रास होतो. मग क्यॅन्टीन मधे गेलो तरी तिथे ही डोळ्यांना त्रास होतो शिवाय विनाकारण चहा कॉफी पिली जाते , तातुन एक्स्ट्रा सुगर कन्झुम केली जाते त्याने त्रास होतो तो निराळाच. क्यॅरम खेळत बसलो कि ज्युनियर वर राँग इम्प्रेशन पडते . मेन लॉबीत पेपर वाचत बसलो तर समोरची रिशेस्पशनिस्ट 'काय काम नाही का आज' ह्या अविर्भावात बघत रहाते. बरं ऑफीसातुन बाहेर पडुन चहा सिगरेट मारावी तर बाहेर उन्हाळा सुरु झाल्याने परत त्याचा त्रास होतो. अशावेळी ऑफीसात कंटाळा आल्यावर काय करावे ? ---- अवांतरः जास्त लिव्हवत नाही , लिहायचा कंटाळा आला .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19862 वाचन

💬 प्रतिसाद (81)

प्रतिक्रिया

हापिसातल्या हिरवळीवर लक्ष

सतिश पाटील
Fri, 03/11/2016 - 14:35 नवीन
हापिसातल्या हिरवळीवर लक्ष ठुवा.डोळे गार हुतील. त्यांना च्या कॉपीला इचारा.
  • Log in or register to post comments

ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 14:52 नवीन
ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट करायचे नाही असा आमचा एक सोपा नियम आहे आणि ह्या नियमामुळे हा ऑप्शन कटाप होतो :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश पाटील

बहुतेक सगळेच जण हा नियम पाळत

अभ्या..
Fri, 03/11/2016 - 14:57 नवीन
बहुतेक सगळेच जण हा नियम पाळत असल्याने तुमचा टाइमपास होत नसावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सगळेच नाहीत पाळत ... हळुच

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 15:06 नवीन
सगळेच नाहीत पाळत ... हळुच गुपचुप ऑफीसातुन बाहेर पडौन समोरच्या सी सी डी मध्ये जाणारी प्रेमपाखरे ( मराठीत लव्हबर्ड्स) पाहिली की आम्हाला आमच्या ह्या नियमाचा लय राग येतो , पण करणार काय , नियम तो नियम ! ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट

प्रसाद१९७१
Fri, 03/11/2016 - 16:17 नवीन
ऑफीसात ज्युनियरशी फ्लर्ट करायचे नाही असा आमचा एक सोपा नियम आहे
मग सिनियर्स शी फ्लर्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

मंग त्यांना शिनियर शी फ्लर्ट

sagarpdy
Fri, 03/11/2016 - 16:56 नवीन
मंग त्यांना शिनियर शी फ्लर्ट करायला उत्तेजित करा :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ह्म्म ...

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 17:38 नवीन
ह्म्म ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

बाबौ !

सस्नेह
Fri, 03/11/2016 - 14:38 नवीन
या वरच्या कामांसाठी तुमाला हापिसात पगार मिळतो ??? ग्रेट !
  • Log in or register to post comments

विषयांतर होतंय पण तरीसुद्धा -

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 03/11/2016 - 15:50 नवीन
विषयांतर होतंय पण तरीसुद्धा - आय टी (किवा परकीय चलन आणणाऱ्या कुठल्याही व्यवसाय) तल्या नोकरीतला पगार हा तिथे केलेल्या कामाचा 'मोबदला' आहे असा तुमचा समाज असेल तर तो चुकीचा आहे. काम असेल तेवा पगाराच्या दसपट असते आणि नसेल तेवा 'उद्योगी' डोक्याला लगाम घालावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सरांचे धागे वाचुन

होबासराव
Fri, 03/11/2016 - 14:48 नवीन
निराकारता कशि साध्य होइल हे बघावे, एकदा का तुम्हाला स्व गवसला कि मग "आनंदाचे डोहि आनंद तरंग" चा प्रत्यय येइल आणि मग कसला कंटाळा अन कसल काय.
  • Log in or register to post comments

मर्द बननेका इतना शौक है तो

अभ्या..
Fri, 03/11/2016 - 14:51 नवीन
मर्द बननेका इतना शौक है तो कुत्तोंका सहारा लेना छोड दे कात्या . . . . . असले १५-२० क्रियेटीव्ह डॉयलॉग एका कागदावर लिहून ते फाइल करावेत. छान वेळ जातो. कुणाला उद्देशून लिव्हायचे याचा गंभीर विचार केल्यास जास्त टाइमपास होतो. अजून ३५ हजार आयडीया आहेत. देईन वेळ मिळाल्यास. (आम्हाला बसून पगार मिळत नाही. जळजळ वगैरे म्हणनार्‍यांनी वाकड फाटा गाठावा)
  • Log in or register to post comments

लिहायचाही कंटाळा आलाय अभ्या

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 14:57 नवीन
लिहायचाही कंटाळा आलाय अभ्या राव नाहीतर आम्हीही चतु:शृंगीच्या मदीरात गुद्दे अन चिमकुटे वगैरे लिहित बसलो असतो कि !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फोन अलाउड असेल तर

अभ्या..
Fri, 03/11/2016 - 15:13 नवीन
फोन अलाउड असेल तर टेलिमार्केटींगची कामे घ्यावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कशाला ???

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/11/2016 - 18:16 नवीन
कशाला ??? त्यापेक्षा 4/5 टनाटनी ग्रन्थ घेऊन त्याचे उपयुक्त अन्वयार्थ लावत बसा तेव्हढाच होईल त्या निमित्तानि मुलातल्या घुबडाचा ससा! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ओकेच की

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 18:19 नवीन
म्हणजे गणु चा ससा होईल आणि सरु चे काय ? कासव???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या! ते टुमचं कपटी

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/11/2016 - 18:31 नवीन
ह्या ह्या! ते टुमचं कपटी हिन्दू औरँगजेबी मण काहिहि करु शकेल याची ग्यारेन्टी हायेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

पण कासवच केलेले बरे म्हणजे

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 18:33 नवीन
पण कासवच केलेले बरे म्हणजे त्यांच्यात शर्यत लावता येईल : (गणु)ससा तो ससा की कापुस जसा, त्याने (सरु)कासवाशी पैज लाविली वेगे वेगे धावु अन (चतु:शृंगी)डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हो रे गिर्जाकाका, स्वघोषित

सूड
Fri, 03/11/2016 - 19:21 नवीन
हो रे गिर्जाकाका, स्वघोषित धर्मसुधारक होण्यापेक्षा हे असलं बरं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

कंटाळा

मन१
Fri, 03/11/2016 - 14:55 नवीन
हे आमचं कंटाळ्याबद्दलचं काही :- http://www.misalpav.com/node/26923
  • Log in or register to post comments

केन्डी क्रश खेळावे

अनुप७१८१
Fri, 03/11/2016 - 14:58 नवीन
केन्डी क्रश खेळावे
  • Log in or register to post comments

क्यँन्डीक्रश खेळुन संपवले :(

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 14:58 नवीन
क्यँन्डीक्रश खेळुन संपवले :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप७१८१

अवर्‍या क्यांड्या खाल्यात!

वेल्लाभट
Fri, 03/11/2016 - 15:29 नवीन
अवर्‍या क्यांड्या खाल्यात! बाब्बो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काये क्यान्डी क्रश ?

नीलमोहर
Fri, 03/11/2016 - 16:00 नवीन
मला पण आवडतं क्यांड्या खायला, पण आईसवाल्या.. त्यापेक्षा देऊळी धावायला जास्त आवडतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

मीटिंग. सगळे कंटाळलेले /

नाव आडनाव
Fri, 03/11/2016 - 14:58 नवीन
मीटिंग. सगळे कंटाळलेले / झोपाळलेले / वैतागलेले तिथेच असतात :)
  • Log in or register to post comments

उगाच इकडे तिकडे हिंडून

प्रचेतस
Fri, 03/11/2016 - 15:01 नवीन
उगाच इकडे तिकडे हिंडून लोकांना 'ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊउ' करून यावे.
  • Log in or register to post comments

तुमचे ऑफीस शेजारीच आहे , एकदा

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 15:07 नवीन
तुमचे ऑफीस शेजारीच आहे , एकदा तुमच्या ऑफीसात घुसुन तुम्हालाच ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ करायचा मानस आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आणी

नाखु
Fri, 03/11/2016 - 15:12 नवीन
जाग्यावर आल्यावर काय करावे ब्रे..... तुम्ही कंटाळा आल्यावर काय करता ? असा काकु टाकल्यास काही "हाती" गवसेल असे वाटते अन्यथा सगळ्या मनच्या बाता काय ?????. रच्याकाने : एखादे कंटाळामुक्ती स्त्रोत्र, गेलाबाजार तुष्टीयज्ञ का करवून घेत नाहीस हाफीसात, तुझ्यासारखे समदु:ख्खी असतीलच की तेव्हढंच वाढीव पुण्य !!!! वरील प्रतिसादात अनुक्रमे काकु म्हणजे:काथ्याकुट हाती म्हणजे :अंतीम सत्य मन म्हणजे आयडी नव्हे वाढीव म्हणजे अतिरिक्त्/जास्तीचा. कुठलीही अस्मिता दुखावू नये म्हणून बाळबोध नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

उगाच इकडे तिकडे हिंडून

स्पा
Fri, 03/11/2016 - 15:50 नवीन
उगाच इकडे तिकडे हिंडून लोकांना 'ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊउ' करून यावे.
=))ख्याक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

लोल. रोफ्ल. :))

यसवायजी
Fri, 03/11/2016 - 16:48 नवीन
लोल. रोफ्ल. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

=)) खपलो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/11/2016 - 19:13 नवीन
=)) खपलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरेरे !!

नीलमोहर
Fri, 03/11/2016 - 15:01 नवीन
तुम्हाला हापिसात खालील आणि इतरही सोयी उपलब्ध आहेत, तरीही म्हणता कंटाळा घालवायची सोय नाही. १. तुम्ही कॅन्टीनमध्ये जाऊ शकता २. कॅरम खेळू शकता ३. पेपर वाचू शकता ४. ऑफिसच्या वेळेत बाहेर चक्कर मारून येऊ शकता. ज्या लोकांना आपली खुर्ची आणि पीसी सोडून इतर काही करण्याची सोय नाही त्यांनी काय म्हणावे. बादवे बाकी सर्व आहे तुमच्याकडे मग आरामात ताणून देण्याचीही सोय असेल, लोळायचं मस्त.. अशावेळेस मी तंद्री लावून डे-ड्रिमींग मध्ये हरवून जाते.. physically present mentally absent.. मज्जा येते :)
  • Log in or register to post comments

डे-ड्रिमींग

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 15:04 नवीन
डे-ड्रिमींग >>> अरेरे , आता काय सांगु नीमो , ऑफीसात चांगली स्वप्ने पडत नाहीत , केवळ शोकांतिकाच दिसतात स्वप्नात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

अर्थात..

नीलमोहर
Fri, 03/11/2016 - 15:45 नवीन
तुमचा तुमच्या मनावर ताबा नाही, तुम्हास 'स्व' गवसलेला नाही. स्व गवसलेल्या माणसाचे विचार असे यत्र तत्र भरकटत नाहीत, तो भरकटलेलं मन आणि विचार एकसंध करून, ठाम निश्चय आणि ध्यान प्रक्रियेद्वारे आपल्याला पहिजे तशी 'गो ड गो ड' स्वप्नं अंतः चक्षूंद्वारे थेट प्रक्षेपण करून पाहू शकतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

एक करा

नाखु
Fri, 03/11/2016 - 15:47 नवीन

ऑफीसात चांगली स्वप्ने पडत नाहीत , केवळ शोकांतिकाच दिसतात स्वप्नात :(

म्हणून लगेच हाफीस बदलू नका जरा धीर धरा अच्छे दिन येतील तुमचेही लवकरच !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

धागे काढायचे.

एस
Fri, 03/11/2016 - 15:12 नवीन
धागे काढायचे.
  • Log in or register to post comments

खिडकीतून दिसणाऱ्या ब्लुरीज

गणामास्तर
Fri, 03/11/2016 - 15:13 नवीन
खिडकीतून दिसणाऱ्या ब्लुरीज मधल्या इमारतींचे मजले मोजा. चांगला टाईमपास होतो :)
  • Log in or register to post comments

झाले मोजुन :( २२ की २४ मजले

प्रसाद गोडबोले
Fri, 03/11/2016 - 17:41 नवीन
झाले मोजुन :( २२ की २४ मजले आहेत . त्यातल्या एकेका घराची किंमत ९० लाख ते २-३ कोटीच्या घरात आहे आणि तरीही लोकं ते विकत घेवु शकतात , आपण कधी घेवु शकणार ह्या विचाराने आम्हाला फार गहिवरुन येते ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

सुंदर चेहरे नाहीत का आसपास?

गवि
Fri, 03/11/2016 - 15:19 नवीन
सुंदर चेहरे नाहीत का आसपास? असल्यास त्राटक आणि नसल्यास भश्रिका आणि कपालभाती करावी.
  • Log in or register to post comments

एक चेहरे पे कयी चेहरे लगा लेते है लोग...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 03/11/2016 - 19:20 नवीन
सुन्दर चेहरे आपपाल्या मित्रांना फोन करून 'अरे ऑफिसात लै कंटाळा आला रे, नोकरी सोडून दूर कुठेतरी जावं असं वाटतं रे, अगदी तुझ्यासोबत सुद्धा बोलावं वाटत नाही रे, जग सोडून दुस-या ग्रहावर जावं, निर्जन बेटावर जावं, मी थोड़ा वेळ शांत बसते असं म्हणून फोन ठेवतात. म्हणजे मित्राने यांना लगेच फोन करावा म्हणून ते सुन्दर चेहरे नाटकं रचत असतात. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

प्रा.डॉ. सर

होबासराव
Fri, 03/11/2016 - 19:34 नवीन
आमच्या हापिसातले काहि सुन्दर चेहरे कॉल करुन बोलायचि एव्हढि तसदि घेत नाहित्...ते फक्त मिस कॉल देतात आपपाल्या मित्रांना....बास मग २ तास काहि घोर नाहि ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा ओपन होतं म्हणता आणी तरी

बेकार तरुण
Fri, 03/11/2016 - 15:20 नवीन
मिपा ओपन होतं म्हणता आणी तरी कंटाळा येतो हेही म्हणता ! ऐकावं ते नवलच !!
  • Log in or register to post comments

बरेच उपाय आहेत करण्यासारखे

अजया
Fri, 03/11/2016 - 15:29 नवीन
बरेच उपाय आहेत करण्यासारखे रिकाम्या वेळात एकादष्ण्या सांगत जाणे नवीन आलेल्या पात्रांना हात बघून भविष्य सांगणे(जास्त वेळ धरु नये अवलक्षण कॅटेगरीत जाल) उगाच राग येतो अशा लोकांना खडू मारून हैराण करणे घरची भाजी हापिसात नेऊन निवडणे लोकरीचे बूट मोजे विणणे आणि लोकांना घालून दाखवणे कलिंगड कापण्याचे सुशोभित नमुने तयार करणे ब्रेक अप झालेल्यांना होलसेलमध्ये टिशु पेपर पुरवणे डु आय डी घेऊन हापिसातल्या लोकांना मयतरी करणार का मेल करणे नमाजसाठी टोप्या विणून विकून औरंगजेबपणा करणे
  • Log in or register to post comments

धागे काढा...

वेल्लाभट
Fri, 03/11/2016 - 15:30 नवीन
धागे काढा... साहित्याचे किंवा मग रुमालाचे, मोज्याचे वगैरे.
  • Log in or register to post comments

अर्रर्रर..

नीलमोहर
Fri, 03/11/2016 - 15:49 नवीन
ते बसून मोज्याचा एकेक धागा काढताहेत असे इमॅजिन केले ना मी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

ते बसून मोज्याचा एकेक धागा

अभ्या..
Fri, 03/11/2016 - 15:50 नवीन
ते बसून मोज्याचा एकेक धागा काढताहेत असे इमॅजिन केले ना मी ;)
एक राँबर्ट, एक काळी मावशी, एक मेरी, एक लॅब्ररी अजून काय काय असे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

राँर्बट आहे ते

राजो
Fri, 03/11/2016 - 16:06 नवीन
राँर्बट आहे ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बरोबर लिहिले तर मोजी माझा

अभ्या..
Fri, 03/11/2016 - 16:11 नवीन
बरोबर लिहिले तर मोजी माझा डूआयडी आहे म्हणायला कमी करणार नाहीत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजो

किंवा मग धागे विणायला शिका..

सूड
Fri, 03/11/2016 - 15:50 नवीन
किंवा मग धागे विणायला शिका...क्रोशा, दोन सुयांवरचं, तीन सुयांवरचं विणकाम =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

एक उलट दोन सुलट

वेल्लाभट
Fri, 03/11/2016 - 18:21 नवीन
एक उलट दोन सुलट मग दोन सुलट तीन उलट फुल कन्फ्हूज्झ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

करियर ला सपोर्ट करतील असा

स्पा
Fri, 03/11/2016 - 15:52 नवीन
करियर ला सपोर्ट करतील असा काही अभ्यास करावा , तुतोरीअल्स बघाव्यात. एरवी वेळ मिळत नाही, पण हा वेळ उगाच वाया घालवू नये
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा