Skip to main content

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 05/03/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 70244
प्रतिक्रिया 362

प्रतिक्रिया

भाषण एक नंबर ! शंभर तोफंची सलामी !! Modi ji Your PM of entire nation , not of RSS ideology क्या बात है!! :) आज पर्यंत फक्त क्रांति, मार्क्स, चेग्वेरा, लेनिन, विधार्थी आंदोलने या बद्दल फक्त ऐकून होतो, काल तोच जोश कन्हैया मधे दिसत होता. #भावा_फुल्ल_सप्पोर्ट

In reply to by कट्टापा

पहिल्यांदा तुमी बिचार्‍या सज्जन बाहुबलीला का मारलंत ते सांगा ! मग तुमचं कायबी ऐकायला तयार हौत :) ;)

वेगळा विचार वगैरे काही नाही. ही असलीच भाषणं डावे पक्ष अनेक वर्ष देत आहेत. गरीबी हटाओ, मनुवाद हाय हाय वगैरे वगैरे. यात नवं काहीच नाही. मोदी/भाजपा विरोधी लोकांना कोणीतरी रॅलिंग पॉईंट मिळाला म्हणून सगळे टाळ्या पिटतायत. पण तुरुंगात जाउन आल्यावर भारत की बरबादी होगी, भारत तेरे टुक्डे होंगे वगैरे घोषणा चूक होत्या, संविधानात/ न्याय व्यवस्थेत माझा विश्वास आहे ही उपरती झाली हेही नसे थोडके.

टार्गेट कितीचं आहे,नाही ते अश्या साठी कि जरा धुरळा खाली बसला कि काही लोक जोरात गाड्या घेऊन जातात ना हो।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

धुराळाच आहे तो, त्यामुळे कधीतरी खाली बसणारच... तरी पण जितका जास्त धुराळा, तितकी जास्त धुळफेक असे शिंपल मॅथ आहे.

In reply to by तर्राट जोकर

सहमतीबद्दल आभार. धुराळा - आझादी च्या आणि सरकार विरोधी बोंबा. अथवा अ‍ॅवार्ड वापसी-लीला.. धुळफेक - सरकार म्हणजे वाईटच, हिंदू म्हणजे सगळे अंधश्रद्धा, वगैरे वगैरे.

कन्हैया कुमारला 6 महिन्यांसाठी अंतरिम जामीन मिळाला. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला, ती एक न्यायालयीन प्रक्रिया आहे. जामीनाबाबत न्यायालयाची दिशा अतिशय स्पष्ट असते. त्यानुसार जामीन मिळणार हे काही वेगळं नव्हतं. अगदी कन्हैया ची केस कपिल सिब्बलच काय पण कोणीही लढली, असती तरी तो मिळणारच होता. पण उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आदेशात ज्या गोष्टी नमूद केल्या त्याचा विचार ही करणे अतिशय आवश्यक आहे. - आदेशाच्या परिच्छेद 39 मध्ये न्यायमूर्ती म्हणतात कि, यातील जामीन अर्जदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की ते हे जे स्वतंत्र उपभोगत आहेत ते केवळ सीमेवर सैन्य रक्षा करण्यासाठी आहे म्हणून. -परिच्छेद 41:- अफजलगुरु आणि मकबूल भट्ट च्या नावाने युनिवर्सिटी कॅम्पस च्या सेफ वातावरणात जे लोक घोषणा देत होते, त्यांना हे स्वतंत्र मिळत आहे ते केवळ आपल्या सैन्यामुळेच, जे सैन्य प्राणवायूचा कामतरतेमध्ये ही संरक्षण करत आहेत. देश विरोधी घोषणा देणारे तिथे तासभरही थांबू शकणार नाहीत. -परिच्छेद 42:- अशा घोषणांमुळे, शहिदांच्या परिवाराचे खच्चीकरण होते आहे. -परिच्छेद 43:- जामीन अर्जदार (कन्हैया) घटनेच्या आर्टिकल 19-1- a अंतर्गत बोलण्याचे स्वातंत्र्य मागत आहे, त्याने हे ही लक्षात ठेवावे की घटनेच्या आर्टिकल 51 A मध्ये नागरिकांच्या जबाबदाऱ्या (fundamental duties) सांगितल्या आहेत. यापुढे जाऊन मा. न्यायमूर्ती असेही म्हणतात कि, JNU मध्ये अशाप्रकारचा प्रोग्रॅम घेणारे व देश विरोधी घोषणा देणाऱ्यांना fundamental right to freedom of speech and expression अंतर्गत संरक्षण मागता येणार नाही. हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे, असा साथीचा रोग झालेल्या विद्यार्थ्यांचा हा रोग काबूत ठेवला पाहिजे/ दूर केला पाहिजे. हा रोग पसारण्यापूर्वीच antibiotics दिले पाहिजे, आणि त्याचा उपयोग होत नसेल तर शस्त्रक्रिया ही करावी लागेल. गँगरिन झाल्यास तो भाग कापून काढावा लागेल. दिल्ली उच्च न्यायालयाचा रोख स्पष्ट आहे. जामीन मिळाला म्हणून कुणी खुश होण्याची गरज नाही. आणि कुणी न्यायालयाला नावे ठेवण्याची पण गरज नाही. ©आदित्य रुईकर, Advocate.

In reply to by तर्राट जोकर

Trial by media मध्ये काय वेगळं होत असतं? ते अधिकार नसताना निर्णय देऊन मोकळे होतात. इथे न्यायालयाला अधिकार तरी आहेत. रच्याकने आपलं त्या अभाविपवरचं बोलणं अर्धवट राहिलंय. खरडवहीत लिहू का?

कन्हैया कुमार ला पुढील राजकीय वाटचालिसाठी शुभेच्छा. तो PM होईल असं नाही वाटत. पण मोदी होतील असं तरी कुठे वाटलं होतं? (सर्वच डाव्यांप्रमाणे) आक्रस्ताळी स्वभाव वाटतो त्याचा ( हल्ली आक्रस्ताळी नेते सर्वच पक्षात सापड़तात हे ही खरं). आपणच या देशाचे तारणहार (या शब्दातील हार तेवढी खरी) आहोत हा अशांचा पक्का (चुकीचा) समज.

जे एन यु चे रजिस्ट्रार म्हणतात की काही विद्यार्थ्यांनी अफजल च्या स्मृती दिना दिवशी मेळावा इ. परवानगी ( जे एन यु ) परिसरात मागीतली होती जी रजिस्ट्रार यांनी नाकारली. यावर कनैह्या ह्यांनी अध्यक्ष म्हणुन विरोध प्रकट केल्याचा पुरावा आहे. आज ही बातमी दुरदर्शनच्या एन डी टी व्ही वर प्रसिध्द झाली आहे. वास्तवीक विद्यार्थी त्यांच्या संदर्भातल्या पॉलीसीचा विरोध विद्यापीठ आवारात करत असतील तर गैर नाही पण राजकीय आणि गुन्हा सिध्द होऊन फाशी झालेल्या माणसाचे गोडवे गाण्यासाठी परवानगी मागत असतील तर गैर आहे. परवानगी नाकारल्यावर निदर्शने / मेळावा घेतल्याचे सिध्द झाल्यास यांना जे एन यु मधुन हाकलणे योग्य ठरावे.

In reply to by विवेक ठाकूर

मी देतो. ही घ्या लिंक. हा संदर्भ असणार्‍या अजून बर्‍याच लिंक्स आहेत. http://www.newindianexpress.com/nation/Kanhaiya-Had-Objected-to-Cancell… Kanhaiya Had Objected to Cancellation of Permission for Afzal Guru Event: JNU Registrar NEW DELHI: JNUSU president Kanhaiya Kumar had objected to cancellation of permission for the controversial event against hanging of Parliament attack convict Afzal Guru, JNU Registrar Bhupinder Zutshi has claimed. Around 3 pm, we had a discussion on the bus route. After 10 minutes, Saurav Sharma (ABVP member and JNSU joint secretary) also came. We all discussed the bus route for 10 minutes. "Sharma later showed me a pamphlet regarding the 'cultural event' on 'judicial killing of Afzal Guru' and said some of the students are organising this event today (February 9, 2016) at 5 pm at Sabarmati Dhaba," Zutshi has told the committee. The Registrar has further maintained that when the varsity decided to withdraw the permission, Kanhaiya had called him objecting to the cancellation.

In reply to by विवेक ठाकूर

केवळ हीच एक चूक नाही तर भूतकाळात झालेल्या अनेक सभांच्या पत्रकांच्या ज्या प्रती इराणींनी त्याच्या लोकसभेच्या भाषणात पुरावा म्हणून दाखवल्या होत्या त्याही विद्यापिठाच्या रेकॉर्ड्प्रमाणे सत्य आहेत हे सुद्धा रजिस्ट्रारने लेखी उत्तराने कळवले आहे ! त्या सर्व पत्रकांत देशविरोधी काय काय लिहीले होते हे कळण्यासाठी व ते पुरावे का सबळ होते (जे आता परत एकदा सिद्ध झाले आहे) हे माझ्या त्यासंबधीच्या धाग्यातील चित्रफीत परत पाहिल्यास कळेल ! जनेविमधे हे सगळे इतका काळ चालले असताना जर कन्हैय्या म्हणतो तसे "त्याला काहीच माहीत नाही" किंवा "त्याचा या सगळ्याला पाठींबा नसतानाही त्याने विद्यार्थी संघटनेचा सर्वोच्च नेता या नात्याने काही केले नाही/करण्याची क्षमता दाखली नाही"... तर मग तो कोणत्या लायकीचा नेता आहे ? आणि जर त्याने देशद्रोही कारवायांकडे हेतूपुर्स्सर दुर्लक्ष केले असेल तर मग त्याची देशद्रोह्यांबरोबर हातमिळवणी आहे असे म्हटले तर काय चुकले ? सत्य हेच आहे की अश्या देशविरोधी कारवाया फार पूर्वीपासून जनेवित चालत आलेल्या आहेत पण लांगुलचालन आणि स्वार्थी राजकारणामुळे त्याविरुद्ध पूर्वी कारवाई झाली नाही... आणि पूर्वानुभवावरून पाहता आताही ती होणारच नाही असा त्या लोकांचा ठाम समज झालेला होता... तो झालेल्या कारवाईने खोटा ठरला. इतके रामायण झाल्यावर आणि बाजू आपल्यावर उलटल्यावर कोणीही मीदोषी आहे असे म्हणेल काय ? उलट आपली कातडी बचावण्यासाठी "माझ्यासारखा घटनेचा पाईक मीच" असेच म्हणणार... कन्हैय्या तेच करत आहे. शेवटचा निर्णय कोर्टात केस पूर्णपणे चालल्यावरच येईल. पण, कन्हैय्याला जामीन देताना कोर्टाने वैद्यकीय परिभाषेत लिहिलेल्या काही टिप्पण्या पाहिल्या तर कोर्टापुढे कोणते व किती सबळ पुरावे ठेवले असावेत याचा काहिसा अंदाज (बिटविन द लाईन्स वाचल्यास) यायला हरकत नाही. बुद्धीला अजून काही खाद्य : सुरुवातीला अतीजोरात असलेला कनहैयामागचा राजकीय पाठींबा आता बर्‍याच अंशी गायब झाला आहे यामागे काय गुपीत असावे बरे ? (कम्युनिस्ट त्याला बंगालमधे नेऊ म्हणतात ते सोडा. तिथे कम्युनिस्टांची हालत इतकी खस्ता झाली आहे की तेथे जाणे कन्हैय्याचा राजकीय आत्मघात ठरेल !)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याच न्यायानं रोहित वेमुला प्रकरणात डॉ. राजश्रींची स्टेटमंटस बघितली तर बाईंनी धादांत खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत हे मान्य कराल का ? सुरुवातीला अतीजोरात असलेला कनहैयामागचा राजकीय पाठींबा आता बर्‍याच अंशी गायब झाला आहे यामागे काय गुपीत असावे बरे ? त्याचा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला तर त्याच्या वक्तव्यातला दुभंग लोकांसमोर येईल. पण दिलेला विडिओ आणि त्या नंतर झालेले त्याचे इंटरव्यूज पाहिले तर त्याचा विद्रोह सत्तेविरुद्ध आहे, देशाविरुद्ध नाही हे विदाऊट एनी इन बिटवीन लक्षात येतं. शिवाय न्यायालयानं त्याला जामिन दिला आहे आणि इतर आरोपींना तो मिळालेला नाही ही वस्तुस्थिती सुद्धा समोर आहेच.

In reply to by विवेक ठाकूर

छान. आवडला तुमचा प्रांजळपणा (हे खोचकपणे नाहीय) आता नविन (म्हंजे जुन्याच पण तुमच्यासमोर नविन) आलेल्या तथ्यानुसार तुमचे वरचे विचार परत एकदा मांडा.

In reply to by शलभ

"Sharma later showed me a pamphlet regarding the 'cultural event' on 'judicial killing of Afzal Guru' and said some of the students are organising this event today (February 9, 2016) at 5 pm at Sabarmati Dhaba," Zutshi has told the committee. हे तुमच्या नजरेतून सुटलं का ? आता शर्मा त्या कार्यक्रमाची परवानगी मागायला गेला होता का त्या विरोधात तक्रार करायला ? याची शहानिशा व्हायला हवी आणि मग निवाडा होऊ शकतो.

In reply to by विवेक ठाकूर

सुटलं नाही. पण शर्माचं objection असतं तर रजिस्ट्रार ने त्याचं पण नाव घेतलं असतं. शर्मा चुकला असेल तर त्यालाही आत घ्या. चुकीला माफी नाही. ते जाऊदे पण कन्हैयाचं चुकलं असं मान्य केलय तुम्हीच तर त्याविषयी बोला. तुम्ही प्रांजळ्पणा सोडू नका (एवढेच ह. घ्या ;))

ती कन्हैयाची चूक आहे हे मान्य म्हणुन काय देशद्रोह होतो का ? अजाणते पणी सरकारी स्कॉलरशिप वर राहुन कधी कधी बुध्दी भ्र्ष्ट होते माणसाची. जाऊद्या तो लहान आहे, विद्यार्थी आहे. अस म्हणणारे आता पुढे या.

In reply to by नितीनचंद्र

अजाणते पणी सरकारी स्कॉलरशिप वर राहुन कधी कधी बुध्दी भ्र्ष्ट होते माणसाची. >> काय हे? या वाक्याचा अर्थ काय?

या वाक्याचा अर्थ भारतात असहिष्णुता आहे. उगाचच विरोधी पक्षाच्या लोकांना तुरुंगात डांबण्यात येते असा तुम्ही लाऊ शकता.

कन्हैयाला अफजलगुरूबद्दल प्रश्न विचारल्यावर एखाद्या मुरलेल्या नेत्याप्रमाणे गोलगोल उत्तर देवून मोकळा होतो. बाकि सगळं चालू द्या ओ,मोदींना,संघाला,हिंदुत्ववादाला कितीही विरोध करा,पण त्याच्याआडून आपण भलतचं काहीतरी दुसरं करतोय हे समजण्याइतकी तरी बुद्धी आहे का त्या कन्हैयाला?

भाषण स्वातंत्र्याची ऐशीतैशी

Did you check facts before making the speech: JNU professor Makarand Paranjape asks Kanhaiya Kumar Makarand Paranjape, poet and professor of English at Jawaharlal Nehru University on Monday took on students union president Kanhaiya Kumar who is facing sedition charge, asking him whether he checked his facts before delivering the much celebrated speech. ..... "Do you know how many judicial murders were committed from 1920 to 1950s in Stalin s USSR. "Seven hundred and seventy nine ninety nine thousand five hundred and fifty three. Almost a million and how many people were executed for criminal and civil charges? Only 34000," he added. Paranjape was speaking at the Speak-in at the administration block, the 15th of the edition. What, however, stand out was that his speech was interrupted first by sloganeering by Kanhaiya Kumar and was also booed by some students in the audience, unlike other speakers who took a pro-Left position on the issue of Nationalism debate and Paranjape was also made to face questions from audience, again led by Kumar. Speaking amidst a gathering which was either neutral or pro-Left, Paranjape still took on Kumar s citing "misrepresentation" during his speech after his release from jail post the interim-bail.

In reply to by विकास

हेच लिहायला आलो होतो. आता हळूहळू या प्रकरणातील सत्य बाहेर येत आहे. विद्यापीठाच्या रजिस्ट्रॉरने दिलेल्या साक्षीवरून "आपल्याला अफझल गुरूवरील कार्यक्रमाची माहिती नव्हती" हा कन्हैय्याचा दावा खोटा ठरल्याचे दिसत आहे. सर्व प्रकार ठरवून केल्याचे स्पष्ट होत आहे.

विठांशी कन्हैयाबद्दलच्या बहुतेक मतांबाबत सहमत.

In reply to by साती

इथले विचारवंत काय विचार करतात याच खरंच नवल वाटतं. मुद्दा काय आणि चर्चा काय ! मी एक साधी गोष्ट सांगण्यासाठी ही पोस्ट टाकली होती की समता ही प्रत्येक सुजाण नागरिकाची, वैयक्तिक जवाबदारी सुद्धा आहे. आणि त्या संदर्भात कन्हैयाचे विचार अत्यंत योग्य आहेत. इथल्या मान्यवरांसकट सर्वांनी इतक्या साध्या गोष्टीला संपूर्ण राजकीय रंग फासून त्या संवेदनाशील विचारांची वाट लावली. कन्हैया दोषी आहे किंवा कसं हे न्यायालय ठरवेल पण त्याचे या विडिओत व्यक्त झालेले विचार अत्यंत मननीय आहेत. अत्यंत नादानपणे त्याला कम्युनिस्ट ठरवणं आणि मग त्या फ्रेममधून निष्कारण सिपीआयची कुंडली मांडणं, मग बिजेपी आणि शेवटी आपवर घसरणं हे फक्त एकच गोष्ट दर्शवतं ` वंचितांप्रती संवेदनाशीलता' हा लोकांना पक्षीय अजेंडा वाटतो. ती व्यक्तिगत जीवनात अनुसरायची गोष्ट होऊ शकते हे लक्षातच येत नाही. तस्मात, इंदिरा गांधी काय की मोदी काय की आणखी कुणी काय लोकांच्या या मानसिकतेचा कायम फायदा घेत राहातील आणि स्वतःचं कल्याण साधत राहातील. आणि वंचितांना शेवटपर्यंत वंचनाच मिळत राहील.

In reply to by विवेक ठाकूर

त्यंत नादानपणे त्याला कम्युनिस्ट ठरवणं आणि मग त्या फ्रेममधून निष्कारण सिपीआयची कुंडली मांडणं,
कमाल आहे. तो आणि त्याचे कुटुंबिय हे पूर्वीपासूनच कम्युनिस्ट आहेत. जो मुळातच कम्युनिस्ट आहे त्याला कम्युनिस्ट म्हणणे म्हणजे नादानपणा?

In reply to by विवेक ठाकूर

अत्यंत नादानपणे त्याला कम्युनिस्ट ठरवणं आणि मग त्या फ्रेममधून निष्कारण सिपीआयची कुंडली मांडणं कन्हैय्या कुमार All India Student Federation (AISF) चा नेता आहे आणि त्याच संघटनेच्या पाठिंब्यावर जनेविच्या विद्यार्थी संघटनेचा प्रेसिडेंट म्हणून निवडून आला आहे... आणि AISF is the student wing of the Communist Party of India (CPI), हे राजकारणासंबंधी जबाबदारीने बोलणार्‍या/लिहिणार्‍या निम्नस्तराच्या विद्यार्थ्यालाही जालावरून सहज पाहता येईल. विठाजी, निदान आपण ज्याची बाजू घेत आहोत... (अ) त्याचे स्वतःचे काय म्हणणे/मत आहे; (आ) त्याचा वर्तमान/भूतकाल कसा आहे/होता; (इ) तो कोणत्या संघटनांशी संलग्न आहे/होता; या गोष्टींचा थोडातरी अभ्यास असावा, याबाबत आपले काय म्हणणे आहे ? जालाच्या कृपेने असा अभ्यास अत्यंत सोपा झाला आहे आणि थोडे तारतम्य वापरले तर नीरक्षीरविवेक करून, तोंडघशी पडण्याचे टाळण्याजोगे, सबळ मुद्दे शोधणे फार कठीण नाही. असे असूनही, कल्पनेने तयार केलेले मुद्दे किंवा माध्यमांमधले सोईचे पण सबळ नसलेले मुद्दे वापरण्याच्या फ्याशनला तुमच्यासारखा विचारवंत सतत बळी पडत आहे, हे पाहून दु:ख होते. याशिवाय, अभ्यास न करता दिलेल्या माहितीत फार मूलभूत चुका निघाल्या तर, इतरांसाठी तुम्ही सतत वापरत असता ती नादान, इ सारखी शेलकी विषेशणे स्वतःवरच उलटतात, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीच म्हणा.

In reply to by अनुप ढेरे

ये जो आजकल नौटंकि हो रहा है ई सब केरळ और प.बंगाल के लिये हि हो रहा है. पुरस्कार वापसि एक दौर चला था...बिहार इलेक्सन कि बाद ऊ एकदम से खतम हुआ. वैसन हि इ नौटंकि भि खतम हो जायेगा.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

अहो मागच्या बिहार मधील निवडणुकीत कनैह्या बिहार मध्ये ७ ते ९ दिवस त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले होता , तेही त्याच्या गावात मोदी संघ विरोध करणारा कोणीही दिसला कि त्याच्या नावाने गळे काढताना आंजा वर त्याच्या संबंधी माहिती मिळावा अशी नम्र विनंती

एका प्रश्नाचं उत्तर हवंय बघा देता आलं तर द्या,स्पष्टीकरण नकोय उत्तर हवंय कन्हैय्या ने आज जेव्हा परांजपे वक्ता म्हणून बोलायला लागले तेव्हा तो घोषणा बाजी करून वारंवार अडथळे का आणत होता,आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांची खिल्ली का उडवली,नाही म्हणायला कन्हैया म्हणतोय ना आजच्या तरुणाई ला बोलू दिल जात नाही म्हणून म्हटलं तो बाकीच्यांना का बोलू देत नाही।त्याची बाजू घेणाऱ्यांनी ह्याच उत्तर दिलच पाहिजे अस नाही ,मौनव्रत धारण करू शकता

कन्हय्या उवाच--- भारतीय जवान काश्मीरात बलात्कार करतात अशा काही घटना नक्कीच झाल्या आहेत आणि संबंधित सैनिकांना शिक्षाही झाली आहे.पण सरसकट 'भारतीय जवान' काश्मीरात बलात्कार करतात असे हा नवा युगपुरूष बोलला आहे असे मटामधले वृत्त सांगते. काश्मीरात पूर आला होता तेव्हा भारतीय जवानांनीच काश्मीरातल्या लोकांना कशी मदत केली होती हे या हरामखोराला दिसले नाही का? काय संक्षी हीच का तुमच्या कन्हय्याची वास्तविकता आणि प्रांजळपणा? असल्या लोकांच्या आणि त्यांच्या पित्त्यांच्या कारवाया आणि इथेच मिपावर त्यांचे समर्थन करणारे लोक बघितले की खरोखरच तळपायाची आग मस्तकात जाते.

In reply to by तर्राट जोकर

बातमीचा विपर्यास कसा करावा याचा उत्तम नमुना म्हणजे ही क्लिप ! तो म्हणतोयं "मानवी हक्कभंगावर मी बोलीन, एफएसपीए (Armed Forces Special Powers Act) विरुद्ध बोलीन, सैनिकांचा सन्मान करुन सुद्धा म्हणीन की काश्मिरी महिलांवर सुरक्षादलांकडून बलात्कार केले जातात" आता खरंच बलात्कार होत असतील, आणि हे वर सदस्यानं कबूल केलंच आहे : अशा काही घटना नक्कीच झाल्या आहेत आणि संबंधित सैनिकांना शिक्षाही झाली आहे. पण सरसकट 'भारतीय जवान' काश्मीरात बलात्कार करतात असे हा नवा युगपुरूष बोलला आहे असे मटामधले वृत्त सांगते नीट ऐकलं तर वरच्या भाषणाचा `सरसकट' असा अर्थ होत नाही. आणि समतेतून दृष्टीनं बघितलं तर बलात्कार सैनिकानं केला तर तो सन्मान होत नाही. एकूणात झी न्यूजवाल्यांनी त्याच्या आधीच्या वाक्यांचा संदर्भ न घेता, (ह्युमन राइट्स आणि सैनिकांप्रती आदर), ऑट ऑफ काँटेक्स्ट बातमी भडकवली आहे.

In reply to by विवेक ठाकूर

-१ काहीही सपोर्ट करायच. खूपच खाली आलात तुम्ही तर.

In reply to by शलभ

ट्रुमन आणि शलभ, जवानांकडून होणार्‍या बलात्कारांबद्दल कन्हयाने काय बोलले असते तर नक्की योग्य असते? त्याने सारे के सारे असे म्हटलेले नाही. आता तुम्हाला त्याच्यावर गोली चालवायचीच असेल तर त्याला कुठलंही निमित्त पुरतं. हा सरसकट शब्द नको तिथेही घुसडल्या जातोय. अर्गुमेंट जिंकण्यसाठी व प्रतिपक्षाला हलकं दाखवण्यासाठी त्याने जनरलायझेशन केलंय असं म्हटले की झाले. मी इथे कन्हयाची बाजू घेत नाही. जवानांकडून बलात्कार होतात हे जर सत्य आहे तर आहे. आता एन्टोनीसारखे असे म्हणावे काय की जे बलात्कार करतात त्यांच्या अंगावर भारतीय वर्दी असते? इथे कोन म्हणतंय, काय म्हणतंय हे महत्त्वाचे की जी समस्या आहे त्यावर विचार करणे?

In reply to by तर्राट जोकर

यांच्यापैकी कोणीही बलात्कार केला तर तो गुन्हा आहे आणि त्याला शिक्षा - जी कायद्याने दिलेली आहे ती झालीच पाहिजे. पण भारतीय सैनिक काश्मीरमध्ये बलात्कार करतात असं जेव्हा तो म्हणतोय तेव्हा तो सरसकटीकरण जरी करत नसला तरी तो ज्या पद्धतीने हे म्हणतोय त्यावरून भारतीय सैनिक बलात्कार करतात आणि त्याबद्दल त्यांच्यावर काहीही कारवाई होत नाही, in other words, भारतीय सैन्य अशा गुन्ह्यांना पाठीशी घालतं असं सुचवू पाहतोय आणि त्याचा विरोध हा करायलाच पाहिजे कारण ते चुकीचं आहे. असा अर्थ तर नक्कीचनिघतोय. दुस-या शब्दांत सांगायचं तर तो बलात्कार करणाऱ्या सैनिकांबरोबर तिथल्या बाकीच्या सैन्यालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय. त्याचा विरोध हा करायलाच हवा. आणि जर कुणाला वाटत नसेल की त्याचा असा काही हेतू नाहीये तर १. तो माणूस खूप भाबडा आहे किंवा २. कन्हैयाचा भक्त झालेला आहे असंच म्हणायला पाहिजे.

In reply to by बोका-ए-आझम

जवानांकडून होणार्‍या बलात्कारांबद्दल कन्हयाने काय बोलले असते तर नक्की योग्य असते? >> ह्याचे उत्तर अपेक्षित होते.

In reply to by तर्राट जोकर

तजो संघर्षकाळात स्त्रीयांचे हाल हा असमर्थनीय पण ऐतिहासिक काळापासून चालत आलेला प्रकार आहे त्यावर टिका व्हावयास हवी युनाटेड नेशन्सच्या माध्यमातून या विषयावर काम होते आहे मी सुद्धा मिपावर या विषयावर मागे लिहिले आहे. पण केवळ भारतीय सैनिकांना वेगळे लक्षकरुन नव्हे, पाकीस्तानी सैनिकांचा इतिहासही अदर्श नाही बांग्लादेशला साडे नऊशे पाकीस्तानी सैनिकांवर युद्धकालीन गुन्ह्यांवर केस चालवणे बाकी आहे पाकीसानने ते सैनिक बांग्लादेशला सोपवावेत, -पाकीस्तानी सैनिकांबद्दल अजूनही यादी देता येईल, सौदी अरेबीयाच्या दुतावास अधिकार्‍यांचे स्त्री शोषणाचे भारत आणि तांझानिया देशाकडून कारवाईस राजनैतिक अपवाद मिळवला पण सौदी अरेबीयाने स्वतःच्या देशाच्या कायद्यानुसार कोणता खटला सौदी अरेबीयात चालवला ? इराक मधल्या चालू गोंधळात याझिदी स्त्रीयांची खरेदी विक्री आणि बलात्कार आणि असे अनेक विषय हवे तर मी यादी देतो कन्हैया किंवा त्याचे जेएनयुकर मार्गदर्शक प्राध्यापक काही बोलले का ? एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थनही करावयाचे नाही पण जेव्हा जे एन युतील अपवादामुळे सरसकट जे एन यु ला दोषी ठरवू नये असे तुम्हाला वाटते तसेच काही अपवादांवरून सर्व भारतीय सैन्यास दोषी धरून भारतीय सैन्याचे हकनाक सरसकटपणे प्रतिमा हनन करणारी विधाने आदर्श ठरतात किंवा कसे ?

In reply to by माहितगार

तुमचा पहिला परिच्छेद 'त्यांना का नाही सांगत' छाप वाटतो. तरी माध्यमांत आलेल्या बातमीनुसार कन्हया महिलादिनाच्या निमीत्त काढलेल्या रॅलीला संबोधित करतांना एकूण जगात दंगलींच्या काळात स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांबद्दल बोलत असतांना हे उद्गार काढलेत. त्यात रवांडा, आफ्रिका, गुजरात इत्यादी भागात झालेल्या अत्याचारांचा उल्लेख केला आहे. इथे फक्त गुजरातचाच संदर्भ देण्याचे कारण पुरेसं स्पष्ट आहे. ही इज अनदर ओवेसी इन डिस्गाईज ऑफ कम्युनिस्ट लीडर. सर्व भारतीय सैन्यास दोषी धरून भारतीय सैन्याचे हकनाक सरसकटपणे प्रतिमा हनन करणारी विधाने आदर्श ठरतात किंवा कसे ? >> अर्थात आदर्श नाहीतच.

In reply to by तर्राट जोकर

'त्यांना का नाही सांगत'
ऑफ कोर्स ! त्याने पाकीस्तानी सैनिकांबद्दलही बोलणे अगदीच गरजेचे आहे कारण काश्मिरचा प्रश्न रंगवण्यात पाकीस्तानचा हात आहे आणि पाकीस्तानचा हात स्वच्छ नाही -भारतीय सैनिकांच्या चुकांबद्दल कारवाई होते- तरीही केवळ भारतीय सैनिकांकडे कसे बोट दाखवता हे खडसावून त्याने विचारावयास नको होते ? स्वतःला प्रसिद्धी मिळाली की देश विरोधी तत्वांना आगीत तेल टाकण्यासाठी वापरू द्यायची ?

In reply to by माहितगार

The Armed Forces Special Powers Act अंतर्गत सेनेला मिळालेले अधिकार आणि त्याचा गैरवापर ह्याबद्दल गेल्या दोन दशकांपासून बरिच चर्चा सुरु आहे. त्यात कन्हयाने जे वाक्य आता बोलले आहे ते गेल्या दोन दशकापासून जिथे जिथे हा अ‍ॅक्ट लागू आहे तिथे तिथे बोलले गेले आहे. इरोम शर्मिला ह्याच कायदाविरूद्ध गेल्या पंधरा वर्षांपासून उपोषण करत आहे. २००४ मध्ये मणिपूरमधे स्त्रियांनी 'इंडियन आर्मी, रेप अस' असे फलक घेउन नग्न मोर्चा काढला होता. हे सर्व असत्य आहे काय? नाही. The Armed Forces Special Powers Act अंतर्गत सैनिकांना विशेष सुरक्षा प्रदान केली आहे, त्यांच्याविरूद्ध तक्रार होऊ शकत नाही (हे खरे आहे काय?) AFSPA चा गैरफायदा घेऊन काही सैनिक गैरव्यवहार करत असतील, त्यांच्या विरोधात सिलेक्टीवली मोर्चा न काढता सर्व इंडियन आर्मीच्या नावाने नग्न मोर्चा काढणार्‍या स्त्रियांना आपण काय म्हणाल?

In reply to by तर्राट जोकर

तक्रार होऊ शकत नाही (हे खरे आहे काय?)
पूर्णतः खरे नाही, खोट्या आरोपांपासून सुरक्षीत करणे एवढाच उद्देश -भारतात पोलीसदले राज्यसरकरच्या अखत्यारीत येतात उर्वरीत भारतात सैनिकांच्या सिव्हील ऑफेन्स करता पोलीस सैनिकास अटक करु शकतात पण जिथे अतिरेक्यांचा प्रभाव आहे तिथे पोलीसांचे नातेवाईकच किडनॅप करून किंवा अतिरेकी असलेल्या नातेवाईकास सोडवण्यासाठी सैनिकांवर खोटे आरोप लावण्याचे उद्योगही होऊ शकतात-, AFSPA सहसा वरीष्ठांची परवानगी लागत असावी आणि स्थानिक पोलीसांना केस करता येत नसली तरी कोर्टमार्शल पासून संरक्षण मिळणे कठीण असते- लगेच कारवाई नाही झाली तरी ती पुढे चालूनही होऊ शकते- ; वस्तुतः शक्यतो भारतीय सैन्य मुख्यत्वे अतिरेक्यांशी मुकाबला करण्यापुरते वापरले जाते अतिरेकी पकडल्या नंतर शक्यतोवर स्थानिक पोलीसांच्या स्वाधीन केले जातात. सैनिकांच्या चुकांचे सरसकट समर्थन केले जात नाही, सध्या भाजपातच कुणी माजी लष्कर प्रमुख मंत्रि आहेत ते स्वतःही समर्थन करत नाहीत कडक कारवाईची भूमिका घेतात, सध्याच्या भाजपा सरकारने काश्मिरात एक चुकीच्या गोळीबारीची चुक झाली तर लगोलग जाहीर माफी मागून कारवाई केल्याचे उदाहरण आहे. विदाऊट वॉरंट धाडी टाकण्याचे अधिकार सैनिकांना अतिरेक्यांच्या मुकाबला करण्याच्या दृष्टीने असतात, अशांत क्षेत्रात बाहेरच्या राज्यातील पोलीसदलातील महिला मोठ्या प्रमाणावर सैन्यात तात्पुरत्या भरतीवर वापराव्यात म्हणजे गैरवर्तन आणि गैरप्रसिद्धीचा वाव कमी होऊ शकेल. पण अतिरेक्यांशी लढण्याकरता पोलीसदले कमी पडत असतील तेव्हा तेव्हा सैन्याचा रोल येणे सहाजिक असावे.
नग्न मोर्चा काढणार्‍या स्त्रियांना आपण काय म्हणाल?
१) नग्न मोर्चा काढल्याने नग्न मोर्चा काढणार्‍याचे म्हणणे सिद्ध होते हा तर्क दोष आहे. २) नग्न मोर्चाकाढून काही सिद्ध होत असेल तर तेथिल अतिरेक्यां विरुद्धही काढावा एकीकडे अतिरेक्यांना संरक्षण द्यायचे आणि दुसरीकडे अपवाद पकडून सर्व सैन्याला बदनाम करावयाचे हे स्विकार्ह नाही हेच म्हणेन ३) उपोषणे आधी स्वतःच्या लोकांनी हिंसा करू नये म्हणून करावीत

In reply to by माहितगार

पूर्णतः खरे नाही, खोट्या आरोपांपासून सुरक्षीत करणे एवढाच उद्देश --- अतिरेकी पकडल्या नंतर शक्यतोवर स्थानिक पोलीसांच्या स्वाधीन केले जातात. >> आपली माहिती योग्य आहे पण अर्धवट आहे. अ‍ॅक्टमधली सर्व कलमे बघितली तर सैन्याला विशेष अधिकार आहेत हे स्पष्ट आहे. त्याविरूद्ध आंदोलने सुरु आहेत ती गैरवापराच्याबद्दलच आहेत. सैनिकांच्या चुकांचे सरसकट समर्थन केले जात नाही,-- उदाहरण आहे. >> इथे भाजपा सरकारचा विशेष उल्लेख करायची गरज नव्हती. सैन्याला विशेषाधिकार देण्याचा कायदा काँग्रेसकाळात झालाय. जिथे हे कायदे लागू आहेत ती सगळी ठिकाणे बरीच जुन्या वादाची आहेत. इथे कोणते सरकार आत्ता सत्तेत आहे त्याने काही फरक पडत नाही. किंवा आता मोदीसरकार आहे म्हणून ही आंदोलने गेल्या २० महिन्यांतच सुरु झाली आहेत असेही नाही. विदाऊट वॉरंट धाडी टाकण्याचे अधिकार----सहाजिक असावे. >> सुचवलेला उपाय रोगापेक्षा इलाज भयंकर अशा स्वरुपाचा आहे. १) २) ३) >> वरिल तीन्ही मुद्दे मला पटलेले नाहीत. तुम्ही नागा स्त्रियांना कांगावाखोर म्हणत आहात व भारतीय मानत नाही असे दिसते आहे. राजकिय मुद्द्यांमुळे सैनिक आणि सामान्य नागरिक दोहोंनाही हकनाक बळी पडावं लागतं. सैन्य सीमेवर (प्रत्यक्ष युद्ध नसतांना) रक्त सांडत असेल तर तो मला राजकिय नेतृत्वाचा (ते कोणत्याही पक्षाचे असो) पराभव वाटतो. सरकार आणि अतिरेकी यांच्यामधे सैनिक आणि नागरिक भरडले जातात. मला सैनिकाची जेवढी काळजी आहे तेवढीच सामान्य नागरिकाचीही आहे. कारण ह्या दोन्हींमुळे आपला देश बनतो. आपण आपल्या देशावर जेव्हा प्रेम करतो म्हणतो तेव्हा ते अशा देशवासीयांवर करतो असे अभिप्रेत असते. फक्त सैनिकांवर, जमिनीवर प्रेम म्हणजे देशप्रेम नाही. स्पेशल अ‍ॅक्ट अंतर्गत होणारे कथित अत्याचार यांची चर्चा खूप जुनी आहे. त्यात नवीन काहीच नाही. भारतीय सैन्याच्या नावाने खडे फोडणेही. हे सगळे प्रकरण खूप गुंतागुंतीचे व सामान्य नागरिकाच्या आकलनापलिकडे आहे. कन्हया जे बोलला ते काही नवीन, वेगळे नाही. पण मीडियाला हॉट टी आर पीसाठी बातमी अशीच बनवावी लागते की सामान्य नागरिक चटकन प्रक्षोभित होईल. "कन्हयाने कहा भारतीय सेना बलात्कारी" "कन्हयाका भारतीय सेनापर एक और सनसनीखेज आरोप" अशा ब्रेकिंग न्युज फिरवल्या जातील. अर्थात मोदीविरुद्ध उभ्या राहिलेल्या कन्हयाला हिरो मानायला लागलेल्या जनतेला तो कसा नालायक आहे हे पटवण्यासाठी असे डावपेच आवश्यक आहेत. पण मिसळपाववर अभ्यासू प्रतिसाद देणार्‍यांनी तरी माध्यमांचा बनाव समजून घ्यावा व कन्हयाला फुटेज देणे बंद करावे. कारण आता पुढे कन्हया पश्चिमेकडे पाय करुन झोपला तरी 'कन्हयाका रुझान पाकिस्तानकी ओर' अशीही ब्रेकिंग न्युज येईल. रच्याकने, कन्हया जेही बोलत आहे ते तद्दन परंपरागत भारतीय कम्युनिझम आहे. वर्षानुवर्षे ते एकाच प्रकारचे दळण दळतायत. नाविन्य एवढंच की ते आता आंबेडकरवादी चळवळीला फूस लावण्याचा प्रयत्न करत आहेत. कन्हया जे म्हणतोय ते कित्येक वर्ष म्हटलं जातंय तेव्हा आता फक्त कन्हया म्हणतोय म्हणून ते महत्त्वाचं झालंय की कसे हा प्रश्न व्यक्तिलक्ष तर्कदोषाचा आहे काय?

In reply to by माहितगार

दुसरे असे इथे स्पष्ट करावे वाटते की पुर्वोत्तर राज्यांमधे अशांतता नांदावी म्हणून चीन व काश्मिरात पाक बरेच प्रयत्न करत आहे हे सर्वज्ञात आहे. जसे जनमत प्रभावित करणे, अरिरेक्यांना मदत, इत्यादी. त्यामुळे सैन्याला विशेष अधिकार आवश्यक आहेत, ते काढुन घेऊ नये ह्याबद्दल माझे दुमत नाही. गैरवापराबद्दलच्या तक्रारींवर ताबडतोब चौकशी व कारवाई करणे हेही होत असेल असा विश्वास आहे. कश्मिरी जनता, पुर्वोत्तर जनता कशी विचार करते, जगते ह्याची अनुभूती आपण शांत शहरांमधे असलेल्या आपल्या वातानुकूलित खोल्यांमधे घेऊ शकत नाही, त्यामुळेच त्यांचे विखारी, विघटनवादी विचार आपल्याला खटकतात. वरच्या प्रतिसादात हे उल्लेख आवश्यक होते.

In reply to by तर्राट जोकर

अलिकडच्या पठाणकोण प्रसंगात टिका होऊनही अजित डोवालांनी सैन्यदल लगोलग उपलब्ध असूनही वापरण्याचे टाळले, अर्थात सैनिकी स्थळावर हल्ला झाला म्हणून डोवालांना तसे करता आले. अतिरेक्यां विरुद्ध लढण्यासाथी तयार केलेल्या सैनिक नसलेल्या दलांना पोलीस हा राज्यसरकारच्या अखत्यारीतला विभाग असल्यामुळे कठीण होते, काही अटींवर केंद्रसरकार कडे स्वतंत्र पोलीस दल आणि अतिरेकी विरोधी दल असण्याच्या अधिकारांसाठी घटनात्मक दुरुस्त्यांची गरज आहे, त्यासाठी असलेले राजकीय सहमती अजूनही होत नाही त्यामुळे केंद्र सरकारांची सैन्य दले सिव्हीलीअन एरीआत न वापरण्याची इच्छा असूनही त्यास मर्यादा येतात हे टिकाकार मंडळी लक्षात घेत नाहीत.

In reply to by तर्राट जोकर

एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थनही करावयाचे नाही हे सुद्धा मी माझ्या प्रतिसादातून लिहिले आहे त्याचा विसर पडावयास नको.

In reply to by तर्राट जोकर

प्रत्येक जण गुन्हेगार आहे आणि त्यातले काही जण सैनिक आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणाला असता तर १००% मान्य. बलात्कार करणारा माणूस काय व्यवसाय करतो याने फरक पडतो का? त्याने गुन्हा केलाय, तो गुन्हेगार आहे. त्या गुन्हेगाराचा व्यवसाय काय आहे हा मुद्दा त्याने जाणीवपूर्वक काढलेला आहे, कारण तिथे त्या व्यवसायाचा आणि त्या संस्थेचा (पक्षी: भारतीय सैनिक आणि भारतीय सैन्य)अपमान करायचा आणि त्यांना बदनाम करायचा हेतू आहे. नंदीग्राम आणि सिंगुर इथल्या संघर्षात अनेक कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनीही बलात्कार केले पण कम्युनिस्ट पक्षांना नावं ठेवली का कुणी? आणि ती ठेवणं चुकीचंच आहे. गुन्हा करणारा हाच त्याच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे, तो ज्या संघटनेचा सदस्य आहे त्यावर ताशेरे मारणं हा गंभीर प्रकार आहे. तरुण तेजपाल हेही त्या आरोपावरुन तुरुंगात आहेत. उद्या जर तो सिद्ध झाला तर भारतीय पत्रकार बलात्कार करतात असं म्हणू का आपण?

In reply to by बोका-ए-आझम

तुमच्या प्रत्येक शब्दाशी बिनशर्त सहमत. प्रश्नाचे उत्तर मिळाले, धन्यवाद. फक्त एक. प्रत्येक जण गुन्हेगार आहे आणि त्यातले काही जण सैनिक आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणाला असता तरी माध्यमांनी (इथे झी न्युज) वरचीच हेडलाईन वापरली असती की नाही?

In reply to by तर्राट जोकर

तो स्त्री पोलीसांची संख्या वाढवा स्त्री सैनिकांची संख्या वाढवण्याच्या गरजे बद्दलही बोलू शकला असता नाही का ?

In reply to by तर्राट जोकर

Distortion आणि manipulation हा वेगळ्या लेखमालेचा विषय आहे. विल्यम रँडाॅल्फ हर्स्ट हे अमेरिकन माध्यम क्षेत्राचे बादशहा. ते त्यांच्या वार्ताहराला म्हणाले होते - You give me photographs, I will give you war. आजकालची माध्यमं फार वेगळं वागत नाहीत. अर्थातच सन्माननीय अपवाद तिथेही आहेत पण आपल्या टीआरपीसाठी माहितीचं distortion, manipulation आणि gate keeping होतं हीदेखील वस्तुस्थिती आहे.

In reply to by तर्राट जोकर

माझा प्रश्नच वेगळा आहे. सध्याचं JNU मधील प्रकरण, त्यात काश्मीर च्या स्वतंत्रतेचा / अवैध कब्जाचा काही लोकांनी उचललेला मुद्दा या पार्श्वभूमीवर अशी वक्तव्ये करणे आगीत तेल ओतण्याचा प्रकार नाही का ? पार्श्वभूमी लक्षात न घेता या हे भाषण कसे बरोबर आहे हे म्हणणेच चूक आहे (भक्तिमार्गाला लागू नये हि विनंती) या माणसाचा खरोखर विभाजनवाद्यांना पाठींबा असेल व मत असेल कि भारत काश्मीरचा अवैध ताबा घेऊन आहे, तर या वक्तव्याचा त्याच्या अन्य समर्थकांमध्ये हि कल्पना दृढ बनण्यासाठी उपयोग होतो. वर "मी बोललो ते खोटे आहे का ?" असे बोलून हात झटकायला हा मोकळा. दुसऱ्या बाजूने या माणसाला एवढी हुशारी नाही त्याच्या मनात जे आलं ते हा बोलतोय (कदाचित जामीन देतानाच्या निर्णयातील सैन्य आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य याचे विधान आणि याच्या मनातील आधीपासूनची सैन्याबाबतची चीड). कोणत्याही बाबतीत हा माणूस फक्त त्याच्या नवसमर्थकांना तोंडघाशी पडतोय. (केजरीवालांच्या बाबतीत तोंडघाशी पडलेला एक)

In reply to by बोका-ए-आझम

कनैह्या चा दांभिंग पणा बघा त्याने काश्मीर चे उदाहरण दिले आफ्रिकन स्टडीज करतो म्हणून आफ्रिकेचे उदाहरण दिले मान्य मग काश्मीर पलीकडे बलुचिस्तान मध्ये मानवी हक्काचे हनन पाकिस्तानी सैन्य करते तेथे नागरिकांचे अपहरण खून बलात्कार करते त्याबदाल अवाक्षर नाही काश्मीर पलीकडचा पाकिस्तान तेथील महिलांचे मानवी हक्क ह्याबाबत कनैह्या बोलला नाही नसेल बोलायचे त्याला पाकिस्तान विरोधात त्यांची मर्जी