Skip to main content

कन्हैया कुमार : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

लेखक विवेक ठाकूर यांनी शनिवार, 05/03/2016 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतिही कटुता न बाळगता संयमितपणे, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती समर्पक उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. यापूर्वी त्याचा जेएनयू कँपसमधे बरखा दत्तनं घेतलेला इंटरव्यू तितकाच सादगीपूर्ण आहे. तो पाहिल्यावर त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस नायप्रविष्ट असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 70215
प्रतिक्रिया 362

प्रतिक्रिया

शेवटी कन्हैय्याने आपले प्राणांतिक उपोषण सोडले. हे काय? पाहिजे असलेली आझादी मिळाली वाटते? मग उपोषण कसे सोडले? की त्या ओ माय गॉड चित्रपटातील स्वामीप्रमाणे मोठ्या जोशात प्राणांतिक उपोषण सुरू तर केले पण त्याचा शून्य परिणाम होत आहे हे लक्षात आल्यामुळे अडचण झाली? तो चित्रपटच असल्यामुळे त्या स्वामीला संडासात लपून बटाटेवडे खाताना दाखवता आले.पण प्रत्यक्ष जीवनात अशा परिस्थितीत loss of face शिवाय माघार घेता येणे शक्य नसते. या कन्हैय्या कुमारबरोबर तेच झालेले दिसत आहे. याला अपेक्षित असलेल्या व्यवस्थेत अशांना एकतर डायरेक्ट वर पाठवले गेले असते नाहीतर गुलागमध्ये तर नक्कीच. किमानपक्षी असा दम भरला गेला असता की आयुष्यभर आझादी वगैरे पोपटपंची स्वप्नातही सुचली नसती.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्राणांतीक??अहो इथे प्राण जायची वेळ आली कन्हैय्या ची ह्या उपोषणाने। त्याच्या शिवाय सेक्युलर लोकांचा उद्धार कोण करणार म्हणून भारताच्या लोकशाही कड़े बघुन त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने?उपोषण सोडलय

In reply to by गॅरी ट्रुमन

शेवटी कन्हैय्याने आपले प्राणांतिक उपोषण सोडले.
डोंबलाचं प्राणांतिक उपोषण. २८ एप्रिलला उपोषण सुरू केल्यावर १ व २ मे ला हा विमानाच्या बिझनेस क्लासने बिहारमध्ये लालूचा आशिर्वाद घ्यायला गेला होता. ३ दिवस पोटात अन्नाचा कण न घेतलेला माणूस असा दोन दिवस हिंडू शकतो? विमानात याने भरपूर हादडलं असेलच. बिहारमध्येही पुख्खा झोडला असेल. तो काय उपाशीपोटी २ दिवस इकडेतिकडे हिंडत होता का? नंतर त्याला २ दिवसांपूर्वी म्हणे भरपूर उलट्या झाल्या. उलट्यांचं कारण लक्षात येतंय. आता इतर विद्यार्थी उपोषण करताहेत (१० दिवस उपाशी राहून हे अजून कसे उपोषण करताहेत खुदा जाने) आणि याने उपोषण सोडून दिले. आता उंडारायला आणि हमे चाहिए आजादी असं बरळायला मोकळा.

In reply to by सुबोध खरे

माघार घेणे चर्चिल , शिवाजीमहाराज व अडवानी यानाही टाळता आले नव्हते. कन्हैय्या तर छोटं बाळ आहे अजुन .

In reply to by श्री गावसेना प्रमुख

लघुशंका चारचौघात विद्यापीठातील रस्त्यावर सर्वांदेखत करायची नसते हे ज्याला कळत नाही तो लहान बाळच आहे की. लहान बाळ इकडेतिकडे मजेत हिंडत असते. प्रेशर आले की जिथे उभा आहे तिथेच उभ्याउभ्या लघुशंका करून मोकळे होते. बाळाला व बघणार्‍यांनाही त्याचे काही वाटत नाही. कन्हैयाने तसेच केले. त्याला स्वतःला त्याबद्दल खंत नाही व त्याच्या फॅनक्लबलाही त्यात काही चुकीचे वाटले नाही. विद्यापीठाया व्यवस्थापनाला त्यात काय चुकीचे वाटले कोण जाणे. लहान बाळच तो!

फर्स्टपोस्ट च्या फेकींग न्यूज विभागात गेल्या तीनचार महीन्यात कन्हैय्या बाळा बाबत बरेच रोचक एप्रिलफूल किस्से जमा झालेले दिसताहेत. गूगल दुवा

काश्मिरी दहशतवाद्याच्या समर्थनार्थ उमर खालीदची नवी फेसबुक विवादास्पद पोस्ट आल्याची बातमी आहे. 'सुडो-सेक्युलर' लोक सांशंकीतांच्या लंगड्या बाजू उचलण्याचे, नाही त्यांचे पाणी भरण्याचे उपद्व्याप का करतात कुणास ठाऊक. :(

In reply to by माहितगार

च्यायला, उमर खलिदने चे गव्हाराची विधानं सांगणे म्हणजे उंदराला मांजर साक्षी! तो चे गव्हारा एक नंबरचा हलकट आणि घाबरट माणूस होता, ते वेगळंच. -गा.पै.