छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके
एखादी कलाकृती किती संभाव्यता निर्माण करु शकते यावर तिची कालातीतता ठरते. आणि त्याचं एक अनोखं उदाहरण म्हणजे अमीर खुसरोचा हा क़लाम आहे : छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके !
मूळ क़लाम खाली दिलायं आणि त्याची अनेकानेक वेरिएशन्स एकेका दिग्गजानं आपल्या प्रतिभेनुसार केली आहेत.
अपनी छ्ब बनाइके जो मैं पी के पास गई
जो छब देखी पिहू की, तो अपनी भूल गई ।
इथूनच कल्ला सुरु होतो. कारण हा क़लाम सूफी़याना आहे. त्याला एका बाजूला संपूर्ण आध्यामिक रंग आहे आणि दुसर्या बाजूला इष्कबाजीचा तुफानी जल्लोष आहे.
प्रेससी स्वतःला सजवून सवरुन प्रियकराकडे गेली, पण जेंव्हा त्याचा चेहरा पाहिला तेंव्हा ती आपला चेहरा विसरुन गेली ! याचा सूफी़ अर्थ असा की प्रकृती तिचं सजवलेलं व्यक्तीमत्व घेऊन पुरुषाला भेटायला गेली आणि त्याचा कोणताही चेहरा नसलेली अनंतता पाहून त्यातच सामावून गेली. कशामुळे? तर केवळ त्याच्या एका नजर भेटीनं !
प्रियकराशी नजर भेट काय की दिगंत आकाशाशी नजर भेट काय, अंतीम परिणाम एकच : एकरुपता!
छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके
बात अगम केहे दीनी रे, मोसे नैना मिलाइके |
ही अगम बात दोतर्फा आहे. नजरेशी नजर मिळाल्यावर खरं तर बातच संपते, शब्दांचं कामच उरत नाही. एक अंगोपांग व्यापणारी शांतता उरते. त्या संवादाला खुसरो `अगम बात' म्हणतो ! शांततेचा शांततेशी झालेला अपूर्व संवाद.
प्रेम भटीका मधवा पिलाइके,
मतवाली कर लिनी रे, मोसे नैना मिलाइके |
नैनांशी नैन मिळायचा आवकाश, प्रेमाची मधुरता मतवाली करते. आणि ही गोष्ट सुद्धा दोन्ही प्रेमात एकसमान आहे. प्रेयसी मतवाली होते तसा साधकही मस्त होतो. ओशो म्हणतात : ` परमात्मा एक मैखाना है, जिसने उसे पिया, सदाके लिए मतवाला हो जाता है' |
गोरी गोरी बैंया, हरी हरी चुरियां
बैंया पकर हर लिनी रे, मोसे नैना मिलाइके |
प्रेयसीचे गोरे बाहू आणि हिरवा चुडा...त्यानं फक्त तिला बाहू धरुन स्वतःकडे ओढलं आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची सिमा संपली. हिरवा रंग प्रकृती दर्शवतो आणि गोरे बाहू तीच्या स्त्रीत्वाची साक्ष देतात. ज्या क्षणी प्रकृती पुरुषात मिसळते त्या क्षणी क़यामत ओढवते. एक अथांग निराकारता पुन्हा प्रकृतीच्या प्रकटीकरणाचा माहौल बनवते.
बल बल जाऊं मैं तोरे रंग रजवा
अपनीसी रंगदिनी रे, मोसे नैना मिलाइके |
प्रेयसी म्हणते, माझ्या रंगरसिया मी तुझ्यावर कुर्बान आहे कारण तुझ्या नजरेनं, तू मला तुझ्या रंगात रंगवून टाकलयंस! आध्यात्मिक अर्थानं, साधक जेंव्हा आकाशाला भेटतो तेंव्हा तो सुद्धा आकाश होऊन जातो. आकाशाचा आणि त्याचा रंग एक होतो.
खु़सरो निजा़मके बल बल जाइये
मोहे सुहागन किनी रे, मोसे नैना मिलाइके |
या ओळींना तर अनेक रंग लाभले आहेत. जी प्रेयसी स्वतःला प्रियकराप्रती समर्पित करते ती सुहागन होते. खरं तर ती स्वतःतून प्रियकराला आकारात बांधायचा प्रयत्न करते. आध्यात्मिक अर्थानं साधक स्वतःचं व्यक्तिमत्त्व संपवून, स्त्रैण अर्थानं सुहागन होतो आणि स्वतःलाच पुनर्जन्म देतो... तो द्विज होतो.
बात अगम केहे दीनी रे मोसे नैना मिलाइके |
____________________________________________________
ही अफाट रचना अबिदा परवीन आणि राहत फतेहअली खाननी अशी काय धमाल गायली आहे की तुम्ही केंव्हाही ऐका, ती तुम्हाला मस्त करेल. अबिदा स्वतः सूफी गायिका आहे आणि राहत, उस्ताद नुसरत फतेहअली खानचा पुतण्या आहे. सुफीज़ममधे प्रत्येक आवाज अल्लाचा आवाज मानला गेलायं त्यामुळे अबिदाच्या आवाजाला कसलंही बंधन नाही. तिचं गाणं संपूर्ण इश्वर शरण आहे त्यामुळे ती प्रकटीकरणाचं केवळ एक माध्यम बनून गाते. राहतचा आवाज त्याच्या नांवाला साजेसा म्हणजे हृदयाला शांत करणारा आहे. त्याच्या आवाजाचा गोडवा केवळ मिस्टिकल आहे. इस्लाममधे निराकाराला समर्पण ही एकमेव साधना मानली गेलीये. तस्मात, राहत जेंव्हा गातो तेंव्हा अनंत स्पेसमधे तो विलीन झालेला असतो, उरतो तो फक्त त्याच्या आवाजाचा गोडवा. त्यानं नुसतर साहेबांची गायकी सहीसही उचलून तिला स्वतःचा रंग देण्याचं असंभव काम केलंय.
एकीकडे अबिदाच्या खर्जाची अदिम दरी तर दुसरीकडे त्या दरीच्या अथांगतेला लिलया पार करणारं राहतच्या आवजाचं जीवघेणं चांदणं अशी ही अनोखी मैफिल जमलीये.
या दोघा दिग्गजांनी खु़सरोचा क़लाम आपल्या प्रतिभेनं रंगवलायं. त्यात नवी शायरी गुंफली आहे आणि ती सुद्धा तितकीच सहज पण दिलकश आहे.
इथे सगळी वेरिएशन्स देत नाही, तुम्हाला ती ऐकतांनाच मजा येईल पण हे एक कडवं कमाल आहे :
खुसरो रैन सुहागकी, जो मैं जागी पी के संग,
ऐसी बाजी़ प्रेमकी, जो मैं खेली पी के संग,
जीत गयी तो पिया मोरे, जो मैं हारी पी के संग |
काय कमाल अंदाज़ आहे शायरीचा. अशी सुहागरात जी मी प्रियकरा बरोबर जागवली. अशी प्रेमाची शर्त जी प्रियकराशी लावली...की मी जिंकले तर तू माझा आणि हरले तर मी तुझी!
छाप तिलक सब छीनी रे, मोसे नैना मिलाइके |
.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रकृती परमात्मा ओशो सूफियाना
मी तर अबिदा परवीनच्या मन
निगाह-ए-दरवाईशां ऐका...
सुंदर रसग्रहण!
मला समजलेला गाण्याचा अर्थ जरा
मोसे नैना मिलाइके !
अध्यात्म हे टेशन माझ्या
खुसरोचं काव्य स्त्रैण तर आहेच
आदूदादू, विठाकाका आध्यात्मिक
ते दोर मी केव्हाच कापून
तरीही किती चिकाटीने समजवतायेत
सर आपल ते....
विठांशी सहमत - बहुतांश सूफी
ह्या काव्याचा जनक खुसरो आहे हे माहीत नव्हतं
+१
हे गाणं अनेक गायकांनी अनेक वेळा गायलं आहे
//एखादी कलाकृती किती
हाहा!
चुकून 'रामोशान्' वाचलं =))
ते सुद्धा बरोबरच्च आसेल !
काय सुंदर कलाकृती आहे
+१
नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर
सहमत.. विठा तुमचा सूफी वर
थोडे धाडस
दुरुस्ती:कायाविरहित
+१
+१
+१
बात अगम केहे दीनी रे, मोसे नैना मिलाइके |
शब्द निर्देश अनुभवाचा करतात
जे लिहीतो तो माझा अनुभव आहे
हम्म पटतय
थोडक्यात*
सत्य एकच आहे, अभिव्यक्ती वेगवेगळ्या आहेत.
शब्दावर कुणाची मालकी नसते.
अगम-निगम
मस्त लेख आणि चर्चा. चांगली
माझ्याकडे एक असंच छापातिलक